मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती व वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षांसाठीच्या महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. त्यात २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य असेल. इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी लागणारी वीज निवासी दराने आकारली जाईल.
इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावरील वाहने दळणवळण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवित आहेत. या वाहनांमुळे पेट्रोलियम पदार्थांवरील अवलंबित्व कमी होण्यासह कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे. केंद्र सरकारने २०३० पर्यंत ‘इलेक्ट्रिक व्हेईकल नेशनह्ण घडविण्याचा निर्धार केला असून त्या पावलांवर पाऊल टाकत आता राज्याने आपले धोरण आखले आहे.
या धोरणानुसार राज्यात नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या पाच लाखापर्यंत वाढविण्यासह इलेक्ट्रिक वाहने, सुटे भाग, बॅटरी, चार्जिंगची उपकरणे यांचे उत्पादन आणि सुट्या भागांचे एकत्रिकरण उपक्रम या सर्वांसाठी मोठी गुंतवणूक आकर्षित केली जाईल. या उत्पादकांना प्रोत्साहनेही देण्यात येतील. इलेक्ट्रिक वाहने आधारित संशोधन आणि विकास केंद्र, नवनिर्मित केंद्र तसेच सेंटर आॅफ एक्सलेन्स स्थापन करण्यासाठी प्रोत्साहनाचाही या धोरणामध्ये समावेश आहे.
दुचाकी, तीन चाकी, कार आणि बसेससाठी विद्युत वाहन सार्वजनिक जलद चार्जिंग केंद्रांच्या उपकरणे,यंत्रांमध्ये गुंतवणुकीच्या २५ टक्के भांडवली अनुदान पहिल्या २५० चार्जिंग केंद्रांना (प्रती चार्जिंग स्टेशन १० लाख रुपये इतकी कमाल मर्यादा) देण्यात येईल.
राज्यात नोंदणी झालेल्या पहिल्या एक लाख इलेक्ट्रिक वाहनांसाठी (दुचाकी वाहने ७० हजार, तीन चाकी वाहने २० हजार आणि चार चाकी वाहने १० हजार) खासगी वाहतूक आणि वैयक्तिक खरेदीदारांना पाच वर्षांच्या धोरणाच्या वैधतेच्या कालावधीत अंतिम वापरकर्ता (एंड युजर) अनुदान मिळेल. यामध्ये त्यांना वाहनांच्या मूळ किंमतीवर १५ टक्के अनुदान (दुचाकीसाठी ५ हजार रुपये, तीन चाकी वाहनांसाठी १२ हजार रुपये, कारसाठी १ लाख रुपये याप्रमाणे कमाल मर्यादेत) तीन महिन्यात खरेदीदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल अग्निसुरक्षा व अन्य सुरक्षततेच्या अधीन राहून संबंधित नियोजन प्राधिकरणाच्या प्रचलित नियम, कायद्यातील तरतुदीनुसार पेट्रोल पंपाच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे करण्याची मुभा असेल.(source :Lokmat)
मुंबई : उदयपूरस्थित १४ वर्षीय गौरवी सिंघवी या जलतरणपटूने जुहू बीचपासून ते गेटवे ऑफ इंडिया हे ४६ किलोमीटर समुद्रातील अंतर पोहून पार केले. मंगळवारी पहाटे ३.३0 वाजता तिने पोहायला सुरुवात केल्यानंतर गेटवेला ती दुपारी १.३२ वाजता पोहोचली. हे ४६ किलोमीटरचे अंतर १0 तासांत यशस्वीरीत्या तिने पार करत विक्रम प्रस्थापित केला. जुहू ते गेटवे हे अंतर आजवर कोणत्याही जलतरणपटूने पोहून पार केलेले नाही. गेटवे ऑफ इंडियाला गौरवीचे आगमन झाल्यावर उपस्थितांनी तिचे अभिनंदन करून तिला प्रोत्साहन दिले.
यावेळी गेटवे ऑफ इंडियाला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थित राहून तिचे स्वागत केले. तर, या विक्रमात आई-वडील, आजी, प्रशिक्षक यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे गौरवीने सांगितले.
अभिमान वाटतो - पर्यटनमंत्री जयकुमार रावल - या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, देशातील खुल्या समुद्रातील सर्वांत जास्त अंतर गौरवीने पार केले आहे. हा जागतिक विक्रम म्हणायला हरकत नाही. तिने हा विक्रम १0 तासांत केला आहे.
राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांतर्फे तिच्या अभिनंदनासाठी आलो होतो, हे त्यांनी आवर्जून नमूद केले. आपल्या देशातल्या शालेय मुलीने विक्रम प्रस्थापित केल्याचा अभिमान असल्याचेही ते या वेळी म्हणाले.(source :Lokmat)
नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यूआयडीएआयने प्लास्टिकने तयार झालेले स्मार्ट आधार कार्ड न वापरण्याचं आवाहन केलं आहे. असे आधार कार्ड अनेकदा काम करणं बंद करतात, असं यूआयडीएआयने म्हटलं आहे.
