ब्रेस्ट (फ्रान्स): फ्रँकॉई गेबार्ट या फ्रेंच नाविकाने न थांबता एकट्याने पृथ्वीची सागरी परिक्रमा सर्वात कमी वेळात पूर्ण करण्याचा नवा विश्वविक्रम रविवारी प्रस्थापित केला.
फ्रँकॉईने ही प्रदक्षिणा ४२ दिवस, १६ तास, ४० मिनिटे व ३५ सेकंदात पूर्ण केली. याआधीचा विक्रम फ्रान्सच्याच थॉमस कोविले यांनी गेल्या वर्षी केला होता. फ्रँकॉईने सहा दिवस व १० तासांचा कमी वेळ घेऊन त्यांचा विक्रम सहज मोडला.
फ्रान्सच्या वायव्य टोकाजवळ असलेले उशांत बेट आणि इंग्लंडच्या नैऋत्येस असलेला लिझार्ड पॉर्इंट यांच्या दरम्यान या सागरी पृथ्वी परिक्रमेच्या समाप्तीची काल्पनिक रेखा ठरविण्यात आली होती. ३४ वर्षांच्या फ्रँकॉई यांनी ब्रिटिश प्रमाण वेळेनुसार रविवारी पहाटे १.४५ वाजता समाप्तीरेषा पार केली.
‘वर्ल्ड सेलिंग स्पीड कौन्सिल’च्या निरीक्षकाने फ्रँकॉई यांनी परिक्रमेसाठी घेतलेल्या वेळेची घोषणा केली. बोटीतील ब्लॅक बॉक्स आणि जीपीएस डेटाशी पडताळणी केल्यानंतर या वेळेची नंतर अधिकृत पुष्टी केली जाईल. दोन मुलांचा पिता असलेल्या फ्रँकॉई यांनी ३०मीटर लांबीच्या अत्याधुनिक ‘मॅक्सी-ट्रायमरान’ बोटीतून ही सागरी सफर केली. (source : lokmat)
नवी दिल्ली - गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अपेक्षेप्रमाणे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. 68 जागा असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने 23 आणि काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे.
मागच्या आठवडयात बहुतांश एक्झिट पोल चाचण्यांमधून हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार येईल असा अंदाज वर्तवला होता. हिमाचल प्रदेशमध्ये नेहमीच सत्तांतराचा इतिहास राहिला आहे. दर पाच वर्षांनी इथे आलटून-पालटून भाजपा आणि काँग्रेसचे सरकार येत असते. सध्या हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.
68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.(source : lokmat)
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर दिली आहे. आतापर्यंत 170 मतदारसंघांचा कल हाती आला असून, त्यामध्ये काँग्रेसने भाजपावर आघाडी घेतली आहे.
भाजपा 87 तर काँग्रेस 83 जागांवर आघाडीवर आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दरम्यान, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले होते. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे.
केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप हार्दिक पटेलने केला होता.(source : lokmat)
मुंबई : वाढते प्रदूषण आणि डिझेल-पेट्रोलच्या अनियंत्रित किमतींमुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त आहेत. त्यामुळेच सध्या सरकारतर्फे विजेवर चालणा-या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले जात आहे. देशात पहिली इम्पोर्टेड विद्युत एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल) एक्स टेक्स्ला कार मुंबईत दाखल झाली आहे.
विजेवर चालणाºया या अत्याधुनिक एसयूव्ही कारची नोंदणी मुंबईतील ताडदेव आरटीओमध्ये पूर्ण करण्यात आली. सुमारे तीन कोटी रुपये किमतीच्या या कारसाठी आरटीओतर्फे सुमारे ४० लाखांहून अधिक रकमेची ‘करसूट’ देण्यात आली आहे.
मुंबईतील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात या विद्युत एसयूव्हीची नोंदणी झाली. ही कार ७ आसनी आहे. पूर्णपणे विजेवर चालणाºया या एसयूव्हीचा टॉप स्पीड २५० किलोमीटर प्रतितास असल्याचा दावा कंपनीने केला आहे. डीपब्ल्यू रंगाची कार गेल्या आठवड्यात मुंबईत सागरी मार्गाने कंटेनरमधून दाखल झाली.
गेल्या आठवड्यापासून या कारची नोंदणी प्रक्रिया सुरू होती. या कारची किंमत २ कोटी ८९ लाख रुपये आहे. ताडदेव आरटीओमध्ये शहरातील खासगी गुंतवणूक कंपनीच्या नावे या कारची नोंदणी झालेली आहे.(source : lokmat)
विशाखापट्टणम : कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांच्या अचूक मा-यानंतर शिखर धवनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने तिस-या व निर्णायक वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात रविवारी श्रीलंकेचा ८ गडी राखून सहज पराभव केला आणि मालिकेत २-१ ने सरशी साधली.
