चालू घडामोडी - ११ सप्टेंबर २०१७

Date : 11 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नवीन एमएमआरडीए डीपीमध्ये कोळीवाडे सुरक्षित सुधारणांनंतरच मंजूर :
  • समितीने जून आणि जुलै २०१७ दरम्यान मुंबईत सुनावणी घेतली असून स्थानिकांच्या विनंतीनुसार, सुनावणी तालुका स्तरावरही घेण्यात येत आहे.

  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) विकास आराखड्याबाबत प्राप्त झालेल्या सूचना/हरकतींचा अभ्यास करून, प्रादेशिक योजनेत बदल सुचविण्यासाठी, प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय नियोजन समितीची नेमणूक करण्यात आली आहे.

  • सुनावणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर, उपसमिती एमएमआरडीएला अहवाल सादर करेल. त्यानंतरच अहवालातील शिफारसींची दखल घेत, योग्य त्या सुधारणांसोबत प्रारूप प्रादेशिक योजना मुंबई महानगर नियोजन समितीमार्फत, राज्य शासनाला मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

  • प्रस्तावित सागरी किनारी मार्ग व मेट्रो रेल गोराई-मानोरी मार्गे वसई-विरार येथील किनार्‍यावरून जाईल. त्यामुळे स्थानिक कोळीवाडे विस्थापित होतील, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

  • प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, हे प्रकल्प गोराई-मनोरी व वसई-विरार क्षेत्रात किनार्‍यालगत नसून, उपनगरीय रेल्वे मार्गानजीक अस्तित्वात असलेल्या डीपी रोडवर प्रस्तावित आहेत. म्हणजेच, प्रकल्पामुळे कोळीवाडे विस्थापित होणार नाहीत.

लेनोव्होचे थिंकपॅड मालिकेत दोन बिझनेस लॅपटॉप :
  • लेनोव्हो ए२७५ आणि ए४७५ हे दोन्ही लॅपटॉप विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे असून यातील बरेचसे फिचर्स हे समान आहेत. दोन्ही लॅपटॉप उत्तम दर्जाच्या बॅटरीने सज्ज असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० तास चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

  • दोन्ही मॉडेलमध्ये एएमडी प्रो ए १२ हा प्रोसेसर देण्यात आला असून याला रेडिऑन आर७-क्लास या ग्राफीक कार्डची जोड देण्यात आली असून दोन्ही लॅपटॉप १६ जीबी रॅमने सज्ज असून स्टोअरेजसाठी ५१२ जीबी आणि एक टेराबाईटचे पर्याय देण्यात आले आहेत. 

  • लेनोव्हो ए२७५ लॅपटॉप मध्ये १२.५ इंची तर लेनोव्हो ए४७५ मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतांचे डिस्प्ले असतील.

  • यात टचस्क्रीन डिस्प्लेचा पर्यायदेखील देण्यात येणार असून हे दोन्ही लॅपटॉप एलटीई नेटवर्कला सपोर्ट करणारे आहेत, अर्थात यात फोर-जी नेटवर्कला वापरता येईल.

  • तसेच यात ब्ल्यु-टुथ व वाय-फायचा सपोर्टदेखील असेल. यामध्ये दोन युएसबी ३.०, युएसबी टाईप-ए पोर्ट, एचडीएमआय, युएसबी टाईप-सी कनेक्टर, हेडफोन पोर्ट आदी कनेक्टीव्हटी देण्यात आली आहे.

  • लेनोव्हो थिंकपॅड ए २७५ हे मॉडेल ८६९ डॉलर्सला तर लेनोव्हो थिंकपॅड ए ४७५ हा लॅपटॉप ८४९ डॉलर्स मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

  • हे दोन्ही लॅपटॉप ग्राहकांना प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात खरेदी करता येणार आहेत. तर भारतात याची अधिकृत लाँचीग लवकरच होऊ शकते.

गेल्या अडीच महिन्यात पेट्रोलच्या दरात १६ रुपयांनी वाढ : 
  • १ जुलै २०१७ रोजी पेट्रोलचा दर ६३ रुपये लिटर होता आणि १० सप्टेबर २०१७ रोजी पेट्रोलचा दर ७९ रुपये लिटर असून म्हणजे गेल्या ७२ दिवसात पेट्रोलमध्ये १६ रुपयांची दरवाढ झाली आहे.

  • कधीकाळी १ दोन रुपये जरी पेट्रोल वाढले, तरी वाहनचालकांच्या असंतोषाला कंठ फुटायचा आता तर अडीच महिन्यात पेट्रोलने १६ रुपयांची विक्रमी उसळी घेतली आहे तरीही सगळे चिडीचुप आहेत.

  • १ जुलै रोजी पेट्रोलचा दर ६३ रुपये प्रती लिटर होता. तर १५ जुलै रोजी ६५ रुपये, १ ऑगस्टला ६७ रुपये, १५ ऑगस्टला ७० रुपये, १ सप्टेंबरला ७५ रुपये आणि १० सप्टेंबरला ७९ रुपये प्रती लिटर आहे.

