आरोग्याचा प्रश्न ही भारतापुढील एक प्रमुख समस्या असून विविध आरोग्य सेवांद्वारे त्याला तोंड देण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सविता रामनाथ कोविंद, आयोजक संस्थेचे अध्यक्ष धीरुभाई मेहता उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रपती कोविंद यांनी देशापुढील आरोग्यविषयक बाबींचा ऊहापोह केला. ते म्हणाले की, देशापुढे संसर्गजन्य व्याधी, नवनवे आजार व उन्नत होणाऱ्या व्याधींचे आव्हान समाजासमोर उभे ठाकले आहे. आरोग्य सेवेची कमतरता, कुपोषण व दुर्लक्षित व्याधींमुळे या अडचणी उद्भवतात. त्यावर मात करण्यासाठी आयुष्मान भारत व अन्य उपक्रम सरकारतर्फे राबविले जात आहेत.
आरोग्यविषयक समस्या गुंतागुंतीच्या असून त्याला सामाजिक-आर्थिक भेदाची किनार आहे. महात्मा गांधी यांचा निसर्गोपचारावर विश्वास होता. समुदाय आरोग्याचे भान ठेवणाऱ्या या संस्थेने पारंपरिक आरोग्यविषयक ज्ञानाचे संवर्धन करीत पर्यायी उपचार पद्धती विकसित करावी. या संस्थेचे कर्करोग, क्षयरोग व कुष्ठरोगावर चाललेले संशोधन परिणामकारक ठरत आहे. संस्थेने या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेशी संवाद ठेवून जागतिक पातळीवर अभिमानास्पद ठरेल, असे कार्य करावे.
भारताकडे औषधी निर्माणशास्त्राचे केंद्र म्हणून पाहिले जाते. प्रत्येकाच्या डोळय़ांतील अश्रू पुसण्याचे स्वप्न बापूंनी पाहिले होते. या प्रवासात वैद्यकीय तज्ज्ञांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार असल्याचेही राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपतींनी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या ग्रामदत्तक, ग्रामीण आरोग्य विमा, सामुदायिक आरोग्य या उपक्रमांची प्रशंसा केली. भाषणाच्या प्रारंभी त्यांनी महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांत आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांप्रति संवेदना व्यक्त केली. नागरिकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविकात संस्थाध्यक्ष धीरुभाई मेहता यांनी देशातील ४७० वैद्यकीय महाविद्यालयांपैकी सर्वोच्च असणाऱ्या तीन संस्थांमध्ये सेवाग्रामची वैद्यकीय संस्था असल्याचा उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भूतानचे पंतप्रधान लोतै शेरिंग यांची थिंपू येथे भेट घेतली. दोन्ही देशांच्या नेत्यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींना म्हटले की, भारतीयांच्या मनात भूतानचे अनोखे स्थान आहे. माझ्या मागील कार्यकाळातही माझ्या पहिल्या दौऱ्यासाठी मी भूतानची निवड केली होती. यंदा देखील माझ्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरूवातीस मी भूतानला आल्याने आनंदी आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, हे भारताचे भाग्य आहे की आम्ही भूतानच्या विकासातील प्रमुख भागीदार आहोत. भूतानच्या पंचवार्षिक योजनांमध्ये भारताचे सहकार्य आपल्या इच्छा आणि प्राथमिकतांच्या आधारे यापुढेही कायम राहील. तसेच, सार्क करन्सी स्वॅप फ्रेमवर्क अंतर्गत भूतानसाठी करन्सी स्वॅपची मर्यादा वाढवण्यासाठी आमची सकारत्मकता आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी भूतानमध्ये ‘रूपे कार्ड’ देखील सादर केले. त्यांनी म्हटले की, मला अत्यंत आनंद होत आहे की, आज आम्ही भूतानमध्ये ‘रूपे कार्ड’ सादर केले. यामुळे डिजिटल देवाणघेवाण आणि व्यापार तसेच पर्यटन क्षेत्रातील आमचे संबंध अधिक बळकट होतील.
पंतप्रधान मोदी आणि भूतानचे पंतप्रधान लोतै शेरिंग यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी ट्विटद्वारे म्हटले की, आमच्यातील घनिष्ठ संबंधामध्ये नवी उर्जा आणि विश्वास निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य अधिकाधिक वाढीबद्दल चर्चा करण्यात आली आहे. या अगोदर दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजधानी थिंपू येथे जंगी स्वागत करण्यात आले. तेथील नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहत एका हातात भारताचा तिरंगा ध्वज तर दुसऱ्या हातात भूतानचा ध्वज घेऊन मोदींचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भूतानच्या दौऱ्यासाठी येथे आगमन झाले असून त्यांनी त्यांचे समपदस्थ लोटे शेरिंग यांच्याशी शनिवारी चर्चा केली. वेगवेगळ्या क्षेत्रांत द्विपक्षीय भागीदारी वाढवण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली असून यासंबंधात १० सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
दोन्ही देशांच्या संबंधात दृढता आणि विश्वास आणण्याचा यात प्रयत्न असून मोदी यांनी शेरिंग यांच्याशी शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली, अशी माहिती परराष्ट्र प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटर संदेशात दिली. त्यांनी म्हटले आहे, की भूतानमधील जुने धार्मिक केंद्र असलेल्या सिमटोका डोझाँग बरोबर समझोता करार होणार आहे. रुपे कार्डही सुरू करण्यात आले आहे. मोदी यांची ही भूतानला दुसरी भेट असली तरी त्यांच्या दुसऱ्या पर्वातील पहिलीच भेट आहे. पंतप्रधान मोदी यांना भूतानच्या ताशीछोडझोंग राजवाडय़ात सलामी देऊन जंगी स्वागत करण्यात आले. पारो विमानतळावरही त्यांचे शाही स्वागत झाले.
