मुंबई : लोकलमधील महिला सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे. त्यानुसार महिला बोगीत सीसीटीव्ही कार्यरत असलेली पहिली बम्बार्डिअर लोकल मंगळवारी (उद्या) मुंबईत दाखल होणार आहे. या लोकलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वीज कमी वापरणारे पंखे आणि अन्य उपकरणांचा समावेश आहे. लोकलमध्ये महिला सुरक्षेसह एलईडी दिव्यांचीही व्यवस्था आहे.
चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बम्बार्डिअर लोकलची बांधणी करण्यात आली आहे. सर्व महिला बोगींत सीसीटीव्ही हे थेट कोच फॅक्टरीतूनच बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर ‘लो कंझ्युम पॉवर’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सामान्य लोकलमधील ट्युबलाईटच्या जागी या लोकलमध्ये एलईडी दिवे कार्यान्वित करण्यात आले आहेत. ही लोकल सध्या भुसावळ येथे पोहोचली असून नियोजित वेळापत्रकानुसार येत्या २४ तासांत मुंबईत दाखल होणार आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सर्व लोकलमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवर ४० लाख प्रवासी सीएसएमटी ते कल्याण-कसारा-कर्जत या मार्गावर प्रवास करतात. त्यांना आधुनिक बम्बार्डिअर लोकलमुळे फायदा होणार आहे. ही लोकल सध्या कोणत्या मार्गावर चालविण्यात येणार याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
वेग क्षमता ताशी १०५ किमी बम्बार्डिअर लोकलची वेग क्षमता ताशी १०५ किमी इतकी आहे. ही लोकल मेन मार्गावर मेल-एक्स्प्रेसच्या बरोबरीत धावण्याची शक्यता आहे. परिणामी लोकल फेºयांची संख्या वाढविता येईल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. मध्य रेल्वेच्या बम्बार्डिअर लोकलच्या पाठोपाठ मेधा लोकलच्या बांधणीचे कामही वेगाने पूर्ण होत आहे.(source :lokmat)
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) अधिकृत वेबसाइट डोमेनचे नूतनीकरण न झाल्यामुळे १८ तासांपर्यंत आॅफलाइन राहिल्यानंतर आज वेबसाइटची सेवा पुन्हा सुरू झाली.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाने आपल्या वेबसाईटच्या नूतनीकरणाचे पैसे भरले नव्हते. या डोमेनला आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी खरेदी केले होते.
वेबसाइटची नोंदणी करणाºया रजिस्टर डॉट कॉम आणि नेमजेट डॉट कॉमने या डोमेनच्या नावाला सार्वजानिक बोलीसाठी ठेवले होते आणि त्यावर सात बोली लागल्या होत्या, त्यात सर्वांत मोठी बोली २७0 डॉलरची होती. हे डोमेन २ फेब्रुवारी २00६ पासून ते २ फेब्रुवारी २0१९ पर्यंत कायदेशीर आहे. अपडेट करण्याची तारीख ३ फेब्रुवारी २0१८ होती.
बोर्डाची ही वेबसाईट रविवारी सायंकाळपर्यंत चालू होऊ शकली नव्हती. सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे त्या वेळेस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे दुसरा वनडे खेळत होता.(source :lokmat)
मुंबई : देशातील सर्व निवडणूक प्रक्रिया ईव्हीएमऐवजी मतपत्रिकाद्वारे घेण्याची मागणी करत, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीने बुधवारी, ७ फेब्रुवारीला राज्यव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे पार्टीचे अध्यक्ष अॅड. सुरेश माने यांनी सांगितले की, ईव्हीएमद्वारे निवडणूक धोरण राबविताना व्ही. व्ही. पैट पेपर ट्रेल व्यवस्था असणे आवश्यक आहे. यंत्रणा सक्षम होत नाही, तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकांद्वारेच
मतदान घ्यावे. या मागणीसाठी वांद्रे पूर्वेकडील जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय भवनावर बुधवारी निदर्शने करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली - भारताची पाचवेळची जगज्जेती महिला बॉक्सर एमसी मेरी कोमचा ड्रीम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं लटकला आहे. मेरी कोमनं मणिपूरची राजधाळी इंफाळपासून 10 किलोमिटर दूर लांगोल हिस्ल येथे एक बॉक्सिंग अकादमी तयार केली आहे. ही अकादमी दोन वर्षापूर्वी तयार झाली आहे. पण औपचारिक उद्धाघाटनासाठी अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहत आहे. यासाठी मेरी कोमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारणा केली होती. पण त्याचे अजून उत्तर मिळालेले नाही. त्यामुळं मेरी कोमचा ड्रीम प्रोजेक्ट तयार होऊनही सर्वांसाठी खुला झालेला नाही.
दरम्यान, मेरी कोम आपल्या अकादमीच्या विस्तारासाठी प्रयत्नशील आहे. तीन एकर क्षेत्रामध्ये तयार झालेल्या या अकादमीत सध्या 25 तरुण आणि 20 महिला बॉक्सिंगचे धडे घेत आहेत. तीन मजली इमारतीमध्ये बॉक्सिंगसाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.
मेरी कोमचे पती आणि अकादमीचे मुख्य ओनलर कारोंग म्हणाले की, मेरी बॉक्सिंगला ती काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न करतेय. तिला ज्या अडचणीचा सामना करावा लागला तो इतरानां लागू नये. हा तिचा उद्देश आहे. या अकादमीतून अनेक युवा-युवतीला बॉक्सिंगचे धडे मिळतील. या अकादमीची निर्मीती म्हणजे मेरी कोमचे स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. मणिपूर आणि देशातील अन्य भागात ती अशाच प्रकारच्या अकादमी उघडण्याचे स्वप्न पाहत आहे.
