वॉशिंग्टन : माणसाने सूर्यावर स्वारी करण्याची कल्पना आता प्रत्यक्षात साकारणार आहे. पार्कर सोलार प्रोब हे नासाचे अंतराळयान ३१ जुलै रोजी सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. हे अंतराळयान हवाई दलाच्या विमानातून फ्लोरिडा येथे नेण्यात आले असून तिथे त्याच्या काही चाचण्या घेण्यात येत आहेत. डेल्टा आयव्ही अग्निबाणाच्या सहाय्याने पार्कर सोलार प्रोब अवकाशात प्रक्षेपित करण्यात येईल. ते सूर्याच्या अगदी जवळ जाणार आहे.
आजवर तिथपर्यंत मानवनिर्मित एकही गोष्ट पोहोचू शकलेली नाही. सूर्यातून होणारा किरणोत्सार, तसेच प्रचंड तप्त वातावरण याचा सामना करत पार्कर सोलार प्रोबला आपले शोधकार्य पार पाडावे लागणार आहे. सौरवायू, तसेच ग्रहमालेतील व पृथ्वीजवळील हवामानावर परिणाम करणारे सूर्याच्या पृष्ठभागावरील घटक यांचा अभ्यास या मोहिमेत करण्यात येईल. पार्कर सोलार प्रोब अंतराळयानाला थर्मल प्रोटेक्शन सीस्टिम किंवा हिट शिल्ड बसविण्याचेही काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. सूर्यावर प्रचंड उष्णता असून, त्यापासून हिट शिल्ड या अंतराळयानाचे संरक्षण करेल.
सात वर्षे चालणार मोहीम अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीतील प्रार्कर सोलार प्रोब प्रकल्पाचे व्यवस्थापक व शास्त्रज्ञ अँडी ड्राईजमन यांनी सांगितले की, हा प्रकल्प साकारण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी अतिशय परिश्रम घेतले आहेत. नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रातून या प्रोब सोलार प्रोबचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा कालावधी सात वर्षांचा आहे.
राबत (मोरक्को) : ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ ही इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची थेट वंशज आहे, असा दावा 'मोरक्को'च्या वर्तमानपत्रात करण्यात आला आहे.
क्वीन एलिझाबेथ ही कोणे एके काळी स्पेनवर हुकूमत गाजवणाऱ्या अरबी बादशाहांची वंशज आहे. यानुसार ती मोहम्मद पैगंबरांचीही वंशज होते, असा दावा अब्दल हामिद अल-अव यांनी लेखात केला आहे. मोरक्कोमधील 'अल औसबा' या अरबी वर्तमानपत्रात मार्च महिन्यामध्ये हा लेख छापण्यात आला होता.
एलिझाबेथ द्वितीय ही जगातील सर्वात दीर्घ वारसा लाभलेली राणी मानली जाऊ शकते. मोरक्कोचे बादशाह मोहम्मद चौथे आणि जॉर्डनचे बादशाह अब्दुल्ला द्वितीय यांची ती नातेवाईक आहे, असं लेखात म्हटलं आहे. क्वीन एलिझाबेथच्या 43 पिढ्यांचा अभ्यास करुन हे संशोधन मांडण्यात आलं आहे.
अकराव्या शतकातील सेविलेचे शासक अबु-अल-कासिम मोहम्मद बिन-अब्बाद पैगंबर मोहम्मद यांची कन्या फातिमा यांच्याशी एलिझाबेथचा थेट संबंध येतो. कासिमला 'जायदा' नावाची आणखी एक कन्या होती. अब्बासी राजवटीवर अल्मोराविद शासकाने हल्ला केला, त्यावेळी जायदा स्पेनला पळून गेली.
स्पेनला गेल्यावर जायदाने आपलं नाव बदलून 'इजाबेल' असं ठेवलं आणि रोमन कॅथलिक धर्म स्वीकारला. जायदाने स्पेनचा राजा अल्फान्सो सहावा याच्याशी लग्न केलं. त्यांना 'सांचा' हा मुलगा होता. सांचाचे वारस केम्ब्रिजचे तिसरे अर्ल रिचर्ड. ते इंग्लंडचा राजा एडवर्ड तिसरा याचे नातू. मोरक्को, एंडुलुसिया आणि युरोपीय राजांच्या शरीरात पैगंबरांचं रक्त वाहत आहे, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी एसआयएच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगडाच्या तटबंदीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात येणार असून, पुरातत्व विभाग या कामावर लक्ष ठेवून असेल. या बैठकीला देशाचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार संभाजीराजे भोसले आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सरकारच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. मात्र, आता हे काम लवकरात लवकर मार्गी लागावं अशी हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - भारतीय लष्कराची बुलेट प्रूफ जॅकेटची प्रतीक्षा अखेर संपली आहे. तब्बल 9 वर्षांनंतर संरक्षण मंत्रालयानं सोमवारी (9 एप्रिल) मेक इन इंडिया अंतर्गत 639 कोटी रुपयांचा करार केला असून याअंतर्गत लष्कराला 1.86 लाख बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध होणार आहेत. एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेज या कंपनीला हा करार मिळाला आहे.
