चालू घडामोडी ०६ जून २०१८

Date : 6 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगाच्या तुलनेत जास्त तास काम करुनही मुंबईकरांना मिळतो कमी मोबदला - अहवाल :
  • आर्थिक राजधानी असलेल्या मुंबानगरीत देशभरातील नागरीक नोकरी-व्यवसायासाठी रोज येत असतात. मुंबई आपल्याला उपाशी ठेवणार नाही ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. त्याचप्रमाणे मुंबईत दिवसागणिक असंख्य लोकांना नोकरीही मिळते. हे कर्मचारी जगातील प्रमुख शहरांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सर्वात जास्त काम करणारे कर्मचारी असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

  • स्विस बँकेच्या युबीएस रिपोर्टमधून ही बाब समोर आली आहे. या अहवालासाठी जगातील ७७ शहरांचा अभ्यास कऱण्यात आला. त्यामध्ये पॅरीस, रोम, न्यूयॉर्क यांसारख्या शहरांमध्ये मुंबईतील कर्मचारी अव्वल आहेत. या अहवालानुसार मुंबईतील कर्मचारी वर्षाला सरासरी ३,३१४ तास काम करतात.

  • या कमाईच्या तुलनेत मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीचा महिना खर्च जास्त असतो. मुंबईतील घराच्या भाड्याचा खर्च हा न्यूयॉर्कच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी जास्त आहे. तासांप्रमाणे मिळकतीचा विचार केल्यास जिनेव्हा, झुरीक ही शहरे आघआडीवर आहेत. या यादीत मुंबईचा क्रमांक सर्वात खाली आहे.

  • याबरोबरच मुंबईमधील कर्मचाऱ्यांमध्ये सुटी घेण्याचे प्रमाणही कमी आहे. हे कर्मचारी वर्षातून सरासरी १० सुट्या घेतात असे या अहवालात नोंदविण्यात आले आहे. मुंबईतील कर्मचाऱ्याला iPhone X खरेदी करायचा असल्यास त्याला ९०० तास काम करावे लागणार आहे. म्हणजेच जास्त तास काम करुनही मुंबईकरांना कमी मोबदला मिळतो.

गौरी लंकेश यांचे नाव अमेरिकेतील ‘न्युझियम’च्या स्मारकात :
  • वॉशिंग्टन : पत्रिकारिता आणि बातम्यांचा इतिहास सांगणारे जगातील सर्वांत मोठे संग्रहालय असलेल्या ‘न्युझियम’मधील पत्रकारांच्या स्मारकामध्ये गौरी लंकेश व सुदीप दत्ता भौमिक या दोन भारतीयांसह अठरा पत्रकारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

  • जागतिक स्तरावर प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर जी गदा आणली जात आहे त्याची तीव्रतेने जाणीव सर्वांना व्हावी या हेतूने अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे ‘न्युझियम’ संग्रहालयात पत्रकारांचे हे स्मारक उभारले आहे. त्यात यंदा आठ महिलांसह अठरा पत्रकारांची नावे समाविष्ट केली आहेत.

  • गौरी लंकेश यांच्याविषयी न्युझियमने म्हटले की, भारतातील जातीव्यवस्था व हिंदु मुलतत्त्ववादावर घणाघाती प्रहार करणारे लेख गौरी लंकेश नेहमी लिहीत. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी हल्लेखोराने गोळ््या झाडून हत्या केली व तो पळून गेला. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व हिंदुत्ववादी राजकारणावर सातत्याने कडाडून टीका करीत असत. लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी एका व्यक्तीवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

  • सुदीप दत्ता भौमिक या पत्रकाराच्या कामगिरीचा गौरव करताना ‘न्युझियम’ने म्हटले आहे की, निमलष्करी दलातील भ्रष्टाचार सुदीप यांनी त्रिपुरातील एका वृत्तपत्रात लेखन करुन उजेडात आणला होता. त्यानंतर एक आठवड्याने निमलष्करी दलाचा एक अधिकारी तपन देववर्मा याने सुदीप यांना २१ नोव्हेंबर २०१७ रोजी भेटायला बोलावले.

