चालू घडामोडी - ०८ जुलै २०१७

Date : 8 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी-जिनपिंग यांची भेट; भारताची केली प्रशंसा :
  • सिक्कीममधील घडामोडींवरून भारत-चीन दरम्यान वाढता तणाव असताना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिगपिंग यांची शुक्रवारी अनौपचारिक भेट झाली.

  • दोघांना एकमेकांशी हस्तांदोलनही केले, शिवाय विविध मुद्द्यांवर चर्चाही केली, दोन्ही नेते जी-२० शिखर परिषदेसाठी आले आहेत.

  • ब्रिक्स सदस्य राष्ट्र प्रमुखांच्या बैठकीत मोदी यांनी ब्रिक्स सदस्य देशांना दहशतवादाचा मुकाबला करण्यास आणि जागतिक आर्थिक वृद्धीला गती देण्याकामी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

  • बैठकीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीनसह अन्य पाच देशांचे प्रमुखही उपस्थित होते. या वेळी या नेत्यांनी चीनमध्ये होणाऱ्या ९ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या तयारीवरही चर्चा केली. 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांनंतर या बैठकीचा समारोप करताना, चीनचे अध्यक्ष शी जिगपिंग यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सने केलेल्या प्रगतीबद्दल भारताची प्रशंसा केली. 

''धोनी 2019 चा विश्वचषक खेळणार'' : चंचल भट्टाचार्य
  • टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्र सिंह धोनीचा आज ३६ वा वाढदिवस असून धोनीमध्ये २०१९ च्या विश्वचषकात खेळण्याची पूर्ण क्षमता आहे, असं त्याचे बालपणीचे प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.

  • वेस्ट इंडिजविरुद्ध धोनीने खेळलेल्या संथ खेळीवरही चंचल भट्टाचार्य यांनी भाष्य केलं, याच सामन्यात टीम इंडियाला ११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

  • धोनीने या सामन्यात कारकीर्दीतीलं सर्वात संथ अर्धशतक नावावर करत ११४ चेंडूत ५४ धावा केल्या होत्या.

  • टीम इंडियाला टी-२०, वन डे आणि कसोटीमध्येही नंबर वन बनवणारा धोनी योग्य वेळी निवृत्तीचा निर्णय घेईल, असं चंचल भट्टाचार्य यांनी सांगितलं.

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी जी २० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची दशसूत्री :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतल्या जी २० शिखर परिषदेत दहशतवादाविरोधात सगळ्या देशांनी एकत्र येत लढण्याचा मुद्दा उचलून धरत एक अॅक्शन प्लानच जगासमोर ठेवला आहे.

  • जगातले काही देश दहशतवाद्यांना राजकीय हेतू साधण्यासाठी आश्रय देत आहेत, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे.

  • आयसिस, अल कायदा या दहशतवादी संघटनांप्रमाणेच पाकिस्तानल्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत आणि दहशतवाद पसरवत आहेत.

  • मिडल ईस्टमध्ये अलकायदा, दक्षिण आशियात लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हक्कानी नेटवर्क आणि नायजेरियात बोको हरम यांसारख्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत.

  • दहशतवाद ही जगापुढची मोठी समस्या आहे, दहशतवादाला पाठिंबा देण्याऱ्या देशाच्या अधिकाऱ्यांवर जी २० परिषदेत बंदी घालणे.

  • एफटीएफ प्रमाणेच शस्त्रांच्या आणि स्फोटकांच्या तस्करीवर आणि खरेदी विक्रीवर बंदी घालण्यासाठई वेपन अँड एक्स्प्लोझिव्ह अॅक्शन टास्क फोर्सची स्थापना करणे.

आयआयटी, एनआयटी प्रवेशास स्थगिती :
  • भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. उमेदवारांना देण्यात आलेल्या जादा गुणांबद्दलच्या वादामुळे यंदा घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षा (अ‍ॅडव्हान्स) २०१७ मध्ये जे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले त्यांच्या प्रवेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली आहे.

  • आयआयटी-जेईईच्या यादीतून प्रवेश देण्यावर या निर्णयामुळे परिणाम होईल, असे अर्जदारांचे वकील डी. के. देवेश म्हणाले. 

  • आयआयटी-जेईई (अ‍ॅडव्हान्स) २०१७ मध्ये पुढील आदेशापर्यंत कोणाचेही समुपदेशन करू नये अथवा प्रवेश देण्यात येऊ नये, असा आदेश न्या. दीपक मिश्रा आणि न्या. ए. एम. खानविलकर यांच्या पीठाने दिला आहे.

  • इतकेच नव्हे तर शुक्रवारपासून देशातील सर्व उच्च न्यायालयांवर याबाबतच्या यचिकेची सुनावणी घेण्यावरही पीठाने र्निबध घातले आहेत.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • गोपाल नीलकंठ दांडेकर (गो. नी. दांडेकर), मराठी कादंबरीकार, चरित्रकार : ०८ जुलै १९१६

  • वी. के. आर. वी. राव (विजेंद्र कस्तुरीरंग वरदराज राव), भारतीय अर्थशास्त्रज्ञ : ०८ जुलै १९०८

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण : ०८ जुलै २००१

  • सर जोसेफ वॉर्ड, न्यू झीलँडचा १७वा पंतप्रधान : ०८ जुलै १९३०

ठळक घटना

  • वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले : ०८ जुलै १४९७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.