केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (AICTE) अस्तित्व संपुष्टात आणण्यात येणार आहे.
त्याऐवजी उच्च शिक्षणासाठी एकच नियामक यंत्रणा आणण्याचा सरकारचा विचार आहे. असे झाल्यास ६१ वर्षांपूर्वीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे.
केंद्र सरकार उच्च शिक्षण क्षेत्रावरील देखरेखीसाठी हायर एज्युकेशन एम्पॉवरमेंट रेग्युलेशन एजन्सी अर्थात ‘हिरा’ हा नवा कायदा लागू करण्याबाबत विचार करत आहे. या संदर्भातील निर्णय सरकारने मार्चमध्ये घेतला होता.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि नीती आयोगाने हायर एज्युकेशन एम्पॉवरमेंट रेग्युलेशन एजन्सी अर्थात ‘HEERA’ हा कायदा लागू करण्यासंबंधी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सरकारने एक समितीही स्थापन केली आहे.
या समितीत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि उच्च शिक्षण विभागाचे सचिव के. के. शर्मा यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे.
पाकिस्तान विरोधातील विजयानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोमवारी लंडनमध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातून जस्टिस एंड केयर ऑर्गनाइजेशनला फंड(पैसे) गोळा करणे हा उद्देश होता. ही ऑर्गनाइजेशन मानवी तस्करी थांबवण्यासाठी प्रयत्न करते आहे.
कोहलीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय माल्ल्यानेही उपस्थिती लावली होती. विजय माल्ल्या आपल्या बायकोसह या कार्यक्रमात आला होता.
कोच अनिल कुंबळे, माजी कर्णधार धोनी, युवराज, केदार जाधवसह इतर भारतीय खेळांडूनीही हजेरी लावली होती. एक्स्ट्राटाइम डॉट कॉम ने विजय माल्ल्या कार्यक्रमाला आलेल्या क्षणांचा व्हिडिओ यू-ट्यूब पेज अपलोड केला आहे.
भारत - पाकिस्तान सामन्यासाठी माझ्या उपस्थितीला मीडियाने खूप कव्हरेज दिला. भारतीय संघाला चिअर करण्यासाठी सगळ्या सामन्यांना उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे', असं सांगत माल्ल्याने आपण बिनधास्तपणे स्टेडिअममध्ये येऊन सामने पाहणार असल्याचं सांगत एकाप्रकारे आव्हानच देऊन टाकलं आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या जीएसएलव्ही एमके-३ या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या प्रक्षेपकाचे (रॉकेट) श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
जीएसएलव्ही एमके-३ हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा उपग्रह प्रक्षेपक असून, त्यात भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक या शक्तिशाली इंजिनाचा वापर करण्यात आला आहे.
सतीश धवन केंद्राच्या दुसऱ्या तळावरून सायंकाळी ५ वाजून २८ मिनिटांनी हा प्रक्षेपक अवकाशात झेपावला. या प्रक्षेपकाद्वारे ३.१३ टन वजनाचा 'जी सॅट-१९' हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठविण्यात आला असून, प्रक्षेपनानंतर १६ मिनिटांनी तो अवकाशात सोडण्यात आला.
तसेच आगामी काळात या प्रक्षेपकाद्वारे अंतराळवीरांना अवकाशात पाठविणेही शक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या यशस्वी प्रक्षेपणामुळे चार टन वजनाचे उपग्रह स्वबळावर अवकाशात पाठविण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली असून, यापूर्वी २.३ टनापेक्षा अधिक वजनाचे उपग्रह अवकाशात पाठविण्यासाठी भारताला इतर देशांची मदत घ्यावी लागत होती, मात्र, हे अवलंबित्व आता संपुष्टात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मंगळवार, ६ जून रोजी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येणार आहे. सोहळ्याला राज्यभरातून हजारो शिवभक्त उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीच्या वतीने गडावर ५ व ६ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात गडपूजनाने होणार आहे.
६ जूनला पहाटे गडावरील नगारखान्यासमोर ध्वजारोहण, त्यानंतर संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मुख्य राज्याभिषेक सोहळा होणार आहे.
तसेच या वेळी शिवरायांच्या उत्सवमूर्तीवर छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस.टी.च्या मे २०१७ या महिन्याच्या उत्पन्नात नांदेड विभाग राज्यात प्रथम आला आहे.
यानिमित्ताने नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक नंदकुमार कोलारकर यांचा नुकताच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते मुंबईत सत्कार करण्यात आला.
एस.टी. महामंडळाच्या बसेस सध्या अवैध प्रवासी वाहतुकीला तोंड देत प्रवाशांची अखंडपणे गेल्या ६८ वर्षापासून सेवा देत आहेत.
अवैध प्रवासी वाहतुकीच्या संकटावर मात करीत प्रवाशांसाठी विविध सोयी- सवलती देत आहेत.
मे २०१७ या महिन्याच्या उत्पन्नात नांदेड विभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून सरासरीच्या तीन करोड एवढे उत्पन्न नांदेड विभागाने गाठले आहे.
नांदेड विभागाचे कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले विभाग नियत्रंक नंदकुमार कोलारकर यांनी नांदेड विभागाचे विभाग नियत्रंक म्हणून मे २०१६ मध्ये सुत्रे स्वीकारली.
मुस्लिम ब्रदरहूड, अल कायदा, इस्लामिक स्टेटला (आयएस) पाठिंबा देणे आणि इराणशी संबंध असल्याबद्दल चार अरब देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडले. या निर्णयामुळे आखातातील अरब देशांतील संबंध आणखी ताणले गेले आहेत.
बहारिन, इजिप्त, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातने कतारशी संबंध तोडल्याची घोषणा करताना आम्ही आमचे राजनैतिक कर्मचारी माघारी बोलावत आहोत, असे सांगितले.
एमिरेट्स या विमान कंपनीने कतारमधील विमान सेवा बंद करण्याचे ठरविले असून, त्याची अंमलबजावणी होणार आहे.
कतार हा नैसर्गिक वायूने समृद्ध असून २०२२ मध्ये जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद त्याच्याकडे आहे. शिवाय अमेरिकेचा कातारमध्ये १० हजार सैनिकांचा महत्त्वाचा लष्करी तळही आहे.
सौदी अरेबियाने सध्या येमेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातून कतारी सैनिकांच्या तुकड्यांना काढून घेण्यात येईल, असे म्हटले.
जन्म, वाढदिवस
प्रसिद्ध मराठी विश्वकोशकार गणेश रंगो भिडे यांचा जन्म : ०६ जून १९०९
ठळक घटना
शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक : ०६ जून १६७४
जागतिक वन दिन : ०६ जून
इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत शीख अतिरेक्यांचा नाश करण्यासाठी लष्कराच्या मदतीने सुवर्णमंदीरावर हल्ला चढविला : ०६ जून १९८४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.