मनिला : ’एशियान’ संघटनेच्या ५० व्या वर्षानिमित्त आयोजित मेजवानीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांची अल्पकाळ उभ्याउभ्या भेट घेऊन शुभेच्छांची देवाणघेवाण केली. मोदी व ट्रम्प यांची औपचारिक बैठक उद्या सोमवारी दुपरी व्हायची आहे.
‘एशियान’ शिखर परिषद व अनुषंगिक बैठकांसाठी आलेल्या सदस्य देशांच्या नेत्यांसाठी फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रोनल्डो द्दय़ुतेर्ते यांनी स्वागत समारंभ आयोजित केला होता.
सर्व पाहुण्या नेत्यांनी फिलिपीन्सचा राष्ट्रीय पेहराव असलेला, फिकट पिवळ्य़ा रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला ‘बाराँग तगलाँग’ हा शर्ट परिधान केला होता.
या वेळी जमलेल्या नेत्यांच्या मांदियाळीत फेरपटका मारून मोदी यांनी शिन्जो अबे (जपान), दिमित्री मेदवेदेव (रशिया) व नजिब रझाक (मलेशिया) या पंतप्रधानांशीही गप्पागोष्टी केल्या.
नवी दिल्ली : देशात इस्लामिक बँकिंग व्यवस्थेला परवानगी न देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाला रिझर्व्ह बँकेने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, देशातील सगळ्य़ा नागरिकांना बँकिंग आणि आर्थिक सेवा सारख्याच पद्धतीने व व्यापक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इस्लामिक किंवा शरीया बँकिंग व्यवस्था व्याज न आकारण्याच्या तत्त्वावर चालणारी अर्थव्यवस्था आहे. व्याज घेणे इस्लाममध्ये निषिद्ध मानण्यात आले आहे.
भारतात इस्लामिक बँकिंग सेवा देण्याच्या प्रस्तावाचा अभ्यास रिझर्व्ह बँकेने आणि भारत सरकारने केला. भारतात व्याजविरहित बँकिंग किंवा इस्लामिक बँकिंग सेवा सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काय पावले उचलली, याचा तपशील विचारण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट, २0१४ रोजी जन धन योजना सुरू केली. देशातील सगळ्य़ांना आर्थिक व्यवहारांत सामावून घेण्याच्या उद्देशाने ही योजना होती. २00८ मध्ये आर्थिक क्षेत्र सुधारणांसाठी समितीने व्याजविरहित बँकिंग सेवा सुरू करण्याचा बारकाईने विचार करण्यावर भर दिला होता.
काठमांडू : नेपाळचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले कीर्ती निधी बिस्ता यांचे शनिवारी उशिरा निधन झाले. ते १९६९ ते १९७०, ७१ ते ७३ व ७७ ते ७९ पंतप्रधान होते. २००५ मध्ये राजे ग्यानेंद्र यांच्या नेतृत्वात ते शासनाचे उपाध्यक्ष होते. कॅन्सरच्या दीर्घ आजारास लढा देत वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
नेपाळचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले कीर्ती निधी बिस्ता यांचे शनिवारी उशिरा निधन झाले. ते १९६९ ते १९७0, ७१ ते ७३ व ७७ ते ७९ पंतप्रधान होते.
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियाला बँक ऑफ इंडियाकडून दररोजच्या भांडवली खर्चासाठी १५00 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे. दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निविदा काढल्यानंतर एक महिन्याच्या आत हे कर्ज मिळाले आहे.
अलीकडच्या काही महिन्यांत एअर इंडियाला सार्वजनिक बँकांकडून मिळालेले हे दुसरे कर्ज आहे. यापूर्वी पंजाब नॅशनल बँक आणि इंडसइंड बँकेकडून ३,२५0 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहि तीनुसार, ते कर्जही दररोजचा भांडवली खर्च करण्यासाठी मिळाले होते.
एअर इंडिया सध्या आपले कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यात व्यवसायाच्या संचालनासाठी उपयोग नसलेल्या संपत्तीची (नॉन कोअर असेट) विक्री करण्यावरही विचार सुरू आहे.
