जुलै महिन्यात २२ तारखेला दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी प्रक्षेपण झालेले चांद्रयान-२ तासाभरातच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. ‘जीएसएलव्ही मार्क ३’ प्रक्षेपकाच्या सहाय्याने दुसऱ्या प्रयत्नात चांद्रयान २ अवकाशात झेपावले. उड्डाण यशस्वी झाल्यानंतर मजल दरमजल करत ४८ दिवसानंतर आज चांद्रयान २ हे प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास सज्ज झाले आहे. या मोहिमेदरम्यान एक अभिमानास्पद गोष्टही घडली, ती म्हणजे या मोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या दोन महिला वैज्ञानिकांनी केले. भारताच्या इतिहासात एखाद्या महिलेने अंतराळ मोहिमेसारख्या अतिमहत्वाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुथय्या वनिथा आणि रितू करिधल अशी चांद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला वैज्ञानिकांची नावे आहेत. यांपैकी वनिथा यांनी चांद्रयान-२ चे प्रोजेक्ट डायरेक्टर तर करिधल यांनी मिशन डायरेक्टर म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी आहे. यापूर्वी भारतात इस्रोच्या अतिमहत्वाच्या मोहिमेत अशा प्रकारे महिला शक्तीचा कधीही सहभाग नव्हता, त्यामुळेच पहिलांद्याच घडलेल्या या घटनेने भारतीय महिलांनी आपली हुशारी आणि ताकद जगाला दाखवून दिली आहे. झी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
मुथय्या वनिथा या इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहेत त्यांचा या मोहिमेत अंत्यत महत्वाचा वाटा आहे. चांद्रयान-२च्या यशाला आणि अपयशाला त्याच कारणीभूत ठरणार होत्या. मात्र, अपेक्षेप्रमाणे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्वाची ठरणारी चांद्रयान-२ मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी करुन दाखवला आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
हरारे : झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष व माजी पंतप्रधान रॉबर्ट मुगाबे यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. १९८० ते २०१७ असा प्रदीर्घ काळ त्यांनी देशाला आपल्या वज्रमुठीत दडपून ठेवले होते.
श्वेतवर्णीय अल्पसंख्याकांच्या राजवटीतून ऱ्होडेशियाला मुक्त करणारा नेता अशी त्यांची ओळख होती पण नंतर त्यांनी स्वत: सत्ता राबवताना दडपशाही व भीती पेरण्याचे राजकारण केले. नंतर त्यांच्याच एकनिष्ठ लष्करशहांनी त्यांची पदावरून हकालपट्टी केली होती.
झिम्बाब्वेचे संस्थापक व माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचे निधन झाले असून ही देशासाठी वेदनादायी घटना आहे असे इमर्सन मनागावा यांनी सांगितले.
मुगाबे हे ऱ्होडेशियाच्या स्वातंत्र्यलढय़ाचे प्रतीक होते व आफ्रिकेत त्यांची तीच सकारात्मक ओळख होती. त्यांनी देश व आफ्रिका खंडासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, असे इमर्सन यांनी सांगितले.
नोव्हेंबर २०१७ मध्ये मुगाबे यांना अपमानास्पद पद्धतीने सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. पण नंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. सिंगापूर येथे काही महिने त्यांना अज्ञात आजारामुळे रुग्णालयात ठेवण्यात आले होते पण बहुदा त्यांना पुरस्थ ग्रंथीचा कर्करोग होता.
संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या “चांद्रयान-२” मोहिमेकडे लागले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या ऐतिहासिक घटनेच्या सर्व घडामोडींसंदर्भात अपडेट्स देत आहे. असे असतानाच दुसरीकडे इस्त्रो गगनयान या महत्वकांशी मोहिमेच्या तयारीला लागले आहेत. गगनयान मोहिमेद्वारे भारत पहिल्यांदा स्वबळावर आपला अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे.
२०२२ पर्यंत किंवा त्याआधी ही मोहिम यशस्वी करण्याचे लक्ष्य इस्त्रोने समोर ठेवले आहे. यासाठी वैमानिकांना प्रशिक्षण देणारे ‘ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर’ही बंगळुरुमध्ये सुरु करणार आहे. या मोहिमेमध्ये अंतराळात जाण्यासाठी अंतराळवीर निवडण्याची जबाबदारी भारतीय वायू सेनेकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकीकडे इस्त्रो “चांद्रयान-२” चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणार असतानाच वायू सेनेनेही गगनयान मोहिमेसाठी काही वैमानिकांची अंतराळात जाण्यासाठी निवड करत या मोहिमेच्या प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा केला आहे.