अधुनिक साहित्या आणि सुविधा असलेली ही भारताची पहिलीच अकादमी असल्याचे मत मेरी कोमच्या पतीनं व्यक्त केलं. पुढे ते म्हणाले की, ही अकादमी तयार होवून दोन वर्ष झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन करावं असे आम्हाला वाटते. अकादमीमध्ये भारतीय क्रिडा प्राधिकरण (साई)ते अक्सटेंशन सेंटर आहे. मेरी कोम क्षेत्रीय बॉक्सिंगचा हा एक भाग आहे.(source :lokmat)
मुंबई : समाजमाध्यमांमध्ये मराठीतून साधला जाणारा संवाद, स्फूट लेखन यांना प्रोत्साहित करण्याबरोबरच, मराठी भाषेवर इतर भाषांचे होणारे आक्रमण रोखले पाहिजे. परकीय शब्दांकडे सोय म्हणून न पाहता, आपल्या अभिजात मराठी भाषेचे संवर्धन करण्याची तळमळ ठेवत, तिचे वैभव सांभाळले पाहिजे. शब्दांबरोबरच त्या परकीय संस्कृतीचेही आक्रमण आपल्यावर होत असते, हे ध्यानात घेतले पाहिजे व ही गुलामगिरी रोखली पाहिजे, असे परखड विचार ज्येष्ठ साहित्यिका विनया खडपेकर यांनी मांडले.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपार्ले शाखेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने, एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन रविवारी विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात करण्यात आले. त्याचे उद्घाटन उद्योजक प्रसाद पाटील यांनी केले.
या वेळी संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनप्रमुख माधवी कुंटे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, भरारी प्रकाशनच्या लता गुठे व विश्वघर संस्थेच्या रेखा नार्वेकर यांच्या सहकार्याने झालेल्या या संमेलनात, स्वागताध्यक्ष डॉ. पुष्पा रमेश प्रभू, सुप्रसिद्ध साहित्यिक सुमेध रिसबूड व ज्येष्ठ साहित्यिका स्मिता भागवत यादेखील उपस्थित होत्या.
ग्रंथसेवक हा वाचक आणि साहित्यिक यांच्यातील दुवा असून, त्याच्या कार्यामुळेच ग्रंथ व साहित्य अधिक समृद्ध आणि प्रौढ होते. त्यामुळे त्याचे महत्त्व विशेष अधोरेखित व्हायला हवे, असे मत सुमेध रिसबूड-वडावाला यांनी व्यक्त केले. स्मिता भागवत यांनी अनुवादित साहित्याचे प्रमाण वाढले पाहिजे व त्याचबरोबर, त्यात केवळ अनुवाद नको, तर भावानुवाद असला पाहिजे व अशा साहित्याच्या निर्मितीवर भर दिला गेला पाहिजे, असे मत मांडले.(source :lokmat)
मुंबई : मराठी रंगभूमीवर ‘लिटल थिएटर’ची रुजवात करणा-या ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य निर्मात्या सुधा करमरकर(८५) यांचे सोमवारी सकाळी वांद्रे रेक्लमेशन येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात मुलगा मिलिंद करमरकर आहे. बालनाट्य चळवळीच्या प्रणेत्या म्हणून सुधातार्इंचे रंगभूमीवरील योगदान न विसरता येण्याजोगे आहे. त्यांच्या निधनामुळे बालनाट्य चळवळ पोरकी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सुधा करमरकर यांचा जन्म १९३४मध्ये मुंबईत झाला. राज्य शासनाचा ‘प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता.
गाजलेली बालनाट्ये ‘लिटल थिएटर’च्या माध्यमातून ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’, ‘अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा’, ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘चिनी बदाम’, ‘गणपती बाप्पा मोरया’ ही सुधातार्इंनी सादर केलेली बालनाट्ये लोकप्रिय ठरली. व्यावसायिक रंगभूमीवरही त्यांनी भूमिका साकारल्या. ‘पुत्रकामेष्टी’, ‘बेईमान’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या.
बाल रंगभूमीच्या विकासासाठी समर्पित भावनेने आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या सुधा करमरकर यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अमेरिकेत जाऊन त्यांनी बाल रंगभूमी संकल्पनेचा विशेष अभ्यास केला होता. या चळवळीच्या त्या खºया अर्थाने अध्वर्यू होत्या.(source :lokmat)
महत्वाच्या घटना
१६८५: जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.
१९१८: ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.
१९३२: कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.
१९३२: प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
१९४२: दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.
१९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली.
१९५९: जॅक किल्बी यांनी इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.
१९६८: फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
जन्म
१९११: अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून २००४)
१९१२: ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण एव्हा ब्राउन यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)
१९१५: आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९९८)
१९४५: जमैकन संगीतकार बॉब मार्ले यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १९८१)
१९५२: ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी डॉ. रिक चार्ल्सवर्थ यांचा जन्म.
१९८३: क्रिकेटपटू एस. श्रीशांत यांचा जन्म.
मृत्यू
१८०४: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १७३३)
१९३१: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन. (जन्म: ६ मे १८६१)
१९३९: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे निधन.(जन्म: १० मार्च १८६३)
१९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १८९५)
१९७६: चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५)
१९९३: अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अॅश यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९४३)
२००१: केन्द्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.