भारतीय लष्कराची बुलेटप्रूफ जॅकेटची मागणी केंद्र सरकारने 2009 मध्येही मान्य केली होती. मात्र त्यावेळी लष्कराने आयोजित केलेल्या ट्रायलमध्ये एकही कंपनी टिकू शकली नव्हती. सहभागी झालेल्या चारपैकी फक्त एका कंपनीने पहिला राऊंड पार केला होता.
दरम्यान करारासंदर्भात सांगताना मंत्रालयानं सांगितले की, 1,86,138 बुलेटप्रूफ जॅकेट्ससाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. नवीन बुलेटप्रूफ जॅकेट जवानांना ‘360 डिग्री सुरक्षा’ पुरवतील असा दावाही करण्यात आला आहे. या जॅकेटमध्ये सुरक्षेसंबंधी सर्वोत्कृष्ट सुविधा पुरवल्या जातील, असं एसएमपीपी कंपनीने सांगितले आहे.
मुंबई : ‘लोकमत’ समूह आयोजित व यूपीएल पुरस्कृत पाचव्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा सोहळा वरळीच्या एनएससीआयमध्ये मंगळवारी सायंकाळी विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या उपस्थितीत होत आहे. विविध १४ क्षेत्रांतील गुणिजनांना हे पुरस्कार प्रदान केले जातील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य पाहुणे तर ‘यूपीएल’चे ग्लोबल सीईओ जय श्रॉफ हे विशेष अतिथी असतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल, अभिनेते अक्षयकुमार, अभिनेत्री करीना कपूर, क्रिकेट संघाचे मुख्य कोच रवी शास्री यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे. शिक्षणमहर्षी व बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान केला जाईल. वाचकांचा आॅनलाइन कौल व १५ नामांकित ज्युरींच्या मंथनातून विजेते निवडले असून, ते कोण याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.
फडणवीस-संजय राऊत यांच्यात रंगणार सामना राज्यसभेचे खासदार, शिवसेनेचे नेते आणि ज्येष्ठ संपादक संजय राऊत हे या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘रोखठोक’ मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीची तमाम मराठीजनांमध्ये असलेली उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भाजपा-शिवसेनेतील ताणलेले संबंध, शिवसेनेकडून भाजपावर होत असलेले शाब्दिक हल्ले या पार्श्वभूमीवर, संजय राऊत शब्दांची कुठली गुगली टाकतात आणि मुख्यमंत्री त्यावर किती चौकार षटकार लगावतात, याची उत्कंठा आहे.
मुंबई : देशात मानसिक आजारावर संशोधन करणारी एकमेव संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ (निमहान्स) या संस्थेने महाराष्ट्रात सॅटेलाइट केंद्र उघडण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. तर, ठाणे येथील मनोरुग्णालयाचे आधुनिकीकरण व उपचारांसाठी निमहान्स सल्लागार म्हणून काम पाहणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली.
बंगळुरू येथील निमहान्स या संस्थेला आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली. या भेटीनंतर माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, देशात मानसिक आजारासंबंधी संशोधन करणारी निमहान्स ही एकमेव संस्था आहे. मानसिक स्वास्थ्यासंबंधी वाढत असलेले आजार व जागृती विचारात घेता महाराष्ट्रातही या संस्थेचे सॅटेलाइट केंद्र सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर आज बंगळुरू येथे जाऊन केंद्राची पाहणी केली. महाराष्ट्रात या संस्थेचे सॅटेलाइट केंद्र सुरू झाल्यास महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांनाही फायदा होणार आहे. सॅटेलाइट केंद्राबाबत निमहान्सने सकारात्मकता दर्शविली असून याबाबत केंद्राकडे पाठपुरावाही करणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात मेमरी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय झाला असून या मेमरी क्लिनिकमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रशिक्षण देण्यासाठी निमहान्स संस्था पुढाकार घेणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणाचे मोड्युल तयार करण्याची तयारी या संस्थेने दर्शवली आहे.
राज्यात मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता आहे. ही कमतरता लक्षात घेता आता राज्यातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना मानसिक आजार व त्यासंबंधीचे उपचाराचे विशेष प्रशिक्षण या राष्ट्रीय केंद्राकडून देण्याबाबत आजच्या दौºयात चर्चा झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
महत्वाच्या घटना
१९१२: इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.
१९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
१९७०: पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.
जन्म
१८४३: विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९०१)
१८८०: वृत्तपत्रकार तसेच उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै१९४१)
१८९४: बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९८३)
१८९७: भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९०)
१९०७: नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार मो. ग. रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी१९९५)
१९१७: भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे २०१३)
१९२७: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८२)
१९५२: भारतीय राजकारणी नारायण राणे यांचा जन्म.
१९७२: स्काईप चे सहसंस्थापक प्रेसिंड कासासुलु यांचा जन्म.
मृत्यू
१३१७: संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले.
१६७८: रामदास स्वामींची लाडकी कन्या वेणाबाई यांचे निधन.
१८१३: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १७३६)
१९३१: लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी आणि लेखक खलील जिब्रान यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८८३)
१९३७: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १८८४ – रायपूर, मध्य प्रदेश)
१९४९: पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८९१ – सहारणपूर, उत्तर प्रदेश)
१९६५: स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १८९८)
१९९५: भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)
२०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९१८)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.