लालबागमधील गुरुकुल या संस्थेत चित्रकलेचे धडे गिरविणा-या या बालचित्रकाराने हा सन्मान पटकाविल्याने लालबाग-परळवासीयांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लालबाग परळमधील अवघ्या १३ वर्षांच्या दूर्वांकाने जपान येथील आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
जपानच्या जपान क्वॉलिटी अॅश्युरन्स आॅर्गनायझेशन इंटरनॅशनल एन्व्हायर्नमेंटल चिल्ड्रेन्स ड्रॉइंग कॉन्टेस्ट ही स्पर्धा गेली १४ वर्षे होते आहे. या स्पर्धेत यंदा ‘आम्ही आमच्या सुंदर जगाचा भाग आहोत’ असा विषय होता.
या स्पर्धेत गुरुकुलच्या १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ९६ देशांतील १७ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याने ही बालचित्रकारांची स्पर्धा अतिशय चुरशीची झाली होती.
स्पर्धेच्या स्वरूपाप्रमाणे १७ हजार स्पर्धकांपैकी केवळ ६० जणांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून या ६० विद्यार्थ्यांमध्ये गुरुकुलच्या दूर्वांका मनिष सुरती या चिमुरडीचा समावेश आहे.
चित्रात पृथ्वीवर प्राणी, पक्षी, वृक्ष, नद्या यांच्यासह बालके आनंदात राहत असल्याचे दाखविले असून यापूर्वीही संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत पारितोषिके पटकावली आहेत.
परिषदेचे पहिले संमेलन लोणावळा येथे होणार असून, याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांची सन्मानाने निवड करण्यात आली आहे.
बालकुमार साहित्य संस्थेतील अंतर्गत वादामुळे गेली तीन वर्षे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन होऊ शकले नाही, त्यामुळे आता महाराष्ट्र साहित्य परिषदेनेच बालकुमार साहित्य संमेलन भरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
लोणावळ्यातील मनःशक्ती प्रयोग केंद्राच्या सहकार्याने हे एकदिवसीय साहित्य संमेलन २० सप्टेंबर रोजी होणार आहे.
समेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने होणार असून, त्यात शाळांमधील सातशे विद्यार्थी सहभागी होणार आहेततसेच या वेळी 'मराठी अभिमान गीत' शालेय विद्यार्थी सादर करतील, त्यानंतर उद्घाटन सत्रात डॉ. अवचट बालकुमारांशी संवाद साधणार आहेत.
विद्यापीठाकडून ५ अभ्यासक्रमांचे निकाल बाकीच असल्यामुळे, हे निकाल आता लागणार तरी कधी, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात असून तसेच उत्तरपत्रिकांच्या झालेल्या सरमिसळीतून विद्यापीठ आता काय मार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई विद्यापीठ युद्धपातळीवर निकालाचे काम करत आहे, पण अजूनही विद्यापीठाला सगळ्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात यश आलेले नाही.
मुंबई विद्यापीठाने आतापर्यंत ४७२ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत, त्यामध्येही आयडॉलच्या निकालांमध्ये अधिक गोंधळ झाले आहेत, तर दुसरीकडे विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या निकालांमध्येही चुका झाल्या आहेत.
निकाल लागूनही विद्यार्थ्यांची सुटका झालेली नाही. त्यामुळे आतापर्यंत विद्यापीठाकडे ५० हजारांहून अधिक उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी आल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाने शनिवारी रात्री उशिरा एमकॉमच्या तिसºया सत्राचा निकाल जाहीर केला असून १ हजार ४७० विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रयोगशाळेतून एकदा नव्हे, तर दोन वेळा पळून गेलेल्या बुद्धिमान यंत्रमानवाने (रोबो) रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना तर ओळखलेच व स्वत:ची खूप उत्साहाने ओळखही करून दिली.
रशियातील पर्ममध्ये माहिती व तंत्रज्ञान प्रदर्शनाला पुतीन यांनी भेट दिली असून त्या वेळी रोबो प्रोमोबोट-पुतीन भेट झाली, रशियाची सिलिकॉन व्हॅली म्हणून पर्मची ख्याती आहे.
मोठे डोळे असलेल्या या रोबोची निर्मिती रशियाने केली असून मार्गदर्शक (गाइड), मॉडेल आणि एखाद्या उत्पादनाचा विक्रेता म्हणून प्रोमोबोटचा उपयोग होतो.
सार्वजनिक जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहितीही हा रोबो स्वत:कडे ठेवतो. गेल्या वर्षी या रोबोने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
नंतर या रोबोला मॉस्कोतील राजकीय मेळाव्यात अटक करण्यात आली असून तेथे तो रशियन संसदेचे उमेदवार व्हॅलेरी कालाचेव्ह यांना पाठिंबा देत होता.
उमेदवाराच्या गटाकडून प्रक्रिया आणि विश्लेषण करण्यासाठी हा रोबो मतदारांची अनेक विषयांवरील मत-मतांतरे नोंदवून (रेकॉर्ड) घेत असल्याची खात्री पटल्यानंतर, लोकप्रतिनिधीने पोलिसांना बोलाविले होते.
ज्या भारतीय भाषांसाठी गुगल ट्रान्सलेट अॅपची सेवा सुरू केली आहे, त्यात बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामिळ, तेलुगु व उर्दू या भाषांचा समावेश आहे.
सर्च इंजिन गुगलने अनुवादाच्या अॅपमध्ये आणखी सात भारतीय भाषांचा समावेश केला असून गुगल ट्रान्सलेटमध्ये आता मराठी, बंगाली व उर्दूसह सात आणखी भाषा असतील.
अॅण्ड्रॉइड व आयओएस स्मार्टफोनमध्ये या अॅपचा उपयोग करता येईल, ही सुविधा आॅफलाइनही असणार म्हणजेच इंटरनेट नसतानाही या फिचरचा उपयोग केला जाऊ शकतो.
यासाठी कॅमेरा त्या मजकुराच्या प्रतिमेवर ठेवावा लागेल, या अॅपद्वारे एखाद्या भाषेतील छापील मजकुराचाही अनुवाद करता येईल मात्र, हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे.
अनुवाद फोनच्या स्क्रीनवर पाहता येईल उदाहरणार्थ, रस्त्यांवरील इंग्रजीतील बोर्डाचा मजकूर या अॅपच्या माध्यमातून हिंदी व अन्य भाषेत दिसू लागेल.
जागतिक दिवस
वरिष्ठ नागरिक आदर दिन : जपान.
जन्म /वाढदिवस
शबाना आझमी, सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री : १८ सप्टेंबर १९५०
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदि
शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक : १८ सप्टेंबर २००२
डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक : १८ सप्टेंबर २००४
ठळक घटना
आयकानची स्थापना : १८ सप्टेंबर १९९८
पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून घेतल्यावर जनरल परवेझ मुशर्रफने लश्करप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले : १८ सप्टेंबर २००७
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.