नागरी उड्डयन संचलनालयानं दिले असून उंची कमी करण्यासाठी सांगण्यात आलेल्यांमध्ये मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारील विलेपार्ले, सांताक्रूझ, घाटकोपर परिसरातील इमारतींचा समावेश आहे.
या इमारतींची उंची कमी करण्यासाठी ६० दिवसांचा अवधीही देण्यात आला आहे, ७० इमारतींना जून महिन्यात नागरी उड्डयन संचालनालयाचे नोटीस बजावली होती. नोटीस बजावलेल्या इमारतींमध्ये ५० वर्षांहून जुन्या इमारतींचाही समावेश करण्यात आला होता.
विशेष म्हणजे भारतीय विमानतळ प्राधिकरणानेच १९७८ पासून या इमारतींना 'ना हरकत प्रमाणपत्र' बहाल केले होते. नोटीस बजावण्यात आलेल्या इमारतींमधील रहिवाशांकडे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेली प्रमाणपत्रे आहेत.
अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना स्वत:च्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी येणारे दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी देशाच्या अर्थव्यवस्थेत ३६ बिलियन डॉलर्सची भर घालतात.
दि इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल एज्युकेशन (आयआयई) ची स्थापना १९१९ मध्ये झाली असून शांतीपूर्ण आणि न्यायसंगत समाज बनविण्यासाठी ही संस्था प्रयत्न करते.
आयआयईने म्हटले आहे की, मध्यपूर्व आणि भारतासाठी या सर्व्हेतील निष्कर्ष काळजीचा विषय आहे.
तीस टक्के संस्थांना काळजी आहे की, मध्य पूर्वेतील विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा प्रस्ताव तर स्वीकारला असला तरी या परिसरात येत नाहीत.
शतकवीर मिताली राज (१०९ धावा, १२३ चेंडू, ११ चौकार), वेदा कृष्णमूर्ती (७० धावा, ४५ चेंडू, ७ चौकार, २ षटकार ) व हरमनप्रीत कौर (६० धावा, ७ चौकार) यांच्या चमकदार फलंदाजीनंतर राजेश्वरी गायकवाडच्या (५-१५) अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला संघाने शनिवारी अखेरच्या साखळी लढतीत न्यूझीलंडचा १८६ धावांनी पराभव केला आणि महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
भारताने ७ बाद २६५ धावांची दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड संघाचा डाव २५.३ षटकांत ७९ धावांत गुंडाळला. राजेश्वरीला दीप्ती शर्मा (२-२६), झुलन गोस्वामी (१-१४), शिखा पांडे (१-१२) व पूनम यादव (१-१२) यांची योग्य साथ लाभली.
न्यूझीलंडतर्फे अॅमी सॅटरवेट (२६), कॅटी मार्टिन (१२) व अॅमिला केर (नाबाद १२) यांचा अपवाद वगळता अन्य महिला फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदविता आली नाही.
स्पेनच्या गार्बाइन मुगुरुजा हिने शनिवारी येथे सेंटर कोर्टवर पाच वेळेसची चॅम्पियन व्हीनस विल्यम्स हिचा सहज ७-५, ६-० असा सरळ सेट्समध्ये पराभव करताना विम्बल्डन महिला एकेरीचे ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावले.
मुगुरुजाने सुरेख खेळ करताना व्हीनसचा ७७ मिनिटांत पराभव करताना इतिहास रचण्याच्या तिच्या अपेक्षांवर पाणी फेरले आणि अशा प्रकारे ती विम्बल्डन जिंकणारी दुसरी स्पेनिश खेळाडू ठरली. ती दोन वर्षांपूर्वी पहिल्या विम्बल्डन फायनलमध्ये व्हीनसची बहीण सेरेनाकडून पराभूत झाली होती.
मुगुरुजाची विद्यमान प्रशिक्षक कोचिंता मार्टिनेज हिने १९९४ मध्ये विम्बल्डनमध्ये स्पेनचा झेंडा फडकावला होता, परंतु मिळालेल्या संधीचा फायदा घेतल्याने मी खुश आहे.
दोन वर्षांआधी मी सेरेनाविरुद्ध फायनलमध्ये पराभूत झाले होते आणि त्या वेळेस तिने एक दिवस मी विजेतेपद पटकावेल असे सांगितले होते. आज अखेर हे सिद्ध झाले.
गणित क्षेत्रातील प्रतिष्ठीत ‘फील्ड्स मेडल’ पुरस्कारनं गौरवण्यात आलेल्या जगातल्या पहिल्या गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखान यांचं अमेरिकेत निधन झालं आहे. त्या ४० वर्षांच्या होत्या.
प्रदीर्घ काळापासून त्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होत्या.
‘फील्ड्स मेडल’ हा पुरस्कार गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानला जातो. मिर्जाखान यांना २०१४ मध्ये ‘कॉम्प्लेक्स जियोमेट्री अॅण्ड डायनामिकल सिस्टम्स’साठी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
मरियम यांचा जन्म १९७७ मध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये झाला. त्यांना तरुणपणी आंतरराष्ट्रीय मॅथेमॅटिकल ओलंपियाडमध्ये दोन सुवर्ण पदाकांनी गौरवण्यात आलं होतं.
जन्म, वाढदिवस
लॅरी सँगर, विकिपीडियाचा सह-संस्थापक : १६ जुलै १९६८
कॅटरिना कैफ, हिंदी चित्रपट अभिनेत्री : १६ जुलै १९८४
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
जुलियन श्वाइंगर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ : १६ जुलै १९९४
ठळक घटना
युध्दातील कार्यकुशल सेनापती नानासाहेब पेशवे यांचा पराभव होऊन पेशवाईचा शेवट झाला : १६ जुलै १८५७
अमेरिकेने तयार केलेल्या पहिल्या अणुबॉंम्बचा न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात चाचणीस्फोट करण्यात आला : १६ जुलै १९४५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.