चालू घडामोडी - ११ मे २०१७

Date : 11 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हरप्रीत सिंगला सलग दुसरे कांस्य :
  • भारताच्या हरप्रीत सिंगने ग्रीको-रोमन विभागातील ८० किलो गटात कांस्यपदक पटकावले आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत त्याचे हे लागोपाठ दुसरे कांस्यपदक आहे. त्याचा सहकारी गुरप्रित सिंगला मात्र पदक मिळवण्यात अपयश आले.

  • हरप्रीतचे येथील पदक भारतासाठी एकमेव यश ठरले. भारताच्या अन्य खेळाडूंना अपयशास सामोरे जावे लागले. गुरप्रीतने रेपीएज फेरीद्वारे कांस्यपदकाच्या आशा निर्माण केल्या होत्या,

  • चीनच्या बिन यांगने त्याला केवळ ३८ सेकंदांमध्ये चीत केले व निर्णायक विजयासह ८-० अशी लढत जिंकली.

  • ग्रीको-रोमन विभागातील ८० किलो गटात हरप्रीतने जपानच्या युया माईतावर २-१ अशी मात करीत शानदार सुरुवात केली होती, मात्र नंतरच्या फेरीत त्याला दक्षिण कोरियाच्या जुआन हुयांग किमने ८-० असे लीलया पराभूत केले. किमने या गटात अंतिम फेरी गाठल्यामुळे हरप्रीत याला कांस्यपदकाच्या रीपीचेज फेरीत स्थान मिळाले.

  • भारताच्या रवींदर (६६ किलो), हरदीप (९८ किलो) व नवीनकुमार (१३० किलो) यांचे आव्हान संपुष्टात आले. हरदीपला रीपीचेज फेरीत

अमेरिकी काँग्रेसच्या दलाई लामांशी भेटीबद्दल चीनचा आक्षेप :
  • अमेरिकी काँग्रेसच्या एका प्रतिनिधी मंडळाने दलाई लामा यांची भारतात भेट घेतल्याबद्दल चीनने अमेरिकेकडे राजनैतिक आक्षेप नोंदवला आहे.

  • तिबेटच्या स्वातंत्र्याला पाठिंबा न देण्याच्या अमेरिकेच्या आश्वासनाचा यामुळे भंग झाला असल्याचे त्याने म्हटले आहे.

  • तिबेटच्या स्वातंत्र्याला पाठिंब्याबाबत जगाला अतिशय चुकीचा संदेश गेला असून, तिबेटच्या स्वातंत्र्याला पाठिंबा न देण्याबाबत अमेरिकी सरकारच्या बांधिलकीचा भंग झाला असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले.

  • अमेरिकी काँग्रेसने दलाई लामा यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क साधणे थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले. अल्पसंख्याक नेत्या नॅन्सी पेलोसी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या एका प्रतिनिधी मंडळाने दलाई लामांची मंगळवारी धर्मशाळा येथे भेट घेतली होती.

  • तिबेटला चीनपासून वेगळे करण्यासाठी काम करणारे फुटीरवादी म्हणून चीन दलाई लामांकडे पाहते. कुठल्याही जागतिक नेत्याने किंवा सरकारी अधिकाऱ्याने त्यांना भेटण्यास चीनचा आक्षेप असतो.

राज्यातील अर्ध्याहून अधिक पीएच.डी बोगस : विनोद तावडे 
  • विद्यापीठांमधील अर्ध्याहून अधिक पीएच.डीचे प्रबंध हे कॉपी पेस्ट असतात. अशा संशोधन विषयांचा भविष्यात काहीच उपयोग होत नाही.’ असं तावडे म्हणाले..

  • महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील अर्ध्याहून अधिक पीएच.डी बोगस असल्याचं वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केलं आहे. त्यामुळं सर्व संशोधन केंद्रांना यापुढे प्रबंध ऑनलाईन जाहीर करण्याच्या सूचना दिल्याचंही तावडे म्हणाले. 

  • ‘अनेक जण फक्त पगारवाढ होण्यासाठी किंवा नावापुढे डॉक्टर लावण्यासाठी पीएच.डी. करतात.

  • मोहनदास पै समितीच्या अहवालानुसार आपल्याकडील पीएच.डींपैकी १.३० टक्केच प्रबंधांचे संदर्भ वापरले जातात असंही तावडेंनी सांगितलं.

  • शोधन केंद्रांना पीएच.डीचे प्रबंध ऑनलाइन जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जेणेकरून प्रबंधांची नक्कल करून पदवी मिळवण्याला अटकाव होऊ शकेल.

