मुंबई : तब्बल १० लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य असलेली मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स ही गुंतवणूकदार परिषद रविवारपासून सुरू होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायंकाळी वांद्रे-कुर्ला संकुलात तिचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जगातील नामवंत कंपन्यांचे सीईओ या वेळी प्रामुख्याने उपस्थित असतील. त्या आधी नवी मुंबई विमानतळाचा पायाभरणी समारंभही मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
या परिषदेत ४५०० सामंजस्य करार होतील व त्यातून ३५ लाखांना रोजगार मिळेल, असा राज्य सरकारचा दावा आहे. जगातील १५0 कंपन्यांचे सीईओ त्यात सहभागी होणार आहेत. व्हर्जिन हायपरपूलचे रिचर्ड ब्रॅन्सन, इमर्सनचे एडवर्ड मोन्सन, मुकेश अंबानी, आंनद महिंद्रा यांचा त्यात समावेश असेल.
काही देशांचे उद्योगमंत्री, संरक्षण उत्पादन कंपन्यांचे सीईओही यात सहभागी होतील. उद्घाटनानंतर जगातील निवडक सीईओंबरोबर पंतप्रधान मोदी हे बंदद्वार चर्चा करणार आहेत.
२ दिवसांत ई-व्हेइकलसारखे नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट आॅफ थिंग्स, इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट सिटी, निर्यात, सप्लाय चेन रचना, जल नियोजन,उद्योजिका, इज आॅफ डुइंग बिझनेस, मेक इन महाराष्ट्र आदी विषयांवरील चर्चासत्रे आहेत. सोमवार, १९ रोजी दुपारी मुख्यमंत्री महाराष्ट्राला वन ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्याबाबतचे व्हिजन मांडतील.
मुंबई : नीरव मोदीसह अन्य तिघांनी पंजाब नॅशनल बँकेच्या लेटर आॅफ अंडरटेकिंगच्या आधारे ११, ५०० कोटी रुपये स्वत:कडे वळते केले. ही रक्कम पीएनबीच्या नावाखाली अन्य बँकांकडून आरोपींकडे गेली. मात्र ती रक्कम अन्य बँकांची होती. त्यामुळे या रकमेची जबाबदारी पीएनबीचीच आहे, अशी भूमिका रिझर्व्ह बँकेने घेतल्याचे समजते.
त्यामुळे या रकमा पीएनबीने अन्य बँकांना द्याव्यात, असेच संबंधित बँकांचे म्हणणे आहे. आरबीआयने तसे आदेश पीएनबीला दिल्याची चर्चा होती. असे आदेश दिले नाहीत, असे आरबीआयने स्पष्ट केले. पीएनबीने रक्कम न दिल्यास अन्य ३० बँकाही अडचणीत येतील. वित्तीय गोंधळ निर्माण होईल, अशी भीती आरबीआयला वाटत आहे.
बँकांची अपेक्षा वाढत्या एनपीएमुळे सर्वच बँका संकटात आहेत. त्यात पीएनबीचाही समावेश आहेच. बँकेकडे निधीची कमतरता आहे. अशा वेळी अन्य बँकांना ११,५०० कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचे सरकारने हस्तक्षेप करावा, अशी पीएनबीची अपेक्षा आहे.
तुमच्या हमीवर बँकांनी नीरव मोदीला कर्ज दिले. त्यामुळे तुम्ही ती रक्कम संबंधित बँकांना परत करा, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने पीएनबीला दिल्याचे वृत्त होते. पण असे आदेश दिले नसल्याचे आरबीआयने रात्री जाहीर केले.
पुणे : पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत अॅड. सुभाष पवार हे बहुमताने निवडून आले. उपाध्यक्षपदी अॅड़ भूपेंद्र गोसावी आणि अॅड़ रेखा करंडे यांनी निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी झालेल्या चौरंगी लढतीत अॅड. सुभाष पवार यांनी सर्वाधिक ३ हजार ४७० मते मिळाली.
उपाध्यक्ष पदी अॅड. भूपेंद्र गोसावी (२६८८ मते) आणि अॅड. रेखा करंडे (दांगट) (२५१२ मते) यांची निवड झाली आहे. सचिव पदासाठी अॅड़ संतोष शितोळे २ हजार ५३० आणि अॅड. लक्ष्मण घुले २ हजार १५८ मते मिळवून विजयी झाले. खजिनदार पदी प्रतापराव मोरे (३४५१ मते) यांची निवड झाली आहे. हिशेब तपासणीसपदी अॅड़ सुदाम मुरकुटे (२५६३ मते) यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणी सदस्यपदी चेतन औरंगे, समीर भुंडे, अशिष गवारे, पंजाब जाधव, गणेश लेंडे, लक्ष्मी माने, प्रियदर्शनी परदेशी, योगेश पवार, रमेश राठोड आणि रफिक शेख या १० जणांची यापूर्वीच सर्वानुमते निवड झाली होती.
