‘वंदे मातरम्’ या शब्दात मोठी ऊर्जा आहे. वंदे मातरम् न म्हणण्याची भूमिका मुस्लीम समुदायाची नाही, परंतु काही बोटावर मोजण्याइतपत समाजकंटक धर्माच्या आड येऊन जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करतात, असे मत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
येथे विजय वाघमारे लिखित ‘सिमी: दी फर्स्ट कनव्हिक्शन इन इंडिया’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी खडसे यांनी भारतात जन्म घेऊन संपूर्ण जीवन भारतातच व्यतीत करणाऱ्यांना वंदे मातरम् म्हणायला काय हरकत आहे, असा प्रश्न उपस्थित केला.
आपण पहिल्यांदा जळगावमध्ये निघालेल्या राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या मोर्चात सिमी या देशद्रोही संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
या वेळी आ. चंद्रकांत सोनवणे, राजुमामा भोळे, पुण्याच्या अभिनव प्रकाशनचे प्रतिनिधी समीर दरेकर, अॅड. केतन ढाके, विष्णू भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव पाटील, सिमी खटला चालविणारे अॅड. के. डी. पाटील आदी उपस्थित होते.
स्विस बँकेत आपला काळा पैसा ठेवून निवांत बसलेल्या सगळ्याचींच झोप उडवणारी बातमी समोर आली असून स्विस बँकेत ज्यांचं अकाऊंट आहे आणि ज्यांनी आपला काळा पैसा या खात्यांमध्ये जमा केला आहे ती सगळी माहिती भारत सरकारला देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
स्वित्झर्लंड सरकारशी झालेल्या ऑटोमॅटिक सूचना आदान-प्रदान करारामुळे स्विस बँकेत पैसा जमा केलेल्या भारतीय व्यक्तींच्या खात्याची गोपनीय माहिती आता केंद्र सरकारला मिळू शकणार आहे.
या करारामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणणार हे निश्चित आहे कारण या खात्यांसंदर्भातली माहिती सातत्यानं स्वित्झर्लंड सरकार भारताकडे पाठवणार आहे.
भारतासोबत झालेल्या आर्थिक खात्यांच्या माहितीसंदर्भातल्या आदान-प्रदान करारामुळे हे स्पष्ट होणार आहे, स्वित्झर्लंड सरकारनं प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत यासंदर्भातला विस्तृत अहवाल मांडण्यात आला आहे.
काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचे ताशेरे झाडत चक्क त्यांच्या ‘नमो’ या जनतेनं प्रेमानं दिलेल्या नावाची व्याख्याच बदलली आहे.
NAMO म्हणजे ‘No Agriculture Mal-governance Only’ असा ट्विट करत अभिषेक मनु सिंघवी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
भाजप सरकार सूडाचं राजकारण करतं आहे, तसंच देशात असहिष्णुता कशी वाढीला लागेल याची पुरेपूर काळजी घेतं आहे; अशी टीका सिंघवी यांनी केली आहे.
देशातल्या असहिष्णुतेमुळे भाजप नेतृत्त्वावरून लोकांचा विश्वास उडत चालला आहे. सीबीआयतर्फे विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या घरी आणि मालमत्तेवर छापेमारी करायची ही चाल सरकार जाणीवपूर्वक खेळतं आहे.
कर्नाटकचे उर्जा मंत्री डी.के. शिवकुमार यांच्याशी संबंधित ६४ जागा आणि संपत्तीवर सीबीआयनं छापेमारी केली होती, गुजरातच्या ४४ आमदारांना बंगळुरूमधील ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं तिथेही सीबीआयनं छापेमारी केली असून डी.के. शिवकुमार यांनीच या सगळ्या नेत्यांना रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं.
ब्लू व्हेल चॅलेंज या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली असली, तरी तसे करणे शक्य नाही, असे मत इंटरनेट तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र विधानसभा व संसदेतही या गेमवर बंदी घालण्याची व तो संकेतस्थळावरून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती.
पण हा गेम मोबाइल किंवा संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतो त्यामुळे त्यावर बंदी घालणे शक्य नाही, असे ‘सेंटर ऑफ इंटरनेट अँड सोसायटी’ या संस्थेचे उद्भव तिवारी यांनी सांगितले.
या गेमसाठी कुठले एक संकेतस्थळ नसल्यामुळे सगळ्या इंटरनेटवरच बंदी घातली तर हा गेम रोखता येईल पण ते अशक्य आहे, या गेमचा प्लेस्टोअरवर किंवा संकेतस्थळांवर शोध घेतला, तो सापडत नाही, त्यासाठी त्याचे निर्माते संभाव्य वापरकर्त्यांशी संपर्क साधतात.
अॅनिमेटेड व्हेल मासा अडथळे पार करीत जातो, असा एक मुलांचा गेम आहे. दुसरा ब्लू व्हेल चॅलेंज गेम हा आताच्या नकारात्मक गेमला पर्याय म्हणून तयार करण्यात आला आहे, त्यात प्रेरणात्मक कार्यात सहभागास उत्तेजन दिले जाते.
त्यांत सहभागकर्त्यांना तुमचे जीवन अमूल्य आहे, असा संदेश दिला जातो. घातक असलेला ब्लू व्हेल गेम ५० दिवसांच्या आव्हानांचा असून तो रशियात तयार झाला. त्यात १३० जणांनी रशियात प्राण गमावले.
टेलिकॉम जगतात रिलायन्स जिओने प्रवेश केल्यापासून दिग्गज कंपन्यांचे धाबे दणाणल्याचे दिसते, जिओला आव्हान देण्यासाठी त्यांनी दिलेल्या स्कीमप्रमाणे किंवा त्यापेक्षाही कमी दरात डेटा व कॉलिंगचे विविध प्लॅन्स सादर करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे.
आता या युद्धात एअरटेलनेही उडी घेतली असून त्यांनी आपल्या ४ जी ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर सादर केली असून कंपनीने प्रीपेड ग्राहकांसाठी ३९९ रूपयांचा एक नवा प्लॅन आणला आहे. यामध्ये ८४ दिवसांत ८४ जीबी डेटाबरोबर मोफत कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.
रिलायन्स जिओतर्फे ३०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये केवळ ५६ दिवसांत रोज १ जीबी इतका डेटा 4जी स्पीडने वापरता येणार असून याशिवाय जिओने अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा दिली आहे.
एअरटेल वेबसाइटनुसार ही ऑफर केवळ ४ जी फोन आणि ४ जी सिम असलेल्या ग्राहकांसाठीच आहे, त्याचबरोबर कंपनी २४४ रूपयांत ७० दिवसांपर्यंत दररोज १ जीबी डेटा देत आहे. त्याचबरोबर या अंतर्गत मोफत कॉलिंगचीही सुविधा आहे.
जागतिक दिवस
स्वातंत्र्य दिन : कोट दि आयव्होर.
मुक्ती दिन : टर्क्स व कैकोस द्वीप.
जन्म, वाढदिवस
जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक : ०७ ऑगस्ट १९६६
एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ : ०७ ऑगस्ट १९२५
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता : ०७ ऑगस्ट १९४१
रेड अडेर, अमेरिकेचा अग्निशमनतज्ञ : ०७ ऑगस्ट २००४
ठळक घटना
व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले : ०७ ऑगस्ट १९७६
मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली : ०७ ऑगस्ट १९४७
सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध : ०७ ऑगस्ट १९९१
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.