अरूणाचल प्रदेशमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. या देशात पैशांची कमतरता नाही. पण बादलीलाच जर छिद्र असेल तर पाणी भरणार कसे, असा सवाल करत काँग्रेसचे नाव न घेता टीका केली.
ईशान्य भारतच्या परिषदेसाठी इटानगरला येणारा मी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई नंतरचा पहिलाच पंतप्रधान आहे. त्यानंतर कोणतेच पंतप्रधान इथे आले नाहीत. व्यस्त असल्यामुळे ते आले नाहीत. पण मी येथे आलोय फक्त तुमच्यासाठी.. त्यामुळेच मी ईशान्य भारत परिषदेला उपस्थित आहे, असे मोदी म्हणाले.
तत्पूर्वी, मोदींच्या हस्ते डोरजी खांडू स्टेट कन्वेंशन सेंटरचे उद्घाटन झाले. त्यानंतर सभेत ते बोलत होते. अरूणाचल प्रदेशच्या नैसर्गिक उपलब्धतेबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, ज्या अरूणाचलमधून प्रकाश पसरतो. आगामी दिवसांतही येथे विकासाचा प्रकाश असा फैलावेल की संपूर्ण देश ते पाहत राहील.
मतदार यादीत तुमचे नाव नाही? चिंता करु नका आता तुम्हाला उन्हातान्हात कोणत्याही रांगेत उभे रहावे लागणार नाही. घरबसल्या एका क्लिकवर आता तुम्हाला तुमचे नाव एका अॅप्लिकेशनद्वारे मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे. ERONET (Electoral Rolls Services NeT) असे या अॅप्लिकेशनचे नाव असेल.
निवडणूकीच्या प्रक्रियेमध्ये डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी हे अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. यावर मतदार कार्डाच्या नोंदणीची, पत्ता आणि नाव बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदारांना या कामांसाठी मतदार केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही.
आतापर्यंत २२ राज्ये या अॅप्लिकेशनशी जोडण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूकांमध्येही हे अॅप्लिकेशन लागू करण्यात आले नव्हते. येत्या काळात जून महिन्यापर्यंत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये जोडले जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली.
तर मेघालय, नागालँड, त्रिपूरा आणि कर्नाटकसारखी काही राज्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या सिस्टीमशी जोडली जाणार आहे. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी सांगितले. या माध्यमातून ७५०० निवडणूक अधिकाऱ्यांशी जोडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. या अॅप्लिकेशनमध्ये सुरक्षा आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने सुविधा करण्यात आली आहे.
वडोदरा : ‘लोहपुरुष’ अशी ओळख असलेले भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा अतिभव्य पुतळा नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाच्या परिसरात उभारण्याचे काम युद्धपातळीवर आहे.
येत्या ३१ आॅक्टोबरला सरदार पटेल यांच्या १४३ व्या जयंतीदिनी त्याचे अनावरण केले जाऊ शकेल, असा विश्वास गुजरात सरकारने व्यक्त केला आहे. गुजरातचे मुख्य सचिव जे. एन. सिंग यांनी केवडिया कॉलनीला भेट देत कामाचा आढावा घेतला. काम ठरल्याप्रमाणे ३१ आॅक्टोबरपूर्वी पूर्ण होईल, अशी खात्री त्यांनी व्यक्ते केली. सरदार सरोवर नर्मदा निगमचा प्रमुख या नात्याने हे महत्त्वाकांक्षी काम पूर्ण होताना पाहून आपल्याला विशेष आनंद होत असल्याचे सिंग म्हणाले.
पुतळ््याच्या मुख्य कामाचे अनावरण झाल्यानंतर काही महिन्यांतच हा रोप-वेही सुरू होईल, असे सिंग म्हणाले. ते म्हणाले की, धरण बांधकामा वेळी सामान व कर्मचाºयांच्या वाहतुकीसाठी उभारलेला एक रोप-वे सध्या आहे. त्याचाच विस्तारत केला जाईल.
