चालू घडामोडी - १९ एप्रिल २०१७

Date : 19 April, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
उत्तर प्रदेशात ४१ सनदी अधिका-यांच्या बदल्या - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
  • उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने ४१ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्यातील सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्याची ही दुसरी वेळ असून याआधी गेल्या आठवड्यात २०रिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. 

  • डॉ. प्रभात कुमार यांच्याकडे ग्रेटर नोएडा आणि यमुना प्राधिकरणच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इलाहाबादचे आयुक्त राजन शुक्ला यांची नागरिक सुरक्षा आणि राजकीय संघटना पेन्शन विभागात नेमणूक केली आहे.

  • डॉ. आशिष कुमार गोयल यांच्याकडे इलाहाबाद आयुक्तपदाची जबाबदारी दिली आहे.

  • आग्राचे आयुक्त चंद्रकांत यांची राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव म्हणून नेमणूक केली आहे. झाशीचे आयुक्त राममोहन राव यांची आग्राच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, झाशीच्या आयुक्तपदी अमित गुप्ता यांची नेमणूक करण्यात आली. 

विजय माल्ल्याला भारतात आणणं अवघड - उज्ज्वल निकम
  •  भारतातील बँकांचे जवळपास ९ हजार कोटी रुपये बुडवून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या लंडनमध्ये आहे. विजय मल्ल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी आज अटक केली होती, मात्र काही वेळातच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. 

  • ''विजय माल्ल्या याला गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार भारतात आणणे अवघड आहे. तेथील न्यायालयात आपल्या तपास यंत्रणेचे  पुरावे टिकत नाहीत, तिथला गुन्हेगार हस्तांतरण  कायदा किचकट आहे. 

मुस्लिम नेत्याने सोनू निगमविरोधात जारी केला फतवा
  • गायक सोनू निगम यांनी धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे. शिवाय, सोनू निगम हे निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे वागत आहे, अशी टीका कादरी यांनी सोनू निगमवर केली आहे. 

  • एवढंच नाही तर सोनूला जुन्या चपलांचा हार घालणा-या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली आहे. 

  • बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने १७ एप्रिल रोजी अजानसंदर्भात केलेल्या ट्विटचा वाद संपुष्टात येण्याऐवजी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण मुस्लिम नेता आणि पश्चिम बंगालचे अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमविरोधात फतवा काढला.

चीन-पाक कॉरिडॉरचा काश्मीर मुद्द्याशी थेट संबंध नाही - चीन
  • चीन-पाकिस्तान(सीपीईसी)च्या आर्थिक कॉरिडॉरचा काश्मीर मुद्द्याशी कोणताही थेट संबंध नसल्याचा खुलासा चीननं केला असून भारतानं वन बेल्ट-वन रोड (OBOR) या प्रकल्पात सहभागी व्हावं, असं आवाहन चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग यांनी केलं आहे.

  • भारताबाबत नेहमीच आक्रस्ताळी भूमिका घेणा-या चीननं पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

  • चीनचे OBOR या प्रोजेक्टसाठी 14 ते 15 मे रोजी समीट होणार आहे. OBOR हा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. 

  • चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले, OBOR समीटमध्ये भारताचा कोणताही नेता उपस्थित राहणार नाही. मात्र भारताला पाहिजे असल्यास ते स्वतःचा प्रतिनिधी पाठवू शकतात.

भारतातील आयटी क्षेत्राला धक्का, अमेरिकेच्या एच १ बी व्हिसात बदल
  • भारतातील आयटी तज्ज्ञांमध्ये अमेरिकेतील एच १ बी व्हिसा प्रसिद्ध असून ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारात एच १ बी व्हिसा नियमात बदल करुन अमेरिकन तरुणांना नोकरीत प्राधान्य मिळेल यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले होते. 

  • अध्यादेश लागू झाल्याने आता अमेरिकेत आयटी कंपन्यांना नोकरी देताना स्थानिक तरुणांनाच प्राधान्य द्यावे लागणार आहे. नवीन धोरणानुसार जास्त वेतन असलेल्या व कुशल कर्मचाऱ्यांनाच अमेरिकेतील एच १ बी व्हिसा दिला जाणार आहे.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयटी कंपन्यांना जोरदार दणका देत ‘बाय अमेरिकन हायर अमेरिकन’ या अध्यादेशावर स्वाक्षरी केली.

  • २०१८ या वर्षांत ६५, ००० एच १ बी व्हिसासाठी १,९९, ००० अर्ज आले आहेत.

दिनविशेष

जन्म, वाढदिवस

  • पीटर दी नरोन्हा, भारतीय उद्योगपती : १९ एप्रिल १८९७

  • मालती पांडे, सुप्रसिद्ध गायिका : १९ एप्रिल १९३०

  • विल्फ्रीड मार्टेन्स, बेल्जियमचा पंतप्रधान : १९ एप्रिल १९३६

  • मुकेश अंबानी सुप्रसिद्ध उद्योगपती : १९ एप्रिल १९५७

  • अर्शद वारसी हिंदी चित्रपट अभिनेता : १९ एप्रिल १९६८

  • जेसन गिलेस्पी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू : १९ एप्रिल १९७५

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • रॉबर्ट तिसरा, स्कॉटलंडचा राजा : १९ एप्रिल १३९०

  • क्रिस्टीना, स्वीडनची राणी : १९ एप्रिल १६८९

  • बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान : १९ एप्रिल १८८१

  • अनंत लक्ष्मण कान्हेरे क्रांतिकारक : १९ एप्रिल १९१०

क्रांतिकारक मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक : १९ एप्रिल १९१० 

  • विनायक नारायण देशपांडे, क्रांतिकारक : १९ एप्रिल १९१०

  • अयुब खान, पाकिस्तानचा पंतप्रधान : १९ एप्रिल १९७४

ठळक घटना

  • कॅनडातील टोरोंटो शहर आगीत भस्मसात : १९ एप्रिल १९०४

  • रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित अंतराळस्थानक सॅल्युत १चे प्रक्षेपण केले : १९ एप्रिल १९७१

  • भारताचा पहिला उपग्रह : १९ एप्रिल १९७५

  • आर्यभट्ट याचे प्रक्षेपण आर्यभट्ट : १९ एप्रिल १९७५

  • यु.एस.एस. आयोवा या अमेरिकेच्या युद्धनौकेवर स्फोट. ४७ ठार : १९ एप्रिल १९८९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.