चालू घडामोडी - १७ जुलै २०१७

Date : 17 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भविष्यात भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करू शकतो : जेसन गिलेस्पी
  • दोन वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास उत्सूक राहू शकतो, असे आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीने म्हटले आहे.

  • रवी शास्त्री यांची ११ जुलै रोजी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून शास्त्री आता कुंबळे यांचे स्थान घेतली.

  • कुंबळे यांनी विराटसोबत मतभेद झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता.

  • गिलेस्पी म्हणाला, ‘यावेळी या पदासाठी अर्ज करायचा किंवा नाही, याबाबत मला निर्णय घेता आला नाही.

बकुळ पंडित यांना बालगंधर्व पुरस्कार प्रदान :
  • बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे ज्येष्ठ गायिका बकुळ पंडित यांना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

  • गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांना देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार गोव्याच्या आप्पा बाबलो गावकर तर डॉ. सावळो केणी पुरस्कार डोंबिवलीच्या धनंजय पुराणिक यांना देण्यात आला.

  • गोविंद बल्लाळ पुरस्काराने मुंबईच्या शुभदा दादरकर, काकासाहेब खाडिलकर पुरस्कारने पुण्याच्या कविता टिकेकर, खाऊवाले पाटणकर पुरस्काराने गोव्याच्या राया कोरगावकर, रंगसेवा पुरस्काराने पुण्याचे सयाजी शेंडकर आणि गोव्याचे लक्ष्मण म्हांबरे यांना गौरविण्यात आले.

  • तसेच पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी ५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे.

पंतप्रधान मोदींकडून रामनाथ कोविंद यांचे ‘अॅडव्हान्स’मध्ये अभिनंदन :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे निवडणुकीपूर्वीच अभिनंदन केले असून सरकारकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी कोविंद यांना दिले आहे.

  • या बैठकीला रामनाथ कोविंददेखील उपस्थित होते. ‘बिहारचे माजी राज्यपाल असलेल्या रामनाथ कोविंद यांनी मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांचे सहकारी म्हणून काम केले आहे. 

  • भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांच्या मतांची बेरीज केल्यास कोविंद यांना दोन तृतीयांश मते मिळू शकतात. त्यामुळे कोविंद यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.

  • ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपूर्वीच रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन केले आहे,’ अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी दिली आहे.

  • यावर भाष्य करताना ‘रामनाथ कोविंद यांना देशातील ४० पक्षांचा पाठिंबा आहे. बिहार, तमिळनाडू, ओदिशासारख्या बिगरभाजप मुख्यमंत्र्यांनीदेखील कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे,’ असे अनंत कुमार यांनी म्हटले. 

आयफा अवॉर्ड २०१७ पुरस्कार सोहळा :
  • आयफा अवॉर्ड २०१७ च्या रंगारंग पुरस्कार सोहळ्यात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कार पटकाविले.

  • 'उडता पंजाब' साठी शाहिदला बेस्ट अ‍ॅक्टरच्या आयफा ट्रॉफीने गौरविण्यात आले. आलियाला याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

  • 'पिंक'चे दिग्दर्शक अनिरूद्ध रॉय चौधरी यांना बेस्ट डायरेक्टरची आयफा ट्रॉफी मिळाली. तसेच सोनम कपूरच्या 'नीरजा' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

  • आयफा अवॉर्ड सोहळ्यात तापसी पन्नूला 'वूमन ऑफ द इयर'च्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

  • अभिनेता वरूण धवन याला 'ढिशूम'मधील भूमिकेसाठी बेस्ट कॉमिक अ‍ॅक्टरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

रोजगारयुक्त महाराष्ट्रासाठी 'कौशल्य विकास' कटिबद्ध :
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 'जागतिक युवा कौशल्य दिना'निमित्त १५ जुलै रोजीच्या आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते.

  • राज्यातील तरुणांना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राज्यात राबविण्यात येत असून, आगामी काळात रोजगारयुक्त महाराष्ट्र घडावा, यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी दिली.

  • कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री निलंगेकर-पाटील म्हणाले की, भारत हा एकमेव देश असेल, जो प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युवकांना कुशल प्रशिक्षण देण्यावर आम्ही भर देत आहोत.

  • 'मेक इन इंडिया'नंतर कौशल्य विकास विभागाचे ६२ सामंजस्य करार झाले असून, त्यापैकी ५८ करार कार्यन्वित झाले आहेत.

हरिंदर संधूला विजेतेपद :
  • भारताच्या हरिंदर पाल संधूने आपली विजयी घोडदौड कायम राखताना दोन आठवडय़ांमध्ये दुसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली.

  • हरिंदरने ७७ मिनिटे चाललेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात अग्रमानांकन लाभलेल्या ऑस्ट्रेलियाच्या रेक्स हेड्रिकचा १२-१४, ११-३, ११-४, ११-७ असा पराभव केला आणि मेलबर्न येथे सुरू असलेल्या व्हिक्टोरियन खुली स्क्वॉश स्पर्धा जिंकली.

  • संधूने एकही गेम न गमावता अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र अखेरच्या सामन्यात त्याला सुरुवातीला संघर्ष करावा लागला. पहिल्याच गेममध्ये प्रदीर्घ काळ दोघांमध्ये आक्रमकपणे झुंज रंगली. हेड्रिकने पहिला गेम अतिरिक्त गुणांसह जिंकला.

  • गेल्या आठवडय़ात दक्षिण ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकणाऱ्या तिसऱ्या मानांकित संधूने दुसरा गेम मात्र ११-३ अशा पद्धतीने आरामात जिंकला.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • संविधान दिन: दक्षिण कोरिया.

जन्म, वाढदिवस

  • डेव्हिड हॅसेलहॉफ, अमेरिकन अभिनेता : १७ जुलै १९५२

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • अ‍ॅडम स्मिथ, आधुनिक अर्थशास्त्रज्ञ : १७ जुलै १७९०

  • मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या : १७ जुलै २०१२

ठळक घटना 

  • मराठी भाषेतील पहिला छापील मजकुर मोडी लिपीत. देवी रोगावरील लस टोचून घेण्याविषयीची जाहिरात : १७ जुलै १८०२

  • फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले : १७ जुलै १९९४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.