दोन्ही देशांदरम्यान व्यापक चर्चा झाली असून आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध नव्या उंचीवर नेण्यास मोठी संधी असल्याचे मोदी यांनी सांगितले. ते भूतानी विद्यार्थ्यांशी प्रतिष्ठित रॉयल विद्यापीठात संवाद साधणार आहेत.
नवी दिल्ली : मराठी, तामिळ, बंगाली यांना प्रादेशिक भाषा म्हणणे योग्य नाही. त्या राष्ट्रीय भाषाच आहेत. मराठीचेच उदाहरण द्यायचे झाले, तर महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, धारवाड, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशातही ती बोलली जाते. त्यामुळे माझ्या दृष्टीने सर्व प्रादेशिक भाषा राष्ट्रीय भाषाच आहेत, असे स्पष्ट मत प्रख्यात विचारवंत व हिंदी कवी अशोक वाजपेयी यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत व्यक्त केले. व्यवस्थेकडून विविध स्तरांवर प्रादेशिक भाषांची गळचेपी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृत, प्रादेशिक भाषा, अनुवाद आदी विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला.
प्रादेशिक भाषांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय का - अलीकडेच भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण झाले. त्यातून भारतात सातशेहून अधिक भाषा आणि बोली असल्याचे आढळून आले. यातील काही फारच कमी बोलल्या जातात तर काही कोट्यवधी लोक बोलतात. दुसऱ्या भारतीय भाषांमध्ये हिंदीने संपर्क भाषा म्हणून काम केले आहे. सध्याचा सत्ताधारी पक्ष एक धर्म, एक संस्कृती, एक भाषा यावर विश्वास ठेवतो; पण मुळात हे युरोपीय राष्ट्रांचे धोरण आहे. त्यांची नक्कल करण्याचा हा प्रयत्न आहे.
हिंदी सर्वाधिक बोलली जाते. त्यामुळे हे धोरण असेल का - हिंदीभाषिक प्रदेश सर्वांत हिंसक, धर्मांध, कायद्यांची मोडतोड करणारा आहे, असा निष्कर्ष त्या प्रदेशांमधील गेल्या काही वर्षांचा राजकीय व्यवहार बघून काढता येतो. हिंदी ही जातीयवाद, हिंसा, हत्या, बलात्काराची भाषा आहे, हा निष्कर्ष काही प्रमाणात सत्यही आहे; पण हिंदी साहित्यात त्याचे समर्थन मिळणार नाही. आपल्या देशातील राजकारणाचे खूपच बाजारीकरण झाले आहे; पण त्यात आंतर्विरोधही आहे. प्रचार, प्रसार आणि मते मागण्याची वेळ येते, तेव्हा त्यांना बहुभाषिकतेचा अभिमान वाटतो आणि नंतर याच प्रादेशिक भाषांचे महत्त्व ते नाकारतात. हिंदीने संपर्क भाषा म्हणून काम करताना आपली दुसरी बाजूही सांभाळून ठेवली आहे.
महत्वाच्या घटना
१८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.
१९२०: अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
१९४२: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.
१९४५: इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्ष पदावर सुकारणो हे कार्यरत झाले.
१९५८: बांग्लादेश चे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.
१९६३: जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
१९९९: गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या वा पोलिस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई.
२००५: जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.
२००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
जन्म
१७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)
१७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १७८३)
१७९२: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेल यांचा जन्म.
१८७२: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)
१८८६: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर१९५९)
१९००: राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)
१९२३: लेगस्पिनर गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९५५)
१९३४: गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म.
१९३६: हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म.
१९५६: भारतीय फलंदाज संदीप पाटील यांचा जन्म.
१९६७: पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा जन्म.
१९८०: अभिनेत्री प्रीती जंघियानी यांचा जन्म.
मृत्यू
१२२७: मंगोल सम्राट चंगीझ खान यांचे निधन.
१८५०: फ्रेंच लेखक ऑनोरे दि बाल्झाक यांचे निधन.
१८८६: मॉर्टिस लॉक चे शोधक एली व्हिटनी ब्लेक यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १७९५)
१९१९: सीग्राम कंपनीचे संस्थापक जोसेफ ई. सीग्राम यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८४१)
१९४०: ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १८७५)
१९४५: भारतीय क्रांतिकारक, आझााद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८९७ – कटक, ओरिसा)
१९७९: भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९१३)
१९९८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९४८)
२००८: रहस्यकथाकार नारायण धारप यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)
२००९: दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांचे निधन.
२०१२: भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.