या रोप-वेने जाताना पर्यटकांना एका बाजूला सरदार पटेलांचा गगनचुंबी पुतळा तर दुसºया बाजूला नर्मदा नदीचे अथांग पात्र दिसणार आहे. येथून सुमारे १०० कि.मी. अंतरावर असलेल्या नर्मदा नदीवरील सरकार सरोवर धरणापासून नदीपात्रात ३.५ कि.मी. आत साधू बेटावर हा पुतळा उभारला जात आहे. सरदार पटेल यांनी ५६२ संस्थाने खालसा करून देशाच्या एकात्मततेत मोठे योगदान दिले म्हणून या पुतळ््याचे ‘स्टॅच्यु आॅफ युनिटी’ असे नामाभिधान करण्यात आले आहे. पूर्ण झाल्यावर हा पुतळा न्यूयॉर्क येथील जगप्रसिद्ध ‘स्टॅच्यु आॅफ लिबर्टी’हून उंच होईल व तो जगातील सर्वात उत्तुंग पुतळा ठरेल.
सुमारे ३,००० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांच्या हस्ते ३१ आॅक्टोबर २०१३ रोजी या कामाचे भूमिपूजन झाले होते. तो दिवस सरदार पटेल यांच्या १३८व्या जयंतीचा होता. हे काम सरकार व खासगी उद्योगांच्या भागीदारीत (पीपीपी) केले जात असून सरदार सरोवर नर्मदा निमग लि., लार्सन अॅण्ड ट्युब्रो हे त्यातील दोन भागीदार आहेत.
बर्लिन - हवेतील नायट्रोजन ऑक्साइडची मात्रा कमी करण्यासाठी जर्मनी सारकारनं सार्वजनिक वाहतूक सेवा मोफत करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सिन्हुआ वृत्तसंस्थेनं रिपोर्टच्या हवाल्यानं सांगितले की, जर्मनीतील 20 शहरामध्ये नायट्रोजन ऑक्साइडची मात्रा युरोपियन महासंघाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा आधिक आहे. 2020 च्या आधी ही स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत.
युरोपियन महासंघाने ठरवलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या मर्यादेचे पालन करण्यात जर्मनी अपयशी ठरत आहे. लोक खाजगी वाहणांता वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे प्रदुषण वाढून हवा दुषित होत आहे. यावर उपाय म्हणून जर्मनी सरकारने सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोफत सार्वजनिक वाहतूकीबरोबरच कायद्यांमध्ये अनेक बदल करुन प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे जर्मन मंत्र्यांनी सांगितले. बस तसेच टॅक्सीमधून बाहेर येणाऱ्या धूरांबद्दल कठोर नियम करणे, वाहतूकीच्या नियमांमध्ये बदल करणे, वायू प्रदूषण मुक्त झोनची घोषणा करणे, कमी वायू प्रदूषण करणाऱ्या गाड्या वापरणाऱ्यांना कर सवलतींबरोबर सध्याच्या गाड्यांमधील तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासारख्या उपाययोजना राबवण्यासंदर्भातील नियोजन सुरु असल्याचेही जर्मनीने सांगितले आहे.
या संदर्भात पर्यावरण मंत्री बार्बरा हेन्ड्रीक्स, अर्थमंत्री पीटर अल्टमेरी आणि कृषीमंत्री ख्रिश्चन सीमीड यांनी मंत्र्यांनी युरोपीयन महासंघाचे पर्यावरण आयुक्त करमेन्यू वेल्ला यांना एक पत्र पाठवले आहे. वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे जर्मनीसमोरील सर्वात मोठे आव्हान असून त्या दृष्टीने आम्ही निर्णय घेण्यास सुरुवात केली असल्याचेही या या पत्रात म्हटले आहे.
काठमांडू - राजकीय अस्थिरतेचा सामना करणा-या नेपाळमध्ये पुन्हा एकदा सात महिन्यात पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. शेर बहाद्दूर देबुआ यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. खडगा प्रसाद ओली त्यांची जागा घेणार आहेत. शेर बहाद्दूर देबुआ नेपाळचे 40 वे पंतप्रधान होते. ओली यांचा लवकरच शपथविधी होईल.
मागच्यावर्षी मे महिन्यात पुष्पा कमल दहल म्हणजे प्रचंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी शेर बहाद्दूर देबुआ यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला होता. अवघ्या नऊ महिन्यात त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ते नेपाळचे 39 वे पंतप्रधान होते.दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे.