सलग चौथ्या वर्षी बारच्या निवडणूकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनचा वापर करण्यात आला. सिग्नल सर्किटचे अजित गावडे आणि सहका-यांनी ईव्हीएम व्यवस्था पाहिली. पुणे जिल्हा बार असोसिशनचे माजी अध्यक्ष अॅड़ एन.डी.पाटील यांनी निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. अॅड. शिरीष शिंदे, अॅड. श्रीकांत आगस्ते,अॅड. हेमंत गुंड, अॅड.अभिजित भावसार, अॅड.सुप्रिया कोठारी, अॅड. अमोल जोग, अॅड. काळूराम भुजबळ आणि अॅड. रवि पवार यांनी उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
अकोला: निसर्ग शिक्षण कार्यसंस्था व बाल शिवाजी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जठारपेठ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भूगोल प्रदर्शन-२0१८ चे आयोजन केले आहे.
२१ फेब्रुवारीला अण्णासाहेब देव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा आरंभ होईल. प्रत्येक दिवशी सकाळी ९, ११ व दुपारी १ व ३ वाजता असे चार शो घेण्यात येतील. प्रत्येक कार्यक्रम हा दीड तासाचा राहील.
गोल-गोल वाटणारा भूगोल अधिक गोड वाटावा, अनेक साध्या परंतु दुर्मीळ बाबी जनसामान्यांपर्यंत सहजरीत्या पोहचाव्यात, यासाठीच प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती निसर्ग अभ्यास केंद्र संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.
इराणचे अध्यक्ष हसन रुहानी शनिवारी भारताच्या भेटीवर आले असून दहशतवाद, सुरक्षा, व्यापार व ऊर्जा या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची ठोस चर्चा झाली. दोन्ही देशांनी नऊ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात १८ महिन्यांसाठी चाबहार बंदराचा काही भाग भाडेतत्त्वावर चालवण्यास घेण्याच्या कराराचा समावेश आहे.
राष्ट्रपती भवनमध्ये रुहानी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही रुहानी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक स्थितीवर व्यापक चर्चा केली असून शांततामय, संपन्न व स्थिर अफगाणिस्तानच्या आवश्यकतेवर भर दिला आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी सांगितले की, दोन्ही देशांना दहशतवादमुक्त जग हवे आहे. दहशतवाद पसरवणाऱ्या शक्तींचा प्रसार रोखणे, सायबर गुन्ह्य़ांना आळा घालणे व आंतरराष्ट्रीय गुन्ह्य़ात एकमेकांना सहकार्य करणे या मुद्दय़ांवर दोन्ही देशांचा भर आहे. रुहानी यांनी सांगितले की, दहशतवादाचा सामना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रादेशिक संघर्ष हे राजनीती व राजकीय पुढाकारातून सोडवले पाहिजेत त्यात त्यांनी कुठल्याही प्रादेशिक संघर्षांचा उल्लेख केला नाही.
एकूण नऊ करार दोन्ही देशात झाले. त्यात इराण पोर्ट अँड मेरीटाईम ऑर्गनायझेशन व भारताच्या पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड यांच्यात करार झाला. त्यात चाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्यातील शाहीद बेहेसटी बंदराचे संचालन काम १८ महिन्यांसाठी भारत भाडेतत्त्वावर घेणार आहे.
महत्वाच्या घटना
१९६५: गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.
१९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
२००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
जन्म
१७४५: बॅटरी चा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च १८२७)
१८२३: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १८९२)
१८३६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८६ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
१८७१: थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९३३)
१८८३: क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट १९०९)
१८९८: फेरारी रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८८)
१९११: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०००)
मृत्यू
१२९४: मंगोल सम्राट कुबलाई खान यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १२१५)
१४०५: मंगोल सरदार तैमूरलंग यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १३३६)
१५६४: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजेलो यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १४७५)
१९६७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९०४)
१९९२: चित्रकार नारायण श्रीधर बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९१०)
१९९४: कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. पंडित गोपीकृष्ण यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९३५)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.