नवी दिल्ली: भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार बनण्याकडे विराट कोहलीची वाटचाल सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या सध्याच्या मालिकेत विराटने क्लीन स्वीप केल्यास महेंद्रसिंग धोनी याला मागे टाकून कोहली कर्णधार म्हणूनही ‘नंबर वन’ ठरेल.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या कोहलीच्या नेतृत्वात भारताने ४३ कसोटी सामने खेळले. त्यातील २५ जिंकले. नऊ सामन्यात संघ पराभूत झाला तर नऊ सामने अनिर्णीत राहिले. सध्या धोनी सर्वांत यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नावे ६० पैकी २७ विजयांची नोंद असून कोहलीला त्याची बरोबरी साधण्यासाठी केवळ दोनच विजय हवे आहेत. अॅडलेड कसोटी जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी संपादन केली. अशावेळी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा मालिका विजयाची शक्यता बळावली आहे.
कोहली सर्वांत यशस्वी कर्णधारासोबतच विदेशात सर्वाधिक विजय नोंदविणारा कर्णधार देखील बनू शकतो. सध्या हा रेकॉर्ड सौरव गांगुलीच्या नावे आहे. सौरवच्या नेतृत्वात भारताने विदेशात ११ सामने जिंकले. कोहली दहा विजयासह यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
कोहलीच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेत सर्वाधिक पाच तर विंडीजमध्ये दोन विजयाची नोंद केली. याशिवाय द. आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात प्रत्येकी एक विजय साजरा केला.
गुजरातः नर्मदा नदीकाठच्या सरदार सरोवरामध्ये उभारण्यात आलेली देशातील सर्वात भव्य प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पर्यटकांना रेल्वेच्या माध्यमातून पोहोचता यावं, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन नव्या स्टेशनचं निर्माण करणार आहे.
जिथे सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य प्रतिमा विराजमान आहे. तिकडे पर्यटकांना पोहोचण्यासाठी पाच किलोमीटर अंतरावर केवडिया या स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे. हे रेल्वे स्टेशन अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी ही माहिती दिली आहे. येत्या 15 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन करणार आहेत. यादरम्यान रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित राहणार आहेत.
केवडिया रेल्वे स्टेशन निर्माणासाठी जवळपास 20 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येणार आहे. या रेल्वे स्टेशनचं काम सप्टेंबर 2019पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वे डभोई आणि चांदोद स्टेशनांदरम्यानच्या 18 किलोमीटर लाइनचा विस्तार करत आहे. त्यानंतर त्याची पुढील लाइन 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या केवडियापर्यंत वाढवण्यात येणार आहे.
केवडिया स्टेशनची इमारत तीन मजली असणार आहे. पहिल्या दोन मजल्यांवर रेल्वे संबंधित सुविधा पुरवण्यात येणार आहे. तर तिसऱ्या मजल्यावर एक आर्ट गॅलरी बनवण्यात येणार आहे. या गॅलरीमध्ये स्थानिक आदिवासी जाती यांची कला आणि शिल्पकला प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : संपूर्ण भाजपा ज्यांना पप्पू म्हणून संबोधतो त्या राहुल गांधी यांच्या कठोर मेहनतीमुळे काँग्रेसने हिंदी भाषक राज्यांत ‘अजेय’चा दावा करणाऱ्या भाजपाचे सिंहासन हलवून सोडले. ३ राज्यांतील विजय काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. कारण, ११ डिसेंबर २०१७ रोजी राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते. बरोब्बर एका वर्षांनंतर ११ डिसेंबर २०१८ रोजी ३ राज्यांतून भाजपाला बाहेर करीत, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस चांगले यश मिळवू शकते, हे सिद्ध केले.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर आणि विजयाचे संकेत मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दहा जनपथवर पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली.
यावेळी त्यांनी निश्चित केले की, कोणत्या राज्याची सूत्रे कोणत्या नेत्याकडे सोपवावी. २०१९ च्या लोकसभा निवडणुका पाहता, निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली जावीत. प्रादेशिक पक्षांबाबत राहुल गांधी हे गंभीर आहेत. त्यामुळेच राजस्थान, मध्यप्रदेशात बसपा आणि सपाला सोबत घेतले जाऊ शकते.
