आता लवकरच देशात नागरिकांना पाण्याखाली धावणाऱ्या ट्रेनचा अनुभव घेता येणार आहे. कोलकात्यातील हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओही शेअर केला आहे.
देशातील पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार असल्याचे या व्हिडीओमधून सांगण्यात आले. तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातील पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार असल्याचे यात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कोलकात्यातील प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. या ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच लावण्यात आले आहे. तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे. नदीखालून ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे. ही ट्रेन लवकरच सुरू होणार असून हे उत्तम इंजिनिअरिंगचं प्रतिक असल्याचं पीयूष गोयल म्हणाले. ही देशासाठी अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीनीच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी आठवड्यातील पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार केली जाणार आहे. या अगोदर सर्वोच्च न्यायालयात मुस्लीम पक्षकाराच्यावतीने बाजू मांडताना अॅड.राजीव धवन यांनी याप्रकरणी आठड्यात पाच दिवस सुनावणी घेण्यास आक्षेप नोंदवला होता. मात्र, सुनावणी सुरूच ठेवण्यात आली.
आठवड्यातील पाच दिवस या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर, यावर मुस्लीम पक्षकाराच्यावतीने आक्षेप नोंदवण्यात आला व सांगण्यात आले की, जर अशाप्रकारे या सुनावणीत घाई केल्या गेली तर, ते यामध्ये आम्ही सहकार्य करू शकणार नाही.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय पीठाने याप्रकरणी शुक्रवारी जेव्हा सुनावणी सुरू केली तेव्हा, मुस्लीम पक्षकाराच्यावतीने अॅड. राजीव धवन यांनी यासंबधी आक्षेप नोंदवला होता.
शुक्रवार आणि सोमवारी नव्या आणि प्रलंबीत खटल्यात दाखल केल्या जाणाऱ्या अर्जांवर विचार केला जात असतो. मात्र, शुक्रवारी जेव्हा ‘राम लला विराजमान’च्या वतीने अॅड. के.परासन यांनी आपली अर्धवट चर्चा पुढे सुरू केली तेव्हा अॅड.धवन यांनी यावर हस्तक्षेप नोंदवला. त्यांनी म्हटले की, जर आठवड्याच्या सर्वच दिवशी याप्रकरणाची सुनावणी केली जाणार असेल तर न्यायालयाला सहकार्य करणे शक्य होणार नाही. अशाप्रकारे घाई केल्या जाऊ शकत नाही. यावर मुख्य न्यायाधींनी त्यांना, आम्ही आपल्या म्हण्याची नोंद घेतली असल्याचे सांगत पुढील सुनावणी सुरू ठेवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना आज, दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता त्यांना नियमित तपासणीसाठी आणले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दीक्षित यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान, जेटली यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
जेटली यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून अरूण जेटलींची तब्येत खराब असल्याने, त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता. शिवाय, ट्विटरवर देखील त्यांनी माहिती दिली होती की, मागील १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्री पदासाठी विचार केला जाऊ नये.
जेटलींनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, आपल्या नेतृत्वात पाच वर्षे काम करण्याचा अनुभव छान होता. या अगोदर देखील एनडीए सरकारने मला जबाबदारी दिली होती. सराकर शिवाय संघटनेत आणि विरोधी पक्ष नेत्याच्या रूपातही मला महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आता मला काही नकोय.
नवी दिल्ली : ‘एक देश-एक शिधापत्रिका’ योजना १ जून २०२० पर्यंत देशभरात पूर्णपणे लागू होईल, असे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पास्वान यांनी सांगितले. तेलंगण-आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमध्ये शिधापत्रिकांच्या आंतरराज्य जोडणीची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. याचा अर्थ तेलंगण व आंध्र प्रदेश येथे राहणारे शिधापत्रिकाधारक लोक दोन्ही राज्यात स्वस्त धान्य दुकानात खरेदी करू शकतील. तसेच महाराष्ट्र व गुजरात या राज्यातील लोक दोन्हीकडे स्वस्त धान्य दुकानातून खरेदी करू शकतील.
