मुंबई : इंग्लंडमध्ये 2022 साली होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून नुकतीच याची घोषणा करण्यात आली. आयसीसीनंही याबाबत ट्वीट करुन याची माहिती दिली. त्यामुळे 24 वर्षांनी राष्ट्रकुलमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेश होणार आहे.
क्रिकेटच सर्व समाने बर्मिंहॅम येथील एजबेस्टन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण आठ महिला संघ सहभागी होणार आहेत. याआधी 1998 च्या क्वालालंपूर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने सुवर्ण पदक जिंकलं होतं.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष लुईस मार्टिन यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केल्याचं आम्ही स्वागत करतो. स्पर्धेत महिला टी-20 क्रिकेटसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चांगला मंच असल्याच लुईस मार्टिन यांनी म्हटलं.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 27 जुलै ते सात ऑगस्ट 2002 पर्यंत इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये पार पडणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 18 खेळांमधील जवळपास 45 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.
मुंबई : येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण सर्वजण भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या कार्यक्रमांची लगबग सुरु आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सोशल मीडियावरही असंख्य पोस्ट्स शेअर केल्या जातात, शुभेच्छा दिल्या जातात. त्यासाठी ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर विशेष हॅशटॅग वापरले जातात.
यंदा ट्विटरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त वापरल्या जाणाऱ्या हॅशटॅगसोबत अशोकचक्राची इमोजीदेखील पाहायला मिळणार आहे. मराठीसह देशातल्या 10 प्रमुख भाषांमध्ये (इंग्लिश, हिंदी, गुजराती, तमिळ, बंगाली, पंजाबी, मल्याळम, ओडिया, कानडी, तेलुगू) हॅशटॅग बनवण्यात आले आहेत.
मागीलवर्षीदेखील या भाषांमध्ये विशेष हॅशटॅग बनवण्यात आले होते. त्यावेळी हॅशटॅगसह लालकिल्ल्याची इमोजी पाहायला मिळाली होती. यंदा लाल किल्ल्याऐवजी अशोक चक्राची इमोजी पाहायला मिळेल. हे हॅशटॅग 14 ऑगस्ट रोजी अॅक्टिव्ह होतील, असे ट्विटर इंडियातर्फे सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली : सध्या देशभर निकृष्ट दर्जाच्या विधि महाविद्यालयांचे पेव फुटले असल्याने, पुढील तीन वर्षे कोणत्याही नव्या विधि महाविद्यालयास परवानगी न देण्याचा आणि आहेत त्याच महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचा निर्णय ‘बार कौन्सिल आॅफ इंडिया’ने घेतला आहे.
रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय कौन्सिलने एका प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर केला. मात्र, ज्या राज्यांमध्ये राष्ट्रीय विधि विद्यापीठ नाही, तेथे अशी संस्था सुरू करण्याचा तेथील राज्य सरकारचाच प्रस्ताव असेल, तर त्याला हा निर्णय लागू होणार नाही.
कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, सध्या देशात असलेली १,५०० विधि महाविद्यालये पक्षकारांची न्यायालयीन प्रकरणे चालविणे व विधि सेवा देणे यासाठी पुरेशा संख्येने वकील पुरविण्यास पुरेशी आहेत. त्यामुळे काही काळ नवी महाविद्यालये निघाली नाहीत, तरी अडचण होणार नाही. त्याऐवजी विधि शिक्षणाचा आणि वकिली व्यवसायाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याने, त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
कौन्सिलने असेही म्हटले की, असाच निर्णय सन २०१६ मध्येही घेण्यात आला होता. तरीही विविध राज्य सरकारांनी ३०० हून अधिक विधि महाविद्यालयांना ‘ना हरकत दाखले’ दिले व विद्यापीठांनी त्या महाविद्यालयांना संलग्नताही दिली. कौन्सिलने मंजुरी देण्यास नकार दिल्यावर अनेक प्रकरणे न्यायालयांमध्ये गेली व त्यापैकी काही महाविद्यालयांना मंजुरी देण्याचे आदेशही दिले गेले.
