1. राजीव गांधी खेलरत्न : बजरंग पुनिया ( कुस्ती) आणि दीपा मलिक ( पॅरा अॅथलिट)
2. जीवनगौरव पुरस्कार : संजय भरद्वाज ( क्रिकेट), रंबीर सिंह खोक्कर ( कबड्डी), मेर्झबान पटेल ( हॉकी)
3. द्रोणाचार्य पुरस्कार : विमल कुमार ( बॅडमिंटन), मोहिंदर सिंह ढिल्लोन ( अॅथलिट), संदीप गुप्ता ( टेबल टेनिस)
4. अर्जुन पुरस्कार : रवींद्र जडेजा (क्रिकेट),अजय ठाकूर ( कबड्डी), गौरव सिंग गिल ( मोटर स्पोर्ट्स), पूनम यादव ( क्रिकेट), प्रमोद भगत ( पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), तजिंदरपालसिंह तूर ( अॅथलिट), मोहम्मद अनस याहीया ( अॅथलिट), एस भास्करन ( बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), चिंग्लेनसाना सिंह कंगुजान ( हॉकी), अंजुम मुदगील ( शूटींग), हरमित राजुल देसाई ( टेबल टेनिस), पूजा धांडा ( कुस्ती), सुंदर सिंग गुर्जर ( पॅरा अॅथलिट), बी साई प्रणित ( बॅडमिंटन), सिमरनसिंह शेरगिल ( पोलो), फॉदा मिर्झा ( इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू ( फुटबॉल), स्वप्ना बर्मन ( अॅथलिट)
5. ध्यानचंद पुरस्कार : मॅन्युएल फ्रेडीक्स ( हॉकी), अरुप बसाक ( टेबल टेनिस), मनोज कुमार ( कुस्ती), नितीन किर्तने ( टेनिस), सी. लाल्रेमसंगा ( तिरंदाजी)
न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडण्याआधी गुरुत्वाकर्षण अस्तित्वात होते. न्यूटनच्या आधी हजारो वर्षापूर्वी भारतातील हिंदू ग्रंथामध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीचा उल्लेख करण्यात आल्याचा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केला आहे. अॅटम आणि मॉलिक्यूलचा अविष्कार ऋषि प्रणव यांनी केल्याचा दावाही रमेश पोखरियाल यांनी केला आहे. शनिवारी दिल्लीमध्ये आरएसएसने आयोजित केलेल्या ज्ञानोत्सव कार्यक्रमात रमेश पोखरियाल बोलत होते. कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, योगगुरू रामदेव बाबा उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना रमेश पोखरियाल यांनी आयआयटी आणि एनआयटीला संस्कृत भाषेवर अभ्यास करण्याचा टास्क दिला आहे. संस्कृत ही जगातील एकमेव वैज्ञानिक भाषा असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. संस्कृत भाषेचे महत्व आपण सिद्ध करू शकलो नाही, त्यामुळे आपल्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. आयआयटी आणि एमआयटीच्या कुलगुरू आणि प्राचार्यांना यावर अभ्यास करण्याची विनंती करतो. त्यांनी संस्कृत भाषा वैज्ञानिक असल्याचे सिद्ध करावे.
संस्कृत ही जगातील एकमेव वैज्ञानिक भाषा आहे. जे बोलले जाते तेच या भाषेत लिहिले जाते. भविष्यात संगणकासाठी संस्कृत वापरली जाईल असे ‘नासा’नेही मान्य केले आहे. भविष्यात संगणक टिकणार असेल तर तो फक्त संस्कृतच्या आधारेच टिकू शकेल, असे भाकीतही मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी केले. जगाला अणू ही संकल्पना जगाला चरक ऋषींनी दिली. आपल्याकडे जे आहे ते आपण जगाला का सांगायचे नाही? आपली परंपरा आपणे पुढे नेली पाहिजे, असेही ते म्हणाले.
देशातील सर्वत उंच व्यक्ती अशी ओळख असलेल्या धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्याकडे मदत मागितली आहे. आर्थिक चणचण असल्याने उपचारासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी आदित्यनाथ यांच्याकडे केलीये.
8 फुट इतकी उंची असलेल्या 45 वर्षीय धर्मेंद्र यांना ‘हिप रिप्लेसमेंट सर्जरी’ करायची आहे. या शस्त्रक्रियेसाठी आठ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगता येऊ शकते. त्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे. पण, एवढी मोठी रक्कम आवाक्याबाहेर असल्याने त्यांनी थेट उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्यासाठी काल (17 ऑगस्ट) मुख्यमंत्री कार्यालयातही गेले होते.
मुख्यमंत्री तेथे नसल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. मुख्यमंत्र्यांशी भेट झाली नाही, पण त्यांच्या कार्यालयातून मदतीचं आश्वासन देण्यात आलं आहे अशी माहिती धर्मेंद्र यांनी दिली. “नवी दिल्लीमध्ये मला शस्त्रक्रिया करायचीये. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. जगभरातून विविध लोकं माझ्यावर डॉक्युमेंट्री बनविण्यासाठी येतात. त्यामुळे सरकारने थोडाफार विचार करुन मला मदत करावी” असं धर्मेंद्र वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हणाले.
उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये राहणा-या धमेंद्र यांच्या नावाची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. भारतातील सर्वात उंच व्यक्ती असलेल्या धर्मेंद्र सिंह यांच्यासाठी त्यांची उंचीच आता समस्या बनली आहे. उंची जास्त असल्याने त्यांना सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी तीन तलाकवरून विरोधकांवर जोरदार टीका केली. व्होट बँकेसाठी तीन तलाक विधेयकाला काँग्रेसने विरोध केला असल्याचे सांगत त्यांनी या निर्णयामुळे मुस्लीम महिलांना त्यांचा हक्क मिळाला असल्याचे म्हटले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सराकरच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आल्याने त्यांचा समाजसुधारकांमध्ये समावेश झाला असल्याचेही गृहमंत्री शाह यांनी म्हटले.
काँग्रेसने तुष्टीकरणासाठी या विधेयकास विरोध केल्याचे सांगत, गृहमंत्री शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात २५ पेक्षा जास्त ऐतिहासीक निर्णय घेऊन देशाची दिशा बदलण्याचे काम केले आहे. ही मोदींच्या नेतृत्वाची कमाल आहे. तीन तलाक संपुष्टात आणने केवळ मुस्लीम समाजाच्या फायद्याचे आहे. एका सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेनुसार, देशातील ९२ टक्के मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकपासून मुक्ती हवी होती.
आज जर आम्ही हे विधेयक मांडले नसते तर जगासमोर भारतीय लोकशाहीवरील हा एक ठपका असला असता. यासाठी मुस्लीम भगीनींनी मोठा लढा दिला. शाह बानोला तीन तलाक दिला गेला तर त्यांनी आपली लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली. काही पक्षांना त्यांच्या व्होट बँकेची चिंता होती यासाठी त्यांनी या विधेयकास विरोध केला. तर संसदेत विरोध दर्शवला मात्र त्यांना माहिती होते की हा अन्याय आहे, ज्याला संपुष्टात आणने आवश्यक आहे. मात्र तरी देखील त्यांच्याकडे सरकारच्या निर्णयाला पाठींबा देण्याचे धैर्य नव्हते.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या अनुच्छेद ३७० च्या तरतुदी रद्द करणाऱ्या राष्ट्रपतींच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका माजी संरक्षण अधिकारी व नोकरशहा यांच्या एका गटाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
गृहमंत्रालयाने २०१०-११ साली जम्मू- काश्मीरसाठी नेमलेल्या संवादकांच्या गटातील सदस्य प्रा. राधा कुमार, जम्मू- काश्मीर कॅडरचे माजी सनदी अधिकारी हिंडल हैदर तय्यबजी, एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) कपिल काक, मेजर जनरल (निवृत्त) अशोक कुमार मेहता, पंजाब कॅडरचे माजी सनदी अधिकारी अमिताभ पांडे आणि २०११ साली केंद्रीय गृहसचिव म्हणून निवृत्त झालेले केरळ कॅडरचे माजी सनदी अधिकारी गोपाल पिल्ले यांनी ही याचिका केली आहे.
राष्ट्रपतींनी ५ ऑगस्टला जारी केलेला आदेश ‘बेकायदेशीर, निर्थक व अप्रभावी’ असल्याचे न्यायालयाने जाहीर करावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. शिवाय या राज्याचा दर्जा घटवून केंद्रशासित प्रदेशाचा करण्यात आल्यामुळे आणि त्याचा काही भाग लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी वेगळा करण्यात आल्यामुळे राज्य विखंडित झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत जम्मू व काश्मीरच्या लोकांचे काहीच म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही, असा आक्षेप याचिकेत मांडला आहे.
महत्वाच्या घटना
१८५६: गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट.
१९०९: इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत.
१९१९: अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९४५: होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
१९९१: सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
१९९९: बेल ग्रेड, युगोस्लाव्हियात हजारो सर्बियन लोकांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन.
जन्म
१८७१: विल्बर राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राइट यांचा जन्म. (मृत्यू: ३० जानेवारी १९४८)
१८७८: फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष मनुएल क्वेझोन यांचा जन्म.
१८८३: पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष जोसेमेंडेस काबेसादास यांचा जन्म.
१८८३: चॅनेल कंपनी चे संस्थापिका कोको चॅनेल यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९७१)
१८८६: स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९३५)
१८८७: भारतीय वकील आणि राजकारणी एस. सत्यमूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४३)
१९०३: लेखक चरित्रकार गंगाधरदेवराव खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)
१९०७: केंद्रीय मंत्री सरदारस्वर्ण सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९४)
१९०७: भारतीय इतिहासकार, लेखक, आणि विद्वान हजारी प्रसाद द्विवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९७९)
१९१३: भारतीय-इंग्लिश सैनिक व लेखक पीटर केम्प यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९३)
१९१८: भारताचे ९वे राष्ट्रपती आणि ८वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)
१९२१: स्टार ट्रेक कथानकाचे निर्माते जीन रॉडेनबेरी यांचा जन्म.
१९२२: मराठी गायक बबनराव नावडीकर यांचा जन्म.
१९४६: अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा जन्म.
१९६७: भारतीय आध्यात्मिक नेते खांड्रो रिनपोछे यांचा जन्म.
मृत्यू
१४९३: पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक (तिसरा) यांचे निधन.
१६६२: फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ ब्लेझ पास्कल यांचे निधन. (जन्म: १९ जून १६२३)
१९५४: इटलीचे पंतप्रधान ऍल्सिदेदि गॅस्पेरी यांचे निधन.
१९४७: अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९०६)
१९७५: शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)
१९९०: पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक रा. के. लेले यांचे निधन.
१९९३: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९२९)
१९९३: निर्भिड पत्रकार य. द. लोकुरकर यांचे निधन.
१९९४: रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते लिनसकार्ल पॉलिंग यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९०१)
२०००: भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक बिनेंश्वर ब्रह्मा यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४८)
२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.