प्रतिभावान सलामीवीर यशस्वी जैस्वालसह आणखी तीन फलंदाजांनी साकारलेल्या दमदार अर्धशतकांच्या बळावर भारतीय युवा संघाने (१९ वर्षांखालील) तिरंगी एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात बांगलादेशचा सहा गडी व आठ चेंडू राखून पराभव करून विजेतेपद मिळवले.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसाठी तिसऱ्या स्थानावरील महमदुल हसनने (१०९) दिमाखदार शतक साकारले. सलामीवीर परवेझ हुसैनने ६० धावा करत त्याला योग्य साथ दिली. परंतु या दोघांव्यतिरिक्त सात फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यातही अपयशी ठरल्यामुळे बांगलादेशचा संघ २६१ धावांत गारद झाला. भारतासाठी सुशांत मिश्रा (२/३३), कार्तिक त्यागी (२/४९) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात यशस्वी (५०), दिव्यांश सक्सेना (५५), कर्णधार प्रियम गर्ग (७३) आणि ध्रुव जुरेल (नाबाद ५९) या चौघांनी उपयुक्त अर्धशतके झळकावल्यामुळे भारताने बांगलादेशवर सहज वर्चस्व गाजवले. तिलक वर्माने (नाबाद १६) चौकार लगावून ४८.४ षटकांत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
केंद्र सरकारच्या ‘शहर ज्ञान व नवोपक्रम समूह’ (सिटी नॉलेज अँड इनोव्हेशन क्लस्टर्स) उपक्रमात विकासासाठी पुणे, भुवनेश्वर, चंडीगड, जोधपूर, अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता या सहा शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांमध्ये किंवा राज्यात अस्तित्वात असलेल्या संस्था आणि निरनिराळे उद्योग यांच्यात समन्वय साधण्यासाठी या समूहांची योजना करण्यात येत आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या १०० दिवसांसाठी निश्चित केलेल्या अॅजेंडांतर्गत हा प्रकल्प प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) कार्यालयाच्या नेतृत्वाखाली प्राधान्याने राबवण्यात येत आहे.
या सर्व शहरांसाठी ‘कन्सेप्ट नोट्स’ तयार असून, काही शहरांमध्ये चर्चात्मक बैठकी आधीच सुरू झालेल्या आहेत, असे पीएसए कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्तरावरील २० प्रयोगशाळा याआधीच भुवनेश्वरच्या यादीवर असून, तीसहून अधिक औद्योगिक घराणी किंवा उद्योगांनी पुण्यात झालेल्या निरनिराळ्या बैठकींमध्ये भाग घेतला.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दोन महिन्यांच्या कालखंडानंतर पुन्हा राज्यसभेत परतणार आहेत. राजस्थानमध्ये एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता डॉ. सिंग हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
डॉ. सिंग यांनी १९९१ ते २०१९ अशी २८ वर्षे आसाममधून राज्यसभेचे सदस्यत्व केले होते. जून महिन्यात त्यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आली. आसाम विधानसभेत काँग्रेसकडे पुरेशी मते नसल्याने डॉ. सिंग यांचा राज्यसभेचा मार्ग बंद झाला होता. डॉ. सिंग यांच्यासारखे नेते राज्यसभेत आवश्यक असल्याने काँग्रेसने तमिळनाडूतून डॉ. सिंग यांना निवडून आणण्याची योजना आखली होती.
याच दरम्यान राजस्थान भाजप अध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनाने राजस्थानमध्ये एक जागा रिक्त झाली होती. २०० सदस्यीय राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे १०० आमदार असून, अपक्ष आणि बसपाचा काँग्रेसला पाठिंबा आहे. यामुळे डॉ. सिंग यांना निवडून येण्यात काही अडचण येणार नाही.
कोल्हापूर : शहरातील दुधाळीचा भाग व जिल्ह्यातील 19 गावे, 11 वाडे, गोकुळ शिरगाव, शिरोली व कागल पंचतारांकित एमआयडीसी पाणी योजनेचा वीजपुरवठा आज दिवसभरात सुरु करण्याचे मोठे काम महावितरणने केले आहे. दिवसभरात पाच उपकेंद्रे सुरु करुन तब्बल 43 हजार 369 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु केल्याने बहुतांश पुरग्रस्त भाग पुन्हा एकदा प्रकाशमान झाला आहे.