प्लास्टिकने तयार झालेल्या स्मार्ट कार्डमध्ये बग असल्याचं यूआयडीएआयने म्हटलं आहे. या कार्डची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे QR code खराब होतो, ज्यामुळे हे कार्ड स्कॅन केलं जाऊ शकत नाही, असं यूआयडीएआयने सांगितलं आहे.
या आधार कार्डमधून वैयक्तिक माहिती चोरी होण्याचा धोका आहे. त्यामुळे याचा वापर टाळावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. आधार लेटर किंवा कात्रण किंवा साध्या पेपरवर या आधारचं डाऊनलोडेड व्हर्जन योग्य असल्याचं यूआयडीएआयने सांगितलं आहे. एम-आधारच्या बाबतीतही हाच सल्ला देण्यात आला आहे.
प्लास्टिक आधारची प्रिंट काढण्यासाठी 50 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात. त्यामुळे हा देखील तोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. आधार स्मार्ट कार्डची काहीही गरज नसल्याचं यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी म्हटलं आहे.(source :abpmajha)
मुंबई : राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देणारी मॅग्नेटिक महाराष्ट्र ही परिषद १८ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी उद्योग क्षेत्रांशी संबंधित धोरणांची घोषणा करीत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले.
अवकाश व संरक्षण क्षेत्रात १ लाख रोजगारनिर्मिती, तर काथ्या धोरणाद्वारे ५० हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. फिनटेक धोरण ३०० स्टार्ट अप उद्योगांचे दालन उघडणार आहे. या शिवाय, विदर्भ, मराठवाडा या कापूस उत्पादक भागांत रोजगार आणि उद्योगांना चालना देण्यासाठी रेडीमेड गारमेंट आणि मुंबईसह राज्याच्या अन्य भागांत जेम्स अँड ज्वेलरीच्या उत्पादनास चालना देण्यासाठीच्या धोरणासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्याच्या सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीसाठी लॉजिस्टिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी एकात्मिक लॉजिस्टिक पार्क धोरणास मान्यता देण्यात आली. राज्यात २५ बहुविध लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत.
राज्याचे वस्त्रोद्योग धोरण मंजूर झाले असून, त्या अंतर्गत येत्या ५ वर्षांत राज्यात ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन १० लाख नवे रोजगार अपेक्षित आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती व वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ५ वर्षांसाठीच्या महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेइकल धोरणास मंजुरी देण्यात आली. त्यात २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, १ लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य असेल.
मोठी गुंतवणूक अपेक्षित मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून मोठी औद्योगिक गुंतवणूक राज्य सरकारला अपेक्षित असून, त्याकरिता उद्योगांना आकर्षित करण्यासाठी आज मंजूर झालेली धोरणे अत्यंत मोलाची ठरतील.(source :Lokmat)
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या शेअर बाजारात काल (मंगळवार) झालेल्या अभूतपूर्व पडझडीचा फटका जगातील दिग्गज उद्योजकांनाही बसला आहे. वॉरेन बफे यांना एका दिवसात ५.३ अरब डॉलर अर्थात सुमारे ३४० अब्ज रुपयांचे नुकसान झालं. वॉरेन बफे हे फोर्ब्सच्या रिअल टाइम रॅकिंगमधले तिसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जातात. त्यांनाही अमेरिकेतील शेअर बाजारात झालेल्या उलथापालथीचा मोठा फटका बसला.
तर फेसबुकचा सीइओ मार्क झुकरबर्ग याला दिवसभरात ३.६ अब्ज डॉलर्सचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. ३.६ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २३० अब्ज रुपयांचे नुकसान झालं आहे. फेसबुकचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरल्याचा फटका मार्क झुकरबर्गला बसला आहे.
भारतीय शेअर बाजारालाही फटका - दुसरीकडे, भारतीय बाजारपेठेतही काल मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. काल दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी घसरला होता. पण दिवस अखेर ही घसरण जरा सावरली. काल सकाळी 1200 अंकांनी झालेली घसरण दिवसअखेर 561 अंकांवर, तर निफ्टीची घसरण 168 अंकांवर थांबली.
अमेरिकन बाजारपेठेत झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिकेची अवस्था नाजूक असताना फेडरल बँकेनं व्याजदर शून्य टक्क्यांवर आणले होते. मात्र आता अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्यामुळे व्याजदर 1 टक्का करण्यात आले, पण ते आणखी दोन टक्क्यांनी वाढून 3 टक्क्यांपर्यंत व्याजदर जाऊ शकतात, असं फेडरल बँकेनं सूचित केलं आहे. त्यामुळे काल, अमेरिकन बाजारानं आपटी खाल्ली. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला.(source :abpmajha)
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलला वस्तू व सेवा करामध्ये (जीएसटी) समाविष्ट करण्यास राज्य सरकारे तयार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.
जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून देशात सुरू झाली असली, तरी रिअल इस्टेट, कच्चे तेल, जेट इंधन, नैसर्गिक वायू, डिझेल आणि पेट्रोल यांना मात्र जीएसटीबाहेरच ठेवण्यात आले आहे. या वस्तू व सेवांवर केंद्रीय उत्पादन शुल्क आणि व्हॅटसारखे कर सुरूच आहेत. अलीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्यामुळे या दोन्ही इंधनांना जीएसटीत आणण्याची मागणी जोरकसपणे पुढे आली आहे.
या पार्श्वभूमीवर जेटली यांनी सांगितले की, आतापर्यंत तरी बहुतांश राज्ये या वस्तू व सेवांना जीएसटीमध्ये आणण्याच्यासाठी अनुकूल नाहीत.
तथापि, मला खात्री आहे की, जीएसटीचा अनुभव जसा वाढत जाईल, तशी स्थिती बदलेल. नैसर्गिक वायू व रिअल इस्टेट त्यानंतर काही काळाने पेट्रोल, डिझेल आणि शक्यतो अल्कोहोलही जीएसटीमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
ते असेही म्हणाले, सर्व प्रकारच्या कर सवलती रद्द केल्यानंतरच कंपनी कर २५ टक्क्यांवर आणला जाऊ शकतो. सवलती तत्काळ रद्द करणे मात्र योग्य होणार नाही. कारण काही उद्योगांनी सवलतींच्या आधारावरच आपले प्रकल्प उभारलेले असू शकतात. सवलती अचानक रद्द केल्यास हे उद्योग अडचणीत येतील.
नवी दिल्ली : मोबाइल फोनचा नंबर न बदलता कंपनी ज्याप्रमाणे बदलता (पोर्टेबिलिटी) येते, त्याप्रमाणे यापुढे तुमचे रेशन कार्डहीदेशातील कोणत्याही शिधावाटप दुकानांत चालू शकेल. त्यासाठी एका राज्यातून वा शहरातून दुसरीकडे गेल्यावर आधीचे कार्ड रद्द करून नव्या ठिकाणी नवे कार्ड काढण्याची गरज भासणार नाही. हे शक्य करण्यासाठी सरकार सार्वजनिक वितरणप्रणाली एकीकृत व्यवस्थेवर (आयएम-पीडीएस) सध्या काम करीत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक व तेलंगणासह काही राज्यांत ही पद्धत अंशत: लागू आहे.
अन्न व सार्वजनिक पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या माहितीनुसार आयएम-पीडीएस नावाची ही योजना २0१८-२0१९ आणि २0१९-२0२0 या काळात लागू होईल व त्यासाठी १२७ कोटी रुपयांचा खर्च होईल. देशव्यापी पोर्टेबिलिटीशिवाय अतिरिक्त डुप्लिकेट रेशन कार्ड रद्द करण्याचेही काम त्याखाली केले जाईल.
याअन्वये सार्वजनिक वितरणप्रणाली राज्यांच्या पोर्टल्सला जोडण्याबरोबरच रेशन कार्डचे व्यवस्थापन, वितरण, पुरवठा व रेशन दुकानांच्या स्वयंचलनाचेही काम केले जाईल. याशिवाय पीडीएससाठी वेब आणि मोबाइल अँप्लिकेशनदेखील तयार केले जाईल.
पासवान लोकसभेत म्हणाले की, महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये रेशन कार्डची पोर्टेबिलिटी लागू केली गेली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणामध्ये ही व्यवस्था अंशत: उपलब्ध आहे.
कुठेही घ्या रेशन तुमच्याकडे महाराष्ट्रातील रेशन कार्ड असेल आणि तुमची दिल्ली व अन्य राज्यात राहावयास गेल्यास तेच कार्ड तेथील दुकानांमध्ये चालेल. म्हणजे असलेल्या कार्डावरच तुम्हाला रेशन मिळू शकेल. त्यासाठी येथील कार्ड रद्द करून, नव्या ठिकाणी पुन्हा कार्ड काढण्याची गरज भासणार नाही.
महत्वाच्या घटना
१८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.
१९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्याची अंगठी.
१९२०: बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
१९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.
१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९७४: ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
१९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
१९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान.
२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
जन्म
१६९३: रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.
१८०४: डिरे अँड कंपनीचे संस्थापक जॉन डिरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८८६)
१८१२: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८७०)
१८७३: आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल१९१२)
१९०६: रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८४)
१९३४: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)
१९३८: कम्युनिस्ट नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.
मृत्यू
१३३३: निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.
१९३८: अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८६८)
१९९९: जॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.