नवी दिल्ली : उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्ती अशा अनेक उपमा ज्यांना कमी पडतील अशा माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं दु:खद निधन झालं. रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री त्यांचं पार्थिव दिल्लीतील निवासस्थानी आणण्यात आलं.
बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 12 ते 3 पर्यंत भाजपच्या केंद्रीय कार्यालयात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता लोदी रोडच्या विद्यूत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र खातं सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या होत्या. 2014 ते 2019 या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मोदींच्या परराष्ट्र धोरणांमध्ये स्वराज यांचा कायमच महत्वाचा वाटा राहीला. सुषमा स्वराज यांच्या जाण्याने भाजपचं तर मोठं नुकसान झालं आहेच. पण राजकारणातील एक अत्यंत हुशार आणि प्रभावी राजकारणी या देशानं सुषमा स्वराज यांच्या रुपानं गमावला आहे.
सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तसेच भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री अशीदेखील त्यांची ओळख आहे. स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.
नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री 9 वाजण्याचा सुमारास स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या, बेशुद्धावस्थेत त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारतीय जनता पक्षाला मीडिया फ्रेंडली बनवण्यात सुषमा स्वराज यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यानंतर सोशल मीडिया भारतात अॅक्टिव्ह झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह करणे, पक्षाचा आणि त्यांच्याकडे असणाऱ्या परराष्ट्र खात्याचा कारभारही त्यांनी सोशल मीडियाद्वारे लोकांसमोर मांडला. त्या स्वतः सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह होत्या.
जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अडल्या-नडलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वराज यांनी नेहमीच मदत केली आहे. कोणत्याही व्यक्तीने एक ट्वीट करुन आपली अडचण मांडावी आणि स्वराज यांनी त्यांची अडचण सोडवली, याची शेकडो उदाहरणे आहेत. त्या स्वतः ट्विटरवर खूप अॅक्टिव्ह होत्या. आज सायंकाळी 7 वाजता स्वराज यांनी ट्वीट करुन जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. हे त्यांचं शेवटचं ट्वीट ठरलं आहे.
इस्लामाबाद : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कलम 370 रद्द करण्याच्या प्रस्तावावर राज्यसभेत केलेलं भाषण चांगलच गाजलं. या भाषणाचे पडसाद थेट पाकिस्तानात उमटल्याचे आता पाहायला मिळत आहेत. इस्लामाबादेत जागोजागी संजय राऊत यांचे पोस्टर्स लागले आहेत.
संजय राऊत यांनी राज्यसभेत विधेयकाच्या चर्चेत काल (05 ऑगस्ट) जम्मू-काश्मीर खऱ्या अर्थानं भारतात घेतलं, पुढे पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानही घेऊ, असं विधान केलं होतं. राऊत यांच्या या विधानाचा इस्लामाबादेत पोस्टर्स लावून निषेध नोंदवण्यात आला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भाषणाची दखल इस्लामाबादलाही घ्यावी लागली आहे.
संजय राऊतांनी त्यांच्या भाषणात केलेल्या विधानाचे पोस्टर्स इस्लामाबादमधील रस्त्या-रस्त्यांवर झळकत आहेत. हे पोस्टर्स पाहून पाकिस्तानी नागरिक संतापले आहेत. त्यांनी हे पोस्टर्स काढायला सुरुवात केली आहे.
चिखलदरा : गेल्या १८ दिवसांपासून चिखलदरा पर्यटनस्थळावर सूर्याचे दर्शन झाले नाही. दिवसभर दाट धुके, कधी, तर क्षणात धो-धो कोसळणारा पाऊस या विलोभनीय दृश्यासाठी राज्यभरातील हजारो पर्यटक येथे हजेरी लावत असताना पावसाळी वातावरणामुळे कपडे वाळत नसल्याची नवीन समस्या समोर आली आहे.
चिखलदरा पर्यटनस्थळावर १९ जुलैपासून संततधार पाऊस होत आहे. तालुक्याने हंगामात अतिवृष्टीही अनुभवली. तूर्तास संततधार पाऊस नसला तरी दाट धुके व ढगाळ वातावरणामुळे पर्यटकांसह स्थानिकांना सूर्यदर्शन झालेले नाही.
