जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ‘ताजमहल’मध्ये बकरी ईदनिमित्त मोफत प्रवेश घेता येणार आहे. बकरी ईदनिमित्त १२ ऑगस्ट रोजी ‘ताजमहल’मध्ये तीन तास मोफत प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे.
बकरी ईदच्या दिवशी विशेष नमाज पठणासाठी ‘ताजमहल’मध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक मुस्लिम नागरीक येत असतात. परिणामी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान तीन तासांच्या कालावधीत ‘ताजमहल’मध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, केवळ नमाज पठणासाठी नव्हे तर देश-परदेशातून येणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी नियोजित तीन तासांमध्ये मोफत प्रवेश असेल असं भारतीय पुरातत्व विभागाने जाहीर केलंय.
१० वाजेनंतर पर्यटकांकडून नेहमीप्रमाणे शूल्क आकारले जातील. मोफत प्रवेशावेळीही सुरक्षिततेची संपूर्ण खात्री केली जाणार असून सर्वांची तपासणी केली जाईल. प्रवेश देताना पॉलिथिन पिशव्या, तीक्ष्ण वस्तू, काडीपेटी, लाइटर आणि खाद्य सामग्री इत्यादींवर बंदी असेल. पुरातत्वशास्त्रज्ञ बसंत कुमार स्वर्णकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
‘ताजमहल’साठी प्रवेशशुल्कानुसार भारतीय पर्यटकांना ५० रुपये द्यावे लागतात, तर परदेशी पर्यटकांना ११०० रुपये द्यावे लागणार आहेत. ताजमहालच्या मुख्य घुमटावर प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला २०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतात.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची तुलना चक्क भगवान कृष्णा-अर्जुनाशी केली आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते. जम्मू-काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यामुळे रजनीकांत यांनी मोदी आणि अमित शाह यांची स्तुती केली आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकशन कार्यक्रमात रजनीकांत बोलत होते. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांचीही उपस्थिती होती.
मिशन काश्मीरसाठी अमित शाह यांना रजनिकांत यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह भगवान ‘कृष्ण’ आणि ‘अर्जुन’ सारखे आहेत. आपल्याला माहित आहे कृष्ण कोण आणि अर्जुन कोण आहेत. स्वत:च्या पक्षाची स्थापना करून २०२१ मधील तामिळनाडूमधील विधानसभा निवडणूक लढवणार आहे.’
संविधानातील ३७० कलम खूप आधीच हटवणे गरजेचे होते, याचा काश्मीरला कोणताही फायदा झालेला नाही. मात्र, आता ते हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपेल आणि राज्य विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करेल, असा विश्वास यावेळी शाह यांनी व्यक्त केला. लोकसभेत आधी विधेयक मांडले असते तर राज्यसभेत त्यावर मोठा गोंधळ होण्याची भीती होती त्यामुळे ते आधी राज्यसभेतच मांडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही वाढ करताना खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत SC-ST प्रवर्गाती विद्यार्थ्यांच्या शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, आता SC-STच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ५० रुपयांवर १२०० रुपये करण्यात आले आहे तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ७५० वरुन १५०० रुपये इतके करण्यात आले आहे.
सीबीएससी बोर्डाने गेल्या आठवड्यातच या फी वाढीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तसेच ज्या शाळांनी जुन्या नियमानुसार दहावी-बारावीची परीक्षा नोंदणी सुरु केली आहे त्यांना विद्यार्थ्यांकडून नव्या नियमानुसार शुल्क वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सीबीएसई बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी SC-ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त विषयासाठी ३०० रुपये अधिक भरावे लागणार आहेत. यापूर्वी अतिरिक्त विषयासाठी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क नव्हते. मात्र, शंभर टक्के दृष्टीहीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. तसेच जे विद्यार्थी शेवटच्या तारखेपर्यंत नव्या नियमानुसार नोंदणी करणार नाहीत त्यांची नोंदणी होणार नाही त्यामुळे त्यांना २०१९-२०च्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
यामध्ये स्थानांतरण शुल्क अर्थात मायग्रेशन फी देखील १५० रुपयांवरुन ३५० रुपये इतकी करण्यात आली आहे. तर परदेशात सीबीएसईच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाच विषयांच्या बोर्डाच्या परीक्षा शुल्कासाठी १०,००० रुपये भरावे लागणार आहेत. यापूर्वी हे शुल्क ५,००० रुपये होते. तर या विद्यार्थ्यांना १२वीच्या बोर्डाच्या परीक्षेत अतिरिक्त विषयासाठी आता १००० रुपयांऐवजी २००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार केल्याचे आरोप हे अन्यायकारक असून त्यात गुन्हेगारी स्वरूपाचा कुटील हेतू आहे असे मत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी व्यक्त केले.
