चालू घडामोडी - १४ एप्रिल २०१८

Date : 14 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महामानवाची १२७ वी जयंती, देशभरात कार्यक्रम :
  • मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहे. 1891 साली मध्यप्रदेशातील महूमध्ये त्यांचा जन्म झाला. आज जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.

  • भारतातील जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचं मोठं काम डॉ. आंबेडकरांनी केलं. त्याच वेळी जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ यातून त्यांचं योगदान मौल्यवान ठरलं आहे. त्यांचं विचारधन आणि प्रत्यक्ष चळवळींमधला त्यांचा सहभाग, यातून ते सर्वांचेच प्रेरणास्त्रोत बनले.

  • बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महू असली तरी मुंबई आणि नागपूर त्यांनी आपली कर्मभूमी मानली. म्हणूनच 1956 मध्ये त्यांनी नागपुरात बौद्ध धम्म स्वीकारला आणि दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

  • डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लाखोंच्या संख्येनं भीमबांधव नागपुरातील दिक्षाभूमीत येत असतात. तर मुंबईतल्या चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित राहणार आहेत.

अमेरिका: डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे दिले आदेश :
  • वॉशिग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला फ्रान्स आणि ब्रिटेनने पाठिंबा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हवाई हल्ल्यांच्या आदेशानंतर सीरियातील दमिश्कजवळ स्फोटाचा आवाजही ऐकू आला. अमेरिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीरियाच्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी लढाऊ विमानांचा वापर केला जातो आहे. तसंच हल्ल्यासाठी बॉम्बचाही वापर होतो आहे. दुसरीतडे, रशियानेही अमेरिकेला मिसाइल हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे.

  • 'सीरियाचा हुकूमशाह बशर अल असद यांच्या रासायनिक हल्ल्याचा लक्ष्य बनवून हल्ले सुरु करावेत, असे आदेश काहीच वेळापूर्वी आम्ही सैन्याला  दिले आहेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सीरिया प्रकरणावरुन देशाला संबोधित करताना म्हणाले. 

  • 'फ्रान्स आणि ब्रिटनच्या मदतीने यासंदर्भात एक संयुक्त ऑपरेशन सीरियात सुरु आहे. यासाठी दोन्ही देशांचे मी आभार मानतो. हा हल्ला असद सरकारला सीरियामध्ये रशियाच्या रासायनिक शस्त्रास्त्रांच्या वापरास रोखण्यात अपयशी ठरल्याचा परिणाम आहे, असंही ते म्हणाले. 

  • दरम्यान, सीरियातील डुमामध्ये रासायनिक शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यात लहान मुलांसह एकूण 74 जणांचा मृत्यू झाला होता. 

महामानवाचे दिल्लीत भव्य स्मारक :
  • नवी दिल्ली - अलिपूरमध्ये उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे उद्घाटन त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशातील बलात्कारांच्या घटनांबद्दल ते प्रथमच बोलले. ते म्हणाले की, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकार प्रयत्न करेल.

  • अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना या स्मारकाचा निर्णय झाला होता. यूपीए सरकारने पुढे काहीच केले नाही. त्यानंतर आमच्या सरकारने या महामानवाच्या स्मारकाचे काम पूर्ण केले. - पंतप्रधान मोदी

चित्रपट पुरस्कारांत मराठीची वाहवा, श्रीदेवी ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :
  • नवी दिल्ली : अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीचे डोळे ज्याकडे लागलेले असतात, त्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, प्रख्यात दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर ‘मॉम’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल दिवंगत श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. ख्यातनाम दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या नेतृत्वाखालील परीक्षक मंडळाने पुरस्कारप्राप्त चित्रपट तसेच भूमिका, दिग्दर्शन आदींची निवड केली. उत्तम करमणूक करणारा चित्रपट म्हणून ‘बाहुबली २’ ठरला आहे.

  • यंदाच्या ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीतील ‘मृत्युभोग’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा तर सुयश शिंदे यांच्या ‘मयत’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनेते प्रसाद ओकचा ‘कच्चा लिंबू’ यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व रवी जाधव यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या आणि प्रेक्षकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला होता. ‘म्होरक्या’ चित्रपटाला विशेष कामगिरीसाठीचा पुरस्कार घोषित करण्यात आला असून, ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘पावसाचा निबंध’ या लघुपटाचा गौरव केला जाणार आहे.

  • नर्गिस दत्त पुरस्कारासाठी निपुण धर्माधिकारी यांच्या ‘धप्पा’ची निवड झाली आहे. ‘न्यूटन’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी पंकज त्रिपाठी यांनाही पुरस्कार घोषित झाला आहे. ३ मे २०१८ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जातील.

