नागरिकांच्या व्हिसामधील वाढत्या घोटाळ्यांच्या तक्रारी पाहता, ‘से नो टू फ्रॉड’ या जनजागृती मोहिमेस सुरुवात झाली असून या मोहिमेअंतर्गत नोकरीसाठी परदेशी नेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या खोट्या आश्वासनांबाबत लोकांमध्ये जागरूकता करण्यात येणार आहे.
केरळ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक अशा दक्षिण राज्यांसह चंदीगढ, जालंधर अशा निमशहरी आणि ग्रामीण भागांतून व्हिसाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. लोकांना प्रामुख्याने आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा अशा देशांमध्ये स्थलांतर करण्याची आश्वासे दिली जातात.
बनावट व्हिसा एजंटची फसवणुकीची पद्धत अतिशय सोपी आहे. असंशयित लोक व्हिसा अर्जदारांना विविध नामांकित कंपन्यांची नावे घेऊन फोन करतात. या संशयितांचे फोन क्रमांकही नामांकित कंपन्यांच्या क्रमांकाप्रमाणेच असतात, त्यात संबंधित लोक व्हिसा अर्जदारांना कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देऊन माहितीची खातरजमा करण्याविषयीही सांगतात.
त्यामुळे संबंधित ग्राहकांची खात्री पटते, त्यानंतर ग्राहकांना सुस्थित नोकरीचे बनावट आॅफर लेटर पाठवले जात असून त्यासाठी खोट्या ई-मेल आयडीचा वापरही केला जातो.
ब्रिटनमध्ये रविवारी एक आश्चर्यकारक घटना घडली. तेथिल एका लेखकाने स्वतःचं पुस्तक चावून खाल्लं. विशेष म्हणजे एका लाइव्ह कार्यक्रमात त्याने हा संपूर्ण प्रकार केला आहे. मॅथ्यू गुडविन असं या लेखकाचं नाव आहे.
असा दावा गुडविन यांनी केला होता. मात्र त्यांचा हा अंदाज चुकला आणि लेबर पार्टीला ४०.३ टक्के मतं मिळाली.
लेबर पार्टीला ३८ टक्क्यांहून जास्त मतं मिळतील असं मला वाटलं नव्हतं, असं मत लेखकाने व्यक्त केलं आहे. मॅथ्यू गुडविन हे लेखक प्राध्यापक असून ते युनिव्हर्सिटी ऑफ केंटमध्ये शिकवतात.
‘ब्रेक्झिट व्हाय ब्रिटेन वॉण्टेड टू लिव्ह यूरोपियन युनियन’ या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत. याच पुस्तकाची पानं त्यांनी चावून खाल्ली. मात्र गुडविन यांनी ही पानं गिळली नाहीत, असं स्काय न्यूजने स्पष्ट केलं आहे.
जीएसटी कौन्सिलच्या रविवारी झालेल्या बैठकीत ६६ उत्पादनांवरील वस्तू व सेवांवरील कराचा दर कमी करण्याचा, वर्षाकाठी ७५ लाखांपर्यंतची उलाढाल करणारे छोटे व्यापारी, लघुउद्योग व रेस्टॉरंट्सना नाममात्र एकत्रित कर योजनेचा लाभ देत जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, ही माहिती बैठकीनंतर अर्थमंत्री जेटलींनी पत्रपरिषदेत दिली.
वर्षाकाठी ७५ लाखांची उलाढाल करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना १ टक्का, लघुउद्योगांना २ टक्के व रेस्टॉरंट्स चालवणाऱ्यांना एकत्रित ५ टक्के कर भरून स्वत:ला जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्याची विशेष मुभा जीएसटी कौन्सिलने दिली आहे. जीएसटी कौन्सिलकडे १३३ वस्तूंवरील कराचे दर
कमी करण्याची मागणी होती त्यापैकी ६६ वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय कौन्सिलने घेतल्याची माहिती देतांना, महत्त्वाच्या वस्तू व त्याचे कमी करण्यात आलेले दर यांची यादीच अर्थमंत्र्यांनी पत्रपरिषदेत सादर केली.
सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी काढून टाकण्याची मागणी देशातल्या अनेक महिला संघटनांनी केली होती मात्र पूर्वीच्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अर्थमंत्री म्हणाले.
