चालू घडामोडी - ०६ ऑक्टोबर २०१७

Date : 6 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर ‘या’ ठिकाणी तयार होतंय :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशासह परदेशात अनेक चाहते आहेत, त्यांची बोलण्याची स्टाईल, कपड्यांची नेहमीच चर्चा होत असून त्यांचा ठराविक असा चाहता वर्ग आहे, या चाहत्यांना मोदींविरोधात कोणी अपशब्द काढल्याचेही आवडत नाही.

  • त्यांना मोदी भक्त असेही काही जण संबोधतात, ही बाब आता शब्दशः खरी ठरणार आहे कारण मोदींना देवाप्रमाणे मानणाऱ्या एक व्यक्तीने त्यांचे मंदीर बनवण्याची घोषणा केली आहे.

  • उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारले जाणार असून यासाठी ५ एकर जमीनही संपादित करण्यात आली आहे, येथे मोदींची १०० फूटी मुर्ती उभारली जाणार आहे.

  • एका निवृत्त अभियंत्याने मोदींचे हे मंदिर उभारण्याची घोषणा केली असून त्यांने म्हटले आहे की, मोदींची लोकप्रियता पाहता त्यांनी हे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

  • मोदी हे असे एकमेव राजकीय व्यक्ती नाहीत ज्यांचे मंदिर उभारण्यात येत आहे, देशात असे आणकी राजकीय पुढारी आहेत ज्यांची मंदिरे उभारली गेली आहेत.

  • यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तेलंगण राज्यातील मल्लिअल येथे सोनिया गांधींचे मंदिर उभारण्यात आले आहे, त्याचबरोबर कुटुंबातील अन्य सदस्य जसे राजीव गांधी, राहुल गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमाही लावण्यात आल्या आहेत.

ब्रिटीश लेखक काझुओ इशिगोरो यांना साहित्यातील नोबेल जाहीर :
  • यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार ब्रिटीश लेखक काझुओ इशिगोरो यांना जाहीर झाला असून ‘नॉवेल्स ऑफ ग्रेट इमोशनल फोर्स’ या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

  • या पुरस्कारासाठी मार्गारेट अॅटवूड, नूगी वा थिओंगो आणि हरुकी मुराकामी हे लेखकही शर्यतीत होते मात्र, नोबेलवर अखेर इशिगोरो यांचे नाव कोरले गेले.

  • जगाशी जोडल्या गेलेल्या भ्रामक भावनांचा उलगडा त्यांनी आपल्या ‘नॉवेल्स ऑफ ग्रेट इमोशनल फोर्स’ या पुस्तकातून केल्याचे स्वीडिश अॅकेडमीने सांगितले आहे.

  • इशिगोरो (वय ६४) यांचा जन्म जपानमध्ये झाला असून ते पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंबिय युकेमध्ये स्थलांतरित झाले असून इशिगोरो यांनी लिहीलेले ‘द रिमेन्स ऑफ दि डे’ (१९८९) या प्रसिद्ध कादंबरीवर एक सिनेमाही येऊन गेला आहे.

  • यापूर्वी तीन टप्पात नोबेल पुरस्कार जहीर झाले यात जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल डब्लू. यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाला.

  • गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी रेनर वेईस, बॅरी बॅरीश, कीप थॉर्न या संशोधकांना नोबेल विभागून देण्यात आला. तसेच जॅक्स डबोके, ओकाईम फ्रँक, मायकल हेंडरसन या तिघांनाही रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर झाले.

सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबांनी पहिल्या स्थानी :
  • ‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध मासिकाने नुकतीच २०१७ सालच्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली असून सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबांनी यांनी India Rich List २०१७ यादीतील अग्रस्थान कायम राखले आहे.

  • त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा ३८०० कोटी डॉलर्सवर पोहोचला असून गेल्या वर्षभरात नोटबंदी आणि जीएसटी यासारख्या निर्णयांमुळे अनेक उद्योगांना घरघर लागली असताना मुकेश यांची संपत्ती ६७ टक्क्यांनी वाढली आहे.

  • मुकेश अंबानी यांच्यापाठोपाठ ‘विप्रो’च्या अझीम प्रेमजी यांनी India Rich List २०१७ यादीत दुसरे स्थान पटकावले आहे, त्यांच्याकडे एकूण १९०० कोटी डॉलर्सची संपत्ती आहे.

  • सन फार्माच्या दिलीप संघवी यांची दुसऱ्या स्थानावरून थेट नवव्या क्रमाकांवर घसरण झाली आहे, त्यांच्याकडे सध्या १२१० कोटी डॉलर्स इतकी संपत्ती असल्याचे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे.

  • यावेळी ‘फोर्ब्स’ने केलेली टिप्पणी महत्त्वाची म्हणावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आर्थिक प्रयोगांचा भारतीय अब्जाधीशांना विशेष फरक पडलेला दिसत नाही, असे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे.