अजित डोवाल यांची चीनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा :
  • बीजिंग : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे सत्तारूढ सीपीसीचे वरिष्ठ अधिकारी यांग जेइची यांच्यासोबत शांघायमध्ये शुक्रवारी चर्चा केली. गेल्या वर्षी डोकलाममध्ये ७३ दिवस निर्माण झालेल्या वादानंतर दोन्ही देशांतील अधिकाºयांतील ही दुसरी चर्चा आहे.

  • सीपीसीच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य यांग यांच्याशी झालेली चर्चा दोन्ही देशांत होणाºया महत्त्वपूर्ण संवादापूर्र्वी होत आहे. डोकलाममध्ये चाललेल्या वादानंतर संबंध पूर्ववत करण्यासाठी दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. स्वराज, सीतारामन यांचाही सहभाग परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या शांघाई कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीत २४ एप्रिल रोजी सहभागी होणार आहेत.

  • एससीओच्या आठ सदस्यांत भारतासह पाकिस्तान नवा देश आहे. एससीओत चीन, कझाखस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत व पाकिस्तान यांचा समावेश आहे.

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार :
  • नवी दिल्ली - दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मरणोत्तर  जाहीर झाला आहे.  65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज झाली. त्यावेळी विनोद खन्ना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 70 च्या दशकात उत्तम अभिनेता म्हणून बॉलीवूड गाजवणाऱ्या विनोद खन्ना यांनी उत्तरार्धात कुशल नेता म्हणूनही छाप पाडली होती. गतवर्षी दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले. 

  • नवी दिल्ली येथी शास्त्री भवन येथे आज शेखऱ कपूर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्करांची घोषणा केली. यावेळी विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.  शेखर कपूर यांच्या अध्यक्षतेखालील या ज्युरींच्या समितीमध्ये गीतकार महबूब, राजेश मापुसकर, त्रिपुरारी शर्मा आदींचा समावेश होता. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 3 मे रोजी होणार आहे.  

  • मन की मीत या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी कारकिर्दीत  खलनायकाच्या भूमिकेकडून नायकाच्या भूमिकेकडे यशस्वी प्रवास केला. 1971 साली प्रदर्शित झालेला हम तुम और वो हा त्यांचा नायक म्हणून पहिला चित्रपट होता.  ‘अमर अकबर अँथनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘ज़मीर’, ‘हेराफेरी’, ‘बर्निंग ट्रेन’... ‘अमर अकबर अँथनी’ हे विनोद खन्ना यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते. 

  • विनोद खन्ना यांनी गुरुदासपूर येथून निवडणूक लढवली. तेथून ते जिंकूनही आले. त्यानी वाजपेयी सरकारमध्ये काही काळ सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याचे मंत्रिपद भूषवले, तसेच नंतर परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्रिपदही भूषवले. 

नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात :
  • इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. नवाझ शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला असून, तेथील राज्यघटनेच्या कलम ६२ (१)(एफ)नुसार दोषी ठरलेली व्यक्ती आयुष्यभरासाठी दोषी मानली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

  • न्यायालयाने याच कलमांन्वये शरीफ यांना फेब्रुवारीमध्ये दोषी ठरवले होते. त्यामुळेच न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ शरीफ यांना सार्वजनिक पद स्वीकारता येणार नाही. म्हणजेच त्यांची राजकीय वाटचाल संपल्यात जमा आहे. याआधी त्यांना पक्षाध्यक्षपदीही राहता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

  • न्यायालयाने म्हटले होते की राज्यघटनेच्या अनुच्छेद ६२ व ६३नुसार दोषी ठरलेली कोणतीही व्यक्ती राजकीय पक्षाची प्रमुख असू शकत नाही. ‘डॉन न्यूज’ने दिलेल्या वृत्ताप्रमाणे ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने दिलेल्या निर्णयाने शरीफ भलतेच अडचणीत सापडणार आहेत.

दिनविशेष :
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

महत्वाच्या घटना

  • १६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.

  • १६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.

  • १७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.

  • १९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.

  • १९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.

  • १९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.

जन्म

  • १६२९: डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध क्रिस्टियन हायगेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १६९५)

  • १८९१: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९५६)

  • १९१४: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९९२)

  • १९१९: पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २०१३)

  • १९१९: भारतीय लेखक आणि नाटककार के. सरस्वती अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९७५)

  • १९२२: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून २००९ – सॅन अन्सेल्मो, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)

  • १९२७: विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा जन्म.

  • १९४२: केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचा जन्म.

  • १९४३: वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा जन्म.

मृत्यू

  • १९५०: भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले. (जन्म: ३० डिसेंबर१८७९)

  • १९६२: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यु. (जन्म: १५ सप्टेंबर १८६०)

  • १९६३: इतिहासकार केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९३)

  • १९९७: चित्रपट आणि नाट्य अभिनेते चंदू पारखी यांचे निधन.

  • २०१३: उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचे निधन. (जन्म: १ मार्च १९३०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.