चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ ऑगस्ट २०१९

Date : 15 August, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
छोटं कुटुंब असणं हीदेखील देशभक्ती – पंतप्रधान :
  • देशात आज सर्वत्र 73 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच वाढती लोकसंख्या हे आपल्या देशापुढील मोठं आव्हान असल्याचे ते म्हणाले. छोटं कुटुंब असणं हीदेखील देशभक्ती असल्याचं मत पंतप्रधानांनी बोलताना व्यक्त केलं.

  • वाढती लोकसंख्या देशापुढील मोठं आव्हान आहे. छोटं कुटुंब असणं हीदेखली देशभक्ती आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. ज्यांच कुटुंब लहान आहे ते सन्मानाचे मानकरी आहेत. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती होणं आवश्यक आहे. यासाठी सामाजिक स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

  • स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनतेने सहकार्य करावं. झपाट्यानं वाढणारी लोकसंख्या पुढील पिढीसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. आपल्या देशात एक जागरूक वर्ग आहे आणि तो हे संकट जाणत असल्याचे ते म्हणाले.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद अस्तित्त्वात येणार; पंतप्रधानांची महत्त्वाची घोषणा :
  • देशाच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आज सर्वत्र पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी तिहेरी तलाक, कलम 370, देशातील गरीबी, देशाची अर्थव्यवस्था, दहशतवाद अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

  • तसंच दहशतवाद पसवणाऱ्यांना शिक्षा ही होणारचं असं सांगत पंतप्रधानांनी पाकिस्तानचं नाव न घेता त्यांना इशारा दिला. दरम्यान, संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यात येणार आहे. ते तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुखांवरील प्रभारी म्हणून काम पाहणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

  • देशातील भ्रष्टाचारासारख्या गंभीर प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. भ्रष्टाचार, घराणेशाहीने देशाचं मोठं नुकसान झालं आहे. भ्रष्टाचार हटवण्यासाठी प्रत्येक स्तरावर काम करण्याची गरज असून तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

१०० गावांमध्ये ‘समूह गृहनिर्माण’ योजना :
  • मुंबई : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यभरात मोठय़ा प्रमाणात घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाकडून डिसेंबर २०१९ पर्यंत पाच लाख घरांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात येणार असून १०० गावांमध्ये समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून ‘स्मार्ट व्हिलेज’ साकारण्यात येणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी दिली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वासाठी घरे-२०२२’ या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री आवास योजना-सर्वासाठी घरे (शहरी)’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्यातून महाराष्ट्रासाठी १९.४० लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेला गती देण्याच्या उद्देशाने राज्यात डिसेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.

  • या महामंडळाला  पाच लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महामंडळाने नुकतेच पुणे येथे १० हजार घरांच्या आणि भुसावळ (जि. जळगाव) येथे पाच हजार घरांच्या प्रकल्पाला मान्यता दिली असून सोलापूर येथे ११ हजार घरांच्या प्रकल्पाला या महिन्यात मान्यता देण्यात येईल, असे मिरगणे यांनी सांगितले.

‘जल जीवन मिशन’वर केंद्र सरकार खर्च करणार ३.५ लाख कोटी :
  • गुरूवारी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. प्रत्येक घरात पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. तसेच पाण्याच्या बचतीसाठी सरकार प्रयत्न करणार असून ‘जल जीवन मिशन’वर सरकार काम करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच यासाठी 3.5 लाख कोटी खर्च करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

  • प्रत्येक घरात पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. पाणी वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. जलसिंचन, जल संचय वाढवण्यावर केंद्र सरकार भर देणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून जल जीवन मिशनवर केंद्र आणि राज्य सरकार मिळून 3.5 लाख कोटी रूपये खर्च करणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. या अभियानासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करणार आहे.

  • वाहते पाणी थांबवण्यासाठी, तसेच मायक्रो एरिगेशन, पाणी वाचवण्यासाठी सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्याची आवश्यकता आहे. तसेच शाळकरी मुलांना पाण्याचं महत्त्व समजण्यासाठी शिक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या 70 वर्षांमध्ये जे काम झाले नाही ते पुढील पाच वर्षांमध्ये पाच पट वेगाने करण्यासाठी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. भविष्य काळात एक असा दिवस येईल जेव्हा किराणामालाच्या दुकानातही पिण्याचे पाणी विकत मिळेल, असे 100 वर्षांपूर्वी जैन मुनी महुडी यांनी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलेली गोष्ट आज खरी ठरत असल्याचेही ते म्हणाले.

