बीजिंग : चीनची प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळा तियांगोंग-२ ही १९ जुलै रोजी आपली कक्षा सोडून पुन्हा वातावरणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. चीनच्या मानवयुक्त अंतराळ अभियांत्रिकी कार्यालयाने शनिवारी ही माहिती दिली.
प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळेवर नजर ठेवणाऱ्या या कार्यालयाने सांगितले की, अंतराळयानाचा अधिकांश भाग वातावरणात प्रवेश करताच भस्मसात होऊन जाईल. त्याचे काही अवशेष दक्षिण प्रशांत क्षेत्राच्या सुरक्षित समुद्री भागात पडण्याची शक्यता आहे.
तियोंगोंग-२ ही तियोंगोंग-१ ची सुधारित आवृत्ती आहे व खºया अर्थाने पहिली अंतराळ प्रयोगशाळा आहे. १५ सप्टेंबर २०१६ रोजी उन्नत जीवन रक्षक, इंधन भरणे व दुसऱ्यांदा पुरवठा करण्याच्या क्षमता जाणून घेण्यासाठी ही मोहीम होती.
शेंझोऊ-११ व चालकरहित तियानझोऊ-१ कार्गो मिशनच्या माध्यमातून चीनने ती हाती घेतली होती. चीन पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत एका मोठ्या मॉड्यूलर अंतराळ स्थानक निर्मितीच्या तयारीत होता. २०२२ पर्यंत स्थायी स्वरूपाचे अंतराळ स्थानक सुरू करण्याची चीनची योजना आहे.
ही अंतराळ प्रयोगशाळा कक्षेमध्ये १००० दिवसांपेक्षा जास्त काळ काम करीत आहे. आता हे यान त्याच्या नियोजित काम करण्याच्या कालावधीपेक्षा दोन वर्षे अधिक काळ काम करीत आहे.
अशी आहे ‘तियोंगोंग’ - तियोंगोंग-२ची एकूण लांबी १०.४ मीटर असून, त्याचा व्यास ३.३५ मीटर आहे. हे यान अंतराळात पाठवले तेव्हा त्याचे वजन ८.६ टन होते.या प्रयोगशाळेत सर्व प्रकारचे प्रयोग करण्यात आलेले आहेत. यान व त्यावरील सर्व यंत्रसामग्री चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. हे यान पुन्हा वातावरणात प्रवेश करण्यास तयार असून, हेही काम नियोजित पद्धतीने सुरू आहे.
भारत सध्या रस्ते अपघातांमुळे त्रस्त आहे. यामुळे केंद्र सरकारने सुरक्षेकडे अधिक लक्ष पुरविले आहे. लहान मुलांसाठी बाईकवर हेल्मेट घालावेच लागणार असून कारमध्येही सुरक्षेसाठी बूस्टरसीट बसवावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मोटार वाहन संशोधन विधेयक 2019 मध्ये याची तरतूद केली आहे.
केंद्रीय मोटर वाहन कायदा 1988 मध्ये संशोधन करण्य़ात आले आहे. यामध्ये एक नवीन कलम 129 जोडण्यात आले असून यामध्ये चार वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी बाईकवरून जाताना हल्मेट घालावे लागणार आहे. तसेच हे हेल्मेट सामान्य नको, तर आयएसआय मार्कचेच असले पाहिजे. शीख धर्माच्या व्यक्तीला तेव्हाच हेल्मेट घालण्यास सूट मिळेल जेव्हा त्याने पगडी घातलेली असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे.
गडकरी यांनी सोमवारी हे विधेयक संसदेत मांडले. यामध्ये अॅम्बुलन्स, अग्निशामन सारख्या आपत्कालीन वाहनांना पुढे जाण्यासाठी रस्ता न दिल्यास 10 हजारांचा दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार असल्याचेही म्हटले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल विद्यासागर राव यांनी सोमवारी (दि. १५) डॉ. प्रमोद येवले यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी अथवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, यापैकी जे अगोदर असेल, त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ बी ए चोपडे यांचा कार्यकाळ ३ जून २०१९ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. कोल्हापूर येथील शिवाजी विदयापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचेकडे डॉ. बाबासाहेब बेडकर मराठवाडाविद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
डॉ येवले यांनी औषधीनिर्माणशात्र विषयात पीएचडी प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. जून २०१५ साली त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली होती. विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमुर्ती अनिल दवे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. नॅशनल इंस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली या संस्थेचे संचालक प्रवीण कुमार तसेच शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे या निवड समितीचे सदस्य होते.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चांद्रयान २ या महत्त्वाकांक्षी अवकाशयानाचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र हा तांत्रिक बिघाड नेमका काय होता ते आता समोर आले आहे. चांद्रयान २ च्या इंजिनमधील गळतीमुळे हे उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती आता समोर आली आहे. GSLV MK 3 च्या क्रायोजेनिक इंजिनातील हेलियमच्या गळतीमुळे ही मोहीम स्थगित करण्यात आली. सोमवारी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी या चांद्रयानाचं उड्डाण होणार होतं मात्र उड्डाणाच्या ५६ मिनिटं आधी ते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण देऊन हे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती इस्त्रोने दिली होती. मात्र पाच विविध सूत्रांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला हेलियमच्या गळतीबाबत माहिती दिली आहे. त्याचमुळे हे उड्डाण रद्द करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे आम्ही उड्डाण थांबवतो आहोत अशी घोषणा करण्यात आली आणि लवकरच उड्डाणाची तारीख जाहीर करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं. तांत्रिक बिघाड नेमका काय झाला होता ते आता या बातमीमुळे समोर आलं आहे.