महापुराचा महावितरण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागातील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवावा लागला. कोल्हापुरातील 26 वीज उपकेंद्र पुरामुळे बाधित झाले होते, त्यापैकी आज अखेर 19 उपकेंद्र सुरू झाली आहेत तर 7 उपकेंद्रे बंद आहेत. परंतु त्यावरील बहुतांश भाग पर्यायी मार्गाने सुरू केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. आज सुरू केलेल्या उपकेंद्रात कांचनवाडी, कानूर, कुरुंदवाड, हासणे व दुधाळीचा समावेश आहे.
दुधाळी उपकेंद्रावर आज दुपारपासून भार टाकण्यात आल्याने शहरातील 19 हजार 268 ग्राहकांची वीज सुरु झाली. तसेच ग्रामीण भागातील चार उपकेंद्र सुरु झाल्याने चंदगड उपविभागातील कानूर, कोवाड, बिजूर, चंदगड, पारणे, गेलुगडे, उमगाव, इनाम कोळींदे, आजऱ्यातील किनी, फुलेवाडीतील मरळी, चिंचवडे, आरे, सावरवाडी, कुरुंदवाड मधील कुरंदवाड, हेरवाड, तेरवाड आणि राधानगरी उपविभागातील बानेत व हासणे अशा 19 गावांचा समावेश आहे. तर मनवाड, आढाववाडी, खापणेवाडी, कोलीक, चाफेवाडी, बाजारभोगावपैकी धनगरवाडा, करंजफेण, सावर्डे, पाल, दाभोळकरवाडी व वडाजीवाडी असे 11 वाडे सुरु करण्यात आले. ही गावे व वाडे सुरु झाल्याने ग्रामीण भागातील 24 हजार 101 वीज जोडण्या सुरू झाल्या आहेत.
‘चांद्रयान-२’ पुढच्या मंगळवारी चंद्राच्या कक्षेत, इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांची माहिती :
अहमदाबाद : गेल्या २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील अंतराळ तळावरून प्रक्षेपित करण्यात आलेले भारताचे ‘चांद्रयान-२’ येत्या २० आॅगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत पोहोचेल व ते ७ सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरेल, असे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी सोमवारी येथे सांगितले.
भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी डॉ. सिवान येथे आले होते. ‘चांद्रयान-२’चे ‘आॅर्बिटर’, ‘लॅण्डर’ आणि ‘रोव्हर’ हे तिन्ही भाग सुस्थितीत असून सर्व यंत्रणा उत्तम प्रकारे काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
‘इस्रो’चे अध्यक्ष म्हणाले की,प्रक्षेपण केल्यापासून गेल्या तीन आठवड्यात ‘चांद्रयान-२’ची कक्षा आणि मार्ग बदलण्यासाठी एकूण पाच क्रिया केल्या गेल्या. १४ आॅगस्टला पहाटे ३.३० वाजता यापुढील ‘ट्रान्स ल्युनर इंजेक्शन’ हा महत्वाचा टप्पा पार पाडला जाईल. त्यामुळे हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने मार्गस्थो होईल.
आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन
महत्वाच्या घटना
१६४२: क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
१८९८: कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
१९१८: बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
१९५४: रेडिओ पाकिस्तान वरुन कौमी तराना हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.
१९६१: आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.
१९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००४: ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्घाटन सोहळा पाहिला.
जन्म
१८८८: स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक जॉन लोगे बेअर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९४६)
१८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १९१८)
१८९८: लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १९६९)
१९०६: लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९८)
१९४५: भारतीय-इंग्लिश क्रिकेटर रॉबिन जॅकमन यांचा जन्म.
१९८३: भारताचा ९ वा ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचा जन्म.
मृत्यू
१७९५: देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन. (जन्म: ३१ मे १७२५)
१८२६: स्टेथोस्कोप चे शोधक रेने लायेनेस्क यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १७८१)
१९१०: आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म. (जन्म: १२ मे१८२०)
१९१७: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८६०)
१९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८६१)
१९४६: विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १८६६)
१९७१: बेंटले मोटर्स लिमिटेड चे संस्थापक डब्ल्यू. ओ. बेंटले यांचे निधन.
१९८०: अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१०)
१९८५: मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९००)
१९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार यांचे निधन.
२०००: पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९६५)
२०१५: हिरो सायकल चे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९२८)
२०१६: भारतीय हिंदू नेते प्रमुख स्वामी महाराज यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९२१)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.