'एनसीसी'मध्ये सहभागी होऊन 'सी' प्रमाणपत्र मिळविलेल्या उमेदवारांना यात लेखी परीक्षा न देता थेट तोंडी मुलाखतीला बोलाविले जाते. ही सवलत आतापर्यंत फक्त पुरुष उमेदवारांनाच मिळत असे.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) 'एअर विंग'मधून 'सी' प्रमाणपत्र मिळविलेल्या मुलींनाही आता हवाईदलाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा न देता थेट मुलाखतीला जाण्याचे दरवाजे खुले झाले आहेत.
तिन्ही सैन्यदलांमधील भरतीसाठी 'कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन' (सीडीएस) ही परीक्षा घेतली जाते. ही भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, 'स्टाफ सिलेक्शन बोर्डा'कडून घेतली जाणारी तोंडी मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी अशी तीन टप्प्यांमध्यो होते.
परंतु हवाईदलाने आता ही सवलत महिलांनाही देण्याचे ठरविल्याने 'एनसीसी'च्या 'एअर विंग'मधून 'सी' प्रमाणपत्र मिळविलेल्या मुलीही यापुढे हवाईदलातील भरतीसाठी 'स्टाफ सिलेक्शन बोर्डा'च्या तोंडी मुलाखतीसाठी थेट बोलाविल्या जातील.
वॉर वाउंडेड फाऊंडेशनच्या वतीने आर्म फोर्स मेडिकल कॉलेज (एएफएमसी) येथे आयोजित दिव्यांग सैनिकांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बिपिन रावत बोलत होते.
देशातील इतर प्रशासकीय सेवांपेक्षा लष्कर सेवा उच्च दर्जाची आहे. त्यामुळे लष्करातील सेवेकडे विशेष सेवा म्हणून पाहिले पाहिजे.
प्रशासकीय सेवेतील पदोन्नतीचे नियम लष्कर सेवेसाठी लावणे योग्य होणार नाही. त्यातून आपण स्वत:च आपला दर्जा कमी करून घेतल्या सारखे होईल, असे देशाचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले.
कार्यक्रमास फाऊंडेशनचे अध्यक्ष निवृत्त ले.जनरल विजय ओबेरॉय, सदन कमांडचे ले.जनरल पीएम हॅरिझ यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मोदी मँगोनंतर उत्तरप्रदेशात आता ‘योगी मँगो’ तयार झाला आहे. उत्तर प्रदेशातले मँगो मॅन हाजी कलीमुल्ली यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत नव्या जातीच्या आंब्याचं उत्पादन घेतलं आहे.
आंब्याचं नाव त्यांनी योगी मँगो असं ठेवलं आहे.
करेला आणि दशेरी आंब्यांच्या वैशिष्ट्यांनी बनलेला हा आंबा बारीक आणि लांब असून ही जात स्वतःच विकसित झाली असून जेव्हा लोकांनी तो पाहिला तेव्हा अनेकांनी त्याला योगी आदित्यनाथांचे नाव देण्याचा सल्ला दिला.
७४ वर्षीय कलीमुल्लाह यांची आमराई लखनौपासून ३० किमी दूर मलीहाबाद इथं आहे. आतापर्यंत त्यांनी इथं अनेक वेगवेगळ्या आंब्यांची लागवड केली आहे. कलीमुल्लाह हे देशात ‘मँगोमॅन’ नावानं ओळखले जातात.
फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इमॅन्युअल माक्रोन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
तसेच या निवडणुकील माक्रोन यांना सुमारे ८० लाख ५० हजार २४५ म्हणजेच एकूण मतदानापैकी ६१.३ टक्के मते मिळाली आहेत.
३९ वर्षीय माक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांच्यावर विजय मिळवला.
भारतीय क्रिकेट संघाला पुढील महिन्यात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बीसीसीआयने रविवारी आयोजित विशेष आमसभेमध्ये मंजुरी दिली आहे.
१ जूनपासून प्रारंभ होत असलेल्या आणि आठ संघांचा समावेश असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड सोमवारी करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.
प्रशासकांच्या समितीने दिलेल्या निर्देशानुसार आयसीसीविरुद्ध कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यात येणार नाही, असा निर्णयही आज घेण्यात आला. गतचॅम्पियन भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार असल्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे आयसीसीने स्वागत केले आहे.
आयसीसीचा अधिकारी म्हणाला, ‘‘जगभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहते केवळ दर्जेदार क्रिकेट बघण्यास इच्छुक आहेत. आता सर्व चाहते १ जूनपासून इंग्लंड व वेल्समध्ये आयोजित स्पर्धेबाबत उत्सुक आहेत.
संघ पाठविण्याचा आणि आयसीसीला नोटीस न पाठविण्याच्या सीओएच्या निर्देशांचे आमसभेने पालन केले आहे.’’
पुण्याची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणेने सांगली बुद्धिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर स्मृती आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
अंतिम फेरीत आकांक्षाने साडेआठ गुणांची कमाई करीत विजेतेपद आपल्या नावे केले. तिला रोख रक्कम ५१ हजार व चंद्राबाई आरवाडे फिरती रौप्यढाल प्रदान करण्यात आली.
मुंबईच्या विश्वा शहाला मात्र आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भारतीय वंशाच्या हिंदुजा बंधूंनी ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान मिळवला आहे.
हिंदुजा बंधूंसह ब्रिटनमधील १०० प्रमुख अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये ४० अन्य भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे.
हिंदुजा समूहाची संपत्ती १६.२ अब्ज पौंड असून मागील वर्षापेक्षा यंदा त्यांच्या संपत्तीमध्ये ३.२ अब्ज डॉलरची वाढ नोंदविण्यात आली आहे.
'द संडे टाइम्स रिच लिस्ट'ने ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. मागील वर्षी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा ब्रिटनमधील अब्जाधीशांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे 'द संडे टाइम्स रिच लिस्ट'मध्ये नमूद करण्यात आले आहे.
जागतिक दिवस
जागतिक रेडक्रॉस दिवस.
युरोप विजय दिन.
जन्म, वाढदिवस
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
वासुदेव चाफेकर : ०८ मे १८९९
अनिल उर्फ कवि अनिल (आत्माराम रावजी देशपांडे), मराठी कवी : ०८ मे १९८२
ठळक घटना
डॉ.जॉन स्टाइथ पेम्बरटनने कोका कोला प्रथम तः तयार केले : ०८ मे १८८६
महात्मा गांधींचे २१-दिवसांचे उपोषण चालू : ०८ मे १९३३
ब्रिटन व फ्रान्सला जोडणार्या इंग्लिश खाडीच्या खालून खोदलेल्या युरो टनेल या बोगद्याचे उदघाटन : ०८ मे १९९४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.