इंजिनात लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन भरल्यानंतर हेलियम भरण्याचे काम सुरु होते. आम्हाला हेलियम भरायचे होते आणि आऊटपुट ५० वर सेट करायचे होते. मात्र हेलियमचे प्रेशर खाली येऊ लागले हे आम्ही पाहिले. असे होणे म्हणजे गळती होते आहे हे आम्हाला समजले अशी माहिती एका वरिष्ठ वैज्ञानिकाने इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. गळती एकाच ठिकाणाहून होते आहे की अनेक ठिकाणांहून होते आहे हे आम्ही तपासण्यास सुरुवात केली असंही त्यांनी सांगितलं
ढाका : बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करशहा जनरल हुसैन मुहम्मद ईर्शाद यांचे वृद्धापकाळातील गुंतागुंतीच्या आजारांमुळे येथील लष्करी इस्पितळात रविवारी निधन झाले. जातीय पक्षाचे प्रमुख व संसदेतील विरोधी पक्षनेते असलेले इर्शाद ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी रौशन, आता काडीमोड झालेल्या दुसऱ्या विवाहातून झालेला एक किशोरवयीन मुलगा व दत्तक घेतलेली आणखी दोन मुले आहेत.
गेल्या २२ जून रोजी प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना लष्करी इस्पितळात दाखल केले गेले होते. हळूहळू एकएक अवयव निकामी होत गेल्याने गेले नऊ दिवस त्यांना जीवरक्षक यंत्रणेवर ठेवले गेले होते. गेले काही दिवस ते निदान डोळ््यांनी तरी प्रतिसाद देत होते, पण नंतर तेही बंद झाले व रविवारी स. ७.४५ वाजता त्यांचे निधन झाले, असे लष्कराच्या प्रसिद्धी विभागातर्फे सांगण्यात आले. सोमवारी त्यांचे पार्थिव रंगपूर जिल्ह्यातील त्यांंच्या मूळ गावी नेले जाईल. तेथून परत आल्यावर सोमवारी लष्कराच्या बनानी कबरस्तानात दफनविधी करण्यात येईल.
बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल हमीद, पंतप्रधान शेख हसिना वाजेद व संसदेच्या सभापती डॉ. शिरीन शर्मिन चौधरी यांनी ईर्शाद यांच्या निधनानिमित्त तीव्र दु:ख व्यक्त केले.
महत्वाच्या घटना
१६६१: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.
१९३५: ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले.
१९४५: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.
१९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्या माँट ब्लँक बोगद्याचे उद्घाटन झाले.
१९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.
१९९२: भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली.
१९९८: गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय.
जन्म
१७७३: ब्रिटिश चित्रकार व रॉयल अॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ – लंडन, इंग्लंड)
१९०९: स्वातंत्र्यसेनानी. भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९९६)
१९१३: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)
१९१४: मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५)
१९१७: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९७८)
१९२३: भूदल प्रमुख के. व्ही. कृष्णराव यांचा जन्म.
१९२६: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इर्विन रोझ यांचा जन्म.
१९३९: भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)
१९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)
१९६८: भारतीय हॉकी पटू धनराज पिल्ले यांचा जन्म.
१९६८: विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर यांचा जन्म.
१९७३: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक यांचा जन्म.
१९८४: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्म.
मृत्यू
१३४२: हंगेरीचा राजा चार्ल्स (पहिला) यांचे निधन.
१८८२: अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरीटॉड लिंकन यांचे निधन.
१९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)
१९९३: रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ यांचे निधन.
१९९४: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.