मिझोराम आणि तेलंगणात यश न मिळाल्याची खंत काँग्रेसमध्ये नाही. तेलंगणात तेलुगू देसम पार्टीच्या विरोधात वातावरण आहे हे माहीत असूनही काँग्रेसने त्यांच्याशी आघाडी केली. कारण, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी चंद्राबाबू यांची महत्त्वाची भूमिका राहू शकते, हे जाणून हा निर्णय घेतला. मध्यप्रदेशातील निकालाचा कल येताच राहुल गांधी हे थेट अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांच्या संपर्कात आहेत. जेणेकरून गरज पडल्यास त्यांची मदत घेतली जाऊ शकेल.
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. ब्रेक्झिट समझोत्यावरून अडचणीत आल्यानंतर आता त्यांच्याच हुजूर पक्षाच्या खासदारांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता.
ब्रेक्झिट करारावरुन थेरेसा मे यांच्याविरोधात हुजूर पक्षाच्या खासदारांनीच थेरेसा मे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. अविश्वास ठराव फेटाळण्यासाठी पक्षाच्या ३१५ पैकी १५८ खासदारांची मते आवश्यक होती.
मी माझ्या सर्व ताकदीनिशी या अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार असे थेरेसा मे यांनी सांगितले होते. यानुसार बुधवारी अविश्वास दर्शक ठराव संसदेत मांडण्यात आला.
हैदराबाद : तेलंगणात पुन्हा बाजी मारणारे टीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची बुधवारी अपेक्षेप्रमाणे विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाली. त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी गुरुवारी होणार आहे. आत त्यांना आश्वासने ठराविक मुदतीत पूर्ण करावी लागतील. राज्यातील ११९ जागांपैकी तब्बल ८८ जागा त्यांच्या पक्षाने जिंकल्या.
केसीआर यांनी येत्या मार्चपर्यंत राज्यातील एक कोटी एकर जमीन सिंचनाखाली आणण्याचे आश्वासन प्रचारात दिले. कालेश्वरम जलसिंचन प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी ठासून सांगितले होते. अन्न, वस्त्र, निवारा यासंबंधीच्या आश्वासनांना जनता भुलते हे राजकारण्यांना माहीत असते. जनतेसाठी दोन बीएचके आकाराच्या दीड लाख घरांचे सुरू असलेले बांधकाम, निवडणूक आचारसंहितेमुळे कंत्राटदारांना निधी न मिळाल्याने थांबले होते. त्यांनी २०२४ पर्यंत राज्यात साडेपाच लाख घरे बांधण्याचे आश्वासन दिले आहे. ही घरे वेगाने पूर्ण करून त्यांचा ताबा लोकांना लवकरात लवकर द्यावा लागेल.
सुमारे अडीच कोटी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी नळांची जोडणी, भागीरथी योजनेच्या अंतर्गत सर्वांना पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी अशी अनेक आश्वासने केसीआरना मुख्यमंत्रीपदाच्या दुसºया कारकीर्दीत पूर्ण करावी लागतील. तीच त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.
टीआरएसला ४६.३८ टक्के मते मिळाली. गेल्या निवडणुकांत हे प्रमाण ३४.०४ टक्के होते.काँग्रेस, टीडीपी, सीपीआय, टीजीएस यांना मिळून गेल्या वेळी वेगळे लढूनही एकत्रितपणे ४०.४६ टक्के मते मिळाली होती. यंदा एकत्र लढूनही या पक्षांची मते ८ टक्क्यांनी घसरून ३२.६९ टक्क्यांवर आली. म्हणजेच तिथे जी महाआघाडी झाली होती, ती आपला प्रभाव पाडूच शकली नाही.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून पराभव स्वीकारल्यानंतर मोदी सरकारला खडबडून जाग आल्याचं दिसत आहे. मोदी सरकार देशभरातील शेतकर्यांची कर्जमाफी करण्याची शक्यता आहे. सुमारे चार लाख कोटी रुपयांचं कृषीकर्ज माफ करण्याची घोषणा केंद्राकडून होण्याची चिन्हं आहेत.
