चालू घडामोडी - ०६ जुलै २०१७

Date : 6 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताने जिंकली आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप : 
  • भारताचा स्टार खेळाडू पंकज अडवाणी याने बुधवारी येथे लक्ष्मण रावतच्या साथीने अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारत आशियाई सांघिक स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली.

  • सर्वात आधी अडवाणीने मोहंमद बिलालविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली असून पाकिस्तानी खेळाडूने अडवाणीविरुद्ध फाऊलने पहिलागुण मिळवला; परंतु भारतीय खेळाडूने ८३ च्या शानदार ब्रेकने जोरदार मुसंडी मारत बेस्ट आॅफ फाइव्ह फायनलमध्ये पहिला फ्रेम आपल्या नावावर केला.

  • दुसरीकडे त्याचा सहकारी रावतनेदेखील अशाच प्रकारची सर्वोत्तम कामगिरी करताना निराश केले नाही. त्याने संधीचे सोने करताना बाबर मसिह याला धूळ चारली.

आय फॉर इंडिया, आय फॉर इस्रायल !
  • व्यापार आणि उद्योगांमध्ये ‘आय’ म्हणजे ‘आय’, पण मी आय म्हणजे इंडिया आणि आय म्हणजे इस्रायल असे संबोधू इच्छितो.

  • इंडिया इस्रायलसोबत आणि इंडिया इस्रायलसाठी असा त्याचा अर्थ होतो, असा मैत्रीचा नवा मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्रपती रुवेन रिवलीन यांची भेट घेतल्यानंतर घोषित केला.

  • मोदी आणि रिवलीन यांच्या द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंबंधी चर्चाही झाली. तसेच रिवलीन यांनी नोव्हेंबरमध्ये भारतात आल्याच्या आठवणींनाही उजाळा दिला. मोदी म्हणाले की, ‘‘राष्ट्रपती रिवलीन यांनी स्वत: रस्त्यावर येऊन माझे स्वागत करणे हा माझा सन्मान नाही तर सव्वाशे कोटी भारतीय जनतेचा सन्मान आहे.’’

  • मोदी यांनी रिवलीन यांच्या निवासस्थानी असलेल्या गेस्टबुकमधील संदेशात लिहिले की, ‘‘रिवलीन यांची भेट अत्यंत उत्साहवर्धक होती. त्यांनी नोव्हेंबरमध्ये केलेल्या भारत दौऱ्याची यावेळी आवर्जून आठवण होते.

  • यावेळी इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून ‘मेक इन इंडिया’ योजना आणखी सक्षम बनविण्याचा मानसही यावेळी व्यक्त करण्यात आला.

महिला क्रिकेट विश्वचषक : भारताचा विजयी ‘चौकार’ :
  • दीप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राज यांच्या शानदार अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवताना श्रीलंकेला १६ धावांनी नमवले.

  • भारताने प्रथम ५० षटकात ८ बाद २३२ धावा उभारल्यानंतर, श्रीलंकेमे ५० षटकात ७ बाद २१६ धावा काढल्या.

  • धावांचा पाठलाग करताना लंकेने सावध सुरुवात केली. दिलानी मनोदरा (६१), शशिकला सिरिवर्देने (३७) आणि निपुनी हंसिका (२९) यांच्या जोरावर श्रीलंकेने आपले आव्हान कायम राखले होते.

  • अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी मोक्याच्यावेळी प्रत्येकी २ बळी घेत लंकेची कोंडी केली असून दीप्ती आणि एकता बिस्त यांनीही प्रत्येकी एक बळी घेत चांगला मारा केला. 

सिक्किमप्रश्नी कुटनीतीच्या माध्यमातूनच तोडगा, भारताची स्पष्ट भूमिका :
  • सिक्किमच्या सीमेलगत असलेल्या डोका ला प्रदेशात चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गेले सुमारे महिनाभर तणातणी सुरू आहे. 

  • मात्र, या प्रश्नी चीनसमोर झुकायचं नाही असे स्पष्ट करत हा प्रश्न केवळ कुटनीतीच्या माध्यमातूनच सिक्किम विवादावर तोडगा निघेल, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतली आहे.  

  • बुधवारी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितले की,  हा मुद्दा कुटनीतीच्या माध्यमातून सोडवला जाऊ शकतो.

  • चीनमधील सैनिकांनी तेथेच राहावे जेथे ते सुरुवातीपासून होते. त्यांनी भुतान परिसरात घुसखोरी केली आहे. त्यांनी या परिसरात येऊ नये. हा आमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि हीच आमची भूमिका आहे.

मोदींकडून इस्रायलमधील मराठी नियतकालिक 'मायबोली'चा उल्लेख :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर आहेत, दुसऱ्या दिवशी कन्वेन्शन सेंटरमध्ये भारतीय समुदायाच्या नागरिकांना संबोधित करताना मोदींनी इस्रायलमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘मायबोली’ या मराठी नियतकालिकाचा उल्लेख केला.

  • ‘इस्रायलमध्ये मायबोली या मराठी भाषेतील नियतकालिकाचं प्रकाशन होत असल्याचं ऐकून आनंद झाला.

  • नोआ मोसिल हे मायबोलीचे संपादक आहेत. विशेष म्हणजे गेल्या ४५ वर्षांपासून जेरुसलेममध्ये या अंकाचं नियमित प्रकाशन होतं.

  • नोआ मोसिल हे मराठी भाषिक ज्यू आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण महाडमधील तळा गावात झालं आहे.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • आचार्य प्रफ़ुल्ल चंद्र रॉय स्मृतिदिन : ०६ जून १९४४

  • हिंद महासभेचे नेते व जैन संघाचे पहिले अध्यक्ष डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म : ०६ जून १९०१

  • लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका : ०६ जून १९०५

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती : ०६ जून २००२

  • जगजीवनराम, भारतीय राजकारणी : ०६ जून १९८६

ठळक घटना

  • दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड : ०६ जून १८९२

  • भारत व तिबेटमधील नथु ला खिंड व्यापारास खुली : ०६ जून २००६

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.