डिसेंबर २०२० मध्ये मानविरहीत यान अवकाशात पाठवल्यानंतर जुलै २०२१ च्या आसपास मानवरहित यान गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळात पाठवण्यात येईल. या मोहिमेमध्ये अंतराळात पाठवण्यासाठी वायू सेनेने वैमानिकांच्या निवडीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळात जाणासाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या तुकडीतील वैमानिकांच्या निवडीसंदर्भातील माहिती वायू सेनेने आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन दिली आहे.
‘भारतीय वायू सेनेने इन्सटीट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसीनमध्ये भारतीय अंतराळवीरांची निवड करण्याचा पहिला टप्पा पार पाडला आहे. निवड करण्यात आलेल्या वैमानिकांना कठोर अशा शारीरिक व्यायाम चाचण्या, प्रयोगशाळेतील चाचण्या, त्यांच्या हृदयाची तपासणी, वैद्यकीय तपासणी आणि वेगवेगळ्या स्तरांवरील मानसिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत,’ असे वायू सेनेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटच्या सुरुवातीलच #MissionGaganyaan हा हॅशटॅग वापरल्याने निवड कशासाठी आहे हे स्पष्ट होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोमधून संपूर्ण भारतीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवणारं भाषणं केलं. मी आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. निराश होऊ नका. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोगच, असे मोदी म्हणाले. या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक असल्याचे मोदी म्हणाले.
भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोमधील उपस्थित प्रत्येक शास्त्रज्ञांची भेट घेत हात मिळवला. म्हणाले, ‘ तुमच्या सारखे ज्येष्ठ लोक इथे असल्याने याचा मोठा फायदा होतो.’ यावेळी इस्त्रो प्रमुख के. सिवन यांना आपल्या भावना अनावर झाल्या. दे आपलं दुखं लपवू शकले नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी थेट पंतप्रधान नरेद्र मोदी यांना मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिवन यांचे सांत्वन केलं.
मुंबई : देशात २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत राज्यात आढळलेल्या पंधरा वर्षांपेक्षा अधिक वयाच्या १ कोटी ६३ लाख निरक्षरांपैकी ६ वर्षांमध्ये १७ लाख ९२ हजार नवसाक्षरांना औपचारिक शिक्षणाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. ‘आॅल इंडिया सर्व्हे आॅफ हाय्यर एज्युकेशन’च्या ताज्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
साक्षर भारत योजनेत राज्यातील १४ लाख ४ हजार जणांना साक्षर करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. १० जिल्ह्यांतील ७३१५ ग्रामपंचायतीत ही योजना राबविण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक गावात प्रेरक व आठ ते दहा निरक्षरांमागे एका स्वयंसेवक नेमण्यात आले. अक्षरओळख, वाचन, लेखन कौशल्याची ‘नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ ओपन स्कुलिंग हाय्यर अॅण्ड टेक्निकल एज्युकेशन’च्या वतीने परीक्षा घेण्यात आली. १६ मुलभूत विषयांमध्ये साक्षरता चाचणी घेण्यात आली.
राज्यात १ लाख ६ हजार ५४६ प्राथमिक शाळा असून ग्रामीण भागातील शाळांची टक्केवारी ७७. ६ टक्के आहे. शाळांचे प्रमाण दर १० किलोमीटरमागे ३.२ टक्के आहे. खासगी, विनाअनुदानित शाळांचे प्रमाण २१ टक्के आहे. प्राथमिक शाळांमध्ये मुलींचे प्रमाण ४६.८ टक्के आहे. शिक्षकांची संख्या ५ लाख ४ हजार असून २९ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे प्रमाण आहे.
महत्वाच्या घटना
१६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
१८१४: दुसर्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.
१८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
१९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
१९३१: दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९५३: निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.
१९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
१९७९: दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.
२००५: इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका.
जन्म
१७९१: आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)
१८०७: न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान हेन्री सिवेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १८७९)
१८२२: प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १८७४)
१८४९: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९२७)
१९१२: ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९६)
१९१५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री डॉ. महेश्वर नियोग यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९५)
१९२५: तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री भानुमती रामकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २००५)
१९३३: मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका तसेच सेवा [Self Employed Women’s Association] या संस्थेच्या संस्थापिका इला भट्ट यांचा जन्म.
१९३४: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर २०१२)
१९३४: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक बी. आर. इशारा यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१२)
१९४०: लेखक व संपादक चंद्रकांत खोत यांचा जन्म.
१९६७: भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी आलोक शर्मा यांचा जन्म.
मृत्यू
१६०१: विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर यांचे निधन.
१८०९: थायलंडचा राजा बुद्ध योद्फा चुलालोके यांचे निधन.
१९५३: मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)
१९७९: कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९०२)
१९९१: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचे निधन. (जन्म: ५ जून १९०८)
१९९४: इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचे निधन. (जन्म: २० जून १९१५)
१९९७: हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५१)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.