चालू घडामोडी - १० जून २०१८

Date : 10 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी व शी जिनपिंग यांची दुसरी भेट फलदायी :
  • चिंगदाओ (चीन) : चीनच्या पूर्वेकडील शातोंग प्रांताची राजधानी व प्रमुख बंदर असलेल्या चिंगदाओ शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत द्विपक्षीय संबंध व व्यापार तसेच गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली.

  • मोदी व शी जिनपिंग यांच्यात दोन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यापैकी एक ब्रह्मपुत्रा नदीच्या जलप्रवाहासंबंधीची सर्व शास्त्रीय माहिती चीनने भारतास देण्याचा आहे. दुसºया कराराने भारतातून बासमती तांदळाची चीनमध्ये निर्यात करण्याचे ठरले.

  • सदस्य देशांच्या प्रतिनिधीमंडळ बैठकीला मोदी उपस्थित राहिले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झियोयेव यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व मोदी यांचीही शनिवारी उशिरा भेट अपेक्षित होती.

  • भारत, पाकिस्तान, चीन, कझागस्तान, रशिया, ताजिकिस्तान, किरगिझीस्तान व उझबेकिस्तान हे देश ‘एससीओ’चे सदस्य आहेत. भारत व पाकिस्तानला गेल्या वर्षीच त्यात सामील केले. पूर्ण सदस्य म्हणून दोघांना ही परिषद महत्त्वाची आहे.

आठवीपर्यंत शिकलेला आमदार कर्नाटकचा उच्चशिक्षण मंत्री :
  • केवळ इयत्ता आठवीपर्यंतच शिक्षण झालेल्या आमदाराला उच्चशिक्षण खात्याचे मंत्री केल्याचे शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी जोरदार समर्थन केले. आपण कितीसे शिकलो आहोत, तरीही आपण मुख्यमंत्री म्हणून काम करीत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले आणि त्यांनी आठवीपर्यंतच शिक्षण घेतलेल्या आमदाराला उच्चशिक्षण खात्याचे मंत्री केल्याबद्दलच्या प्रश्नांना बगल दिली.

  • जद(एस)चे आमदार जी. टी. देवेगौडा यांचे शिक्षण मर्यादित आहे, असे असतानाही उच्चशिक्षण खाते दिल्याबद्दल ते नाराज असल्याचे वृत्त पसरले असून त्याबाबत कुमारस्वामी यांना विचारण्यात आले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले.

  • जी. टी. देवेगौडा यांनी चामुंडेश्वरी मतदारसंघातून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव केला त्यामुळे त्यांना जायंट किलर संबोधण्यात आले. मात्र त्यांचा डोळा अतिशय महत्त्वाच्या खात्यावर होता, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.

  • काही जणांची विशिष्ट खात्यातच काम करण्याची इच्छा असते, परंतु प्रत्येक खात्यामध्ये काम परिणामकारक करण्याची संधी असते, आपल्याला परिणामकारक काम केले पाहिजे. काम करण्यासाठी उच्चशिक्षणापेक्षा अधिक उत्तम खाते आहे का, असा सवाल कुमारस्वामी यांनी केला.

दहावीत ६२५ पैकी ६२४ मार्क, एका मार्कसाठी पेपर रिचेकिंगला :
  • बेळगाव : दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 624 मार्क मिळाले. मात्र एवढी मेहनत करुनही माझा एक मार्क कुठे गेला, याचा शोध घेण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्याने पेपर रिचेकिंगला पाठवला. रिचेकिंगमध्ये उरलेला एक मार्कही मिळाल्यानंतर हा विद्यार्थी टॉपर ठरला.

  • बेळगावमधील मोहम्मद कैफ मुल्लाला दहावीत 625 पैकी 264 मार्क मिळाले. संयुक्तपणे एका विद्यार्थ्यासोबत तो टॉपर होता. मात्र हा एक गुण कसा गेला, याचा शोध घेण्यासाठी त्याने पेपर रिचेकिंगला पाठवला. अखेर रिचेकिंगमध्ये त्याला गमावलेला एक मार्क मिळाला आणि तो बोर्डात टॉपर म्हणून घोषित करण्यात आला.

  • मोहम्मद कैफने विज्ञान वगळता सर्व विषयांमध्ये शंभर टक्के मार्क मिळवले. बोर्डातील तेरा लाख विद्यार्थ्यांपैकी त्याने शंभर टक्के मार्क घेत पहिला क्रमांक पटकावला.

  • ''मला शंभर टक्के मार्क मिळतील याची खात्री परीक्षा दिल्यापासून होती. पण 99.86 टक्के मार्क मिळाले, केवळ एकच मार्क विज्ञान विषयात गमावला होता. पण रिचेकिंगनंतर मला अपेक्षित असा निकाला लागला,'' असं कैफ एका वेबसाईटशी बोलताना म्हणाला.

  • मोहम्मद कैफ आता अकरावीत विज्ञान शाखेला प्रवेश घेणार आहे. त्याचे आई आणि वडील दोघेही शिक्षक आहेत. मोहम्मद कैफ सोशल मीडियावर कधीही वेळ व्यर्थ घालत नाही, त्याने असाच अभ्यास करावा असी इच्छा असल्याचं त्याचे वडील सांगतात.

गोवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम नाईक यांचं निधन :
  • पणजी : गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार शांताराम नाईक यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे नाईक यांची प्राणज्योत मालवली. शांताराम नाईक 73 वर्षांचे होते.

