एसबीआयमध्ये जुन्या नोटा बदलण्यासाठी आतापर्यंत कोणतंही शुल्क आकारलं जात होतं. मात्र आता नोटा बदलण्यासाठी ०२ ते ०५ रुपयांचा सर्व्हिस चार्ज आकारला जाईल. यात २० किंवा त्यापेक्षा जास्तीच्या नोटा किंवा ०५ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेतल्यास ०२ हा चार्ज आकारला जाईल.
एसबीआयनं पुन्हा एकदा आपल्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून एसबीआयनं जारी केलेले नवे नियम ०१ जूनपासून लागू होणार आहेत.
जून्या आणि फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त सर्व्हिस चार्ज आकारला जाणार आहे. तसंच बचत खात्यातून पैसे काढणाऱ्या ग्राहकांनाही सर्व्हिस चार्जचा भुर्दंड पडणार आहे.
२० पेक्षा कमी आणि ०२ हजारांपेक्षा कमी रकमेच्या नोटा बदलण्यासाठी सध्यातरी कोणतंही शुल्क लावलं जाणार नाही. एसबीआयचे नवे नियम ०१ जूनपासून लागू होतील.
देश-विदेशातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बिबर मुंबईत दाखल झाला असून रात्री ०१.३० च्या सुमारास तो चार्टर्ड प्लेनने कलिना येथील विमातळावर उतरला.
त्याच्यासोबतचे जवळपास १२० क्रू मेंबर्स याआधीच मुंबईत पोहोचले आहेत. विमानतळावर बिबरची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते उपस्थित होते.
विमानतळावरून तो थेट लोअर परेल येथील हॉटेलमध्ये गेला, त्याच्या सुरक्षेसाठी इतर सुरक्षांसोबतच सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा हा देखील त्याच्यासोबत आहे.
आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये जस्टिन बिबरचा म्युझिकल कॉन्सर्ट होणार असून त्यासाठी देशभरातून बिबरचे चाहते नवी मुंबईत येणार असून कार्यक्रमाचे तिकीट सर्वसामान्यांच्या अावाक्याबाहेर असले, तरीदेखील उच्चभ्रू वसाहतींमधील तरुणाई मात्र, जस्टीन बिबरला लाइव्ह ऐकण्यासाठी हवी ती किंमत मोजण्यास तयार आहेत.
३५ ते ४५ हजार प्रेक्षक अपेक्षित आहेत. पॉप गायक बिबरचा भारतातील लाइव्ह कार्यक्रम आणि त्याची झलक पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातील तरुणवर्ग या ठिकाणी जमणार आहे. याकरिता नवी मुंबई पोलिसांकडून विशेष फौजदेखील तयार करण्यात आली आहे.
ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणांचा फटका कुठलाही गुन्हा दाखल नसलेल्या गुरुमुख सिंगला बसला असून त्याचे कुटुंब आता विस्कटले आहे. त्याच्या शिकत असलेल्या मुलीला नोकरी करण्याची वेळ आली आहे.
भारतात धार्मिक उत्पीडन होत असल्याच्या कारणास्तव वीस वर्षांपूर्वी अमेरिकेत आश्रय घेतलेल्या शीख व्यक्तीस कॅलिफोर्नियात स्थलांतरविरोधी पथकाने पकडले असून त्याला आता मायदेशी पाठवण्यात येणार आहे, त्याने मायदेशात पाठवण्याविरोधात केलेले अपील फेटाळण्यात आल्यानंतर त्याच्यावर आता ही वेळ आली आहे.
पंजाबमधील टॅक्सीचालक गुरुमुख सिंग हा व्हिसा नसताना मेक्सिकोलगत सीमा ओलांडून १९९८ मध्ये अमेरिकेत गेला होता, त्याला काल ताब्यात घेण्यात आले.
१९९९ मध्ये त्याने अमेरिकेत आश्रयासाठी अधिकृत अर्ज केला होता. त्याच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नाहीत पण तरीही त्याला परत पाठवण्यात येणार आहे.
स्थलांतर विभागाने सांगितले, की न्यायालयाने अनेक पातळ्यांवर त्याला देशाबाहेर काढण्याचे म्हणणे योग्य ठरवले आहे.
गेल्या वर्षी जर्मनी खुल्या स्पर्धेत दुखापतीमुळे कश्यपला माघार पत्करावी लागली होती. इंडिया सुपर सीरिजनंतर गुडघ्याची दुखापत बरी होण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आणि कश्यपचे ऑलिम्पिकवारीचे स्वप्न भंगले.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे रिओ ऑलिम्पिकवारी हुकलेला पारुपल्ली कश्यप पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जागतिक क्रमवारीत त्याची पीछेहाट झाली. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या कश्यपला पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.
असंख्य पुरुष भारतीय बॅडमिंटनपटू सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहेत. त्यांना टक्कर देत मला कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध करावे लागणार आहे. खडतर आव्हान आहे, मात्र मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन,’’ असे कश्यपने सांगितले.
जागतिक दिवस
मातृ दिन : मेक्सिको.
जलसंधारण दिन : महाराष्ट्र.
जन्म, वाढदिवस
नयनतारा सहगल भारतीय लेखिका : १० मे १९२७
माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस, मराठी कवी : १० मे १९३७
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
ठळक घटना
इंग्रज - मराठे तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला : १० मे १८१८
मिरज येथे पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी पेटली : १० मे १८५७
मुंबईमध्ये प्रथमच रात्रीच्या वेळी पकाशझोतात क्रिकेट सामना खेळण्यात आला : १० मे १९८१
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.