रामविलास पास्वान यांनी सांगितले की, आंतरराज्य शिधापत्रिका सेवा आम्ही सुरू केली आहे. हरयाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, पंजाब, राजस्थान, त्रिपुरा या राज्यांमध्ये या योजनेचे काम सुरू आहे.
अन्न खात्याचे सचिव रवीकांत यांनी सांगितले की, शिधापत्रिकांची आंतरराज्य व्यवस्था जानेवारी २०२० पर्यंतपूर्ण होईल अकरा राज्यात एकच संजाल असेल त्यात ११ राज्यातील लोक कुठूनही शिधा खरेदी करू शकतील. एक देश एक शिधापत्रिका योजना १ जून २०२० पर्यंत देशात लागू करण्याचा विचार आहे.
अन्नधान्याचा साठा कसा करणार असे विचारले असता पास्वान यांनी सांगितले की, भारतीय अन्नधान्य महामंडळाकडे भरपूर साठा आहे. त्यांना तीन महिन्यांचा साठा ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. ही गोदामे आता ऑनलाइन असून अन्नधान्याच्या वाहतुकीवर लक्ष ठेवलेले असते. आंतरराज्य शिधापत्रिका योजनेच्या अंमलबजावणीची अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी करणे आवश्यक आहे.
मुंबई : राज्यातील पूरस्थितीमुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेश निश्चितीची मुदत वाढवली आहे. विद्यार्थी जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करू शकणार आहेत.
राज्याच्या सीईटी सेलला विद्यार्थ्यांच्या इमेल द्वारे प्राप्त मागणीनंतर पूरस्थिती निर्माण झालेल्या भागांमध्ये एमबीबीएस/ बीडीएसच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपर्यंत आपल्याला मिळलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस या प्रवेशासाठी पहिल्या फेरी कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना 12 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत वाढून देण्यात आली आहे. विद्यार्थ्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊज प्रवेश निश्चित करण्याची गरज नाही. विद्यार्थी संकेतस्थळावर दिलेल्या आपल्या जवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करू शकतील असे परिपत्रकाद्वारे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय बायो डीझेल दिन
महत्वाच्या घटना
१६७५: चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.
१८१०: स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना झाली.
१८२१: मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.
१९८८: दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
१९९०: मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.
१९९९: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.
१९९९: इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर.
जन्म
१७५५: ५ वा पेशवा नारायणराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १७७३)
१८१०: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १८६१)
१८१४: नेस्ले कंपनी चे संस्थापक हेनरी नेस्ले यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १८९०)
१८५५: जयपूर – अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९४६)
१८६०: संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६)
१८७४: अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९६४)
१८८९: मोनोपोली खेळाचे निर्माते चार्ल्स डॅरो यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १९६८)
१८९४: भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री व्ही. व्ही. गिरी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९८०)
१९०२: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९८३)
१९१३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २००३)
१९३३: कोसवर्थ कंपनी चे संस्थापक किथ डकवर्थ यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २००५)
१९४३: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेट पारू शफकत राणा यांचा जन्म.
१९५६: भारताती-इंग्रजी उद्योगपती पेरीन वॉर्सी यांचा जन्म.
१९६०: भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २००१)
१९६३: भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २००१)
मृत्यू
१९५०: संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९०७)
१९८०: पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९१७)
१९८२: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १९२७)
१९८६: महावीरचक्र प्राप्त जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली. (जन्म: २७ जानेवारी १९२६)
१९९२: कीर्तिचक्र, पद्मश्री लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. (जन्म: १२ ऑगस्ट १९०६)
१९९७: कवी व नाट्यसमीक्षक नारायण पेडणेकर यांचे निधन.
१९९९: भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)
२०१२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर१९३२)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.