चालू घडामोडी - ०९ नोव्हेंबर २०१७

Date : 9 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय वंशाच्या रवी भल्ला यांची होबोकेनच्या महापौरपदी निवड :
  • न्यू यॉर्क- अमेरिकेतील होबोकेन शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे रवी भल्ला यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत सहा उमेदवार होते. मात्र सर्वांना मागे टाकत भल्ला यांनी बाजी मारली आहे.

  • प्रचाराच्या कालावधीमध्ये अज्ञात लोकांनी वाटलेल्या पत्रकांमध्ये भल्ला यांना दहशतवादी असे पत्रके वाटून संबोधण्यात आले होते. 

  • मागच्या आठवड्यात भल्ला यांच्या फोटोवर 'तुमच्या शहरावर दहशतवादाचा ताबा येऊ देऊ नका'! असे छापलेली पत्रके शहरातील सर्व गाड्यांवर लावण्यात आली होती.

  • ही पत्रके महापौरपदाच्या शर्यतीतील दुसरे उमेदवार माईक डिफ्युस्कोज यांच्या नावाने काढण्यात आली होती.परंतु माईक यांनी त्यामध्ये आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते.

हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाला सुरुवात, भाजप-काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढाई :
  • शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी आज मतदान होत असून मतमोजणी 18 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. हिमाचलमध्ये 49.05 लाख मतदार असून त्यामध्ये 20 हजार नवमतदारांचा समावेश आहे. 7 हजार 521 मतदार संघांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

  • मतदानाची वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर होणार आहे.

  • भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून प्रेमकुमार धूमल यांचं नाव जाहीर केलं आहे. तर काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमाचलमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संपूर्ण हिमाचलमध्ये 17,850 पोलीस आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तर केंद्रीय अर्धसैन्य दलाच्या 65 तुकड्याही इथं तैनात करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच अनेक सुरक्षा दलाचे अधिकारीही या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. (source : abpmajha)

28% जीएसटी असलेल्या 80% वस्तू स्वस्त होणार :
  • नवी दिल्ली - बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटी परिषदेचे सदस्य सुशील मोदी यांनी जीसएटीसंदर्भात मोठे विधान केले आहे. जीएसटी अंतर्गत 28 टक्के कर आकारल्या जाणा-या 80 टक्के वस्तूंवरील कर कमी केला जाणार असल्याचे सुशील मोदींनी म्हटले आहे.

  • या सर्व वस्तूंवर 18 टक्के कर आकारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुशील मोदींनी यांनी दिलेल्या माहितीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

  • यातच आगामी काळात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यात गुजरातमध्ये व्यापा-यांची संख्या जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर 28 टक्के जीएसटी आकारला जाणा-या वस्तूंवरील कर कमी केला जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.  

  • आता एकूण 227 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी आकारण्यात येतो.  याबाबत सांगताना सुशील मोदी म्हणाले की, 'गुरुवारपासून जीएसटी परिषदेच्या बैठकीला सुरुवात होत आहे. (source :lokmat)

सायनाची सिंधूवर मात, राष्टीय बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद :
  • नागपूर : राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवालनं पी व्ही सिंधूवर मात करत अजिंक्यपद पटकावलं. अतिशय रोमहर्षक झालेल्या या सामन्यात सायनानं सिंधूचं कडवं आव्हान दोन सेट्समध्येच मोडीत काढलं.

  • सायना आणि सिंधूमधील या सामन्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. यावेळी पहिल्या गेममध्ये सायनानं सिंधूवर 21-17 अशी मात केली. पण दुसऱ्या गेममध्ये सिंधूनं सायनाला कडवं आव्हान दिलं.

  • यावेळी सुरुवातील सिंधू आघाडीवर होती. पण नंतर सायनानं सिंधूला चुका करण्यास भाग पाडलं. ज्यामुळे सायनानं आपली पिछाडी भरुन काढणं सोपं गेलं. शेवटी सायनानं हा गेम 27-25नं जिंकत सामनाही आपल्या खिशात घातला.

  • सायनानं या सामन्यात सिंधूचा 21-17, 27-25 असा पराभव केला. या विजयासह सायनानं तिसऱ्यांदा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. याआधी 2006 आणि 2007 ला सायनानं विजेतेपद पटकावलं होतं. (source : abpmajha)

रघुराम राजन, गोपाल सुब्रमण्यम राज्यसभेवर :
  • नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांना आम आदमी पक्षातर्फे (आप) राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात बुधवारी आश्चर्य व्यक्त केले गेले.

  • ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ गोपाल सुब्रमण्यम यांनाही आपने उमेदवारीची आॅफर दिली आहे. याखेरीज काँग्रेसशी जवळीक असलेल्या एका प्रमुख उद्योगपतीचे नावही चर्चेमध्ये आहे.

  • आपतर्फे दिल्लीतून तीन जण राज्यसभेवर जाऊ शकतात. विधानसभेत काँग्रेस व भाजपाची काहीच ताकद नाही. त्यामुळे आपने ही नावे निश्चित केल्याचे समजते.

  • आपच्या नेत्यांपैकी आशुतोष, संजय सिंग, कुमार विश्वास यांना राज्यसभेवर न पाठवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला असल्याचे सांगण्यात येते.

  • ‘आप’ने केलेल्या उमेदवारीच्या प्रस्तावावर डॉ. राजन विचार करत असल्याचेही या वृत्तात नमूद केले गेले. मात्र रघुराम राजन व गोपाल सुब्रमण्यम यांच्यापैकी कोणाहीकडून यास दुजोरा मिळाला नाही. गोपाल सुब्रमण्यम व राजन या दोघांना मोदी यांनी दुखावले आहे. (source :lokmat)

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • धन्वंतरी दिन / कायदाविषयक सेवा दिन

महत्वाच्या घटना 

  • १९०६: आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.

  • १९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.

  • १९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.

  • १९५३: कंबोडियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६०: रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले.

  • १९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा जनस्थान पुरस्कार प्रदान.

  • २०००: उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

  • २०००: न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासो यांचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.

जन्म दिवस

  • १८६७: जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी श्रीमद राजचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९०१)

  • १८७७: इटली प्रजास्ताक चे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १९५९)

  • १८७७: सारे जहाँन से अच्छा चे पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते कवी मोहम्मद इक़्बाल यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)

  • १९०४: सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९६६)

  • १९३१: लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७)

  • १९३४: अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर१९९६- सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, यु. एस. ए.)

  • १९४४: भारतीय कोरिओग्राफर चितेश दास यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१५)

  • १९८०: अभिनेत्री व मॉडेल पायल रोहतगी यांचा जन्म.

मृत्यू

  • १९४०: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८६९)

  • १९५२: इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८७४)

  • १९६२: भारतरत्न पुरस्कार विजेते धोंडो केशव कर्वे यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १८५८)

  • १९७०: फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८९०)

  • २०००: मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते एरिक मॉर्ले यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९१८)

  • २००३: मैथिली भाषेतील लेखक व कवी विनोद बिहारी वर्मा यांचे निधन.

  • २००५: भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२०)

  • २०११: भारतीय-अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोविंद खुराना यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.