चालू घडामोडी - ०६ सप्टेंबर २०१७

Date : 6 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी-जीनपिंग यांचा पुनरावृत्ती टाळण्यावर भर :
  • चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करताना संबंध रुळावर आणण्याबाबत इच्छा व्यक्त केली असून डोकलाम वाद मागे सारत भारत- चीनने मंगळवारी संबंध पूर्ववत करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याला सहमती दर्शविली.
  • सिक्कीममधील डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर उभे ठाकल्यानंतर भारत आणि चीनचे संबंध कधी नव्हे तेवढे ताणले गेले होते.

  • डोकलामसारख्या वादाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन देशांच्या सैनिकांदरम्यान सहकार्य बळकट करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यालाही या नेत्यांनी बैठकीत सहमती दर्शविली असे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.

  • द्विपक्षीय संबंधांबाबत आमची चर्चा फलदायी ठरली आहे असे ट्विट मोदी यांनी या बैठकीनंतर केले असून ही बैठक रचनात्मक ठरली असून संबंध सुधारण्याच्या दिशेने दोन्ही देश पुढे वाटचाल करण्याच्या बाजूने आहेत.

  • डोकलाममध्ये दोन्ही देशांचे जवान आमने-सामने उभे ठाकल्यानंतर ७३ दिवस तणावाचे वातावरण असताना राजनैतिक पातळीवरील प्रयत्न वाद संपुष्टात आणण्यासाठी कामी आले.

नेहरु युवा केंद्र संघटनमधून 'नेहरु' शब्द वगळण्यात यावा असा प्रस्ताव :
  • नेहरु युवा केंद्र संघटनमधून 'नेहरु' शब्द वगळण्यात यावा असा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पाठवण्यात येणार असून स्पोर्ट्स आणि यूथ अफेअर्स मंत्रालयाने यासंबंधी प्रस्ताव तयार केला आहे.

  • संस्थेचं नाव बदलून नॅशनल युवा केंद्र संघटन करण्यात यावं अशी मागणी आहे लवकरच हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळासमोर सादर केला जाईल.

  • देशातील तरुणांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काम करणारी संस्था नेहरु युवा केंद्र संघटनमधून 'नेहरु' शब्द वगळण्यात यावा असा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. 

  • राजीव गांधी पंतप्रधान असता या संस्थेची स्थापना करण्यात आली असून या संस्थेचं नाव बदलून नॅशनल युवा केंद्र संघटन करण्यात यावं अशी मागणी आहे असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

  • १९७२ रोजी जेव्हा देशात स्वातंत्र्याची २५ वर्ष पुर्ण झाल्याचा आनंद साजरा केला जात होता, तेव्हा नेहरु युवा केंद्र योजना सुरु करण्यात आली होती.

  • १९८६ - ८७ राजीव गांधी पंतप्रधान असताना ३११ जिल्ह्यांमध्ये विस्तार करत या योजनेला एका स्वायत्त संस्थेचं रुप देण्यात आलं असून सुरुवातील ४२ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली होती.

भारतीय लष्करी अकादमीचे नवे प्रमुख संजय कुमार झा :
  • १३ डिसेंबर १९८० रोजी १७ व्या शीख रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली असून ३६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली.

  • भारतीय लष्करी अकादमीचे (आयएमए) ४८ वे प्रमुख (कमांडंट) म्हणून लेफ्टनंट जनरल संजय कुमार झा यांनी सूत्रे हाती घेतली.

  • ले.जनरल झा हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि 'आयएमए'चे माजी विद्यार्थी असून उत्कृष्ट कामगिरी व सवेबद्दल झा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

  • राष्ट्रीय रायफल्स बटॅलियन, आसाम रायफल्स आणि ईशान्येकडील माउंटन विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

संयुक्त राष्ट्र सचिव म्यानमारमधील वांशिक तणाव तात्काळ संपवा : अँटोनियो ग्युटर्स
  • म्यानमारच्या राखिन प्रांतात सुरु असलेल्या वांशिक तणाव व दंगली, जाळपोळीच्या सत्रामुळे गेल्या ११ दिवसांमध्ये १ लाख २५ हजार लोकांनी म्यानमारची सीमा ओलांडून बांगलादेशात प्रवेश केला आहे.