शनिवारी येथे आयआयएम कलकत्ता या संस्थेच्या वार्षिक व्यावसायिक परिषदेत त्यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काही वेळा बिघडली असतीलही, जशी इतर यंत्रे बिघडतात तशी ही यंत्रेही बिघडू शकतात पण त्यात फेरफार करता येत नाही हे सिद्ध झालेले आहे. मतदान यंत्रातील बिघाड व फेरफार यात फरक आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बिघडू शकतात पण त्यात फेरफार करता येत नाही, जे लोक त्यात फेरफार केल्याचा आरोप करतात त्यांचे हेतू गुन्हेगारी स्वरूपाचे असून त्याचा आम्हाला खेद वाटतो. देशातील दोन मोठय़ा सार्वजनिक उद्योगांनी ही यंत्रे तयार केलेली असून ती नामांकित संस्थांचे प्राध्यापक व इतरांच्या देखरेखीखाली तयार केलेली आहेत.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर तृणमूल व काँग्रेस यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफाराचे आरोप केले आहेत, पण हे फार अन्यायकारक आहे. जेव्हा तुम्ही पराभूत होता तेव्हा यंत्रांना झोडपून काढण्यात काय अर्थ आहे. अशा आरोपांमुळे निवडणूक आयोग व या मतदान यंत्राच्या प्रक्रियेतील लोकांवर निष्कारण संशय निर्माण केला जातो. मतदान यंत्रे इतर यंत्रांसारखी बिघडू शकतात हे बरोबर, पण त्यात फेरफार करता येत नाही, असे ते म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेबाबत त्यांनी सांगितले की, यात एकीकडे कायदा व सुव्यवस्था पाळणे व दुसरीकडे प्रशासन व व्यवस्थापन सांभाळणे अशी दुहेरी कसरत असते. यात काही घटक दुराचारी असतील तर त्यांना दूर करण्याची गरज आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी पश्चिम बंगालमध्ये काही निवडणूक अधिकारी बदलण्यात आले होते. आता महाराष्ट्र व हरयानातील विधानसभा निवडणुकांची तयारी आयोग करीत आहे. झारखंड व दिल्लीतील निवडणुका आता तोंडावर आहेत. निवडणूक अधिकारी हे सामान्य लोकांचे रक्षणकर्ते आहेत. जर राज्य सरकार तुम्हाला छळत असेल तर निवडणूक आयोग तुम्हाला संरक्षण देईल.
त्रिनिनाद : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डेत आपल्या लौकीकास साजेशी खेळी साकारली. विराटने त्रिनिदादमध्ये सुरु असलेल्या या वन डेत आपल्या वन डे कारकीर्दीतलं 42 वं शतक साजरं केलं. त्याने 112 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारासह शतकाला गवसणी घातली.
या शतकासह विराटने आपल्या एकूण आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या 67 वर नेऊन ठेवली आहे. त्याच्या या खेळीमुळे त्रिनिदाद वन डेत टीम इंडियानं मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करत आहे.
पाकिस्तानच्या जावेद मियाँदादचा विक्रमही मोडला - विराट कोहलीने विंडीजविरुद्धच्या त्रिनिदाद वन डेत पाकिस्तानच्या जावेद मियाँदादचा 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. मियाँदादच्या नावावर विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जमा होता. मियाँदादनी आपल्या वन डे कारकीर्दीत विंडीजविरुद्ध 64 डावांत 1930 धावा केल्या होत्या. मियादादने विंडीजविरुद्ध आपली अखेरचा वन डे सामना 1993 साली खेळला होता. त्रिनिदादमध्ये विराटने 19 वी धाव घेत मियाँदादचा हा विक्रम मोडीत काढला. विराटने अवघ्या 34 डावांमध्ये हा विक्रम मोडीत काढला.
आंतरराष्ट्रीय हत्ती दिन / आंतरराष्ट्रीय युवा दिन
महत्वाच्या घटना
१८५१: आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
१८८३: शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला.
१९२०: शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले.
१९२२: राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या राजसंन्यास नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९४२: चले जाव चळवळ - पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी.
१९४८: लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.
१९५०: अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.
१९५३: पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी करण्यात आली.
१९६०: नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको – १ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.
१९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली.
१९९०: दक्षिण डकोटा मध्ये सु हॅन्ड्रिकसन यांना सर्वात मोठा आणि सर्वात संपूर्ण टायरनोसॉरस रेक्स चा हाडांचा सापळा सापडला.
१९९८: सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर.
२०००: प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड.
२००२: १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.
जन्म
१८०१: ब्रिटिश उद्योगपती व कॅडबरी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे १८८९)
१८८१: अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक सेसिल डी मिल यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९५९)
१८८७: नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ आयर्विन श्रॉडिंगर यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९६१)
१८९२: भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ एस. आर. रंगनाथन यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२)
१९०६: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. (मृत्यू: १० ऑगस्ट १९९२)
१९१०: सिंगापूरचे पहिले अध्यक्ष यूसुफ बिन इशक यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७०)
१९१९: भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१)
१९२४: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८)
१९२५: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००४)
१९२५: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७५)
१९२६: गणेशमुर्तीकार आणि शिल्पकार बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर यांचा जन्म.
१९४८: कवी, समीक्षक व अनुवादक फकिरा मुंजाजी तथा फ. मुं. शिंदे यांचा जन्म.
१९५९: बुद्धीबळपटू प्रवीण ठिपसे यांचा जन्म.
मृत्यू
१९६४: दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चे जनक इयान फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०८)
१९७३: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १९११)
१९८४: कवी, समीक्षक व अनुवादक आनंदीबाई जयवंत यांचे निधन.
२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९३२)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.