बांगलादेशात पळून गेलेल्या व नो मँन्स लँडमध्ये आश्रय घेणा-या रोहिंग्यांना माघारी येता येऊ नये यासाठी म्यानमार सीमेजवळील प्रदेशात भूसुरुंग पेरत असल्याचा आरोप बांगलादेशने केला आहे.
राँयटर्सला दिलेल्या माहितीत ढाकास्थित सूत्रांनी माहिती दिली असून राखिन प्रांताच्या मंत्र्यांनी भूसुरुंग पेरण्यासारखी कृत्ये आम्ही करत नाही असे सांगत हा आरोप फेटाळला आहे.
बांगलादेश व म्यानमारच्यामध्ये असणा-या तारेच्या कुंपणाला समांतर भूसुरुंग पेरण्याचे काम काही गट करत असल्याचे व त्याचे पुरावे व छायाचित्रे असल्याची माहिती बांगलादेशातील सूत्रांनी दिली आहे.
बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलांनी सोमवारी व मंगळवारी म्यानमारच्या दिशेने प्रत्येकी दोन भूसुरुंगाच्या स्फोटांचे आवाज ऐकल्याचे स्पष्ट केले आहे.
एका रोहिंग्याने स्फोटाच्या स्थळी जाऊन केलेल्या चित्रिकरणात दहा सेंमी व्यासाची धातूची चकती दिसून आली, त्यावरुनही म्यानमार सीमावर्ती प्रदेशात भूसुरुंग पेरत असल्याचे स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
मीराबाईने स्रॅचमध्ये ८५ किलो तसेच क्लीन अॅन्ड जर्क प्रकारात १०४ किलो असे एकूण १८९ किलो वजन उचलून ४८ किलो वजन गटात सुवर्ण पदकाची कमाई केली असून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजनदेखील पुढील वर्षी गोल्ड कोस्ट येथेच होणार आहे.
सेखोम मीराबाई चानू आणि संजीता चानू यांनी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल सिनियर भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये आपापल्या गटात सुवर्ण पदके जिंकून पुढील वर्षी आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पात्रता मिळविली आहे. दरम्यान तिने स्रॅच प्रकारात नवा राष्ट्रकुल विक्रम देखील नोंदविला.
संजीताने महिलांच्या ५३ किलो वजन गटात स्रॅचमध्ये 85 तसेच क्लन अॅन्ड जर्कमध्ये ११० असे एकूण १९५ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले.
केडीएमसी क्षेत्रातील विकासकामांचे आधीच तीनतेरा वाजले असताना आता जीएसटीबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या परित्रकामुळेही येथील विकासकामांवर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे.
२२ आॅगस्टपर्यंत ज्या विकासकामांचे कार्यादेश दिलेले नाहीत, त्या कामांच्या फेरनिविदा काढा, असे परिपत्रक सरकारने काढले.
यामुळे विकासकामांना लागणारा बे्रक पाहता शिवसेना गटनेता रमेश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सोपस्कार करून मंजूर झालेल्या विकासकामांना मान्यता द्यावी, अशी विनंती केली आहे.
केंद्र सरकारने १ जुलैपासून सीएसटी लागू केला असून त्यावर राज्य सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना २२ आॅगस्टला परित्रक जारी केली आहेत.
मात्र हे करत असताना सरकारने महापालिकांच्या अडचणी लक्षात घेतल्या नसल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधले आहे.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये केलेल्या कथित घोटाळ्याची चौकशी राज्याच्या लोकायुक्तांमार्फत करण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंजुरी दिली आहे.
मेहता हे मंत्री असल्याने नियमानुसार त्यांच्या चौकशीसाठी राज्यपालांची मंजुरी गरजेची ठरते. तशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली होती.
ताडदेव एमपी मिल कम्पाऊंडच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गतच्या गृहनिर्माण प्रकल्पात मेहतांनी घोटाळे केल्याचा आरोप करीत पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी आरोपांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्याचे आश्वासन दिले होते.
भारतात स्मार्ट फोन वापरता सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह असणारे भारतीय दिवसातील चार तास मोबाईल अॅपच्या वापरावर खर्च करतात.
मोबाईलमधील अॅपच्या वापरावर खर्च होणारे चार तास म्हणजे सर्वसामान्य लोक करत असलेल्या आठ तासांच्या ड्युटीच्या निम्मा वेळ आहे.
भारतात अनेक नोकरीच्या ठिकाणी आठ तासांची शिफ्ट असते. अॅप्लिकेशनचं विश्लेषण करणारी संस्था अॅप अॅनीच्या मे २०१७ मधील अभ्यासानुसार, अॅन्ड्रॉइड फोनमधील अॅपवर जास्त वेळ घालविणाऱ्यांच्या संख्येत भारत देश टॉप पाचमध्ये होता.
भारतात एन्ड्रॉइड अॅपवर सगळ्यात जास्त सक्रिय असणारी वीस टक्के लोक असून विशेष म्हणजे भारतात मोबाईल अॅपचा जास्त वापर न करणारे युजर्सही दिवसातील दीड तास मोबाईलच्या वापरावर खर्च करतात.
साऊथ कोरीया, मेक्सिको, ब्राझील आणि जपाननंतर भारताचा क्रमांक लागतो, साऊथ कोरीया, मेक्सिको, ब्राझील आणि जपानमधील मोबाईल अॅपचा सर्वात जास्त वापर करणारे युजर्स दिवसातील पाच तास अॅप्सच्या वापरावर खर्च करतात.
विद्यापीठातील काही संशोधक हा मेडिकल कॅमेरा निर्माण करण्याच्या कामी गुंतले असून हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होणार आहे.
जगभरातील असंख्य रुग्णांसाठी उपकारक व किफायतशीर ठरेल अशा मेडिकल कॅमेराच्या निर्मितीचे काम लंडन येथील विद्यापीठात सुरू आहे.
विशेष म्हणजे एक भारतीय संशोधक ही निर्मिती करणाऱ्या गटाचे प्रमुख आहेत, केव ढालिवाल असे या संशोधकाचे नाव असून ते एडनबर्ग विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
या कॅमेराच्या निर्मितीनंतर डॉक्टरांना स्कॅन किंवा एक्स-रेसारख्या महागड्या चाचण्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही, असा दावा केला जात असून तसेच कॅमेरा बहुपयोगी ठरेल, यात शंका नाही.
जागतिक दिवस
जन्म /वाढदिवस
इला भट, मॅगसेसे पुरस्कार विजेत्या, भारतीय समाजसेविका ‘सेवा’ या संस्थेच्या संस्थापिका : ०७ सप्टेंबर १९३३
चंद्रकांत खोत, लघुनियतकालिकांच्या इतिहासातील एक महत्वाचे कवी, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक : ०७ सप्टेंबर १९४०
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक : ०७ सप्टेंबर १९५३
गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु : ०७ सप्टेंबर १५५२
ठळक घटना
लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली : ०७ सप्टेंबर १९९८
इजिप्तमध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका : ०७ सप्टेंबर २००५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.