रेल्वेच्या वयस्क कर्मचाऱ्यांच्या जागी त्यांच्या तरुण मुलांना नोकरी देण्याची २००४ पासून सुरू असलेली योजना रेल्वेने गेल्या महिन्यात बंद केली असून ही योजना घटनात्मकदृष्टय़ा योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘द लिबरलाइज्ड अॅक्टिव्ह रिटायरमेंट स्किम फॉर गॅरंटीड एम्प्लॉयमेंट फॉर सेफ्टी स्टाफ’ (एलएआरएसजीईएसएस) असे या योजनेचे अधिकृत नाव असून ती तत्कालीन रेल्वेमंत्री नितिश कुमार यांच्या कार्यकाळात २००४ साली सुरू करण्यात आली होती. ठराविक प्रकारचे काम करण्यास आवश्यक असणारी शारीरिक क्षमता आणि लवचिकता वयस्क कर्मचाऱ्यांमध्ये नसते. त्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास त्यांच्या जागी त्यांच्या मुलांना नोकरी मिळत असे.
मात्र या योजनेसंबंधी एका खटल्यात जुलै महिन्यात सुनावणी करताना पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने ही योजना घटनेतील सर्वांना समान संधीच्या तत्त्वाविरोधात असल्याचे मत नोंदवले.
या योजनेत कर्मचाऱ्यांच्या मुलांनाच नोकरी दिली जात असल्याने अन्य उमेदवारांवर अन्याय होतो आणि घटनेच्या १४ आणि १६ व्या कलमांचे उल्लंघन होते, असे न्यायालयाने म्हटले. यापूर्वी अहमदाबाद उच्च न्यायालयानेही असेच मत नोंदवले होते. मात्र केरळ आणि पाटणा उच्च न्यायालयांनी या योजनेचे कौतुक केले होते.
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे मतदान संपले आहे आणि गुजरातच्या दुस-या व शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होत असून, दोन्ही राज्यांचे निकाल पुढील सोमवारी, १८ डिसेंबरला लागणार आहेत. त्यानंतर दोन महिन्यांत ईशान्येकडील त्रिपुरा, नागालँड व मिझोरम या राज्यांच्या निवडणुका होतील. यापैकी एका राज्यांत भाजपाची सत्ता नाही. त्यानंतर मेमध्ये कर्नाटकची निवडणूक असून, तिथे काँग्रेसकडून सत्ता खेचण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल.
पुढील वर्षी एकूण आठ राज्यांत निवडणुका होत असून, त्यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपाची सत्ता आहे. गुजरातच्या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने सारी ताकद लावण्याचे कारण वरील तीन राज्यांत पुढील वर्षी सत्ता मिळवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहे.
गुजरात निवडणुकांचे निकाल मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडवर पडतील, असे काँग्रेसला वाटत आहे. या तीन राज्यांत नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये निवडणुका होतील. मिझोरमच्या निवडणुकाही नोव्हेंबरातच होतील, अशी अपेक्षा आहे.
गुजरातवर सारे अवलंबून अर्थात काँग्रेसची सारी गणिते, आडाखे हे गुजरातच्या निकालांवर अवलंबून आहे. त्या जिंकता आल्या वा जागांमध्ये चांगली वाढ झाली, तर काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांच्यात हुरूप येईल. पक्षाध्यक्षपदी एकमताने निवड झालेल्या राहुल गांधी यांचीही ताकद गुजरातच्या निवडणुका वाढवतील, असे आताचे तरी चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या क्रीडापटूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा (सीजीएचएस) लाभ मिळावा, अशी विनंती माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सचिनने २४ ऑक्टोबरला मोदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अव्वल क्रीडापटूंना उतारवयात भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्येवर प्रकाश टाकताना औषधोपचाराच्या अतिरिक्त खर्चाचा ताण त्यांच्यावर पडतो, असे म्हटले आहे. आपल्या पत्रात त्याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघांमध्ये समाविष्ट असलेल्या मोहम्मद शाहीद यांचे उदाहरण दिले आहे.
