भारतीय व्यक्तीस अवकाशात पाठवण्याच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अवकाशवीरांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा भारतीय हवाई दलाने पूर्ण केला असून त्यात टेस्ट पायलट (वैमानिकां)ची निवड करण्यात आली आहे.
या सर्व उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या, रेडिओलॉजी चाचण्या, प्रयोगशाळेतील चाचण्या, वैद्यकीय चाचण्या, मानसिक चाचण्यांची पूर्तता करण्यात आल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. प्राथमिक टप्प्यात २५ जणांची निवड केली असून यातून आणखी चाळण्या लावून २-३ संभाव्य अवकाशवीरांची निवड केली जाणार आहे.
यासंदर्भात इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मोहिमांत टेस्ट पायलटचीच निवड केली जाते असा जगातील समानव मोहिमांतील अनुभव आहे. यातून निवड केलेल्या व्यक्तींना नोव्हेंबरनंतर प्रशिक्षणासाठी रशियात पाठवले जाणार आहे.
दी न्यूयॉर्क टाइम्स- भारताचे विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याआधीच त्याचा संपर्क तुटला, पहिल्या प्रयत्नात यान उतरण्यात भारताला अपयश आले असले तरी या प्रयत्नातून भारताची अभियांत्रिकी कौशल्यातील निपुणता दिसून आली आहे. गेली अनेक दशके भारत अवकाश क्षेत्रात काम करीत असून त्याला आता जागतिक आशाआकांक्षांची जोड मिळाली आहे.
चांद्रयान २ मोहीम फसल्याने राष्ट्रवादी नेते असलेल्या मोदी यांचा वरचष्मा असलेल्या भारतीय राजकारणात काय परिणाम होतात ते बघणे महत्त्वाचे आहे. मोदी यांनी राष्ट्रवादी भावनेतून भारतीय अवकाश कार्यक्रमाला जगभरात वेगळे स्थान मिळवून देण्याचा चंग बांधलेला आहे. या मोहिमातून देशाची शक्ती वाढवून नागरिकांच्या देशभक्तीला हात घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यातून भारतात अवकाश क्षेत्र लोकप्रिय असल्याचे दिसून आले. काही भारतीय शहरात चांद्रयान २ मोहिमेची प्रतीकात्मक चित्रे दर्शनी ठिकाणी लावण्यात आली होती. शाळकरी मुलांनी सोडावॉटर बाटल्यातून खेळण्यातील अग्निबाण उडवले. जुलैत भारताने चांद्रयान २ सोडले होतचे. त्याचे थेट प्रक्षेपण लाखो भारतीयांनी पाहिले होते.
दी गार्डियन- ब्रिटनमधील या वृत्तपत्राने चांद्रयान २ ही भारताची गुंतागुंतीची व महत्त्वाकांक्षी अवकाश मोहीम असल्याचे म्हटले असून चांद्रसंशोधनात जगामध्ये स्वारस्य निर्माण होत असताना भारताने ही मोहीम राबवली. जगातील वैज्ञानिकांनी चंद्रावतरणाची ही मोहीम पाहिली. हे यान दक्षिण ध्रुवावर उतरणार होते व तेथे जीवाश्मांचे संशोधन करून सौरमालेच्या पूर्वीच्या काळातील काही पुरावे गोळा करणार होते. यापुढे २०, ५० व १०० वर्षांनी कदाचित मानव चंद्रावर वस्ती करील, त्यामुळे चांद्र संशोधनात भारत मागे राहू इच्छित नाही, असे फ्रान्सच्या अवकाश संस्थेचे प्रतिनिधी मॅथ्यू वेस यांनी म्हटले आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु वि.ल.धारुरकर यांनी शनिवारी दुपारी राजीनामा दिला . धारुरकर हे कंत्राटदार व नोकरी संदर्भात काही जणांकडून लाच घेत असल्याची चित्रफित बाहेर आली होती.
एका स्थानिक वृत्तवाहिनीने याबाबत स्टींग ऑपरेशन केले होते. कुलगुरुंनी हे आरोप फेटाळले होते. या चित्रफितीत फेरफार करण्यात आले असून, हा बदनामीचा कट आहे असा आरोप त्यांनी केला होता.
संबंधित वृत्तवाहिनी आपल्या भूमिकेवर ठाम होती. काँग्रेसप्रणित एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेने धारुरकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन :
ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचं रविवारी सकाळी निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार असून, मुलगी अमेरिकेत राहते. त्यांची दुसरी मुलगी राणी जेठमलानी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ विधिज्ज्ञ आणि कायद्याचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या बॉम्बे प्रातांतील सिंध विभागात १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता. वयाच्या १७व्या वर्षी जेठमलानी यांनी एलएल.बीची पदवी घेतली आणि वकिली सुरू केली.जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रातांतील शिखरापूर येथे १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता.
वयाच्या १७व्या वर्षी जेठमलानी यांनी एलएल.बी.ची पदवी घेतली आणि वकिली सुरू केली. फाळणी होईपर्यंत जेठमलानी यांनी गावातच वकिली केली. फाळणीनंतर त्यांनी मुंबईत वकिलीला सुरूवात केली.
चार वेळा सवरेत्कृष्ट आफ्रिकन खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या कॅमेरूनच्या सॅम्युएल इटोने वयाच्या ३८व्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.
‘‘एका नव्या आव्हानासाठी मी इथेच थांबत आहे. पाठिंब्याबद्दल सर्वाचे आभार,’’ असे बार्सिलोना, इंटर मिलान आणि चेल्सीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इटोने सांगितले.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन / जागतिक शारीरिक उपचार दिन
महत्वाच्या घटना
१८३१: विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.
१८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्यातील गेंडा माळावर फाशी
१९००: अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
१९४४: दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.
१९५४: साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.
१९६२: स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.
१९६६: स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.
१९९१: मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.
२०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.
२००१: लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.
जन्म
११५७: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल ११९९)
१८३०: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.
१८४६: भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९२६)
१८४८: जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८९७)
१८८७: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९६३)
१९०१: दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्ड यांचा जन्म.
१९१८: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म.
१९२५: इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९८०)
१९२६: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २०११)
१९३३: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म.
मृत्यू
१९३३: इराकचा राजा फैसल (पहिला) यांचे निधन.
१९६०: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १९१२)
१९६५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मन स्टॉडिंगर यांचे निधन.
१९७०: मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १८९४)
१९८०: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्लर्ड लिब्बी यांचे निधन.
१९८१: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा यांचे निधन.
१९८१: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८९७)
१९८२: जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते शेख अब्दुल्ला यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०५)
१९९१: कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१३)
२०१०: कन्नड व तामिळ अभिनेता मुरली यांचे निधन. (जन्म: १९ मे १९६४)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.