  • म्यानमारमध्ये सुरु असलेला वांशिक तणाव आणि रोहिंग्यावर होणारा अत्याचाक तात्काळ थांबवा अशी मागणी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणिस अँटोनियो ग्युटर्स यांनी केली आहे.

  • वांशिक तणावाचे पडसाद युनायटेड किंग्डमच्या हाऊस आँफ काँमन्समध्येही उमटले असून मजूर पक्षाच्या सदस्य यास्मिन कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्री मार्क फिल्ड यांना म्यानमारमधील वंशच्छेदाचा तुम्ही निषेध करणार का असा प्रश्न विचारला.

  • रोहिंग्या महिलांवर बलात्कार आणि हत्येचे सत्र सुरु असल्याचे सांगत अजूनही आंतरराष्ट्रीय समुदाय गप्प का असाही प्रश्न त्यांनी हाऊस आँफ काँमन्समध्ये केला.

  • शँडो फाँरिन मिनिस्टर लिझ मँक्लेन्स यांनी या तणावात लाखाहून अधिक निष्पाप रोहिंग्या पुरुष, महिला, मुलांना विस्थापित व्हावे लागले असून त्यांना छावण्यांमध्ये राहावे लागत असल्याचे सांगितले.

मोदी मुख्यमंत्री असताना मदत नाकारणारे नितीश कुमार :
  • २०१७ रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हादेखील बिहारमध्ये पूर आल्यानंतर पाच कोटींचा चेक पाठवण्यात आला होता मात्र नितीश कुमार यांनी चेक घेण्यास नकार देत पुन्हा पाठवला होता. 

  • बिहारमधील पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी गुजरात सरकारकडून देण्यात येणारी मदत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्विकारली आहे अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.

  • नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नितीश कुमार यांनी मदत नाकारली होतीयावेळी पंतप्रधान मोदींनी ५०० कोटींची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

  • बिहारमध्ये पुराने थैमान घातल्यामुळे गुजरात सरकारने पाच कोटींचा मदतीचा चेक दिला आहे, जो नितीश कुमार यांनी स्विकारला आहे.

  • महत्वाचं म्हणजे जेव्हा २०१० रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हादेखील बिहारमध्ये पूर आल्यानंतर पाच कोटींचा चेक पाठवण्यात आला होता मात्र नितीश कुमार यांनी चेक घेण्यास नकार देत पुन्हा पाठवला होता.

आरबीआयकडे भरपाईची मागणी नोटाबंदीमुळे ५७७ कोटींचे नुकसान :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला रात्री जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती.

  • त्यामुळे देशभरात ‘चलनकल्लोळ’ झाला. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला झालेले फायदे आणि तोटे सांगण्याची सरकारचे प्रतिनिधी आणि विरोधकांमध्ये चढाओढ सुरू झाली.

  • ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी लागणारे स्वदेशी आणि आयात केलेल्या कागदाचे हे नुकसान आहे तसेच या नोटांसाठी वापरण्यात आलेली शाही आणि अन्य सामग्रीच्या किंमतीचाही या नुकसानीच्या रकमेत समावेश आहे.

  • त्यात अर्थतज्ज्ञांनीही आपापली मते नोंदवून नोटाबंदीचे लाभ आणि तोटे सांगितले. 

  • नोटाबंदीच्या निर्णयाचे फायदे आणि तोटे सांगण्याची सरकार-विरोधक तसेच अर्थतज्ज्ञांमध्ये स्पर्धा सुरू असून दुसरीकडे नोटांची छपाई करणाऱ्या सरकारी मुद्रणालयांनी आपल्याला नोटाबंदीमुळे सुमारे ५७७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • -

जन्म /वाढदिवस

  • देवांग गांधी, भारतीय क्रिकेट खेळाडू : ०६ सप्टेंबर १९७१

  • यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता : ०६ सप्टेंबर १९२९

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • जे. जी. नवले, नामवंत क्रिकेटपटू व भारतीय संघाचे कसोटीतील पहिले यष्टिरक्षक : ०६ सप्टेंबर १९७९

  • लुसियानो पाव्हारॉटी, इटालियन ऑपेरा गायक : ०६ सप्टेंबर २००७

ठळक घटना

  • स्वाझीलँडला स्वातंत्र्य : ०६ सप्टेंबर १९६८

  • मुंबईचे पूरक बंदर म्हणून न्हावाशेवा बंदरास सरकारने मंजुरी दिली : ०६ सप्टेंबर १९८०

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.