२०२४ आणि २०२८ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी यजमान शहरांची निवड करण्यात आले असून २०२८ साठी पॅरिस, तर २०२८ साठी लॉस एंजेलिसच्या नावावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं शिक्कामोर्तब केलं.
पेरुची राजधानी लिमामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून लागोपाठ दोन ऑलिम्पिकची यजमान शहरं एकाचवेळी जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ होती.
याआधी पॅरिसमध्ये १९२४ साली ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यानंतर नेमक्या शंभर वर्षांनी फ्रान्सच्या राजधानीत पुन्हा ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात येईल.
२०२० साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा जपानमधील टोकियो शहरात घेतल्या जाणार आहेत.
लॉस एंजेलिसमध्ये याआधी १९३२ आणि १९८४ साली ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे २०२८ साली लॉस एंजेलिसमध्ये तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात येईल.
एबीसीच्या व्यवस्थापकीय परिषदेवर सदस्य म्हणून प्रकाशक गटातून निवड झालेल्या सदस्यांत लोकमत मीडियाचे देवेंद्र दर्डा यांच्याबरोबरच आय. वेंकट, शैलेश गुप्ता, बिनॉय रॉयचौधरी, चंदन मजुमदार, राजकुमार जैन, प्रताप पवार यांचा समावेश आहे.
आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशनच्या अध्यक्षपदी कोका कोलाच्या नेर्ऋत्य आशिया विभागाचे उपाध्यक्ष (आॅपरेशन्स) देवव्रत मुखर्जी तर उपाध्यक्षपदी मुंबई समाचारचे होरमसजी कामा यांची निवड झाली आहे.
हेमंत मलिक, संदीप टर्कस व मयंक परिक हे जाहिरात प्रतिनिधी गटातून निवडून गेले असून या नेमणुका एका वर्षासाठी आहेत, होरमुज्द मसानी हे सेक्रेटरी जनरल असतील.
जाहिरात कंपन्यांच्या गटातून मधुकर कामत, शशीधर सिन्हा, श्रीनिवास स्वामी, सीव्हीएल श्रीनिवास यांची निवड झाली आहे.
देशभरातील १.५५ लाख टपाल कार्यालयांमध्ये पेमेंट बँक सुरू करण्यात येणार असून याद्वारे सर्व आर्थिक सेवा पुरवण्यात येणार आहेत.
२०१८ अखेरीपर्यंत १.५५ लाख टपाल कार्यालये आणि तीन लाख कर्मचाऱ्यांमार्फत ही सेवा दिली जाईल.
भारतीय टपाल विभागाची इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) वेगाने विस्तार करणार असून इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असेल.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.पी. सिंह यांनी संयुक्त राष्ट्र संघात आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवकांकडे पेमेंट सुविधा देणारी उपकरणे असणार आहेत.
मार्च २०१८ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात पोस्ट बँक सुरू होईल. सर्व १.५५ लाख टपाल कार्यालयांत पेमेंट बँकची सुविधा देण्यात येईल.
'साउथ एशिया डेन्सू एजीस नेटवर्क'चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भसीन यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ही निवड २०१७-१८ या वर्षासाठी आहे.
माध्यम सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या 'मीडिया रिसर्च यूझर्स काउन्सिल' (एमआरयूसी) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी 'सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबईत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या 'एमआरयूसी'च्या सभेत पवार यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. पवार या आधी 'एमआरयूसी'च्या संचालक मंडळात प्रकाशकांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.
तसेच इंडियन रीडरशिप सर्व्हे (आयआरएस) हे भारतातल्या वृत्तपत्र वाचकांचे सर्वांत मोठे आणि सर्वांत विश्वासार्ह सर्वेक्षण 'एमआरयूसी'च्या वतीने केले जाते.
'एमआरयूसी' गेल्या दोन दशकांपासून माध्यम क्षेत्रातील विविध पैलूंवर शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करत आहे.
जम्मू काश्मीरमधील आरएस पुरा सेक्टरमधील अरनिया परिसरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे.
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले असून बिजेंद्र बहादूर सिंह असे शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे.
बिजेंद्र बहादूर सिंह हे सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.
जागतिक दिवस
अभियंता दिन : भारतात मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून पाळला जातो.
जन्म /वाढदिवस
दगडू मारुती तथा दया पवार, दलित साहित्यिक : १५ सप्टेंबर १९३५
पद्मश्री दाजी भाटवडेकर, मराठी रंगभूमीवरील नटश्रेष्ठ : १५ सप्टेंबर १९२१
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता : १५ सप्टेंबर १८६०
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदि
प्रा. गंगाधर गाडगीळ, ज्येष्ठ साहित्यिक व नवकथाकार : १५ सप्टेंबर २००८
ठळक घटना
एम.सी.आय. कम्युनिकेशन्स आणि वर्ल्डकॉम या कंपनीचे एकत्रीकरण : १५ सप्टेंबर १९९८
भारतातील दून स्कूलची स्थापना : १५ सप्टेंबर १९३५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.