शिर्डी विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता शिर्डी विमानतळाचा विस्तार करून तेथे नवीन टर्मिनल इमारत बांधण्याचे काम सुरू करावे. ही इमारत पूर्ण होईपर्यंत जुन्या टर्मिनलचा विस्तार तातडीने करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीदरम्यान, उडाण योजना तसेच ‘रिजनल कनेटिव्हीटी स्किम’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विमानांचा आढावा घेण्यात आला. तसेच कंपनीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या अमरावतीतील बरोरा, पुरंदर, सोलापूर, चंद्रपूर येथील विमानतळांच्या प्रगतीचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
मिहान विशेष आर्थिक क्षेत्रात डिफेन्स हबसाठी जेएसआर डायनॅमिक्स या लष्करी सामग्री निर्मिती करणाऱ्या कंपनीने जागेची मागणी केली होती. या कंपनीसाठी 27 एकर जागा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मिहानमध्ये आणखी काही कंपन्यांनी युनिट सुरू करण्यास उत्सुकता दाखवली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच अमरावती येथील विमानतळाचे काम सुरू झाले आहे. इतरही विमानतळ, तेथील धावपट्टी यांची कामेही वेगाने सुरू करावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार इम्तियाज जलील यांची एआयएमआयएमच्या (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुक्तत्याच पार पडलेल्या लोकसभा निडवणुकीत ते औरंगाबादमधून वंचित बहुजन आघाडी-एआयएमआयएम युतीचे उमेदवार होते. त्यांनी २० वर्षांपासून औरंगाबादचे खासदार असलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या ४४९२ मतांनी मतांनी पराभव केला.
त्यांना खासदारकीचे तिकीट मिळण्या अगोदर ते औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. विधानसभेतही त्यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा पराभव केला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांना पक्षाकडून महत्वाचे पद देण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे . या निवडणूक याचिकेवर १३ जुलै रोजी प्राथमिक सुनावणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील बहुजन महापार्टी या पक्षातर्फे निवडणूक लढविलेले उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी ही निवडणूक याचिका सादर केली आहे. त्यांना १२१० मते मिळाली आहेत.
या निवडीनंतर खासदार जलील यांनी लोकसत्ता प्रतिनिधीशी संवाद साधतांना सांगितले की, भविष्यात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समर्थ पर्याय उभा करणं, माझ्या समोरचे आव्हानात्मक कार्य असेल. गत विधानसभा निवडणुकीत एमआयएमने २४ जागा लढवल्या होत्या, आता ५० पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. ज्या ठिकाणच्या जागांवर एमआयएमचा दावा असेल अशा जागांची यादी प्रकाश आंबेडकरांना पाठवली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांप्रमाणे पार पडावी आणि राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.
अकरावी प्रवेशाकरिता कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर विहित कोट्यातील राखीव जागांवर करण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेवर तसेच एकूण प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी हे विशेष भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या या भरारी पथकामधे विभाग स्तरावरील केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतील कोणतेही दोन सदस्य तसेच विभागातील अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी अथवा प्राचार्य, संबंधित शिक्षणाधिकारी अथवा शिक्षण निरीक्षक यांचा या भरारी पथकामध्ये समावेश असणार आहे.
यापूर्वी 2019-20 पासून नववी ते बारावीची विषयरचना आणि मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 10 दिवसांमध्ये अहवाल सादर करणार असून शिक्षण आयुक्त या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. विद्या प्राधिकरणाचे संचालक, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव, माध्यमिक शिक्षण संचालक, बालभारतीचे संचालक आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष या समितीचे सदस्य असणार आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. २२ जुलै रोजी ही भेट होणार आहे. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत या दोन देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होऊ शकते. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान या दोघांची भेट होणार असल्यासंदर्भातले एक पत्र व्हाईट हाऊसतर्फे जारी करण्यात आलं आहे.
