केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला या महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये दिल्ली, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल व केरळ वगळता अन्य राज्यांमध्ये भाजपाला चांगले यश मिळाले आणि हे यश नरेंद्र मोदींच्या करीश्म्याचं मानलं गेलं.
भाजपाचे सगळे नेते व कार्यकर्ते भाजपाचं सरकार अत्यंत चांगला कारभार करत असल्याचं सांगत आहेत, तर विरोधक वाढती असहिष्णूता, वाढलेला दहशतवाद, पाकिस्तानशी बिघडलेले संबंध, रोजगाराची वानवा, अर्थव्यवस्थेची असमाधानकारक वाढ याकडे लक्ष वेधत आहेत.
मोदी सरकारबद्दल काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा पोल घेत आहोत. यामध्ये महागाई, विकास, भ्रष्टाचार, मंत्र्यांची कामगिरी, मोदींचा करीश्मा, जातीयवाद, असहिष्णूता, काश्मिर अशा अनेक प्रश्नांचा समावेश करण्यात आला असून जनतेला खरोखर या सरकारबद्दल काय वाटतं हे समोर येणार आहे.
स्टार मल्ल साक्षी मलिकला शुक्रवारी महिलांच्या ६० किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या रिसाकी कवाईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
२४ वर्षीय साक्षीने उपांत्यपूर्व फेरीत उज्बेकिस्तानच्या नबीरा एसेनबाएव्हाचा ६-२ ने पराभव केला तर उपांत्य फेरीत अयायुलिम कासिमोव्हाविरुद्ध १५-३ ने सहज सरशी साधली.
आॅलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती वर्तुळात पुनरागमन करणारी साक्षी फॉर्मात नसल्याचे चित्र दिसले. साक्षीला रिओ आॅलिम्पिकमध्ये ६३ किलो वजन गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या रिसाकीविरुद्ध २ मिनिट ४४ सेकंदामध्ये १०-० ने पराभव स्वीकारावा लागला.
भारताची अन्य महिला मल्ल विनेश फोगाट हिलाही महिलांच्या ५५ किलो वजन गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दिव्या ककरान महिलांच्या ६९ किलो वजन गटात अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली.
विनेशची वाटचाल सुरळीत राहिली. महिलांच्या ५५ किलो वजन गटात तिने उपांत्यपूर्व फेरीत उज्बेकिस्तानच्या सेवारा इशमुरातोव्हाचा १०-० ने तर त्यानंतर चीनच्या झांगचा ४-० ने पराभव केला.
इंदिरा गांधी या भारतातील सर्वमान्य नेत्या असून २० व्या शतकातील त्या सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व आहेत अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
इंदिरा गांधी यांच्या निर्णयक्षमतेची स्तुती करताना मुखर्जींनी काँग्रेस नेतृत्वाला पक्षातील निर्णय प्रक्रीया गतिमान करण्याचा सूचक संदेशही दिला.
इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदी मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होते.
इंदिरा गांधींचे कौतुक करताना प्रणव मुखर्जी म्हणाले, इंदिरा गांधी या २० व्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहेत. भारतातील जनतेसाठी त्या आजही सर्वमान्य नेत्या आहेत असेही त्यांनी सांगितले.
१९७८ मध्ये काँग्रेसचे विभाजन झाल्यावर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील विजयाची आठवण त्यांनी याप्रसंगी करुन दिली. १९७८ मध्ये काँग्रेसचे विभाजन झाले होते. इंदिरा गांधी यांना पक्षाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. पदभार स्वीकारल्यावर २० दिवसांमध्येच त्यांनी त्यांच्या टीमची निवड केली होती.
चीन-पाकिस्तान दरम्यान सीपीईसी प्रकल्पातील एका भागावर भारताचा तीव्र आक्षेप आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधून जाणा-या इकॉनॉमिक कॉरिडोअरला भारताचा विरोध आहे. पीओके भारताचा भाग असल्याने भारताने आक्षेप घेतला आहे.
भारताने चीनमध्ये उद्यापासून सुरु होणा-या 'वन बेल्ट वन रोड' बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता ध्यानात घेऊन असे प्रकल्प झाले पाहिजेत असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
'वन बेल्ट वन रोड' या महत्वकांक्षी योजनेतंर्गत चीनने सीमा ओलांडून बंदर, रेल्वे आणि रस्ते मार्गाने जोडणीचे लक्ष्य ठेवले आहे.
सुशासन, आंतरराष्ट्रीय नियम, पारदर्शकता आणि समानतेने असे प्रकल्प झाले पाहिजेत. ज्या प्रकल्पामुळे कर्जाचा बोजा वाढेल, पर्यावरणाचे संतुलन बिघडेल असे प्रकल्प टाळले पाहिजेत असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
जागतिक दिवस
--
जन्म, वाढदिवस
धर्मवीर संभाजीराजे यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म : १४ मे १६५७
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
अखिल भारतीय कॉंग्रेसच्या मूळ संश्थापकांपैकी व एक प्रसिध्द कायदेपंडीत नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन : १४ मे १९२३
भारतीय जनसंघाचे अध्यक्ष व प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघुवीर यांचे अपघाती निधन : १४ मे १९६३
ठळक घटना
ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले : १४ मे १९८२
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.