मोदी सरकारने ही घोषणा करुन कर्जमाफी प्रत्यक्षात अंमलात आणली, तर हा ऐतिहासिक निर्णय ठरु शकतो. आतापर्यंत कोणत्याच केंद्र सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात कृषीकर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला नाही. कृषी कर्जमाफीच्या या योजनेचा देशभरातील सुमारे 2.63 कोटी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाभ होणार आहे.
2019 लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल मानल्या जाणार्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन महत्त्वाच्या राज्यांतील भाजपचं संस्थान खालसा झालं, तर तेलंगणा, मिझोरममध्येही भाजपच्या वाट्याला फारसं यश आलं नाही.
शेती हे उत्पन्नाचं प्रमुख साधन असलेल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या हिंदी भाषिक पट्ट्यातील शेतकर्यांनी मोदी सरकारविरोधातील नाराजी मतांमधून व्यक्त केल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे 2019 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा ग्रामीण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारने कृषी कर्जमाफीचं अस्त्र पराजल्याचं दिसत आहे.
भोपाळ, जयपूर : मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींशी बोलणी झाल्यानंतर शेवटी ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीतील हायकमांडच्या निर्णयानंतर हे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.
तत्पूर्वी काँग्रेस आमदारांच्या बैठकीतही हायकमांडचा निर्णय अंतिम राहील, यावर सर्वच आमदारांचे एकमत झाले होते. त्यानंतर, दिल्लीतून हाय कमांडमध्ये झालेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला.
दुसऱ्या बाजूला राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा अध्याप सुटलेला नाही. राजस्थानमधील विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कुणाला बहाल करायची हा पेच काँग्रेसला सोडवावा लागणार आहे. सचिन पायलट की अशोक गेहलोत? हायकमांड नेमकं कुणाच्या बाजूने त्यांचा कौल देणार याची उत्सुकता लागली आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असणाऱ्या सचिन पायलट आणि अशोक गहलोत या उमेदवारांची नेमकी काय बलस्थानं आहेत, आणि कुठल्या गोष्टी त्यांच्या विरोधात जाऊ शकतात काँग्रेसचे हाय कमांड सध्या यावर विचार करत आहे.
जालना : महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्याला पहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट देण्यात आलं आहे.
वैभवनं अंबड तहसील कार्यालयापासून जवळच असलेल्या महा- ई- सेवा केंद्रात जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलं. अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आलं. वैभव ढेंबरे हा अंबड शहरातील मत्सोदरी महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.
मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 16 टक्के आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. त्याचप्रमाणे ही दोन्ही प्रमाणपत्रं कशी असतील, याचे नमुने आधीच जारी केले आहेत.
राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच राज्य सरकारने हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तयार करुन 16 टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले गेले.
महत्वाच्या घटना
१७८०: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८४९)
१८०४: कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७)
१८१६: सीमेन्सचे संस्थापक वर्नेर व्हॅन सीमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १८९२)
१८९९: छायालेखक (cinematographer) पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७६ – मुंबई)
१९४०: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक संजय लोळ यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुन २००५)
१९५४: भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी हर्षवर्धन यांचा जन्म.
जन्म
१७८०: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८४९)
१८०४: कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७)
१८१६: सीमेन्सचे संस्थापक वर्नेर व्हॅन सीमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १८९२)
१८९९: छायालेखक (cinematographer) पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७६ – मुंबई)
१९५४: भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी हर्षवर्धन यांचा जन्म.
१९५५: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा जन्म.
मृत्यू
१९२२: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हेंस हाफस्टाइन यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १८६१)
१९३०: सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १८६९)
१९९४: सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९१७ – कोडोवली, पन्हाळा, कोल्हापूर)
१९९६: स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये यांचे निधन.
२००६: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक लामर हंट यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३२)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.