चालू घडामोडी - १९ फेब्रुवारी २०१८

Date : 19 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शिवाजी महाराजांच्या भूमीवर कुठलेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण नाही -  नरेंद्र मोदी :
  • मुंबई - शिवाजी महाराजांच्या भूमीवर कुठलेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण नाही, असा विश्वास शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात संबोधित करताना व्यक्त केला. महाराष्ट्राचा होत असलेला विकास हा भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

  • ग्लोबल इन्वेस्टर समिट-मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले.  यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी देशाच्या वेगवान विकासासाठी आपल्या सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांचा उल्लेख केला.

  • त्यात गेल्या तीन वर्षांत 1400 अधिक निरुपयोगी कायदे संपवल्याचे आणि अर्थसंकल्पामधून ग्रामीण भागाच्या विकासासाठी घसघशीत आर्थिक तरतूद केल्याचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवर्जुन उल्लेख केला. सरकारच्या धोरणांमुळे  देशातील प्रत्येक घटक सशक्त होत आहे, असेही त्यांनी सांगितले.  

  • त्याआधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे मोदींनी उद्घाटन केले. त्यानंतर सभास्थळी उपस्थितांना मोदींनी संबोधित केले. मोदी म्हणाले, 2022पर्यंत नवी मुंबईचे चित्र पालटणार असून, हवाई वाहतूक, रस्ते वाहतुकीत मोठे बदल झालेले दिसतील. तसेच शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकासह सर्व महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होणार आहेत.  

बाबरी पाडायला गेले होते, आता राम मंदिर बांधायला जाणार - साध्वी प्रज्ञा सिंह :
  • औरंगाबाद : मी बाबरी पडायला गेले होते आणि लवकरच राम मंदिर बांधायला जाणार आहे, असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलं आहे. त्या औरंगाबादमध्ये  पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

  • सध्या देशात चांगलं काम सुरु असल्याचाही दावा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला. शिवाय, मला देश जे काम करायला लावेल ते मी करेन. देश हितासाठी काहीही करायची तयारी  आहे, असं म्हणत त्यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले.

  • आपण दुर्लक्षित नसल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसने षडयंत्र रचलं आणि तुरुंगात टाकल्याचा आरोप त्यांनी केला. साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी होत्या. त्याप्रकरणी त्यांनी काही वर्ष तुरुंगवासही भोगला. मात्र हे काँग्रेसचं षडयंत्र होतं, असा आरोप त्यांनी केला.

धक्कादायक! ‘दर चार तासाला एक बँक कर्मचारी घोटाळ्यासाठी पकडला जातो :
  • आपल्या देशात सध्या पीएनबी बँकेचा घोटाळा चांगलाच गाजतो आहे. नीरव मोदीने या बँकेला ११ हजार कोटींना चुना लावल्याची बातमी समोर येत असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अफरातफर, घोटाळा किंवा फसवणुकीसाठी दर चार तासाला एक बँक कर्मचारी पकडला जातो आणि त्याला शिक्षा होते ही माहिती रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या एका डेटानुसार समोर आली आहे.

  • १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत पब्लिक सेक्टरमधील बँकांच्या ५ हजार २०० कर्मचाऱ्यांना फसवणूक, घोटाळा, अफरातफर प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

  • आरबीआय च्या डेटानुसार अफरातफरीच्या किंवा घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या या कर्मचाऱ्यांना दंड आकारला गेला आणि त्यांना नोकरीवरून काढूनही टाकण्यात आले. सध्या आरबीआय एप्रिल २०१७ ते आत्तापर्यंत किती लोकांना अफरातफर किंवा घोटाळा प्रकरणी शिक्षा झाली याची माहिती गोळा करते आहे. सर्वाधिक फ्रॉड करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एसबीआयचे कर्मचारी पहिल्या क्रमांकावर आहेत. एसबीआयच्या १ हजार ५३८ कर्मचाऱ्यांवर घोटाळा किंवा अफरातफर प्रकरणात कारवाई झाली आहे.

  • एसबीआय पाठोपाठ इंडियन ओव्हरसीज, सेंट्रल ऑफ बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा क्रमांक लागतो. मात्र या बँकांच्या तुलनेत एसबीआयमध्ये घोटाळा केलेल्या कर्मचाऱ्यांचे तिप्पट आहे. 