या १८ दिवसांमध्ये २२ व २३ जुलै रोजी पावसाची नोंद नसली तरी ढगाळ वातावरणामुळे सूर्य दिसलाच नाही मान्सून चांगलाच बरसल्याने संपूर्ण मेळघाटातील नदी -नाले ओसंडून वाहू लागले आहेत. याच पावसामुळे अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा, शहानूर, सपन, पूर्णा प्रकल्पातील जलसाठा वाढला आहे.
सेनादलाच्या संघात अनेक निष्णात प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळेच कामगिरीत सुधारणा झाली आहे. आता भारताकडून खेळायचे माझे स्वप्न आहे, असे गुजरात फॉर्च्युनजायंट्सचा अष्टपैलू कबड्डीपटू जी. बी. मोरेने सांगितले.
गुरुनाथ बाबूराव मोरे हा कोल्हापूरच्या लाकूडवाडी गावचा. बालपणीपासून जोपासलेले सैन्यदलात सामील होण्याचे त्याचे स्वप्न २०१२मध्ये १९व्या वर्षी साकारले. इथेच त्याच्या नावाने ‘जी. बी. मोरे’ असे लघुरूप धारण केले. शेतकरी कुटुंबातल्या गुरुनाथची २०१६ मध्ये प्रो कबड्डी लीगकरिता पुणेरी पलटण संघाकडून निवड झाली. पुण्याकडून दोन हंगामांमध्ये प्रतिनिधित्व केल्यानंतर यंदाच्या हंगामापासून तो गुजरात फॉच्र्युनजायंट्सचे प्रतिनिधित्व करीत आहे.
प्रो कबड्डीतील कारकीर्द सुरू झाल्यापासून गुरुनाथचे आयुष्यच पालटले. याबाबत तो म्हणाला, ‘‘पहिल्यांदा प्रो कबड्डी खेळून माझ्या गावी परतलो, तेव्हा सर्वत्र माझे फलक पाहून स्वत:चा हेवा वाटला. अगदी कोल्हापूरच्या मुख्य हमरस्त्यावरही माझे फलक पाहायला मिळाले. मी कोल्हापूरमधील प्रथितयश व्यक्तिमत्त्व झाल्याची जाणीव मला झाली. चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा या तालुक्यांमधील गावांमधील अनेक शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक आणि खासगी कार्यक्रमांना सन्मानाने निमंत्रणे येऊ लागली आहेत.’’
महत्वाच्या घटना
१७८९: अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली.
१९४२: दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
१९४७: मुंबई महानगरपालिकेने बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
१९४७: थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
१९८१: सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले.
१९८५: जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चीकी मुकाई यांची निवड केली गेली.
१९८७: अमेरिका ते सोव्हिएत संघ पोहून पार करणारे लिन कॉक्स हे पहिले व्यक्ती बनले.
१९९०: गल्फ युद्ध साठी पहिले अमेरिकन सैनिक सौदी अरेबियात पोहोचले.
१९९१: जमिनीवरुन हवेत मारा करणार्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्यांदा यशस्वी चाचणी झाली.
१९९७: चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिट्टोरिओ डी सिका हा सन्मान जाहीर.
१९९८: अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
२०००: ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
जन्म
१८७१: जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५१)
१८७६: पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९१७)
१९१२: हृदयरोगतज्ञ केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्म.
१९२५: पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म.
१९३६: दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते डॉ. आनंद कर्वे यांचा जन्म.
१९४८: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा जन्म.
१९६६: विकिपीडियाचे सह-संस्थापक जिमी वेल्स यांचा जन्म.
मृत्यू
१९३४: जॅक्वार्ड लूम चे शोधक जोसेफ मॅरी जाकॉर्ड यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १७५२)
१८४८: स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १७७९)
१९४१: रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन. (जन्म: ७ मे १८६१)
१९७४: भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.