दक्षिण कोरियात मून यांचा अध्यक्षपदी शपथविधी 
  • दक्षिण कोरियातील अध्यक्षीय निवडणुकीत मून जे इन यांचा विजय झाल्यानंतर लगेचच शपथविधीही असून त्यांनी उत्तर कोरियाबरोबरचा तणाव कमी करण्यासाठी त्या देशाला भेट देण्याची तयारी दर्शवली आहे. 

  • उत्तर कोरियाशी मैत्री साधताना त्यांचे अमेरिकेशी संबंध कसे राहतील याबाबत उत्सुकता राहील.

  • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उत्तर कोरियाला वठणीवर आणण्याची भाषा करीत असताना मून यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. आपण चीन, जपान व उत्तर कोरिया या देशांना भेट देऊन परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे.

  • उत्तर कोरियाच्या प्रश्नावर मून यांची कसोटी लागणार आहे, कारण त्या देशाने अणुकार्यक्रम धडाक्यात राबवल्याने अमेरिकेने विरोध केला आहे. मून यांच्यासमोर देशांतर्गत भ्रष्टाचाराचे मोठे आव्हान असून, माजी अध्यक्ष पार्क गेन हाय यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात महाभियोग चालवण्यात आला होता.

देशात योग आणि सीमेवर युद्ध एकाचवेळी व्हावे - रामदेव बाबा
  • योग आणि युद्धाचे समर्थन करताना रामदेव बाबा यांनी या दोन्ही गोष्टी एकाचवेळी व्हायला हव्यात असे म्हटले. ‘हिंदुस्तानात योग व्हावा आणि सीमेवर पाकिस्तानासोबत योग आणि युद्ध व्हावे. योग केल्याने हिंदुस्तानात आनंद पसरेल आणि सीमेवरील योग आणि युद्धामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना कंठस्नान घालता येईल,’ असे रामदेव बाबा यांनी म्हटले.

  • योग आणि युद्धाच्या एकीकरणामुळे भारतात आनंद पसरेल आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा होईल, असे योगगुरु रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.

  • भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांनी हे विधान केले आहे.

  • भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सध्या मोठ्या प्रमाणात ताणले गेले आहेत. कुलभूषण जाधव प्रकरण आणि सीमारेषेवरील वाढता तणाव यामुळे दोन्ही देशांमधील संवादाची दरी रुंदावली असून पाकिस्तानकडून वारंवार सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे.

  • कुलभूषण जाधव प्रकरणातही पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेतली आहे. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. विशेष बाब म्हणजे भारताने १६ वेळा कॉन्स्युलर अॅक्सेससाठी विनंती करुनही पाकिस्तानने भारतीय राजदूतांना जाधव यांना भेटण्याची परवानगी नाकारली आहे.

भारतीय गोलंदाजांना कळली यॉर्करची ताकद : सुनील गावसकर
  • केकेआर विरुद्ध विजयानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघात कमालीचा उत्साह संचारला. या उत्साहाच्या बळावर ते मुंबई इंडियन्सला धक्का देण्याचा प्रयत्न करतील. मागच्या सामन्यात पराभूत झालेल्या मुंबईसाठी विजयी पथावर परतणे आणि साखळीत नंबर वन स्थान टिकविणे सोपे नाही.

  • आघाडीच्या दोन संघांना अंतिम फेरीत पात्रता सिद्ध करण्यास एक अतिरिक्त सामना मिळतो.

  • केकेआर विरुद्ध किंग्स पंजाबचा मारा मोक्याच्या क्षणी महत्त्वपूर्ण ठरला असून विजयात राहुल तेवटिया याचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला.

  • लेगस्पिनर असलेल्या राहुलने मंद गोलंदाजी करताच त्याचे चेंडू उंच मारण्याची संधी फलंदाजांना मिळाली नाही. संदीप शर्मा आणि मोहित शर्मा यांनी देखील अखेरच्या टप्प्यात टिच्चून मारा केला. या दोघांचेही ‘यॉर्कर’ चकित करणारे होते.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : भारत.

  • मातृत्व दिन.

जन्म, वाढदिवस

  • जे. कृष्णमुर्ती, भारतीय तत्त्वज्ञानी : ११ मे १८९५

  • जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू : ११ मे १९७२

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • जॉन कॅडबरी, इंग्लिश उद्योगपती : ११ मे १८८९

  • लोकनेते कृष्णमोहन बंदोपाध्याय : ११ मे १८८५

ठळक घटना

  • पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम – स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले : ११ मे १८५७

  • ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली : ११ मे १८८८

  • स्त्रियांना पदवीपरीक्षेसाठी प्रवेश देण्याचा ऑक्सफर्ड विद्यापिठाचा निर्णय : ११ मे १९२०

  • चलत चित्र कला व विज्ञान अकादमीची स्थापना. ही संस्था दरवर्षी ऑस्कार पुरस्कार बहाल करते : ११ मे १९२७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.