वर्ल्ड बँक - भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ स्वाभाविक :
  • भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ ही स्वाभाविक असून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्यामुळे दिसणारे हे तात्पुरते परिणाम आहेत, येत्या काही महिन्यांमध्ये ही संपूर्ण मरगळ झटकून भारतीय अर्थव्यवस्था नवी उभारी घेईल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

  • वस्तू आणि सेवा कर लागू केल्याने भारतात अनेक सकारात्मक बदल होतील असेही जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी सांगितले असून जीएसटी लागू केल्यानंतरच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा आलेख खालावल्याचे दिसून आले.

  • याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका, येत्या काळात हा आलेख नक्कीच उंचावेल असा विश्वास किम यांनी व्यक्त केला आहे अर्थव्यवस्थेच्या अधोगतीवरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर सातत्याने टीका होते आहे.

  • अशात वर्ल्ड बँकेतर्फे करण्यात आलेले वक्तव्य निश्चितच आशादायी आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील व्यापाराला चालना मिळावी यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. 

  • केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ आपल्या भेटीसाठी पुढील आठवड्यात येत असल्याची माहितीही किम यांनी दिली.

जागतिक स्तरावरचा ‘अॅना पोलित्स्काया’ गौरी लंकेश यांना पुरस्कार :
  • अॅना पोलित्स्काया या एक निर्भीड पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार मिळवणाऱ्या गौरी लंकेश या पहिल्याच भारतीय पत्रकार ठरल्या असून ‘हिंदुस्थान टाइम्स’ने यासंदर्भातले वृत्त दिले.

  • कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांना त्यांच्या मृत्यूनंतर जगातील मानाचा समजला जाणारा अॅना पोलित्स्काया हा पुरस्कार जाहीर झाला असून मागील महिन्यात ५ सप्टेंबरला गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. शोध पत्रकारितेमधील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.

  • जे पत्रकार लढतात, भूमिका मांडतात त्यावर ठाम राहतात आणि निर्भीड लेखन करतात, त्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया गौरी लंकेश यांची बहिण कविता यांनी थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशनशी बोलताना दिली.

  • गौरी लंकेश या ‘लंकेश पत्रिका’च्या संपादिका होत्या, तसेच विविध वर्तमानपत्रांमध्येही त्या स्तंभलेखनही करत असून त्यांच्या हत्येची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबाने केली.

  • गौरी लंकेश यांची हत्या ज्या पद्धतीने झाली ते अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र त्यांचे मारेकरी पकडले जातील आणि त्यांना कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा गौरी लंकेश यांच्या कुटुंबाने व्यक्त केली.

१५ दशलक्ष डॉलर्स खर्च पोटला पॅलेसचे होणार नूतनीकरण :
  • तिबेटची राजधानी असलेल्या ल्हासामधील पोटला पॅलेसचे नूतनीकरण करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला असून त्यासाठी १० दशलक्ष युआन (१५ दशलक्ष डॉलर्स) इतका खर्च येणार आहे.

  • चारही बाजूने हिमालयाची पर्वतराजी आणि मध्यभागी हा पॅलेस असे दृश्य खूपच मनोहारी असून हा पॅलेस बांधण्यास ४५ वर्षे लागली आणि १६९४ साली तो बांधून पूर्ण झाला.

  • भूकंपाचा परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने याची बांधणी झाली आहे, या पॅलेसच्या काही भागाला देण्यात आलेला सोन्याचा मुलामा खराब झाला आहे. त्यामुळे नूतनीकरणात तेही काम केले जाणार आहे. 

  • चीनच्या आक्रमणानंतर १९५९ मध्ये दलाई लामा तेनझिन ग्यात्सो भारतात आले त्यांच्यासह अनेक तिबेटी लोकांनीही भारतात येऊन हिमाचल प्रदेशातील धर्मस्थळ येथे वास्तव्य केले.

  • चीनच्या आक्रमणाला तिबेटी लोकांनी विरोध केला, तेव्हा या वास्तूचे काहीसे नुकसान झाले होते, या १३ मजली पॅलेसमध्ये १ हजार खोल्या, १० हजार मंदिरे आणि दोन लाख मूर्ती आहेत.

  • चीन सरकारने १९६४ साली या पॅलेसचे रूपांतर म्युझियममध्ये केले असून देशी व परदेशी पर्यटकांचे हे आकर्षणाचे ठिकाण आहे, गेल्या वर्षी तिथे १० लाख ३७ हजार पर्यटक आले होते. पण आता रोज १६०० पर्यटकांनाच आत जाण्यास परवानगी दिली जाते.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • सेना दिन - इजिप्त

जन्म /वाढदिवस

  • संगीतकार सलील कुलकर्णी यांचा जन्म : ०६ ऑक्टोबर १९७२

  • थॉर हायरडाल, नॉर्वेजियन मानववंशशास्त्रज्ञ व शोधक : ०६ ऑक्टोबर १९१४

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  •  दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक : ०६ ऑक्टोबर १९७९

  • भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचे निधन : ०६ ऑक्टोबर १९७४

  • महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे निधन : ०६ ऑक्टोबर २००७

ठळक घटन

  • पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली : ०६ ऑक्टोबर १९४९

  • फिजी प्रजासत्ताक झाले : ०६ ऑक्टोबर १९८७

  • पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले : ०६ ऑक्टोबर १९६३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.