एकापेक्षा जास्त अवयव निकामी झाल्याने जुलै महिन्यात शाहीद यांचा मृत्यू झाला होता. बेताची आर्थिक स्थिती असल्याने त्यांना वेळेवर आणि मोठय़ा रुग्णालयात उपचार घेता आले नाहीत.
पंतप्रधान मोदी यांना विनंती करण्यापूर्वी क्रीडापटूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळण्याबाबत क्रीडा मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्याचे सचिनने त्याच्या पत्रात म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरला सोमवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवले. हा धक्का ४.५ रिश्टर स्केलचा असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याचे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सोमवारी पहाटे ४.२८ मिनिटांनी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे राज्यात कोणतीही जीवित व वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, शनिवारी दुपारी चारच्या सुमारासही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ही ४.७ इतकी होती. शनिवारी भूकंपाचा केंद्रबिंदू हा लेहपासून ९८ किलोमीटर अंतरावर होता.
तर मागील गुरूवारीही जम्मू-काश्मीर सहीत लडाखच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. गुरूवारी आलेल्या भूकंपाची तीव्रता ही ५.१ इतकी होती. याचा केंद्रबिंदू हा भारताच्या ईशान्य भागातील थांग येथे होता.
रोम- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. विरूष्काने जरी लग्नाची माहिती उघडपणे दिली नाही तरीही रोज काहीना काही नवी माहिती समोर येत होती. अखेरील 11 डिसेंबर रोजी विराट-अनुष्काने सात फेरे घेतले.
रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोघांनीही त्यांच्या अधिकृट ट्विटर हँण्डलवरून लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला. इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या अलिशान विवाह सोहळ्यात विराट-अनुष्काचा वेडिंग लूक तितकाच साजेसा होता.
विराट-अनुष्काचं हे डेस्टिनेशन वेडिंग सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय आहे. या रिसॉर्टमध्ये एक दिवस राहण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असले. रिसॉर्टची एका दिवसाची किंमत ही सगळ्यांनाच थक्क करणारी आहे,
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार बोर्गो फिनोखिएतो ख्रिसमस आणि न्यूइयरच्या वेळी दर आठवड्याच्या हिशोबाने 94 लाख रूपये किंमत आकारतो. यादरम्यान, बोर्गो फिनोखिएतो हे रिसोर्ट दुनियेतील दुसऱ्या क्रमांकाचं महागड हॉटेल बनतं.
प्रतिदिवसाची किंमत मोजली तर इटलीतील बोर्गो फिनोखिएतो या हॉटेलची दिवसाची किंमत तब्बल 13लाख 50 हजार इतकी आहे. बोर्गो हे 800 वर्ष जूनं गाव आहे. ज्या गावाला जॉन फिलिप यांनी नवं रूप दिलं व तेथे हे अलिशान रेसॉर्ट उभं केलं आहे. फ्लोरेंस एअरपोर्टपासून बोर्गो फिनोखिएतो जवळपास 1 तासाच्या अंतरावर आहे.
महत्वाच्या घटना
१७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन.
१८८२: आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.
१९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
१९७१: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.
२००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
२०१६: प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
जन्म
१८७२: राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक आणि नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूल चे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९४८)
१८८१: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक हॅरी वॉर्नर यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९५८)
१८९२: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९६५)
१९०७: संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९५०)
१९२५: भारतीय क्रिकेटर दत्ता फडकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९८५)
१९४०: राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म.
१९५०: प्रसिध्द अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म.
१९५२: भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी हरब धालीवाल यांचा जन्म.
१९८१: भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंग यांचा जन्म.
मृत्य
१९३०: परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून निधन.
१९६४: हिन्दी राष्ट्रकवी मैथिलिशरण गुप्त यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)
१९९१: शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर यांचे निधन.
१९९२: साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०६ – आंबेडे, सातेरी, गोवा)
२०००: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९३०)
२००६: सीगेट टेक्नोलॉजी चे सहसंस्थापक अॅलन शुगर्ट यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३०)
२०१२: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९२७)
२०१५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९३५)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.