भारताला स्वातंत्र्य मिळून आता 72 वर्ष पूर्ण होतील. इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. परंतु भारताव्यतिरिक्त असे अन्य 4 देश आहेत जे 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र दिन साजरा करतात. या देशांनाही 15 ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य मिळालं होतं.
भारताव्यतिरिक्त दक्षिण कोरिया, कांगो, बहरीन आणि लिकटेंस्टीन हे चार देश 15 ऑगस्ट रोजीच स्वतंत्र झाले होते. दक्षिण कोरियाला जापानकडून 15 ऑगस्ट 1945, बहरीनला ब्रिटनकडून 15 ऑगस्ट 1971, कांगोला फ्रान्सकडून 15 ऑगस्ट 1960 आणि लिकटेंस्टीनला जर्मनीकडून 15 ऑगस्ट 1866 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते.
देशातील ऑटो सेक्टरला वारंवार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनांच्या विक्रीत मोठी घट होत असून सलग नवव्या महिन्यात आकडेवारीत घसरण झाली आहे. प्रवासी वाहनांची विक्री ३०.९८ टक्क्यांनी घसरली असून २ लाख ७९० राहिली. जुलै २०१८ महिन्यात हा आकडा २ लाख ९० हजार ९३१ इतका होता. सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाइल मॅन्यूफॅक्चर्सने (SIAM) यासंबंधी एक अहवाल जाहीर केला आहे. ऑटो सेक्टरच्या मंदीचा फटका नोकऱ्यांनाही बसला आहे. ऑटो सेक्टरमधील १५ हजार जणांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.
सियामचे मुख्य कार्यकारी अधिकारी विष्णू माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ऑटो सेक्टर क्षेत्रात १९ वर्षांत पहिल्यांदाच इतकी मोठी घट पहायला मिळाली आहे. याआधी डिसेंबर २००० मध्ये इतकी मोठी घसरण पहायला मिळाली होती”. सियामच्या अहवालानुसार, गेल्या काही काळात ३०० डिलरशिप्स बंद पडल्या आहेत.
जुलै २०१९ मध्ये विक्रीत १८ टक्के घट झाली आहे. सर्वात मोठी घट प्रवासी वाहन क्षेत्रात झाली असून विक्रीत ३५ टक्क्यांची घट झाली आहे. व्यवसायिक वाहनांच्या विक्रीत २५ टक्के घट झाली असून, दुचाकींच्या विक्रीत गेल्या जुलै महिन्याच्या तुलनेत १६ टक्के घट झाली आहे. गाड्यांच्या विक्रीच्या तुलनेत २०१८ मध्ये आकडा २२ लाख ४५ हजार २२४ होता. मात्र यावर्षी १८ लाख २५ हजार १४८ वाहनांची विक्री झाली आहे.
“सरकारकडून ऑटो सेक्टरला संजीवनी मिळण्याची गरज आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक संदेश मिळाला आहे”, असं विष्णू माथूर यांनी सांगितलं आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर या राज्यात १२ ते १४ ऑक्टोंबर दरम्यान गुंतवणूक परिषद होणार आहे. १२ ऑक्टोंबरला श्रीनगरमध्ये या परिषदेचे उद्घाटन होईल आणि १४ ऑक्टोंबरला जम्मूमध्ये समारोपाचा कार्यक्रम होईल. कॉनफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज सीआयआयची जम्मू-काश्मीर २०१९ गुंतवणूक परिषदेत महत्वाची भूमिका आहे. टाइम्स नाऊने हे वृत्त दिले आहे.