देबुआ यांच्या राजीनाम्यामुळे डाव्या आघाडीचा नेपाळमध्ये सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नेपाळच्या संसदीय आणि स्थानिक निवडणुकीत देबुआ यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सीपीएनच्या पाठिंब्याने देबुआ नेपाळचे पंतप्रधान झाले होते. माझ्या नेतृत्वाखाली देशात निवडणुका यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी टीव्हीवरील संदेशात म्हटले.
डाव्या आघाडीने राष्ट्राध्यक्षांकडे नव्या सरकारच्या स्थापनेचा दावा केला आहे. युएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली नेपाळचे पुढचे पंतप्रधान असतील. ओली नेतृत्व करत असलेल्या सीपीएन-युएमएल आणि प्रचंड नेतृत्व करत असलेल्या सीपीएन-माओइस्ट आघाडीने डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत संसदेतील 275 पैकी 174 जागा जिंकल्या. निदान आता तरी नेपाळमध्ये स्थिर सरकार सत्तेवर येईल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
सेन्चुरियन : विराट कोहलीच्या टीम इंडियानं पाचवी वन डे जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचा इतिहास घडवला. याच पार्श्वभूमीवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आज सहाव्या वन डे सामन्यासाठी आमनेसामने येणार आहेत.
हा सामना सेन्चुरियनच्या सुपरस्पोर्टस पार्कवर खेळवण्यात येईल. भारतानं पाचवी वन डे जिंकून, मालिकेत ४-१ अशी आधीच खिशात घातली आहे. त्यामुळं टीम इंडियानं आयसीसीच्या वन डे क्रमवारीत नंबर वनवर झेप घेतली. या नंबर वनचा लौकिक राखण्यासाठी आणि मालिकेवरचं आपलं वर्चस्व पुन्हा दाखवून देण्यासाठी टीम इंडिया सहावी वन डेही जिंकण्याचा नेटानं प्रयत्न करेल.
या सामन्याच्या निमित्तानं भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला विश्रांती देऊन, टीम इंडिया मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरला खेळवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
या संपूर्ण मालिकेत टीम इंडियांच्या पहिल्या तीन फलंदाजांनी सुरुवात चांगली करुन दिली असली तरी मधल्या फळीतल्या फलंदाजांना म्हणावा तसा सूर अद्यापही सापडलेला नाही. अंजिक्य रहाणे, हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनी यांनी मालिकेत फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. त्यामुळे आता कर्णधार कोहली प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल करणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
शेवटच्या सामन्यात दिनेश कार्तिक, मनिष पांडे, केदार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर गोलंदाजांमध्येही काही जणांना संधी मिळू शकते.
दुसरीकडे मालिका गमावलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटचा सामना जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न करेल. त्यामुळे या सामन्यासाठी ते देखील संघात काही बदल करु शकतात.
महत्वाच्या घटना
१६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.
१७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले.
१९१८: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
१९५९: फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या अध्यक्षपदी रुजू झाले.
१९६०: अमेरिकी अणुपाणबुडी ट्रायटन ने पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास प्रस्थान केले.
१९८५: लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लीम संघटनेची स्थापना झाली.
जन्म
१२२२: जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १२८२)
१८२२: बोटांचे ठसे, रंगांधळेपणा आणि स्त्रियांच्या सौंदर्यावर संशोधन करणाऱ्या सर फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म.
१८७६: भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९६६)
१९०९: मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९९८)
१९५४: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग यांचा जन्म.
१९६४: ब्राझीलचा फुटबॉलपटू बेबेटो यांचा जन्म.
१९७८: भारतीय क्रिकेटपटू वासिम जाफर यांचा जन्म.
मृत्यू
१९४४: भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)
१९५६: खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य मेघनाथ साहा यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर१८९३)
१९६८: कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८९२)
१९९४: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १९१२)
१९९६: उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक आर. डी. आगा यांचे निधन.
२०००: सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ बेल्लारी शामण्णा केशवान यांचे निधन.
२००१: मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक रंजन साळवी यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.