कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पाऊस दाखल झाला की कर्णधारांच्या डोक्यात आणि उरात धडकी भरवणारी तीन नावे म्हणजे ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’. क्रिकेट सामन्यादरम्यान पाऊस आला तर नियोजित वेळेत खेळ पूर्ण करण्याच्या उद्देशाने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी विशिष्ट षटकांमध्ये धावसंख्या गाठण्याचे लक्ष्य ठेवले जाते. यावेळी त्यांनी नक्की किती धावा कराव्यात यासाठी मागील अनेक वर्षांपासून ‘डकवर्थ-लुइस’ प्रणाली वापरली जाते.
निस्सीम क्रिकेट चाहते आणि गणिताची आवड असणाऱ्यांना आकलन होऊ न शकणाऱ्या ‘डकवर्थ-लुइस’ या जोडगोळने तयार केलेल्या प्रणालीमध्ये २०१५ साली तिसऱ्याची भर पडली ती म्हणजे स्टीव्ह स्टर्न यांची. डकवर्थ-लुइस पद्धतीत सुलभीकरण करण्यात स्टर्न यांचे योगदान लक्षात घेऊन २०१५ च्या विश्वचषकापासून ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ या सुधारित नावाने ही प्रणाली अंगीकारण्यात आली आहे. पण हे तिघेजण नक्की कोण आहेत यावर टाकलेली ही नजर..
फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस हे दोघेही सांख्यिकीतज्ज्ञ आहेत. या दोन गणितज्ञांनी क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्य आल्यास आकडेमोडीसंदर्भात काय तडजोड करता येईल यासंदर्भात काढलेला गणितीय तोडगा म्हणजे डकवर्थ-लुईस प्रणाली. १९९७ साली झिमाब्वे आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यात हा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला. तेव्हापासून आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने) ही प्रणाली वनडे आणि टी-२० सामन्यांदरम्यान पाऊस झाल्यास वापरण्यास सुरुवात केली.
मागील पाच वर्षांपासून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा पाठपुरावा करणार्या उस्मानाबादकरांचा मार्ग यंदा सुकर होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे स्थळ पाहणी पथक मंगळवारी उस्मानाबादेत दाखल होत आहे. संमेलन आयोजनासाठी सर्व पातळीवर करण्यात आलेल्या तयारीचा सविस्तर लेखाजोखा त्यांच्यासमोर सादर केला जाणार आहे.
त्यासाठी मंगळवार, 16 जुलै रोजी उस्मानाबाद शहर आणि परिसरातील विविध संस्था, संघटनांच्या उपस्थितीत पुष्पक मंगल कार्यालय येथे जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी या सर्व तयारीकरिता बुधवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकार्यांची बैठक होणार आहे.
मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी व संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे याकरिता मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेने मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता.
आगामी 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद या चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी नाशिक आणि उस्मानाबाद या दोन मागण्यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. त्यानुसार स्थळ पाहणीकरिता महामंडळाची समिती या दोन ठिकाणी भेट देणार आहे.
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यास मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. गोयल यांनी त्यांच्याविरुद्ध बजावण्यात आलेल्या लुक-आऊट नोटिशीला आव्हान दिले असून न्यायालयाने त्याबाबत केंद्र सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
नरेश गोयल यांना या घडीला परदेशात जाण्याची परवानगी देता येणार नाही, त्यांना आता परदेशात जावयाचे असल्यास त्यांना १८ हजार कोटी रुपयांची हमी द्यावी लागेल, असे न्या. सुरेश कैत यांनी स्पष्ट केले.
दुबईला जाणाऱ्या विमानातून २५ मे रोजी आपल्याला उतरविण्यात आले तेव्हा आपल्याविरुद्ध ईसीआयआर अथवा एफआयआर नोंदविण्यात आलेला नव्हता, असे सांगून गोयल यांनी त्यांच्याविरुद्ध बजावण्यात आलेल्या लुक-आऊट नोटिशीला आव्हान दिले आहे.
विमानातून आपल्याला पत्नीसह उतरविण्यात आले तेव्हा आपल्याला लुक-आऊट नोटिशीबाबत समजले, असे गोयल यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २३ ऑगस्ट रोजी होणार आहे.
भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात ३० सप्टेंबरपूर्वी बँकिंग क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण करण्याचा मार्ग अखेर खुला झाला आहे. यामुळे ज्या भारतीयांची २०१८ पासून स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये खाती आहेत त्यांच्याबाबतची माहिती भारतातील कर अधिकाऱ्यांना पाठविली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात ‘ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन’ (एईओआय) करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून तो गेल्या वर्षीपासून अंमलात आला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने स्विस अर्थमंत्रालयातील अधिकारी आणि स्विस फेडरल कर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून याबाबत लेखी उत्तर आले. भारताचा विचार करता काही माहिती पाठविणे आवश्यक आहे, असे स्विस फेडरल कर अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
बँक खात्यांबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येणारा भारत हा ७३ देशांपैकी एक देश आहे. गेल्या वर्षी एईओआयची ३६ देशांबरोबर याबाबत अंमलबजावणी झाली आहे. बँकिंग क्षेत्राबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यापूर्वी कायदेशीर आणि संसदीय पद्धतींची पूर्तता करण्यात आली आहे, असे स्विस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बँकिंग माहितीची देवाणघेवाण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्वाच्या घटना
१८९०: वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.
१९१३: कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये तापमान १३४ अंश फूट (५७ अंश सेल्सिअस) पर्यंत वाढले, जे पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड आहे.
१९२३: मुसोलिनी यांनी इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.
१९२५: अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रताची सुरुवात केली सलग ४४ वर्षे हे व्रत मृत्यूपर्यंत पाळले.
१९२५: तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना झाली.
१९४०: बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.
१९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.
१९६२: टेलस्टार-१ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.
१९७३: पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.
१९७३: बहामाज देशाला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९७८: मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.
१९७८: मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.
१९९२: मादकद्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
१९९२: आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.
१९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-२ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.
१९९५: म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.
२०००: मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.
२०००: नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.
जन्म
१९०३: साहित्यिक रा. भि. जोशी यांचा जन्म.
१९१३: कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८)
१९१४: सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते जो शस्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९२)
१९२१: स्माईली चे निर्माते हार्वे बॉल यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००१)
१९२३: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)
१९३४: पद्मभूषण विजेते जामखेड मॉडेल चे जनक डॉ. रजनीकांत आरोळे यांचा सुपे अहमदनगर येथे जन्म.
१९४०: अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस चे सभासद लॉर्ड मेघनाद देसाई यांचा जन्म.
१९४३: अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अॅश यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३)
१९४५: इंग्लिश टेनिस खेळाडू व्हर्जिनिया वेड यांचा जन्म.
१९४९: क्रिकेटपटू समालोचक सुनील गावसकर यांचा जन्म.
१९५०: पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचा जन्म.
मृत्यू
१५५९: फ्रान्सचा राजा हेन्री (दुसरा) यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५१९)
१९६९: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन. (जन्म: ३० मे १८९४)
१९७०: आईसलँडचे पंतप्रधान ब्यार्नी बेनेडिक्ट्सन यांचे निधन.
१९७१: भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८८७)
१९८९: साम्यवादी विचारवंत साहित्यिक प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचे निधन.
१९९५: गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध डॉ. रामकृष्ण विष्णू केळकर यांचे निधन.
२०००: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०९)
२००५: पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)
२०१३: भारतीय लेखक आणि शैक्षणिक गोकुलानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२२)
२०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक जोहरा सेहगल यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १९१२)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.