जम्मू-काश्मीर गुंतवणूक परिषदेच्या निमित्ताने या राज्याला त्यांची बलस्थाने, रणनिती आणि क्षमता दाखवून देण्याची संधी आहे. या परिषदेत सहभाग घेणाऱ्या कंपन्यांना राज्याची व्यापार अनुकूल धोरणे, इन्फ्रास्ट्रक्चर, नैसर्गिक स्त्रोत, कच्चा माल आणि कौशल्य असलेला कामगार वर्ग आणि व्यवसायाच्या संधी कशात आहेत त्याबद्दल माहिती समजेल. सीआयआय आणि एफआयसीसीआय या संस्थांकडे अशा कार्यक्रमांच्या आयोजनाचा भरपूर अनुभव आहे.
कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या आठवडयात राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात जम्मू-काश्मीर आणि लेहच्या विकासाची रुपरेखा मांडली होती. दहशतवादामुळे काश्मीरमध्ये मागच्या काही वर्षांपासून मोठे उद्योग आलेले नाहीत. पर्यटन हा या राज्याचा मुख्य व्यवसाय आहे. पण काश्मीरमधल्या तणावामुळे पर्यटकांची संख्याही रोडावली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करुन दहशतवाद्याच्या समस्येवर मात करण्याची सरकारची रणनिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या भाषणातही जम्मू-काश्मीरचा विकास घडवून दाखवू असा दावा केला होता. दुसऱ्या बाजूला काहीही करुन काश्मीरमध्ये अस्थितरता निर्माण करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न आहेत.
सुषमा स्वराज यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले - पंतप्रधान :
सुषमा स्वराज या जशा मितभाषी होत्या तशाच त्या जबाबदार आणि प्रसंगी कठोर बोलणाऱ्या व्यक्ती होत्या. त्या समर्पित कार्यकर्त्या आणि चांगल्या सहकारीही होत्या, त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपा नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांच्या आठवणींना मंगळवारी उजाळा दिला. नवी दिल्लीत आज स्वराज यांच्या शोकसभेचे बोलताना मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मोदी म्हणाले, सुषमा स्वराज या आपल्या मतांबाबत ठाम होत्या, आपल्या मतांशी प्रामाणिक राहण्यासाठी त्या नेहमी प्रयत्न करायच्या. त्यांची भाषणं ही केवळ प्रभावशालीच नव्हती तर प्रेरणादायी असायची. त्या एक सहकारी म्हणून खूपच मदतशील होत्या. पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांमध्ये माझे पहिले भाषण होते त्यावेळी त्यांनी मी माझे विचार कशा पद्धतीने मांडावेत याची चांगली तयारी करुन घेतली होती. जबाबदारी काहीही असली तरी रोखठोक बोलण्याचा त्यांचा स्वभाव होता. अशा वेळी आपल्या लोकांना, पक्षाला समस्येतून बाहेर काढण्यासाठी त्या बऱ्याचदा कडक हरयाणवी भाषेचाही वापर करायच्या.
परराष्ट्र मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी प्रोटोकॉलची परिभाषाच बदलून टाकली होती. ‘वसुधैय कटुंबकम’ या तत्वानुसार, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या भारतीयाला आपला मानून ते केव्हाही मदत करण्यासाठी तयार असायच्या. अनेक मर्यादांशी त्यांनी झुंज दिली, त्याचबरोबर अनेक जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. त्यामुळे आज त्या आपल्यात नसल्या तरी आपल्या कामगिरीचा मोठा वारसा आणि ठेवा त्या आपल्याला देऊन गेल्या आहेत.
महत्वाच्या घटना
१६६०: मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला.
१८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना.
१८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.
१८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.
१९४५: दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.
१९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.
१९४७: पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९४७: लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.
१९५८: एअर इंडियाची दिल्ली – मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
१९७१: बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.
२०१०: पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.
जन्म
१७७७: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८५१)
१९०७: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९९६)
१९११: भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी यांचा जन्म.
१९२५: साहित्यिक, नाटककार पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४)
मृत्यू
१९५८: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९००)
१९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२६)
१९८८: रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८)
२०१२: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २६ मे १९४५)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.