चालू घडामोडी - १८ जुलै २०१७

Date : 18 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रामनाथ कोविंद यांचे पारडे जड :
  • भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी संसद भवनात सोमवारी ९९ टक्के मतदान झाले असून एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांच्यात सरळ लढत आहे.

  • उद्या दिल्लीत सर्व राज्यांतील मतपेट्या आणल्या जातील आणि मतमोजणी २० जुलैला होईल, त्यानंतर देशाचे १४ वे राष्ट्रपती कोण असतील हे जाहीर होईल.

  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाल २४ जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी २० जुलै रोजीच नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे नाव जाहीर होईल.

  • एनडीएकडे तब्बल ६३ टक्के मतांचे पाठबळ असल्याने रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपा नेत्यांनी तसा दावाच केला आहे.

  • संसद भवनात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. पंतप्रधान मोदी संसद भवनात मतदानासाठी वेळेपूर्वीच उपस्थित होते.

ठाण्यामध्ये उभारणार दुसरे कृषी समृद्धी केंद्र :
  • मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टाऊनशिपनंतर, आता कल्याण तालुक्यातही एक कृषी समृद्धी केंद्र म्हणजेच टाऊनशिप रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केले आहे.

  • केंद्र कल्याण तालुक्यातील मौजे नाडगाव, पितांबरे, चिंचवली, उटणे, आंबिवली तर्फे वासुंद्री येथे उभारण्यात येणार असून याबाबत, स्थानिकांकडून नगरविकास विभागाने आता हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.

  • राज्यातील १० जिल्ह्यांना छेदून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन संपादनास असणारा शेतकऱ्यांचा विरोध डावलून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हातात हात घेऊन, नगरविकास विभागाने या मार्गावरील प्रस्तावित २४ समृद्धी केंद्रे अर्थात, टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत बनू शकतो मोठी महासत्ता, चीनी प्रसारमाध्यमांचे भाकीत :
  • सिक्कीम जवळील डोकलाम येथे सैन्यामध्ये झालेल्या झटापटीनंतर भारत आणि चीनमधील तणाव वाढत आहे. तणावाच्या परिस्थितीत चीनी प्रसारमाध्यमे भारतावर कठोर भाषेत टीका करून आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत.

  • भारतात करण्यात आलेल्या करसुधारणेचे  ग्लोबल टाइम्समधील लेखातून कौतुक करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या परकीय गुंतवणुकीमुळे जागतिक महासत्ता बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे.

  • परदेशी उत्पादक भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.  भारतात होत असलेल्या सुधारणा आणि प्रयत्नांमुळे गुंतवणुकदारांना भारतातील आपले भवितव्य सुरक्षित वाटत आहे. 

  • परदेशी गुंतवणुकीच्या मॉडेलचे अनुकरण करून चीनला यश मिळाले होते, आता भारतही त्याच वाटेवरून चालत आहे.

व्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार :
  • राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

  • दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली.

  • व्यंकय्या नायडू यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. त्यामुळे एनडीएतील सर्व घटकपक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, असे शहा यांनी सांगितले.

  • तसेच यावेळी अमित शहा यांनी नायडू यांच्या राजकीय कारकीर्दीचा नव्याने परिचयही करून दिला.

अमेरिकेत उत्पादन केंद्र सुरु करणारी पहिली भारतीय कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा' :
  • महिंद्रा अँड महिंद्राने अमेरिकेत १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कंपनीच्या अमेरिकेतील उत्पादन केंद्रामुळे ३ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

  • देशातील मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेली महिंद्रा अँड महिंद्रा वर्षभरात अमेरिकेत पहिले उत्पादन केंद्र सुरु करणार आहे.

  • कंपनीकडून अमेरिकेतील उत्पादन केंद्रात ऑफ रोड वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. या वाहनांचे डिझाईन कंपनीच्या उत्तर अमेरिकेतील तंत्रज्ञान केंद्रात तयार केले जाणार आहे.

  • अमेरिकेत उत्पादन केंद्र सुरु करणारी महिंद्रा अँड महिंद्रा पहिलीच भारतीय कंपनी ठरणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा वर्षभरात डेट्रॉयटमध्ये उत्पादन केंद्र सुरु करणार आहे.

आफ्रिकेचा दणदणीत विजय
  • दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवताना इंग्लंडला ३४० धावांनी लोळवले. या शानदार विजयासह आफ्रिकेने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. 

  • पाहुण्या आफ्रिका संघाने भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान इंग्लंडला नांगी टाकण्यास प्रवृत्त केले. सामन्याच्या चौथ्याच दिवशी आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव जवळपास निश्चित केला होता.

  • आफ्रिकेने दिलेल्या ४७४ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव केवळ १३३ धावांत संपुष्टात आला.

  • इंग्लंडकडून दुसऱ्या डावात केवळ सलामीवीर अ‍ॅलिस्टर कूक (४२) याने आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याला तोंड दिले. त्याव्यतिरिक्त मोइन अली (२७), बेन स्टोक्स (१८), जॉनी बेयरस्टो ९१६) यांनी काहीप्रमाणात झुंज देण्याचा अपयशी प्रयत्न केला. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • संविधान दिन : उरुग्वे.

जन्म, वाढदिवस

  • प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री : १८ जुलै १९८२

  • नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष : १८ जुलै १९१८

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • यून बॉसिऑन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष : १८ जुलै १९९०

  • राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते : १८ जुलै २०१२

ठळक घटना 

  • इंटेल कंपनीची स्थापना : १८ जुलै १९६८

  • मेरी क्युरी व पिएर क्युरीनी पोलोनियम या नवीन मूलतत्त्वाचा शोध लावला : १८ जुलै १८९८

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.