दोन्ही देशांमधली शांतता, स्थैर्य आणि आर्थिक मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होणार असल्याचीही माहिती समजते आहे. त्याचप्रमाणे दहशतवादाचा बिमोड करणं, सुरक्षा, व्यापार या विषयांवरही चर्चा होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनीही या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की डोनाल्ड ट्रम् यांनी गेल्या महिन्यातच इम्रान खान यांना अमेरिकेला बोलावले होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने इम्रान खान जाऊ शकले नाहीत. आता ही भेट २२ जुलै रोजी होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेने भारताला कायमच आपला सच्चा मित्र मानलं आहे. तसा उल्लेखही ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या G 20 परिषदेतही केला होता. आता इम्रान खान आणि ट्रम्प यांच्या भेटीत दहशतवादावर काय चर्चा होते? तसेच भारत पाकिस्तानच्या बिघडलेल्या संबंधांवर काही चर्चा होणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे
जगात एकूण लोक किती? जाणून घ्या जागतिक लोकसंख्येबद्दलची थक्क करणारी आकडेवारी :
दरवर्षी ११ जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस लोकसंख्यावाढीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. आजच्या या दिवसानिमित्त जाणून घेऊयात जागतिक लोकसंख्येबद्दलची थक्क करणारी आकडेवारी
जागतिक लोकसंख्या: ७७० कोटी (एप्रिल २०१९ पर्यंत
जागतिक लोकसंख्येला १०० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी २ लाख वर्षांचा कालावधी लागला
जागतिक लोकसंख्येने १०० कोटींवरुन ७०० कोटींचा आकडा अवघ्या २०० वर्षांमध्ये गाठला
१९५५ ते १९७५ दरम्यान जागतिक लोकसंख्या वाढ सर्वाधिक म्हणजे वर्षाला १.८ टक्क्यांनी वाढली
२०१० ते २०१५ दरम्यान जागतिक लोकसंख्येची वाढ १.२ टक्क्यांनी घटली
२०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येचा आकडा १ हजार कोटींपर्यंत वाढणार आहे
२१०० ला जागतिक लोकसंख्या १ हजार १०० कोटी इतकी असण्याची शक्यता आहे
२०१८ च्या आकडेवारीनुसार जागतिक लोकसंख्येचे सरासरी वयोमान ३० वर्षे ४ महिने इतके आहे
सर्वाधिक लोकसंख्या असणारे खंड पुढीलप्रमाणे:
आशिया (लोकसंख्या: ४४३. ६ कोटी)
आफ्रिका (लोकसंख्या: १२१. ६ कोटी)
युरोप (लोकसंख्या: ७३.८ कोटी)
उत्तर अमेरिका (लोकसंख्या: ५७.९ कोटी)
दक्षिण अमेरिका (लोकसंख्या: ४२.२ कोटी)
ऑस्ट्रेलिया (खंड) (लोकसंख्या: ३९.९ कोटी)
अंटार्टिका (लोकसंख्या: १२०० कायमचे रहिवाशी नाही केवळ संशोधक)
सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश (२०१४ च्या आकडेवारीनुसार)
चीन – १३ कोटी ९८१ लाख २० हजार
भारत – १३ कोटी ४९४ लाख ६० हजार
अमेरिका – ३ कोटी २९५ लाख १० हजार
इंडोनेशिया – २ कोटी ६५० लाख १५ हजार ३००
पाकिस्तान – २ कोटी १२७ लाख ४२ हजार ६३१
ब्राझील – २ कोटी १०१ लाख ४१ हजार
नायझेरिया – १ कोटी ८८५ लाख
बांगलादेश – १ कोटी ६६८ लाख ५९ हजार
रशिया – १ कोटी ४६८ लाख ७७ हजार ८८
जपान – १ कोटी २६४ लाख ४० हजार
४३८ कोटी लोक या दहा देशांमध्ये राहतात. हा आकडा जागतिक लोकसंख्येच्या ५७ टक्के इतका आहे (जुलै २०१६ पर्यंतची आकडेवारी)
२०२२ मध्ये भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश होण्याची शक्यता
जागतिक लोकसंख्या दिन.
महत्वाच्या घटना
१६५९: अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरून निघून प्रतापगड येथे पोचले.
१८०१: फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने पॉन धूमकेतूचा शोध लावला.
१८९३: कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.
१९०८: लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.
१९१९: नीदरलैंड मध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी कायदा लागू झाला.
१९३०: ऑस्ट्रेलिया चेसर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.
१९५०: पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.
१९५५: अमेरिकेने चलनावर In God we trust (देवावर आमचा विश्वास आहे) असे छापण्याचे ठरवले.
१९७१: चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
१९७९: अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.
१९९४: पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
२००१: आगरताळाते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.
२००६: मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.
जन्म
१८८९: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१ – कोरेगाव, जिल्हा सातारा)
१८९१: प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे १९६१)
१९२१: दलित साहित्यिक शंकरराव खरात यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)
१९३४: जियोर्जियो अरमानी कंपनीचे स्थापक जियोर्जियो अरमानी यांचा जन्म.
१९५३: केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म.
१९५६: भारतीय-अमेरिकन लेखक आणि शैक्षणिक अमिताव घोष यांचा जन्म.
१९६७: भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक झुम्पा लाहिरी यांचा जन्म.
मृत्यू
१९८९: ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये यांचे निधन. (जन्म: २२ मे १९०७)
१९९४: परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्स चे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचे निधन.
२००३: कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक सुहास शिरवळकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)
२००९: गीतकार शांताराम नांदगावकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.