चालू घडामोडी - १० जानेवारी २०१८

Date : 10 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पत्रकाराऐवजी आधार प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना अटक करा - एडवर्ड स्नोडेन :
  • ‘आधार’ची माहिती ५०० रुपयांमध्ये विकली जात असल्याचे वृत्त देणाऱ्या ट्रिब्यून पत्रकारावर दाखल झालेल्या गुन्ह्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जात आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थेचा माजी हेर आणि अमेरिकेतील एनएसए म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या माहितीचा भांडाफोड करणारा गुन्हेगार एडवर्ड स्नोडेनने मोदी सरकारवर टीका केली आहे. पत्रकारांऐवजी आधार प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना अटक करावी, असे स्नोडेनने म्हटले आहे.

  • ट्रिब्यून या वृत्तपत्राने ‘आधार’ची माहिती ५०० रुपयांमध्ये विकली जाते, असे वृत्त दिले होते. ‘आधार’चा माहिती संच उघड झाल्याच्या वृत्ताने देशभरात खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी ‘युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (यूआयडीएआय) थेट ‘द ट्रिब्यून’, बातमी देणाऱ्या पत्रकार रचना खैरा यांच्यावरच गुन्हा दाखल केला होता.

  • मंगळवारी एडवर्ड स्नोडेनने या वृत्तावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. ‘आधार’ची गोपनीय माहिती उघड होत असल्याचे वृत्त देणाऱ्या पत्रकाराला पुरस्कार दिला पाहिजे. त्याची चौकशी व्हायला नको. जर सरकारला खरोखरच जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोट्यवधी भारतीयांची गोपनीयता भंग करणारे धोरण बदलावे. तुम्ही आधी यूआयडीएआयच्या अधिकाऱ्यांना अटक केली पाहिजे, असा सल्लाही त्याने सरकारला दिला.

गुरुत्वाकर्षणाचे श्रेय न्यूटनचे नाही, भाजपा मंत्र्याचा दावा, म्हणे ब्रह्मगुप्त द्वितीयची होती कामगिरी :
  • जयपूर : भाजपा सत्तेवर असलेल्या राज्यांमध्ये देशाचा इतिहास बदलण्याचे जे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत, त्यावरून सर्वत्र वाद होत असतानाच राजस्थानात विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याची तयारी सुरू आहे. भाजपा नेते व राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी इतिहासापाठेपाठ विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रम बदलण्यास सांगतानाच, गुरूत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने नव्हे, त्याच्याआधी ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी मांडला होता , असा अजब दावाही केला आहे.

  • राजस्थान विद्यापीठाच्या स्थापना दिवसनिमित्त एका कार्यक्रमामध्ये राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने मांडला असे आजपर्यंत तुम्ही शिकला आहात. तुम्हालाच काय, मलाही तेच शिकवण्यात आले. पण न्यूटनच्या हजारो वर्षे आधी ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता.

  • आपण आधुनिक आणि खºयाखुºया विज्ञानाचे धडेही द्यायला हवेत. उत्तम दर्जाच्या शालेय शिक्षणातूनच उच्च शिक्षणाचा भक्कम पाया रचला जाऊ शकतो, असे सांगताना शिक्षणमंत्री म्हणाले की, आपण ही जी माहिती दिली आहे, तीही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाद्वारे शिकवणे गरजेचे आहे. 

  • पुस्तकांत आणखी बदल करू उच्च शिक्षणातून केवळ चांगले पगाराची पॅकेज घेणारे विद्यार्थी घडत आहे. पण संस्काराचे मूल्य कमी होत आहे, असे सांगून देवनानी म्हणाले की, विद्यापीठांनी संशोधनाला प्राधान्य द्यायला हवे. यामुळे देशातील अनेक समस्यावर तोडगा निघू शकेल. त्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि आणखी काही बदल करावे लागतील.(source :lokmat)
कोरेगाव भीमा प्रकरण : पारदर्शक तपासासाठी समन्वय समिती - विश्वास नांगरे पाटील :
  • पुणे : कोरेगाव भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केली.

  • ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी नांगरे पाटील यांनी सर्व दलित संघटनांची बैठक आयोजित केली होती़ या बैठकीत सर्व संघटनांनी प्रशासन, पोलीस यांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेवर तीव्र रोष व्यक्त केला़ त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली़

  • कोरेगाव भीमा येथील घटनेबाबत दलित संघटनांशी चर्चा करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी बैठक बोलाविली होती़ या बैठकीला पोलीस अधीक्षक सुवेझ हक, उपमहापौर डॉ़ सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सर्व दलित संघटनांचे नेते उपस्थित होते़ या बैठकीत दलित नेत्यांनी प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर रोष व्यक्त केला़ त्यांनी सांगितले की, २९ डिसेंबरला वढूला घडलेल्या घटनेत अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला होता़ त्यानंतर ३० डिसेंबरला कोरेगाव ग्रामपंचायतीने १ जानेवारीला गाव बंद करण्याचा ठराव केला़ हा ठराव असंसदीय असल्याने त्याची माहिती मिळाल्यानंतरही प्रशासनाने व पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही़.