एअर इंडियाने १८ ऑक्टोबर रोजी एका निविदेद्वारे सरकारी हमी असलेल्या कर्जाची मागणी केली होती. त्यानंतर, बँक ऑफ इंडियाने १५०० कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. गत तीन महिन्यांत बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेने एयरलाइनला कर्ज दिले आहे.
मंगळावर जाण्यासाठी भारतातील १.३ लाख उत्साही व्यक्तींनी नासाकडे मंगळावरील मोहिमेसाठी नावे नोंदवली आहेत. नासाने पुढील वर्षी मंगळावर जाण्यासाठी एक मोहीम आखली आहे. अर्थात, या लोकांना प्रत्यक्षात मंगळावर जाता येणार नाही तर त्या मोहिमेचा बोìडग पास त्यांना दिला जाणार असून, त्यांनी नावे कोरलेली एक पाटी इनसाइट यानाबरोबर पाठवली जाणार आहे.
इनसाइट म्हणजे इंटिरिअर एक्स्प्लोरेशन युजिंग सिसमिक इन्व्हेस्टिगेशन, जिओडेसी अँड हीट ट्रान्सपोर्ट असे यानाचे पूर्ण नाव आहे.
त्यांची नावे सिलिकॉनच्या पातळ पट्टीवर कोरली जातील, त्यासाठी इलेक्ट्रॉन शलाकेचा वापर केला जाईल, त्यामुळे अक्षरे मानवी केसाच्या व्यासाच्या एकहजारांश इतक्या लहान आकारात उमटतील, त्यामुळे लहान पट्टीवर एवढी १.३ लाख नावे बसवली जातील.
इनसाइट यान ५ मे रोजी मंगळाकडे झेपावणार असून, मंगळ मोहीम नावनोंदणीसाठी भारतीयांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. एकूण जगातून २४२९८०७ जणांनी नावे नोंदवली आहे. त्यात १,३८,८९९ लोक भारतीय आहेत.
आयव्हरी कोस्टवर २-० असा विजय मिळवत मोरोक्कोने २०१८च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. तब्बल २० वर्षांनंतर ते पात्र ठरले आहेत.
पहिल्या सत्रात नॅबिर डिरॅर (२५व्या मिनिटाला) आणि मेढी बेनाटियाने (३०व्या मिनिटाला) पाच मिनिटांच्या फरकाने दोन गोल करत मोरोक्कोला आघाडी मिळवून दिली.
हीच आघाडी निर्णायक ठरली. या विजयासह त्यांनी ‘क’ गटात अव्वल स्थान मिळवले. तसेच आगेकूच केली. मोरोक्कोने सर्वाधिक १२ गुण मिळवलेत. मोरोक्कोने यापूर्वी १९९८मध्ये विश्वचषक स्पर्धेत सहभाग दर्शवला होता.
लिबियाविरुद्धची लढत गोलशून्य बरोबरीत सोडवताना टय़ुनिशियाने ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळवत फिफा विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. या बरोबरीनंतर टय़ुनिशियाने काँगोला मागे टाकत अव्वलस्थानी झेप घेतली.
जागतिक दिवस
जागतिक दयाळूपणा दिन
महत्वाच्या घटना
१८४१: जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.
१९१३: रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.
१९२१: वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.
१९३१: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.
१९७०: बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.
१९९४: स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.
२०१२: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.
जन्म दिवस
१७८०: शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १८३९)
१८५०: इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १८९४)
१८५५: आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९१६)
१८७३: कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९५९)
१८९८: पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९६९)
१९१७: महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९८९)
१९१७: हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन माधव मुक्तिबोध यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६४)
१९५४: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक स्कॉट मॅकनीली यांचा जन्म.
मृत्यू
१७४०: प्राचीन मराठी कवी कृष्णदयार्णव यांचे निधन.
१९५६: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १८९३ – मेखलीगंज, कुच बिहार, पश्चिम बंगाल)
२००१: ज्येष्ठ लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१७)
२००२: नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते ऋषिकेश साहा यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.