४५० रुपयांमध्ये 'ही' कंपनी दर महिन्याला देणार तब्बल १००० जीबी डेटा :
  • मुंबई: व्होडाफोननं यू ब्रॉडबँडनं वायर्ड ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये काही नवे प्लान्स लाँच केले आहेत. यामध्ये वर्षभराच्या मुदतीच्या एका नव्या प्लानचा समावेश आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना 12 टीबी डेटा दिला जाणार आहे. या प्लानमधील ग्राहकांना 78 एमबीपीएसचा स्पीड मिळेल. यासाठी ग्राहकांना दर महिन्याला 450 रुपये द्यावे लागतील. 

  • YOU प्लानमधील 12 टीबीच्या प्लानची किंमत 5,399 रुपये (करांसहीत) आहे. म्हणजेच या प्लानसाठी ग्राहकाला महिन्याकाठी 450 रुपये मोजावे लागतील. कंपनीनं 78 एमबीपीएसच्या स्पीडचे तीन नवे ब्रॉडबँड लाँच केले आहेत. यामध्ये 3 टीबी डेटाच्या प्लानचाही समावेश आहे. हा प्लान 90 दिवसांचा असून त्यासाठी ग्राहकाला दर महिन्याला 649 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच तीन महिन्यांसाठी ग्राहकाला 1,947 रुपये (करांसहित) मोजावे लागतील. 

  • व्होडाफोननं याच धर्तीवर 6 टीबीचा प्लानदेखील लाँच केला आहे. या प्लानची मुदत 180 दिवस आहे. यासाठी ग्राहकाला दर महिन्याला 486 रुपये मोजावे लागतील. तर सहा महिन्यांसाठी 2,915 रुपये (करांसहित) द्यावे लागतील. तर वर्षभराच्या प्लानसाठी ग्राहकाला दर महिन्याला 450 रुपये द्यावे लागतील.

  • हे प्लान्स घेणाऱ्या ग्राहकांना इन्स्टॉलेशनसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. याशिवाय राऊटरदेखील मोफत मिळेल. मात्र सध्या तरी हा प्लान कंपनीनं हैदराबादपुरता मर्यादित ठेवला आहे. तशी माहिती कंपनीनं संकेतस्थळावर दिली आहे. 

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पदोन्नतीमधील आरक्षण कायम राहणार :
  • नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला एससी/एसटी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची परवानगी दिली आहे.

  • घटनापीठ या मुद्द्यावर अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत सरकार पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ शकतं, असं सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारलं सांगितलं.

  • सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू मांडताना एएसजी मनिंदर सिंह म्हणाले की, "कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणं ही सरकारची जबाबदारी आहे. देशातील विविध उच्च न्यायालयाच्या निर्णयांमुळे ही पदोन्नती थांबली होती." सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय देताना, सर्व प्रकरणं एकत्र केली आणि याची सुनावणी घटनापीठ करणार आहे.

  • नोकरीत पदोन्नतीमध्ये आरक्षणाबाबत विविध उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वाणिज्य मंत्रालयाने 30 सप्टेंबर 2016 रोजी आदेश काढून सर्व प्रकारच्या पदोन्नतीवर बंदी घातली होती.

  • दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल केल्याने मोदी सरकारवर टीका होत आहे. यानंतर देशभरात दलितांचा आक्रोश समोर आला होता. परंतु या निर्णयामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळू शकतो.

सायना-सिंधूचा आता गोपीचंद यांच्या वेगवेगळ्या अकॅडमीत सराव :
  • मुंबई : एकाच शहराच्या रहिवासी आणि एकाच प्रशिक्षकाच्या शिष्या... मात्र फुलराणी सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंनी स्वतंत्र सराव करण्याला पसंती दिली आहे.

