आर्थिक विकास, सरकारचे निर्णय व करासारख्या महत्त्वाच्या व्यवस्था प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकारवर विश्वास असणं ही बाब महत्त्वाची ठरते.
जनता सरकारला किती स्थिर आणि विश्वसनीय समजते यावर लोकांचा सरकारवर असलेल्या विश्वास विषद होत असून देशाचं सरकार नागरिकांच्या सुरक्षेसाठी किती सक्षम आहे आणि जनतेला सुविधा पुरविण्यासाठी सरकार कटिबद्ध असणंही गरजेचं असतं.
प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या ‘फोर्ब्स’ मॅगझिननं वेबसाइटवर एक यादी प्रसिद्ध केली आहे. जनतेला सरकारवर असलेल्या भरोशाच्या बाबतीत यादीमध्ये भारताला अव्वल स्थान देण्यात आलं आहे.
ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटकडून जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये १५ देशांची नावं देण्यात आली आहे.
भारत- चीनमध्ये सीमारेषेवर तणाव असतानाच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनला जाणार आहेत.
चीनमध्ये ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक होणार असून या बैठकीला डोवाल उपस्थित राहणार आहेत, डोवाल चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत सीमाप्रश्नावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
भारत आणि चीनमध्ये डोकलामवरुन तणाव निर्माण झाला असून चीनने ८ जून रोजी डोकलाम भागात रस्त्याचे काम सुरू करण्याच्या उद्देशाने घुसखोरी केली होती.
डोकलाम हा भाग भूतानच्या अंतर्गत येत असला तरी भारत आणि भूतान या दोन्ही देशांनी चीनच्या घुसखोरीवर आक्षेप घेतला. भूतानच्या सीमारक्षणाची जबाबदारी भारतीय सैन्याकडे असून डोकलाममध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्या तैनात आहेत.
जपानमधील टोकियो येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या एका सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येईल.
वन्यजीव छायाचित्रणात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना जपानचा 'नेचर बेस्ट एशिया' पुरस्कार जाहीर झाला आहे.
बैजू पाटील यांनी गोव्यातील महावीर अभयारण्यात काढलेल्या 'मलबार ग्लायडिंग फ्रॉग'ची आशियातील ८,५०० छायाचित्रांतून 'हायली ऑनर्ड' प्रकारात निवड झाली.
या बेडकाचा रंग पूर्णपणे हिरवा असून एखादा कोळी (स्पायडर) झाडांच्या पानांवर जसा फिरतो त्याप्रमाणेच हा बेडूक फिरत असतो.
गोरक्षणाच्या मुद्यावरुन देशातील काही ठिकाणी हाणामारी, हत्या यांसारख्या हिंसक घटना घडत असून यामुळे सर्व स्तरातून भाजपा व केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे.
देशातील काही भागांमध्ये कथित गोरक्षणावरुन होणा-या हिंसेवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी सांगितले की, कायदा हातात घेणा-या लोकांवर काटेकोरपणे कारवाई केली जाईल.
तर दुसरीकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेत की, स्वयंघोषित गोरक्षक हे खरंतर नरभक्षकप्रमाणे आहेत.
गोरक्षणाच्या नावावर अल्पसंख्यांक व दलितांवर होणा-या हल्ल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर गहलोत यांनी सांगितले की, पार्टी व सरकारचं असे स्पष्ट मत आहे की कायदा हातात घेणा-या कोणत्याही व्यक्तीची सुटका करण्यात येणार नाही.
इस्तंबूल येथे आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या जागतिक पेट्रोलिएम काँग्रेसमध्ये भारताच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांनी सहभाग घेतला. यानिमित्ताने प्रधान यांनी 'भारतीय तेलव गॅस क्षेत्रातील विद्यमान धोरणे' या विषयावरील मंत्री परिषदेचे नेतृत्व केले.
अतिरिक्त पुरवठ्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या जागतिक तेल बाजारात आगामी काळातील मागणी भारतासारख्या आशियाई देशांवरच अवलंबून राहील.
तेल पुरवठादार देशांनी भारतासारख्या देशांना व्यवहार्य किमतीत तेल पुरवठा करावा, असा आग्रह भारताचे पेट्रोलिएम राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) धर्मेंद्र प्रधान यांनी तेल उत्पादक देशांपुढे धरला.
'तेल, गॅस आणि उत्पादनांसमोरील पुरवठा व मागणीविषयक आव्हाने' या विषयावर एक महापरिषदही झाली असून या महापरिषदेत बोलताना प्रधान यांनी वरील विधान केले.
केंद्र सरकारकडून लष्कराला आपत्कालीन स्थितीत ठरलेल्या शस्त्रांची थेट खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
सीमेवर होणाऱ्या चकमकींच्या वेळी सैन्याला शस्त्रसज्ज ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सैन्याची शस्त्रखरेदी नोकरशाहीच्या लालफितीमध्ये आणि फायलींमध्ये अडकणार नाही.
शस्त्रखरेदीच्या प्रक्रियेला अनेकदा बराच काळ लागतो. त्याचा परिणाम कोणत्याही कारवाईवर होऊ नये, अशी संरक्षण मंत्रालय व एकूणच केंद्र सरकारची इच्छा आहे. म्हणून लष्कराला ठरलेली शस्त्रखरेदी थेट करण्याचे केंद्राकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शस्त्रखरेदीचे अधिकार लष्कराला देण्यास ही पार्श्वभूमी आहे. मात्र नवी शस्त्रखरेदी लष्कराला परस्पर करता येणार नाही.
पनामागेट गेट प्रकरणी विरोधकांनी केलेली राजीनाम्याची मागणी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गुरुवारी फेटाळली.
पनामागेट प्रकरणी झालेल्या आरोपांची समितीने चौकशी करून शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस अहवालात केलेली आहे.
मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत नवाझ शरीफ यांनी संयुक्त चौकशी तुकडीच्या अहवालाचे वर्णन ‘आरोप आणि तर्क’ अशा शब्दांत केले, असे वृत्त ‘डॉन’ आॅनलाईन वृत्तपत्राने दिले.
विरोधकांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीकडे बोट दाखवून ते म्हणाले,‘‘पाकिस्तानच्या लोकांनी मला निवडून दिले असून मला पदावरून फक्त तेच दूर करू शकतात.’’ राजकारणात आल्यावर माझ्या कुटुंबाने काहीही कमावले नाही.
जागतिक दिवस
बॅस्टिल दिन : फ्रांस.
जन्म, वाढदिवस
गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक : १४ जुलै १८५६
शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री : १४ जुलै १९२०
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश : १४ जुलै २००८
ठळक घटना
अमरिकेतील सेंट लुई शहरात जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचे स्मारक खुले : १४ जुलै १९४३
फिजीतील उठावाचा सूत्रधार जॉर्ज स्पेटला अटक व देशद्रोहाचा आरोप : १४ जुलै २०००
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.