राज्यात ७०,३२५ कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव :
  • मुंबई : महाराष्ट्रात ७० हजार ३२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव जगभरातील उद्योजकांनी दिले आहे. ५ लाख कोटी अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पंक्तीत जाण्याची क्षमता भारतामध्ये असून, त्यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा १ लाख कोटी डॉलरचा निश्चितपणे असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

  • राज्य सरकारच्या वतीने आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स’ या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, पीयूष गोयल, रामदास आठवले, प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानींसह देशविदेशातील प्रख्यात उद्योगपती मंचावर उपस्थित होते.

  • रिलायन्स: ६० हजार कोटींची गुंतवणूक -

  • पुणे-मुंबई २० मिनिटांत! - 

  • हायब्रीड, ई-वाहनांच्या सुट्या भागाचे उत्पादन - 

  • पोस्को उभारणार पोलाद कारखाना - (source : Lokmat)

२०१९ साली नवी मुंबईतून होणार विमान उड्डाण :
  • नवी मुंबई : स्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. मागच्या सरकारच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प २० वर्षे रखडला; परंतु आम्ही सत्तेवर येताच हा प्रश्न मार्गी लावला, असे सांगत २०१९ साली या विमानतळावरून पहिले विमान उड्डाण होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पायाभरणी आणि जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी उलवे येथे झाले. या प्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूनक व नौकानयनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पी. अशोक गजपती राजू उपस्थित होते. येत्या काळात देशातील बंदर विकास आणि जहाज बांधणीला प्राधान्य दिले जाणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

  • देशात आतापर्यंत एव्हिएशन पॉलिसी नव्हती. ती पॉलिसी आमच्या सरकारने तयार केली आहे. याअंतर्गत देशभरात आता लहान-मोठ्या १०० विमानतळांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी ९०० नवीन विमाने खरेदी केली जाणार आहेत.

  • पायात हवाई चप्पल घालणाºया सर्वसामान्य नागरिकालाही हवाई सफारी करता यावी, हे सरकारचे धोरण असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी या वेळी व्यक्त केले. वीस वर्षे रखडलेला विमानतळ प्रकल्प केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे मार्गी लागला. असे असले तरी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे योगदान मोठे असल्याचे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

पाकिस्तानकडून मोदींच्या नावे २.८६ लाखांचं बिल :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्तेत आल्यानंतर आतापर्यंत काही परदेश दौऱ्यांसाठी भारतीय वायूदलाच्या एअरक्राफ्टचा वापर केला. एअरक्राफ्टच्या वापरावर भारत सरकारने एकूण 2 कोटींचा खर्च केला. यात 2.86 लाख रुपयांचं बिल पाकिस्तानचं आहे .

  • परदेशी दौऱ्यांच्या दरम्यान ज्या ज्या वेळी पंतप्रधान मोदींचं एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या आकाशातून गेलं, त्या त्या वेळेचं नेव्हिगेशन चार्जेस पाकिस्तानने आकारले आहेत. हे नेव्हिगेशन चार्जेस 2.86 लाख रुपये एवढे आहेत.

  • निवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी यासंदर्भात आयटीआयमधून माहिती मागवली असता, त्यांना वरील माहिती मिळाली. जून 2016 पर्यंतची माहिती बात्रा यांना देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती वेळा एअर इंडियाऐवजी आयएएफच्या एअरक्राफ्टचा वापर केला आणि त्यावर किती खर्च झाला, हे जाणून घेण्याासाठी बात्रांनी आरटीआयद्वारे अर्ज केला होता.

  • बात्रांना मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी एकूण 11 परदेश दौरे आयएएफच्या एअरक्राफ्टने केले. यामध्ये नेपाळ, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, कतार, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, रशिया, इराण, फिजी आणि सिंगापूर या परदेश दौऱ्यांचा समावेश आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८७८: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले.

  • १८८४: यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.

  • १९४२: पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या.

  • २००३: तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

जन्म

  • १४७३: सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १५४३)

  • १६३०: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)

  • १८५९: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज स्वांते अर्‍हेनिअस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९२७)

  • १८९९: गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा जन्म.

  • १९०६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून १९७३)

  • १९१९: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९२)

  • १९२२: पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९९५)

  • १९६२: झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हॅना मंडलिकोव्हा यांचा जन्म.

मृत्यू

  • १८१८: पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन.

  • १९१५: थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन. (जन्म: ९ मे १८६६)

  • १९५६: प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य नरेन्द्र देव यांचे निधन.

  • १९५६: ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत केशव लक्ष्मण दफ्तरी यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८८०)

  • १९७८: गायक व संगीतकार पंकज मलिक यांचे निधन. (जन्म: १० मे १९०५)

  • १९९७: संगीतकार राम कदम यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९१८)

  • १९९७: सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९०४)

  • २००३: पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते अनंत मराठे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.