चालू घडामोडी - ११ नोव्हेंबर २०१७

Date : 11 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मुंबईत लवकरच सुसज्ज टेनिस स्टेडियम :
  • मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करण्याच्या दृष्टीने मुंबईत सुसज्ज टेनिस स्टेडियम उभारण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे (एमएसएलटीए) सचिव सुंदर अय्यर यांनी शुक्रवारी दिली.

  • ‘‘मुंबईतील अनेक क्लब्समध्ये टेनिस कोर्ट आहेत. मात्र खूप प्रमाणात प्रेक्षक बसतील, असे स्टेडियम नाही. मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवण्यासाठी संबंधित असोसिएशनचे स्वत:चे स्टेडियम असणे, बंधनकारक आहे. मुंबईत सुसज्ज स्टेडियम बांधण्यासाठी असोसिएशन उत्सुक आहे.

  • त्यादृष्टीने मुंबई शहर रस्ते विकास प्राधिकरणाशी (एमएमआरडीए) आमची बोलणी सुरू आहेत. त्यांनी आम्हाला दोन-तीन जागांचे प्रस्ताव दिले आहेत. त्यातील एक जागा आम्हाला निवडायची आहे. सद्य:स्थितीत ती जागा पडीक आहे. तिचा विकास करून आम्हाला त्यावर बांधकाम करावे लागेल.

  • या प्रक्रियेसाठी काही वर्षांचा कालावधी लागेल. मात्र भविष्यात मुंबईत एमएसएलटीएचे टेनिस स्टेडियम असेल,’’ असे अय्यर यांनी सांगितले.(source :loksatta)

आमच्या पंतप्रधानाला परत द्या, लेबनॉनची सौदी अरेबियाकडे मागणी :
  • बैरुत- सौदी अरेबियामध्ये असलेल्या आमच्या पंतप्रधानांना परत पाठवा अशी मागणी लेबनॉनने केली असून सौदीने आपल्या पंतप्रधानांना ताब्यात घेऊन सौदी अरेबियामध्येच ठेवल्याचा आरोप लेबनॉनने केला आहे.

  • गेल्या आठवडाभरात सौदी अरेबिया आणि लेबऩनमधील तणाव वाढीस लागला आहे. मध्यपुर्वेतील वातावरण नव्याने चिघळण्याची शक्यता आहे. 

  • "हिजबोल्ला जोपर्यंत लेबनॉन सरकारमध्ये आहे तोवर लेबनॉनला सौदी अरेबिया विरोधी देशच मानेल. हिजबोल्लाचा सरकारमध्ये समावेश म्हणजे सौदी अरेबियाविरोधात युद्ध पुकारल्यासारखेच आहे" असे मत सौदीचे आदेल अल-जुबेर यांनी व्यक्त केले आहे.(source :lokmat)

७० वर्षांवरील ज्येष्ठांना घरपोच बँकिंग सेवा द्या - रिझर्व्ह बँक :
  • मुंबई : ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच अंध व अपंगांना डिसेंबर अखेरपासून घरपोच प्राथमिक बँकिंग सेवा द्या, असे आदेश रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना दिले आहेत.

  • रिझर्व्ह बँकेने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. तिची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक व अंध-अपंगांचा रोख रकमेचा भरणा व अदायगी (पीक-अप अ‍ॅण्ड डिलिव्हरी), चेकबुक आणि डिमांड ड्राफ्ट या सेवा घरपोच मिळतील.

  • रिझर्व्ह बँकेने म्हटले की, अनेकदा बँका ज्येष्ठ नागरिक आणि अंध-अपंगांना बँक शाखांतून परत पाठवितात, असे आढळून आले आहे. त्यामुळे या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी बँकांनी घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

  • ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि अंध-अपंग यांच्याप्रमाणेच वैद्यकीय प्रमाणित जुनाट आजार अथवा शारीरिक अक्षमता असलेल्या व्यक्तींनाही या सेवेचा लाभ मिळेल.

जीएसटीमध्ये मोठी कपात, रोजच्या वापरातल्या 177 वस्तू झाल्या स्वस्त :
  • नवी दिल्ली - जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर आकारण्यात येणा-या जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.

  • 227 पैकी फक्त 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. अन्य 177 वस्तू 28 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमधून 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे च्युईंगम ते डिटरजंटपर्यंत वस्तू स्वस्त झाल्या आहेत. 

  • आसामच्या गुवहाटी येथे सुरु असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जीएसटी परिषदेचे सदस्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली.

  • विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधून दैनंदिन वापराच्या वस्तूंवर  28 टक्के जीएसटी आकारण्याला मोठा विरोध होता. त्यामुळे फक्त आलिशान, चैनींच्या 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. (source :lokmat)

प्रद्युम्न हत्या प्रकरणी अजून चार विद्यार्थी CBI च्या रडारवर, मोठे खुलासे होण्याची शक्यता :
  • नवी दिल्ली - प्रद्युम्न हत्या प्रकरणी अकरावीत शिकणा-या विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्या प्रकरणात इतर विद्यार्थीही सामील असल्याचा सीबीआयला संशय आहे.

  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सीबीआयने तपासाला वेग दिला असून, चार विद्यार्थी त्यांच्या रडारवर आहेत. दरम्यान अधिकारी मात्र यासंबंधी काहीही बोलण्यास नकार देत आहेत. यामधील एका विद्यार्थ्याची चौकशीही करण्यात आली आहे. 

  • सीबीआय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सीबीआयला इतर विद्यार्थ्यांच्या सहभागाविषयी संशय आहे. त्याच विद्यार्थ्याने मुख्य आरोपीसोबत मिळून शाळेच्या माळी आणि शिक्षकाला प्रद्युम्न रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती दिली होती.

  • प्रद्युम्न हत्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्याची सलग तिस-या दिवशी चौकशी करण्यात आली. शुक्रवारी इतर विद्यार्थ्यांशिवाय रायन स्कूलच्या माजी कर्मचा-यांचीही चौकशी करण्यात आली.

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • राष्ट्रीय शिक्षण दिन

महत्वाच्या घटना

  • १९२६: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.

  • १९३०: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.

  • १९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.

  • १९६२: कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले.

  • १९७५: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.

  • १९८१: अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • २००४: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.

जन्म दिवस

  • १८२१: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी१८७१)

  • १८५१: विद्वान व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी१९०८ – मुंबई)

  • १८८६: लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९४५)

  • १८८८: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८२)

  • १८८८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)

  • १९०४: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९६०)

  • १९११: लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९९१)

  • १९२४: कसोटीपटू रुसी शेरियर मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १९९६)

  • १९३६: मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.

  • १९६२: अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल डेमी मूर यांचा जन्म.

  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांचा जन्म.

मृत्यू

  • १९८४: मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंगसिनीअर यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९९)

  • १९९४: ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९०४)

  • १९९७: चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांचे निधन.

  • १९९९: शिल्पकार अरविंद मेस्त्री यांचे निधन.

  • २००४: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२९)

  • २००५: ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचे निधन.  (जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)

  • २००५: नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. सी. मोदी. यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.