  • सोशल मिडियावर १ जानेवारीला जमायचे असे संदेश फिरत होते़ तरीही त्याकडे दुर्लक्ष केले़ १ जानेवारीला हिंदुत्ववादी कार्यकर्ते झेंडे घेऊन जमावाने निघून २ किलोमीटरपर्यंत चालत आले नगर रोडपर्यंत आले तरीही त्यांना अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही़ सणसवाडी येथे मोडतोड सुरु केल्यानंतर सुरुवातीला बघ्याची भूमिका घेतली़. (source :lokmat)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत भुवनेश्वरकुमारची सर्वोत्तम कामगिरी :
  • भारताचा द्रुतगती गोलंदाज भुवनेश्वरकुमार याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत स्वत:चे सर्वोत्तम स्थान मिळविले आहे. त्याने २२ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. नुकत्याच झालेल्या आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत त्याने सहा विकेट्स घेतल्या होत्या.

  • भुवनेश्वरकुमारने गोलंदाजीत प्रगती केली असली, तरी त्याचे सहकारी विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांची फलंदाजीत घसरण झाली आहे. या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या कसोटीत सपशेल निराशा केली.

  • फलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ याने ९४७ गुणांसह प्रथम स्थान राखले आहे. इंग्लंडच्या जो रुट याने दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. त्याच्यापाठोपाठ केन विल्यमसन हा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आफ्रिकेच्या हाशिम अमला व डीन एल्गार यांची अनुक्रमे १० व्या व १६ व्या स्थानावर घसरण झाली. अब्राहम डीव्हिलिअर्सने तेराव्या स्थानावर झेप घेतली.

  • भारताच्या हार्दिक पंडय़ाने ४९ वे स्थान मिळविले आहे. मुरली विजय, शिखर धवन व रोहित शर्मा हे अनुक्रमे ३० व्या, ३३ व्या व ४४ व्या स्थानावर आहेत. पहिली कसोटी गमावूनही भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान राखले आहे.

'ओल्ड मंक' रमचे निर्माते कपिल मोहन यांचं निधन :
  • गाझियाबाद : अस्सल मद्यप्रेमींची मैफल 'ओल्ड मंक'च्या बाटलीशिवाय रंगत नाही. गेली अनेक वर्ष मद्यप्रेमींच्या आनंदाचं कारण ठरलेल्या 'ओल्ड मंक' या रमचे निर्माते कपिल मोहन यांचं निधन झालं.

  • 6 जानेवारी रोजी त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी गाझियाबादमध्ये कपिल मोहन यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. शुक्रवारी कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा मोहन आहेत.

  • ते 'मोहन मीकिन लिमिटेड' या कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकही होते. या कंपनीतच त्यांनी 'ओल्ड मंक'सह इतर पेयं तयार केली होती. कपिल मोहन हे लष्करातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी 'ओल्ड मंक'ची निर्मिती केली.

  • जगात सर्वाधिक विकली जाणारी रम म्हणून 'ओल्ड मंक'ची ख्याती होती. 19 डिसेंबर 1954 रोजी 'ओल्ड मंक'च्या विक्रीला सुरुवात करण्यात आली होती. 2010 मध्ये कपिल मोहन यांना 'पद्मश्री'ने गौरवण्यात आलं होतं.

जपानमध्ये लिलावात मासा विकला गेला ४ कोटींना :
  • जपान : एखादा दुर्मिळ मासा सापडल्यावर त्या माशाचा लिलाव केला जातो. हा लिलाव फार फार तर हजार किंवा लाखोंच्या घरात असतो. मात्र जपानमध्ये एका माशाला तब्बल 2 कोटींची किंमत मिळाली आहे.

  • ट्युना असं या माशाचं नाव असून या माशाचा दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीला लिलाव केला जातो. प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक हा मासा विकत घेतात. 

  • जपानमध्ये एका लिलावात चक्क ४ कोटींना विकला गेलाय, इतकंच नव्हे तर याआधी त्याहून मोठी किंमत मिळाली होती.

सर्वसामान्यांसाठी खूशखबर ! ३ अथवा ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्सची सूट मिळण्याची शक्यता :
  • नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला खूश करण्यासाठी मोदी सरकार फेब्रुवारी महिन्यात सादर होणा-या अर्थसंकल्प 2018 मध्ये विशेष तरतूद करण्याची शक्यता आहे. 

  • सादर होणा-या अर्थसंकल्पात मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वर्ष 2018-19साठी आगामी अर्थसंकल्पात सरकार कर सवलत मर्यादा वाढवण्यासोबत कर स्लॅबमध्येही बदल करण्याची शक्यता आहे. 

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर सवलत मर्यादेची सध्याची 2.50 लाख रुपये ही वार्षिक मर्यादा वाढवून ती 3 किंवा 5 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयासमोर आहे. दरम्यान आयकर सवलत पाच लाख रुपयांपर्यत वाढवण्याची यापूर्वीही वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. 

दिनविशेष

महत्वाच्या घटना

  • १८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.

  • १८१०: नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्‍नीला घटस्फोट दिला.

  • १८६३: चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.

  • १८७०: मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.

  • १८७०: जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑईल कंपनीची स्थापना केली.

  • १९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.

  • १९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.

  • १९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.

  • १९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.

  • १९७२: पाकिस्तान मधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.

जन्म

  • १७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ – ब्रम्हावर्त)

  • १८९६: वास्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९६६)

  • १९००: महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)

  • १९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म.

  • १९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.

  • १९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.

  • १९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास यांचा जन्म.

  • १९५०: आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.

  • १९७४: हिंदी चित्रपट अभिनेते ह्रितिक रोषन यांचा जन्म.

मृत्य

  • १७६०: पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे यांचे निधन.

  • १७७८: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचे निधन. (जन्म: २३ मे १७०७)

  • १९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर यांचे निधन.

  • २००२: ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.