  • पेट्रोलच्या वाढत्या दरांनी वाहनचांलकांचा संताप अनावर झाला असून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असल्यामुळे ही वाढ एकदाच दिसून येत नाही.

  • यालाच अच्छे दिन म्हणायचं का ? पण नक्की ही दरवाढ होतेय का ? याला आंतरराष्ट्रीय कारणे आहेत ? की रोजच्या रोज इंधनाचे दर बदलण्याच्या नियमाआड ग्राहकांची शुद्ध फसवणूक होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपाप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली होती असा दावा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आला आहे.

  • नरेंद्र मोदींनी खासदार सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती असे सामनामध्ये म्हटले होते सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या आहेत.

  • रविवारच्या सामनाच्या लेखातून हा गौफ्यस्फोट करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर लिहीलेल्या लेखातून हा खुलासा केला आहे. 

  • काय म्हटले आहे संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे बलदंड नेते श्री. शरद पवार यांच्याशी भेट झाली असून देशाच्या राजकारणावर चर्चा झाली. ‘‘आपण भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागला आहात.

  • शरद पवार यांचे हे म्हणणे, पण आजही महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे पुढारी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या संपर्कात असून आज फक्त ४१ आमदारांची ताकद असलेल्या राष्ट्रवादीसाठी उंटाच्या पाठीवरील ती शेवटची काडी ठरेल व भाजपचीही त्यामुळे एकदाची पोलखोल होईल.

  • राष्ट्रवादीने फडणवीस मंत्रिमंडळात सामील व्हावे असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटत असेल व त्यासाठी त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर गुप्त बैठका सुरू असतील तर त्यामुळे शिवसेनेस विचलित होण्याचे कारण नाही.

पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांची अपेक्षा आरोग्याचा मुद्दा प्राधान्याचा व्हावा :
  • सातवे विश्व संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य बेटावर सुरु झाले असून त्यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ लहाने यांनी विस्ताराने मांडणी केली.

  • संमेलनाचे स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड, संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय आवटे, प्रमोद गायकवाड, माजी महापालिका आयुक्त जीवन सोनावणे, ज्येष्ठ अधिकारी शिवाजी भोसले या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

  • वैद्यकशास्त्रावर मराठीत अनेक पुस्तके आली असली, तरी अद्यापही तिथे संधी आहेत, अवयवदानासारख्या चळवळीची आज आवश्यकता असून आरोग्यावरची आपली तरतूद अनेक छोट्या आणि विकसनशील देशांपेक्षा कमी आहे.

  • स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड म्हणाले, भाषा बाजारपेठेत उभी राहिल्याशिवाय मोठी होत नाही, त्यामुळे आमचा प्रयत्न मराठी भाषेला अधिक व्यावहारिक आणि लोकाभिमुख करण्याचा आहे.

  • त्याच भूमिकेतून हे संमेलन 'आरोग्य' या विषयाभोवती गुंफले असून मराठी ज्ञानभाषा झाली नाही, तर इंग्रजीशरणता ही आपली अगतिकता ठरणार आहे.

  • आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे जसे आवश्यक असून हे ज्ञान मराठीत येणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी येथे केले. 

सोशल मीडियावरील पोस्ट तुम्हाला अडकवू शकते आयकर कायद्याच्या कचाट्यात :
  • फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंवर आता तुमच्या मित्रमंडळींसोबतच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर असणार आहे.

  • एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर किंवा एखादी नवी वस्तू खरेदी केल्यावर त्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करणं हा आजचा नवा नियम आहे.

  • दररोज घडणाऱ्या गोष्टी स्टेटस किंवा फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केल्या जातात जर तुम्ही तुमचा नवा अलीशान बंगला, नवी गाडी, पर्यटन स्थळाचं मोठं कॉटेज याचे फोटो फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असाल, तर तुम्हाला आता सावध रहायला हवं.

  • सोशल मीडियावर फोटो शेअर करायची हीच क्रेझ तुम्हाला अडचणीतही आणू शकते, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंवर आता तुमच्या मित्रमंडळींसोबतच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर असणार आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • राष्ट्र दिन : कॅटेलोनिया

  • राष्ट्रभक्त दिन : अमेरिका

जन्म /वाढदिवस

  • आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते : ११ सप्टेंबर १८९५

  • अनिल उर्फ कवि अनिल : ११ सप्टेंबर १९०१

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • महादेवी वर्मा, हिंदी कवयित्री : ११ सप्टेंबर १९८७

  • एन. डी. नगरवाला, क्रीडा संघटक व शिक्षणमहर्षी : ११ सप्टेंबर १९९८

ठळक घटना

  • सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेनेजन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले : ११ सप्टेंबर १९४२

  • वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडची स्थापना : ११ सप्टेंबर १९६१

  • नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोचले : ११ सप्टेंबर १९९७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.