लाल मातीचा बादशाह असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने रोलां गॅरोवर लौकिकाला साजेशी कामगिरी करताना अंतिम लढतीत स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाचा पराभव केला आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत विक्रमी १० व्यांदा जेतेपद पटकावले.
नदालने वावरिंकाचा ६-२, ६-३, ६-१ ने सहज पराभव केला. एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत विक्रमी १० वेळा जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारा तो पहिला टेनिसपटू ठरला.
तसेच कारकिर्दीतील २२ व्या ग्रॅण्डस्लॅम अंतिम फेरीत खेळत असलेल्या नदालने फ्रेंच ओपनमध्ये तिसऱ्यांदा सेट न गमावता जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याने केवल ३५ गेम्स गमावले.
धावांचा मोठा डोंगर उभा करूनही चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला श्रीलंकेकडून पराभावाला सामोरे जावे लागले होते. मात्र भारताने सांघिक खेळाचे प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळविला.
११ जून रोजी खेळण्यात आलेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा होता. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ४४.३ षटकात सर्वबाद १९१ धावा केल्या.
तसेच त्यानंतर १९२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनीही संयमित खेळाचे प्रदर्शन केले. भारताने ३८ षटकात २ बाद १९३ धावा करत सहज विजय मिळविला.
मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होऊन ५७ वर्षाचा कालावधी लोटला पण अजूनही मराठवाडा विकासात हजारो मैल दूरच आहे. येथील अनुशेष २ लाख ३० हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे.
प्रत्येक बाबतीत मराठवाड्यावर अन्याय होत असून तो कधी दिवस सहन करायचा.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भा सोबत मराठवाड्याचा समतोल विकास साधणे अशक्य असून आता महाराष्ट्रापासून मराठवाडा वेगळा करण्याची वेळ आली आहे.
यासाठी लढा देण्या करीता ह्यस्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा मराठवाडा विकास मंचे अध्यक्ष जे.के.जाधव यांनी केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या पराभवाची दुवा करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी यष्टीरक्षक रशिद लतिफला भारतीय संघाने मैदानातून उत्तर दिले असून या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
वीरेंद्र सेहवागवर अपशब्दात टिका करणाऱ्या लतिफला तिवारीने पुन्हा अशी चूक केलीस तर आमच्या बोलण्यामुळे तुझ्या कानातून रक्त येईल, अशा शब्दात सुनावले आहे.
मनोज तिवारीने पाकिस्तानच्या माजी यष्टीरक्षकाला इशारा देण्यासाठी एक व्हिडिओ संदेश ट्विटरवरुन शेअर केलाय.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला तब्बल १२४ धावांनी धूळ चारली होते या सामन्यानंतर वीरेंद्र सेहवागने भारतीय संघाचे कौतुक करताना पाकिस्तानचा संघ १५ खेळाडू घेऊन खेळला असता तरी जिंकू शकले नसते, असे ट्विट केले होते. याशिवाय ‘बाप बाप असतो’, अशा आशययाचे ट्विटने पाकिस्तानला टोमणा मारला होता.
आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या व अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल ११ जून रोजी जाहीर झाला. यामध्ये पुण्याच्या अक्षत चुघ याने ३६६ पैकी ३३५ गुण मिळवून देशात दुसरा व राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे.
हरियाणातील पंचकुलचा सर्वेश मेहतानी याने देशात पहिला आणि दिल्लीच्या अनन्य अग्रवाल याने तिसरा क्रमांक मिळवला.
मेहतानी हा आयआयटी रुरकी तर चुघ हा आयआयटी मुंबई आणि अग्रवाल हा आयआयटी दिल्ली विभागाचा आहे.
तसेच औरंगाबादच्या ओंकार देशपांडे याने देशात आठवा क्रमांक पटकावला आहे.
जन्म, वाढदिवस
पुरुषोत्तम विश्वनाथ बापट, पाली भाषा कोविद; बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक : १२ जून १८९४
जॉर्ज बुश, अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष : १२ जून १९२४
भालचंद्र दत्तात्रय खेर, मराठी लेखक : १२ जून १९१७
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
पु. ल. देशपांडे, मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक, कवी, नाटककार, अभिनेता (चित्रपट, रंगभूमी), दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार : १२ जून २०००
कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषेचे व व्याकरणाचे गाढे अभ्यासक : १२ जून १९६४
ठळक घटना
भारतीय पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिध्द केले : १२ जून १९९६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.