  • गोव्यातील मडगावमध्ये शनिवारी पहाटे 6.30 वाजता नाईक यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता कुंकळ्ळी येथील निवासस्थानी अंत्यसंस्कार होतील.

  • हार्ट अटॅक आल्यानंतर शांताराम नाईक यांना त्रिमूर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

  • 1967 मध्ये नाईक यांनी काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून प्रवेश केल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. 1984 मध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार राहिले होते. तर दोन वेळा त्यांनी राज्यसभेतून खासदारकी भूषवली आहे.

रोमानियाची सिमोना हालेप फ्रेंच ओपनची नवी विजेती :
  • पॅरिस : रोमानियाच्या अव्वल मानांकित सिमोना हालेपने फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात हालेपने अमेरिकेच्या स्लोआन स्टीव्हन्सचं कडवं आव्हान तीन सेट्समध्ये मोडीत काढलं.

  • हालेपने हा सामना 3-6, 6-4, 6-1 असा जिंकत कारकीर्दीतलं पहिलं ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपद पटकावलं. दोन तास तीन मिनिटे चाललेल्या या लढतीत स्टीव्हन्सने पहिला सेट जिंकत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या हालेपने आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करत पुढील दोन्ही सेट आपल्या नावावर केले.

  • हालेपची यंदाच्या वर्षातली ही दुसरी ग्रॅन्ड स्लॅम फायनल होती. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र फ्रेंच ओपनमध्ये तिने ही कसर भरुन काढताना विजेतेपदाला गवसणी घातली.

चंद्रकांत पाटील यांच्याकडे कृषी मंत्रालय :
  • मुंबई -  पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे त्यांच्याकडील कृषी व फलोत्पादन खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशी जाण्यापूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविले.

  • कृषी खात्याचा कारभार क्रमांक २चे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्रीही आहेत. मुख्यमंत्री १६ जूनला परदेश दौऱ्याहून आल्यानंतर ४ जुलैपासून नागपुरात सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विस्तारानंतर कृषी मंत्रीपद अन्य कुणाला दिले जाईल.

  • सूत्रांनी सांगितले की, अनेक महिन्यांपासून रखडलेल्या महामंडळांवरील नियुक्त्यांचा मार्गही मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या नियुक्त्यांवर शेवटचा हात फिरविला आहे. या नियुक्त्यांची यादी जाहीर करण्याचे अधिकार चंद्रकांत पाटील यांना दिले आहेत. पाटील बुधवारी मुंबईत परतल्यानंतर त्यांची घोषणा होईल, अशी शक्यता आहे.

  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी परदेश दौºयावर रवाना होण्यापूर्वी वरिष्ठ आयएएस तसेच आयपीएस अधिकाºयांच्या मोठ्या प्रमाणात बदल्यांना मान्यता दिली असून, सोमवारी त्या होतील, असेही सूत्रांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचं दोन दिवसात ३३ कोटींचं नुकसान :
  • धुळे : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं दोन दिवसात 33 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. एसटी संपाच्या दुसऱ्या दिवशी एसटीचा 18 कोटी रुपयांचा महसूल बुडाला, तर पहिल्या दिवशी 15 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.

  • दिवसभरात महाराष्ट्रातील 250 आगारातून सुमारे 20 टक्के बसच्या फेऱ्या सुटल्या. राज्यातील 25 आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तसेच 151 आगारामध्ये अंशतः वाहतूक सुरु होती

  • राज्यातील 97 आगारातून दिवसभरात एकही बसची फेरी बाहेर पडली नाही. या संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठया प्रमाणात जाणवत आहेत.

  • तुलनेने मराठवाडा आणि विदर्भामध्ये 40 टक्के वाहतूक सुरु होती. संध्याकाळी चार वाजेपर्यंत होणाऱ्या 32 हजार 148 बस फेऱ्यांपैकी सहा हजार 308 फेऱ्या सुरळीत सुरु होत्या.

  • एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख ३ मागण्या : ०१) एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
    ०२) पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी ०३) जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी

दिनविशेष :
  • महाराष्ट्र राज्य दृष्टीदिन.

महत्वाच्या घटना

  • १७६८: माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.

  • १९२४: इटलीच्या समाजवादी नेता ज्याकोमो मॅट्टेओटी यांची हत्या.

  • १९३५: अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९४४: ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.

  • १९७७: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा अ‍ॅपल-II हा संगणक बाजारात आला.

  • १९८२: पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.

  • १९९९: उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.

  • २००३: स्पिरिटरोव्हर मंगळाकडे रवाना.

जन्म

  • १९०६: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९०९ – पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)

  • १९०८: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतीनाथ चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९८३)

  • १९२४: नेत्रशल्यविशारद के. भालचंद्र यांचा जन्म.

  • १९३८: भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म.

  • १९३८: भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक वासंती एन. भाट नायक यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००९)

मृत्यू

  • १८३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञआंद्रे अ‍ॅम्पिअर यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १७७५)

  • १९०६: गुजराती लेखक समीक्षक गुलाब दासब्रोकर यांचे निधन.

  • १९५५: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचे निधन. (जन्म: १५ जून १८७८)

  • १९७६: पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक अॅडॉल्फ झुकॉर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८७३)

  • २००१: सामाजिक कार्यकर्त्या फुलवंतीबाई झोडगे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.