चालू घडामोडी - १४ नोव्हेंबर २०१७

Date : 14 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जीएसटीमध्ये होणार अजून काही बदल, अरुण जेटलींनी दिले संकेत :
  • नवी दिल्ली - 1 जुलैपासून देशात लागू करण्यात आलेल्या जीएसटी करप्रणालीची घडी अद्याप व्यवस्थित बसलेली नाही. त्यामुळे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर जीएसटी कौन्सिलकडून जीएसटीमध्ये वेळोवेळी बदल करण्यात येत आहे.

  • केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीमध्ये अजून काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. सरकारच्या महसुलाचा अंदाज घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

  • जेटली म्हणाले, "जीएसटीवरून काही जण बालीश राजकारण करत आहेत. जीएसटीमध्ये कपात करणे शक्य होते. त्यामुळे आम्ही चार महिन्यांमध्ये 28 टक्के जीएसटी असलेल्या स्लॅबमध्ये बदल केले आहेत.

  • " 1 जुलै 2017 पासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली होती. त्यानंतर यातील त्रुटी दूर करण्यासाठी दर महिन्याला जीएसची कौन्सिलची बैठक होत आहे. तसेच शुक्रवारी 200 हून अधिक वस्तूंवरील जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या कपातीचा गुजरात निवडणुकीशी संबंध जोडणाऱ्यांवरही जेटली यांनी टीका केली. (source : lokmat)

सचिनला घडवणाऱ्या आचरेकरांना भारतरत्न द्या : विनोद कांबळी 
  • सिंधुदुर्ग : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’चा सन्मान मिळाला, तो आचरेकर सरांमुळे. त्यामुळे रमाकांत आचरेकर यांनाही भारतरत्न मिळाला पाहिजे, असं मत माजी क्रिकेटपटू, सचिनचा मित्र आणि आचरेकरांचा शिष्य विनोद कांबळी यांनी व्यक्त केलं.

  • मुंबईल्या भेंडीबाजार माझा जन्म झाला. गल्ली क्रिकेट खेळायचो. ज्यावेळी बाऊंड्री मारायचो, त्यावेळी बॉल अर्धा कापून यायचा. कुणाच्या कालवणात गेला, कुणाच्या बिर्याणीमध्ये गेला.

  • मात्र आचरेकर सरांनी आम्हाला क्रिकेट खेळताना पाहिलं आणि त्यांनी आम्हाला घडवलं, अशा शब्दात विनोद कांबळींनी आपल्या गुरुंचे ऋण व्यक्त केले.

  • सचिनला ‘भारतरत्न’ हा सगळ्यात मोठा मान मिळाला, तो आचरेकर सरांमुळेच. आचरेकर सरांना द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाला, मात्र मला वाटतं त्यांना ‘भारतरत्न’ दिला पाहिजे अशा भावना विनोद कांबळी यांनी व्यक्त केल्या. (source :abpmajha)

अमेरिकेतील विद्यार्थ्यांत भारतीय दुस-या स्थानी, चीन प्रथम :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांत भारताने १२.३ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. या विद्यार्थ्यात चीननंतर भारत दुसरा सर्वांत मोठा गट झाला आहे. २०१६ च्या देशाच्या अर्थव्यवस्थेत या गटाने ६.५ अब्ज डॉलरचे योगदान दिले आहे.

  • इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल एज्युकेशनच्या अहवालानुसार २०१६-१७ या वर्षात भारताचे १,८६,२६७ विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत होते. भारतातून अमेरिकेत जाणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या १७.३ टक्के आहे. चीनने यात ६.८ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. त्यांचे ३,५०,७५५ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.

  • अमेरिकेत महाविद्यालये आणि विद्यापीठात दहा लाख विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत होते. हा आकडा नंतर १०.८५ लाखांवर पोहोचला आहे.

  • अमेरिकेत अध्ययन करणाºया विदेशी विद्यार्थ्यात चीन, भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरब, कॅनडा, व्हिएतनाम, तायवान, जपान, मेक्सिको आणि ब्राझिल येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (source: lokmat)

’एशियान’च्या बैठकीत भेटले मोदी आणि ट्रम्प, भारताच्या कौतुकासाठी मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार :

  • मनिला - येथे सुरू असलेल्या ’एशियान’ शिखर संमेलानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फिलिपिन्सच्या दौऱ्यावर आहेत. या बैठकीदरम्यान सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली.

  • या भेटीमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यात आशियाई देशांचे भविष्य आणि अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिका  मिळून संपूर्ण जगाचे भविष्य बदलू शकतात, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच भारताच्या केलेल्या कौतुकासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. 

  • आशियाई शिखर परिषदेतील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गेल्या सहा महिन्यांमधील मोदी आणि ट्रम्प  यांच्यामधील ही दुसरी बैठक आहे. या बैठकीमधून ट्रम्प यांनी भारत हा अमेरिकेसाठी चीनपेक्षा कमी महत्त्वपूर्ण नसल्याचे दाखवून दिले आहे.

  • गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने सुधारले आहेत. विशेषकरून  चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्युत्तर म्हणून भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांच्यातील युतीमधून त्याचे संकेत मिळत आहेत. (source :lokmat)

पंतप्रधान झाले तर अण्णा देश दारूमुक्त करणार :
  • अहमदनगर - राजकारणाला नकार देणा-या अण्णा हजारे यांनी भावी पत्रकारांच्या बालचमूने घटकाभरासाठी का होईना पंतप्रधान होणे भाग पाडले. ‘मी पंतप्रधान होणार नाही.

  • फकिराला कोण पंतप्रधान करणार? पण झालोच तर देश भ्रष्टाचार आणि दारुमुक्त करेल’,असे उत्तर अण्णांनी दिले! पत्रकारांच्या भूमिकेत शिरलेल्या बालचमूने अण्णांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची शालेय जीवनापासून उलटतपासणी घेतली. मुलांचे दप्तराचे ओझे हटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा शब्दही अण्णांकडून वदवून घेतला.

  • या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांनी थेट राळेगणसिद्धी गाठत अण्णांची मुलाखत घेतली. लहान मुलांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची अण्णांची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे एरवी माध्यमांचा सराव असलेले अण्णाही जरा सावध होऊनच या पत्रपरिषदेला सामोरे गेले.

  • अण्णा तुम्ही शाळेत खोड्या करत होतात का? तुम्ही नेमके कोणाला घाबरता? उपोषण करताना तुम्हाला भूक कशी लागत नाही? या वयातही तुम्ही एवढे काम करता, तुमच्या या सदृढ शरीराचे रहस्य काय? मोठ्यांसाठी तुम्ही खूप कामे केली, आम्हा लहानग्यांसाठी काय करणार? अशा एकाहून एक प्रश्नांचा भडिमार अण्णांवर झाला.

  • उत्तरे देताना अण्णाही नकळत लहान होऊन गेले. शेवटी बालटीमला भ्रष्टाचारमुक्तीची व व्यसनमुक्तीची शपथ दिली. (source :lokmat)

सायना, प्रणॉयचा जेतेपदाचा निर्धार :
  • राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नुकतेच विजेतेपद मिळवणाऱ्या सायना नेहवाल व एच. एस. प्रणॉय यांनी चीन खुल्या स्पर्धेत अव्वल कामगिरीचा निर्धार केला आहे. कारण या स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर त्यांना दुबईत होणाऱ्या सुपर सीरिजच्या अंतिम टप्प्यास पात्र होता येणार आहे.

  • जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल क्रमांकाची खेळाडू सायनाने राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवताना ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूवर मात केली होती. प्रणॉयनेही किदम्बी श्रीकांत या तुल्यबळ प्रतिस्पध्र्याला हरवले होते. सायना व प्रणॉय या दोन्ही खेळाडूंना सध्या क्रमवारीत ११वे स्थान आहे.

  • सायनाला चीन खुल्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अमेरिकेच्या बेईवेन झांगशी खेळावे लागणार आहे. सिंधूला येथील पहिल्या सामन्यात इंडोनेशियन विजेत्या सायका सातोशी झुंज द्यावी लागणार आहे.

  • प्रणॉयला पहिल्या फेरीत पात्रता स्पर्धेतून मुख्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या खेळाडूशी सामना करावा लागणार आहे. श्रीकांत, समीर वर्मा, अजय जयराम व बी. साईप्रणीत यांनी येथील स्पर्धेत भाग घेतलेला नाही. (source :loksatta)

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक मधुमेह दिन / राष्ट्रीय बाल दिन

महत्वाच्या घटना

  • १७७०: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.

  • १९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.

  • १९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.

  • १९७१: मरीनर - ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

  • १९७५: स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.

  • १९९१: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

  • २०१३: सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.

जन्म दिवस

  • १७६५: वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ – न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

  • १८८९: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)

  • १८९१: पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)

  • १९१९: स्वातंत्र्यसैनिक, लेखक अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९९१)

  • १९२२: संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली यांचा जन्म.

  • १९२४: कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००८)

  • १९४७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९८)

  • १९७१: ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट यांचा जन्म.

  • १९७१: भारतीय शेफ आणि लेखक विकास खन्ना यांचा जन्म.

  • १९७४: क्रिकेटपटू हृषिकेश कानिटकर यांचा जन्म.

मृत्यू

  • १९६७: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८९५)

  • १९७१: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८८९ – समडोळी, जिल्हा सांगली)

  • १९७७: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १८९६)

  • १९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १९२०)

  • २०००: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)

  • २०१३: भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक सुधीर भट यांचे निधन.

  • २०१३: भारतीय पत्रकार आणि लेखकहरि कृष्ण देवसरे यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३८)

  • २०१५: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के.ए. गोपालकृष्णन यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.