  • सायना आणि सिंधू या दोघीही प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या हैदराबादमधल्या दोन वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये सराव करत आहेत. एकमेकींच्या रणनीतीची किंवा एकमेकींच्या भात्यातल्या नव्या अस्त्रांची दुसरीला कल्पना येऊ नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.

  • ऑस्ट्रेलियात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या दोघींमध्ये महिला एकेरीची फायनल झाली होती. त्यात सायनानं सिंधूवर मात करुन सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर सिंधूनं एक नवा विचार मांडून गोपीचंद यांच्या जुन्या अकॅडमीत सराव सुरु ठेवला आहे. सायना नेहवालनं मात्र नव्या अकॅडमीतल्या सुविधांचा वापर करायला सुरुवात केली आहे.

  • गोपीचंद यांना आपला वेळ दोन अकॅडमीमध्ये विभागून द्यावा लागत आहे. परंतु आपली काहीही हरकत नसल्याचं ते म्हणतात. दोघीही जणी स्वतंत्र सराव करण्यात कम्फर्टेबल असल्याचं गोपीचंद यांनी सांगितलं.

नेपाळचे गुरखे करणार डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांचे संरक्षण :
  • सिंगापूर- सिंगापूर येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची भेट होणार आहे. गेल्या वर्षभराच्या तणावानंतर होत असलेल्या या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या महिन्यामध्ये किम जोंग उन यांची दक्षिण कोरियाचे पंतप्रधान मून जाए इन यांची भेट झाली.

  • त्यावेळेस अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. त्याहून ही अधिक महत्त्वाची भेट असल्यामुळे सुरक्षा व्यवस्थाही तितकीच कडक असणार आहे. या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी नेपाळच्या गुरख्यांकडे देण्यात आलेली आहे.

  • हे दोन्ही नेते त्यांचे संरक्षण करणारे स्वतःचे समूह घेऊनच सिंगापूरमध्ये येणार आहेत. तसेच सिंगापूर पोलीस, गुरखा सुरक्षारक्षकांचे दल शिखर परिषदेच्या जागेचे रक्षण करेल. रस्ते, हॉटेल्स आणि मुत्सद्दी, राजनयीक अधिकारी या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारीही गुरख्यांकडे आहे.

  • सिंगापूरमध्ये गुरख्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे संरक्षण सचिव जीम मॅटिस यांनी सिंगापूरला भेट दिली तेव्हाही सुरक्षेची जबाबदारी गुरख्यांकडे देण्यात आली होती. 

  • नेपाळच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या या गुरख्यांना सिंगापूर पोलिसांनी भरती करुन घेतले आहे. सुरक्षा जॅकेट्स, बेल्जीयन बनावटीचे स्कार कॉम्बॅट अझॉल्ट रायफल, पिस्तुले असे ते सुसज्ज असतील.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६७४: रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

  • १८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

  • १९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.

  • १९३३: अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थिएटर सुरू.

  • १९४४: डी डे, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.

  • १९६८: अमेरिकेचे राष्ट्रपती उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांची हत्या.

  • १९७१: सोव्हिएत संघाने सोयुझ ११ चे प्रक्षेपण केले.

  • १९७४: स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.

  • २००४: भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलम यांनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.

जन्म

  • १९०१: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०)

  • १९०३: भारतीय धर्मगुरू बख्त सिंग यांचा जन्म.

  • १९०९: अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेशरंगो भिडे यांचा जन्म.

  • १९२९: भारतीय अभिनेते सुनीलदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २००५)

  • १९९१: सुशिल अत्तरदे यांचा जन्म.

मृत्यू

  • १८६१: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८१०)

  • १८९१: कॅनडाचे पंतप्रधान सरजॉन ए. मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८१५)

  • १९४१: शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे संस्थापक लुईस शेवरोलेट यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर१८७८)

  • २००२: मराठी कवयित्री शांता शेळके यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.