भारतीय नेमबाज हिनाचं पाकच्या मंत्र्याला सडेतोड उत्तर :
  • नरेंद्र मोदी सरकारने जम्मू काश्मीरसंबंधी ५ ऑगस्टला ऐतिहासिक निर्णय घेत राज्याला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम हटवण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वप्रथम ही घोषणा केली. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. एकीकडे भारतासोबतचा व्यापार पाकिस्तानने बंद केला, तर दुसरीकडे समझोता एक्स्प्रेस, भारतीय चित्रपटांवर बंदी असे अनेक निर्णय पाकिस्तानने घेतले. तशातच पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद हुसेन यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विटला भारताची नेमबाज हिना सिधू हिने सडेतोड उत्तर दिले आहे.

  • “भारतीय लष्करातील सर्व पंजाबी जवानांनो, काश्मीरमध्ये जो अन्याय आणि अत्याचार सुरू आहे, त्यात सहभागी होऊ नका. त्या भागात सेवेवर जाण्यास तुम्ही नकार द्या”, असे ट्विट फवाद हुसेन यांनी केले होते. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यातच नेमबाज हिना सिधूने त्यांना चांगलेच धारेवर धरले.

 

  • “भारताच्या सुरक्षेसाठी पंजाबी लोक कायमच तत्पर राहिले आहेत. मी पंजाबी आहे आणि सिधू आहे. शिख समाजाचा इतिहास तुम्ही वाचला असाल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे लष्कराचा विषय बाजूला राहू दे .. आमची (भारताची) सुरक्षा करण्यासाठी आम्ही लष्करी सेवेतच भरती होण्याची गरज नाही”, असे हिनाने फवाद यांना सुनावले.

दिनविशेष :
  • भारतीय स्वातंत्र्य दिन / संस्कृत दिन.

महत्वाच्या घटना 

  • १५१९: पनामा सिटी शहराची स्थापना झाली.

  • १६६४: कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसर्‍यांदा) पराभूत केले.

  • १८२४: अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.

  • १८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

  • १९१४: पनामा कालव्यातून एस. एस. अ‍ॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.

  • १९२९: ग्राफ झेपेलिन हा संशोधक बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.

  • १९४७: भारत देश स्वतंत्र झाला.

  • १९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.

  • १९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.

  • १९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.

  • १९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.

  • १९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.

  • १९७१: बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९७५: बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.

  • १९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.

  • १९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.

जन्म 

  • १७६९: फ्रान्सचा सम्राट नेपोलिअन बोनापार्ट यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १८२१ – सेंट हेलेना)

  • १७९८: भारतीय योद्धा संगोली रायन्ना यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८३१)

  • १८६५: रेकी चे निर्माते मिकाओ उस्ईई यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९२६)

  • १८६७: रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९२२)

  • १८७२: क्रांतिकारक, तत्त्वचिंतक योगी अरविंद घोष यांचा जन्म.

  • १८७२: भारतीय गुरु, कवी आणि तत्वज्ञ श्री अरबिंदो यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५०)

  • १८७३: भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४२)

  • १९०४: मोटार व्हीलचेअर चे शोधक जॉर्ज क्लाईन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९२२)

  • १९१२: इंदौर घराण्याचे संस्थापक उस्ताद अमीर खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४)

  • १९१३: लेखक कवी भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ बी. रघुनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३)

  • १९१५: ऊर्दू कथा, पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९१)

  • १९१७: लेखिका अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१)

  • १९२२: लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म.

  • १९२९: साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोमरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९९९)

  • १९४५: बांगला देशच्या पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांचा जन्म.

  • १९४७: चित्रपट अभिनेत्री राखी गुलझार यांचा जन्म.

  • १९५८: अभिनेत्री आणि वेशभूषाकार सिंपल कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर २००९)

  • १९६१: भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म.

  • १९६४: बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचा जन्म.

  • १९७१: भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म.

  • १९७५: भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक विजय भारद्वाज यांचा जन्म.

  • १९९२: भारतीय बुद्धिबळपटू भास्करन आडहान यांचा जन्म.

मृत्यू 

  • १०५७: स्कॉटलंडचा राजा मॅक बेथ यांचे निधन.

  • १११८: कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट ऍलेक्सियस (पहिला) यांचे निधन.

  • १९३५: अमेरिकन अभिनेते विल रॉजर्स यांचे निधन.

  • १९४२: स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९२)

  • १९७४: स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली (जन्म: १५ डिसेंबर १९०३)

  • १९७५: बांगला देशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९२०)

  • २००४: गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९४१)

  • २००५: भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.