भारताने ३२.१ षटकांत २१९ धावा फटकावत सहज विजय साकारला. धवनने ८५ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १०० धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने चार हजार धावांचा पल्ला गाठला. त्याने अय्यरसोबत (६५) दुसºया विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. दिनेश कार्तिक २६ धावा काढून नाबाद राहिला. भारताने श्रीलंकेचा डाव ४४.५ षटकांत २१५ धावांत गुंडाळला होता.
भारताने सलग आठव्यांदा द्विपक्षीय वन-डे मालिका जिंकली आणि श्रीलंकेविरुद्ध मायदेशात कुठलीही मालिका न गमाविण्याची परंपरा कायम राखली. श्रीलंकेला १९९७ नंतर भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकता आलेली नाही. भारताने यापूर्वी कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला आहे. आता उभय संघांदरम्यान टी-२० सामन्यांची मालिका होणार असून पहिली लढत २० डिसेंबर रोजी कटकमध्ये होईल.
त्याआधी, कुलदीप यादव (३-४२) व यजुवेंद्र चहल(३-४६) यांच्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा डाव २१५ धावांत गुंडाळला. हार्दिक पांड्याने दोन तर जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना योग्य साथ दिली.(source : lokmat)
जोहान्सबर्ग : भारताचा डबल ऑलिम्पिक पदकविजेत्या सुशील कुमारने जोहान्सबर्गच्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून आपलं पुनरागमन साजरं केलं. आपलं हे पदक देशातील प्रत्येक नागरिकाला समर्पित करत असल्याचं तो म्हणाला.
रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या साक्षी मलिकनेही या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. सुशीलकुमारने पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत 74 किलो गटाचं सुवर्णपदक पटकावलं.
सुशील कुमारने न्यूझीलंडच्या आकाश खुल्लरला अस्मान दाखवलं. साक्षी मलिकने महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या 62 किलो गटात न्यूझीलंडच्या टायला ट्यूहाईन फोर्डचा 13-2 असा धुव्वा उडवला.
या विजयानंतर बोलताना त्याने अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. ''तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील हे पदक मी आई-वडील, गुरु सतपाल जी पहेलवान आणि अध्यात्मिक गुरु योगऋशी स्वामी रामदेव आणि देशातील प्रत्येक नागरिकाला समर्पित करतो'', असं ट्वीट सुशीलने केलं.(source : abpmajha)
हवाई दलाच्या ‘सुखोई-३०’ प्रकारच्या ४० लढाऊ विमानांवर ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती हवाई दलाच्या सूत्रांनी दिली. पाकिस्तान आणि चीन यांच्याशी एकाच वेळी युद्धाची शक्यता नाकारता येत नसताना सुखोई ब्रह्मोस सज्ज केल्याने हवाई दलाच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
मुळात सुखोई हे अत्यंत कार्यक्षम लढाऊ विमान आहे. त्यावर ब्रह्मोससारखे जगातील सर्वाधिक वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र बसवल्यावर त्याची मारक क्षमता बरीच वाढणार आहे. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेले क्षेपणास्त्र आहे.
त्याचे वजन २.५ टन असून ते ध्वनीच्या २.८ पट वेगाने २९० किलोमीटरवरील लक्ष्याचा पारंपरिक किंवा आण्विक स्फोटकांनिशी अचूक वेध घेऊ शकते. आजवर त्याचा पल्ला वाढवण्यावर नियंत्रणे होती.
मात्र गतवर्षी भारताला मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम (एमटीसीआर) या संघटनेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर ती नियंत्रणे हटू शकतील आणि ब्रह्मोसचा पल्ला ४०० किमीपर्यंत वाढवणे शक्य होईल.
महत्वाच्या घटना
१९३५: श्रीलंकेत लंका सम समाज पार्टी ची स्थापना केली.
१९५९: ब्रिटीश रॉयल नेव्ही मध्ये एचएमएस हार्मिस हि युद्धनौका दाखल झाली.
१९७८: डॉमिनिक देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९८९: सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९५: अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.
२००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.
२०१६: इंडोनेशियन हवाई दलाचे वाहतूक विमान पापुआ मधील दुर्गम भागात प्रशिक्षण व्यायाम करताना डोंगरावर क्रॅश झाले, त्यात विमानातील सर्व जण ठार झाले.
२०१६: भारतीय ज्युनिअर हॉकी टीम ने बेल्जियम ला हरवून जुनिअर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.
जन्म
१६२०: जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्रिच रॉथ यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १६६८)
१८५६: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४०)
१८७८: सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च १९५३)
१८८७: भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १९७१)
१८९०: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९५४)
१९५५: भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांचा जन्म.
१९६३: अमेरिकन अभिनेते व निर्माते ब्रॅड पिट यांचा जन्म.
१९७१: पत्रकार बरखा दत्त यांचा जन्म.
१९७१: स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ यांचा जन्म.
मृत्यू
१८२९: फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे लॅमार्क यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १७४४)
१९८०: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९०४)
१९९३: चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर यांचे निधन.
१९९५: राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर यांचे निधन.
२०००: इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी यांचे निधन.
२००४: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचे निधन. (जन्म: ११ मार्च १९१५)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.